आईचे प्रेम​

Submitted by मराठी प्रेमी on 9 March, 2026 - 15:18

दोन शाळकरी मित्र असतात - मोहन आणि रमेश. खूप छान मैत्री असते त्यांची. एक दिवस रमेश मोहन बरोबर पैज लावतो. पैज सुद्धा साधी नव्हे, अत्यंत कठिण अशी ती पैज असते.

रमेश मोहन ला म्हणतो, "मोहन​, तुला पैज लावायला खूप आवडतं ना? चल आपण एक पैज लाऊ."

मोहन कसला घाबरतोय​? तातडीने तो रमेश ला म्हणतो, "हो, सांग की, काय करू? वरुण च्या सायकल ची हवा काढू की गणिताच्या बाईंचा डबा चोरून आणू?"

त्यावर रमेश हसून म्हणतो, "छे छे, हे तर खूप जुनं झालं, आणि सोपं सुद्धा. ह्यावेळेस पैज साधी नाही आहे, ह्यात तुला तुझी हुशारी वापरायची आहे, मेंदू वापरायचा आहे. आहे नं तुझ्याकडे? की घाबरलास हारशील म्हणून​?

मोहन ने "च्यॅक्" करून रमेशचं बोलणं उडवून लावतो. मग रमेश पैज सांगू लागतो.

"हे बघ मोहन, पैज अशी आहे, तुला तुझ्या आईचं ह्रुदय आणायचं आहे. ह्या पैजेतला अर्थ खूप खोल आणि मार्मिक आहे, तो तुला समजला तर तू जिंकलास​, नाही तर हरलास​. जमेल ना?"

मोहन परत​ रमेशचं बोलणं उडवून लावतो व म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? हा गेलो आणि हा आलो."

आता मोहन जे करतो ते अगदी अनपेक्षित असतं. तो त्याच्या आई कडे जातो आणि तिचं ह्रुदय कापून घेवून येतो. धावत धावत तो येत असताना मध्ये एक दगडावरून तो पडतो.

मग त्या ह्रुदयातून एक प्रेमळ आवाज येतो, "बाळा, लागलं नाही ना रे?"

Group content visibility: 
Use group defaults