Submitted by मुग्धमानसी on 28 January, 2026 - 11:43
खूप कडाडून भूक लागल्यावर तो येतो स्वयंपाकघरात.
उचकटतो डबे. चाचपडतो पातेली.
जे मिळेल ते खाऊन घेतो. भसाभसा.
जमेल तितकं. जमेल तसं.
अन् जातो निघून.
तेंव्हा त्याला निवड नसतेच. कारण पर्याय नसतात.
आणि अर्थात् आवडही नसते. कारण निवड नसते.
सवडही नसतेच. कारण आवड नसते.
पर्याय नसतात कारण.... धाडस नसते!
त्याचे स्वत:चेही त्यात काहीही नसते.
निव्वळ भूक!
टाळता न येणारी.
फसफसणारी.
भागली नाही तर गुणाकार होणारी.
चवींत न रेंगाळणारी.
गुणांत न अडकणारी.
त्याला कुणीतरी सांगायला हवं...
की मी नव्हे तुझं स्वयंपाकघर.
मी नव्हे तुझ्या स्वयंपाकघरात दडवलेला खाऊ...
मी नव्हे डबा वा पातेलं.
बोलले नाही.
माझ्यातले जिन्नस तसेही त्याला पचणारे नाहीत!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बापरे थेट बेधडक मस्त
बापरे
थेट
बेधडक
मस्त
धन्यवाद किल्ली.
धन्यवाद किल्ली.
कविता नेहमीप्रमाणे नेमका वेध
कविता नेहमीप्रमाणे नेमका वेध घेणारी.
पण शेवटच्या ओळीत कलाटणी, वेगळं काही दडलंय का या विचारात आधी प्रतिसाद द्यायचा राहिला.
कडक.
कडक.
बेधडक !
बेधडक !
वा, मस्त !
वा, मस्त !
व्वा ! आवडली.
व्वा ! आवडली.
प्रेडिक्टेबल असली तरी छान
प्रेडिक्टेबल असली तरी छान उतरली आहे
एक्दम भारी!
एक्दम भारी!
धन्यवाद!
धन्यवाद!
नमस्कार. तुमची कविता वाचली
नमस्कार. तुमची कविता वाचली तेव्हा मी अशाच विषयाशी संबंधित एक कविता लिहीत होतो. अगदी योगायोगाने. पण पलीकडच्या दृष्टिकोनातून.
मग आजारी पडलो आणि कविता प्रकाशित करायची राहून गेली.
तो प्रचंड भूक लागलेला, काहीही खाणारा व्यक्ती मी होतो. आणि माझा भाऊ ही. आता वाटते की कसे काय जमले हे आईला?
असो. सुंदर कविता. वाचून काही आठवणी जाग्या झाल्या.
कविता छान आहे.. शब्द काळजाला
कविता छान आहे.. शब्द काळजाला चिरत जातात.. वरकरणी मनातच घुसमटलेल्या व्यथा, त्रागा, हतबलता, दडलेल्या विखारांचे मिश्रण वाटते..
पण कदाचित मला नीट अर्थ नाही कळला..
वाचताना म्हणजे मला असे वाटले की, एका असंतुष्ट, हतबल विवाहीत "स्री"ची किंवा प्रेयसीची व्यथा आहे..
तिचा प्रियकर फक्त भूक लागल्यावर ओरबाडून घेतो..
आणि उद्वेगाने तिला त्याला सांगायचं आहे मी फक्त तुझी भूक शमवणारी साधन नाहीये..खरतरं मी कोण आहे मला काय हवयं? हेच त्याला झेपणारं नाहीये आणि म्हणून ती काही बोलतही नाहीये पण मनात ते शल्य आहेच..
काही वेगळया अर्थाने लिहिलेली असेल तर सांगा..
धन्यवाद अजय चव्हाण. तुम्हाला
धन्यवाद अजय चव्हाण. तुम्हाला लागलेला कवितेचा अर्थ मला अपेक्षित अर्थाच्या बर्याच निकट आहे.
खूप सारे धन्यवाद.
आवडली.
आवडली.
छानच !!!
छानच !!!
कविता आवडली
कविता आवडली
धन्यवाद!
धन्यवाद!
मी आली होती कधीतरी
मी आली होती कधीतरी
डब्यांच्या आवाजात,
पातेल्यांच्या खडखडाटात,
तुझ्या घाईच्या श्वासात.
खाल्लंस तू — भसाभसा.
मी काही बोलले नाही.
कारण मला माहीत होतं,
ही भूक माझ्यासाठी नव्हतीच.
मी स्वयंपाकघर नव्हते,
ना दडवलेला खाऊ.
मी तर चव होते —
जिच्यासाठी थांबावं लागतं.
तू थांबलास नाहीस.
म्हणून आजही
डबे जागेवर आहेत,
पातेलीही शांत आहेत —
आणि मीही.
फरक इतकाच…
आता मला भूक लागत नाही.