Submitted by दीपांजली on 14 January, 2026 - 14:02

बिग बॉस मराठी सिझन ६ सुरु झाला आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
स्पर्धक :
दीपाली सय्यद : ( अभिनेत्री/पॉलिटिक्स्ल बॅक्ग्राउंड)
सागर कारंडे : ( कॉमेडियन/ अॅक्टर)
सचिन कुमावत: (खान्देशी गायक)
सोनाली राऊत: (मॉडेल, एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट )
आयुष संजीव: (अॅक्टर )
तन्वी कोलते: (अभिनेत्री)
करण सोनावणे/फोकस्ड इन्डियन : इन्फ्लुएन्सर, कॉमेडियन, क्रिकेट प्लेयर्स/ क्रिकेट क्स्न्टेन्ट साठी फेमस.
प्रभू शेळके:रील स्टार
प्राजक्ता शुक्रे,: इन्डियन आयडॉल सिझन १
अनुश्री माने : मॉडेल्/अॅक्ट्रेस
रुचिता जामदार,: एम टि.व्ही रोडीज एक्स कॉन्टेस्टन्ट
राकेश बापट,: अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
रोशन भजनकर: अमरावतीचा बॉडी बिल्डर
दिव्या शिंदे: युवा नेता
विशाल कोटियन : अॅक्टर/एक्स बिबॉ कॉन्टेस्टन्ट
राधा मुंबईकरः लावणी +आयटेम डान्सर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सध्या तरी करण सोनावणे,
मला सध्या तरी करण सोनावणे, सोनाली राउत, विशाल, सागर करांडे, राकेश बापट ठिक वाटत आहेत.
कॅमेरा फुटेज घेण्यात कालु डॉन यशस्वी झाला आहे , तो छोटा पुढारी +सुरज यांना कॉपी करून कॉमेडी+सिम्पथी कन्टेन्ट देत आहे.
हो , सेम.
हो , सेम.
तन्वी जाम डोक्यात गेली आहे. रुचिताही इरिटेटच करणार असे वाटते. या दोघी मैत्रिणी आहेत म्हणे . एकमेकीतच पहिले भांडण करून घेतले खोटे खोटे , अटेन्शन साठी. बिबॉ मधे ही म्हणजे पहिली ड लेवल स्ट्रॅटेजी!
ओंकार, आयुष काही स्पार्क वाटला नाही अजून तरी. बोअर. सेम विथ प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री.
मला ती प्राजक्ता शुक्रे का
मला ती प्राजक्ता शुक्रे का काय माहित फार अनॉयिंग वाटते , जसा अभिजीत सावन्त कधीही आवडला नाही, सेम त्याच व्हाइब्ज !
कालच्या एपिसोड मधल्या बोल्ड स्टेटमेन्ट नंतर दीपाली सैय्यद विकेन्डला बोलणी खाणार नक्की, पण टोटली अॅग्री विथ हर रिमार्क ऑन राधा मुंबईकर, गौतमी पाटील टाइप सो कॉल्ड लावणी डान्सर्स , मला आवडतय दीपालीचं रोखठोक बोलणं.. क्लिअर अॅन्ड लाउड !
राधाने इथे प्रतिउत्तर करण्याचा मोठ्ठा चान्स सोडला , कदाचित तेवढा कॉन्फिडन्स नसेल काउन्टर अर्गुमेन्ट करायचा म्हणून मागे जाऊन कुरकुर करून आली !
विशाल आणि इतर एक्स्पिरियन्स्ड प्लेअर्स या सगळ्या न्युबीज प्लेअर्सच्या स्ट्रॅटजीज आधीच उलगडून सगळे प्लॅन्स फिसकटवतात याबद्दलही रितेश काहीतरी नक्की बोलणार !
आधी वाटलं होतं कि सोनाली या सिझनची निक्की २.० होणार् , पण ती चक्क आवडतेय मला, अजिबात निगेटिव्ह नाही दिसते आत्ता तरी !
निक्की पेक्षा अनॉयिंग ती तन्वी कोलते आहे.
मला पण बरे वाटत आहेत
मला पण बरे वाटत आहेत कंटेस्टंट्स.अजून तस खास नाही वाटत आहे कोणी .पण तीनच दिवस झाले आहेत.रंगत येईल अस वाटत आहे.
तन्वी आणि रुचिताला ,भांडा ,अस सांगून पाठवल असाव.एरिटेट जास्त करत आहेत .
मला मात्र तो छोटा नाही म्हणजे नाहीच आवडला आणि सिंपथी पण नाही वाटत आहे
बहुतेक जाईल या विक मध्ये.
शुक्रे बाई जरा खोट्या वाटत आहेत.
सरकार सरकारच आहेत .बोलबच्चन नको व्हायला.
करण,रुचिता,सरकार,अनुष्का,प्रभू,आयुष मला माहीत नाहीत.
बापट बावळट वाटला मला.
सागर,दीपाली ,प्रॉमिसिंग वाटत आहेत.
शुक्रेबाईंना नेतील शेवटपर्यंत.
विशाल.आणि सोनाली हिंदीतून आले आहेत.मी त्यांचे सिझन एवढू फॉलो नव्हते केले..
पण विशाल कंटेट देईल काड्या घालून.
सोनाली प्रिमियरच्या दिवशी शॉर्टकट दाराने आत जायच तर बाहेरच जायला लागली तेव्हा बावळट वाटली.पण आता जरा आवडायला लागली आहे.हीना पांचाळची आठवण आली तिचा आवाज,पेहराव बघून.
एकंदरीत बर्यापैकी नवीन चेहरे आणून एक रिस्क घेतली आहे बिबॉसने.
भाऊचा धक्का शेवटपर्यंत व्हायला हवा आणि सिझनही.
एलिमिनेशन पहिल्याच आठवड्यात ठेवल आहे,नसत ना?
करणचा गेम आवडला आज, रुचिताची
करणचा गेम आवडला आज, रुचिताची डोकेफोड काहीही कामी आली नाही !
सोनाली, करण दोघं लाउड मुलींना ज्या प्रकारे इग्नोर करतात, मज्जा येते, रुचिताचा आक्रस्ताळेपणा अजुनच वाढला समोरचा माणुस काही रिअॅक्शन देत नाही बघून
तन्वीने यावेळची ऑफिशल व्हिलन म्हणून स्वतःला फिक्स करायला सुरवात केली आहे, बरोबर विशाल असेल तर स्ट्राँग व्हिलन कपल बनतील ते !
सोनाली प्रिमियरच्या दिवशी
सोनाली प्रिमियरच्या दिवशी शॉर्टकट दाराने आत जायच तर बाहेरच जायला लागली तेव्हा बावळट वाटली.>>>हो खरंच.पहिल्या दिवशी सोनाली मला आवडेल असे अजिबात वाटले नव्हते.पण आता आवडतेय.बर्यापैकी matured पण आहे ती. Nominations पण डोकं वापरुन केले तिने. प्रभू बद्दल पण सेम, तो कितपत खेळेल माहित नाही..पण entertain करतो तो.पहिल्या दिवशी त्याच्या साखर मागणीसाठी खूप हसू आलं. प्राजक्ता सध्या तरी fake नाही वाटत आहे मला.पण खरंच इतकी emotional असेल तर निभाव लागणे कठीणच आहे.
एलिमिनेशन पहिल्याच आठवड्यात
एलिमिनेशन पहिल्याच आठवड्यात ठेवल आहे,नसत ना?>>>असं काही नाही.पहिल्या 2 season मध्ये पहिल्याच आठवड्यात झालं होतं elimination.यावेळी पण असेल तर रोशनची पतंग कटेल बहुतेक
अरे वा.. आला का धागा...
अरे वा.. आला का धागा...
खुप कलकलाट भरलाय यंदा तो हळु हळु कमी होईलच.
करण, सोनाली, सध्या बरे वाटले... करण फार थंड डोक्याचा वाटतोय.. ती चावी घेतली आणि रुचिता ला बरोबर लटकवल...तिचा कलकलाट बघुनही तिची दया आली नाही.. गेम खेळायला आली आहे.. असला बावळटपणा कोण करेल..
सागर आणि दीपाली चा अजुन अंदाज येत नाहिये.. सिनियर आहेत दोघं.. शांतपणे खेळले तर पुढे जातील.
विशाल ठीक.. तन्वी भयंकर.. राधा जास्त टिकणार नाही असं वाटतंय..
ते बाकी दोघे बॉडीबिल्डर दिसत पण नाहियेत पण टास्क मधे लागतील...
प्रभु ला का आणलाय ? सुरज ला सहन करुन पेशन्स संपलेत.. त्यात आणि त्याला विनर पण केला..
आता प्रभु ला पण तसंच विनर केलं तर अवघडच आहे.. आपण बघणारे येडे
तन्वी फार म्हणजे फारच डोक्यात
तन्वी फार म्हणजे फारच डोक्यात जात आहे.शनिवारी अर्धा धक्का तिच्यावरच असेल.
काल कानाखाली मारली म्हणून केलेला आरडाओरडा आधी सोनालीने मग बिबॉसने घशात घातला.
काल सोनाली पण जाम स्मार्ट वागली.
विशाल आणि ओमकारमध्ये विशाल लवकर दमतो अस वाटल.पहिल्या टास्कमध्ये पण दमून मग झोपला होता.
काल अनुश्री पण मस्त.
त्या सिक्रेट नोट वरून ज्याची सिक्रेट आग लावेल अशालाच बिबॉस पुढे आणेल.
रुचिता हलक्या कानाची वाटली काल.
आधी तनवीला सपोर्ट देईन अस म्हणाली,मग अनुश्रीने पहिल्यांदा विचारल्यावर तिला हो म्हणाली,मग परत तन्वीने आवाज काढल्यावर बँकआऊट केल.अशीच खेळली तर गद्दार शिक्का बसेल।
बापट आता मला मंद वाटायला लागला आहे.
छोटु नाहीच आवडत आहे।
करण स्मार्टली खेळत आहे पण त्याच्यावर उलटेल तेव्हा बघू कसा खेळतो ते.
पण सिझन चांगला सुरु झाला आहे.
आता शनिवारी भाऊंकडछन अपेक्षा आहेत।
ममांनी सोडलाच का?मला ते जास्त योग्य वाटतात.
मला कालही सागर आणि करणच आवडले
मला कालही सागर आणि करणच आवडले.. सागर बोलण्यात तन्वीलाही गप्प करतो,टास्क मधे चपळ आहे आणि कॉमेडी टायमिंग तर आहेच !
विशाल सगळ्यांच्या गुड बुक्स मधे रहायचा प्रयत्नं करतो , तन्वीला तर ठेवतोच खुष पण तिच्या पाठीमागे दीपाली सैय्यदची समजूत काढत होता, कॅप्टन म्हणून तन्वी नको म्हणत होता !
राकेश त्याला क्लिअरली आवडत नाही पण इतरांशी डायरेक्ट पंगा नाही घेत तो, काल ओमकार आणि त्याच्या झटापटीत चूक ओमकारचीच होती आणि विशाल नक्कीच त्याला भारी पडला.
अरे काय त्या प्रभुलाही लिहिता वाचता येत नाही सूरज सारखे, एक तरी निरक्षर व्यक्ती हवाच अशी नवीन कॅटॅगरी आहे का मराठी बिबीची ?
ती सोनलची चावी कोणी चोरली ते
ती सोनलची चावी कोणी चोरली ते नाही कळल.
हा शो पाहणाऱ्यांना कोपरापासून
हा शो पाहणाऱ्यांना कोपरापासून साष्टांग नमस्कार आणि दंडवत.
चोरी लपवायची आहे बिबॉला ,
चोरी लपवायची आहे बिबॉला , राखून ठेवलाय चोर

Btw, विशाल आणि ओमकारच्या वादात ओमकारच हिन्दीतून कशाला सुरु झाला ?
म्हणूनच विशालचे सुरवातीचे कॅमेराशी कॉन्व्हर्सेशन दाखवले बिबीने, इथे मराठी लोकच इतर भाषा वापरतात !
सोनाली दर episode गणिक जास्तच
सोनाली दर episode गणिक जास्तच आवडतेय...'आग लगे बस्ती में हम हमारी मस्ती में' attitude भारी एकदम...कामं करण्याची पद्धतीही unique आहे.
प्रभू पण मस्त खेळला आज...राकेश मुद्दाम वाईट खेळला असे वाटले...टास्क छान होता पण
त्या प्रभू चे काही रील्स
त्या प्रभू चे काही रील्स बघितले मी, हा कोण, कुठून आला हे बघायला. अगदीच गलिच्छ अश्लील जोक्स आहेत सगळे. वर हाही अंगुठा छाप! मिलियन्स नी फॉलोवर्स मात्र! चीड आली मला. सूरज, हा मुलगा, हे असले आचरट कन्टेन्ट करून श्रीमंत झाले पण संधी मिळाली तरी शिक्षण शिकायची मात्र इच्छा नाही. गरिबी कार्ड खेळतात पुन्हा. याला अजिबात सपोर्ट मिळू नये आणि पुढे जाऊ नये असे वाटते.
मलाही सोनाली आवडते आहे. पण
मलाही सोनाली आवडते आहे. पण तिने अजून तरी इतरांच्या वागण्यावर रीअॅक्शन इतकेच केले आहे, तिने अजून फ्रन्ट फूट वर यायला हवं . गॅरेन्टी घेऊन आली म्हणून नुसतेच आराम करणे हे करत राहिली तर मग नाही आवडणार. सागर आणि राकेश पण आवडलेत. दीपालीने अजून फार खेळ दाखवलाच नाहीये.
तन्वी आवडत नसली तरी गेम जोरदार चालू केला आहे तिने. अनुश्री पण जरा जरा आता पुढे येते आहे.
राधा आणि रुचिता यांना गेम काही समजत आहे असे वाटत नाही.
तन्वीचा गेम मला आवडायला
तन्वीचा गेम मला आवडायला लागलाय. काय माहीत का ते. ती जरा जरा हास्यजत्रेतल्या शिवाली परब सारखी दिसते.
बोकलत, तुम्ही पण बघताय का big
बोकलत, तुम्ही पण बघताय का big boss??
मी नाही बघत पण बायको बघते
मी नाही बघत पण बायको बघते म्हणून मला जबरदस्ती बघावा लागतो.
मी नाही बघत पण बायको बघते
मी नाही बघत पण बायको बघते म्हणून मला जबरदस्ती बघावा लागतो.>>माझ्या नवर्याची पण अशीच मजा येते...बकवास आहे, बकवास आहे म्हणतो आणि मस्त बघतो..
खूप चिडवते मग त्यांना
जबरदस्तीच्या जोड्या बनायला
जबरदस्तीच्या जोड्या बनायला लागल्या आहेत, ते नाही आवडते , दिव्या -सोहम एकदमच मिसमॅच वाट्तात आणि फेक् !
अधेमधे राकेश - सोनालीही दाखवत आहेत, नको बनायला ही पण जोडी !
सोहम कोण?
सोहम कोण?
सोहम कोण?>> ओंकार असेल.
सोहम कोण?>> ओम असेल.
सोनाली सागर आवडतायत.
भाऊंना आरडी म्हटल्यावर केवढ
भाऊंना आरडी म्हटल्यावर केवढ खटकल.दीपालीने तरी कशाला स्टाईल मारायला जाव.नावाने हाक मारलेल चालतय भाऊंना.मग म्हण की रितेश.
भाऊंना म्हण तुम्ही पण जरा जपून।
सिझन चार मधल्या नेमळेकर,यशश्रीसारखे ममांच्या पण नाकी नऊ आणणारे कंटेस्टंट्स तुमच्या वाट्याला नाही आले अजून.ते आले आणि ममां सिझन 5मधून गायबच झाले.
तस भाऊंच नको व्हायला.
भाऊंचे ते"हे माझ घर आहे.माझ्या घरात हे चालणार नाही"हे इरिटेटिंग आहे.बंद करायला हव ते.
बाकी अँनालिसिस अर्थात बिबॉसने चांगला केला.जो भाऊंनी सांगितला।
पण मला ममां चालले असते.भाऊंच या वेळेस जर क्रुत्रिम वाटत आहे.
रुचिता जमदारची यशश्री मसुरेकर होणार बहुतेक कधीतरी धक्क्यावर.काल पण तिने खूप कंट्रोल ठेवला अस वाटल।
तन्वी बिबॉसला हवी असावी शेवटपर्यंत कारण आधी फटकारले मग गोंजारले अस झाल.तन्वीला हिंट दिली की गेम असाच खेळायचा आहे पण कमघ बोलून.खरच मनावर घेतल तर जाईल पुढे।
शुक्रेबाई खूपच खोट्या वाटायला लागल्या आहेत.गुडीगुडी इमेज ठेवायची आहे आणि पडद्याआड राहून गेम खेळत आहेत,बिबॉस समजला आहे.
विशाल खेळून आला आहे तरी नवशिक्या सारखा वागत आहे अस वाटत.म्हणजे निक्की कशी कोळछन प्यायली होती बिबॉस तस नाही वाटत आहे।
सोनालीला शेवटपर्यंत बघायला आवडेल.शुक्रे बाई आणि बापटपासून लांब रहाव लागेल.
प्रभू मात्र आवडतच नाही.या आठवड्यात जाईल अस वाटल होत पण नाही जाणार अजून काही आठवडे आणि समजा काढलण तर केवळ शारीरिक आजारामुळे काढतील.
आज कोण जाईल ते बघू.
त्या रोशनला प्रचंड सपोर्ट आहे सोमिवर.कशासाठी?
मला आतातरी सोनाली,अनुश्री,करण आणि सागर आवडत आहेत.
विकेंड वार दमदार झालाय का, तर
विकेंड वार दमदार झालाय का, तर मी पहिला भाग बघेन. दुसरा नुसता गेम्स मध्ये फुकट घालवतात.
यावेळी मला बिग बॉस बघायला अजिबात वेळ नाहीये आणि डोक्याला तापही करून घ्यायचा नाहीये. विकेंड वार बरा असेल तर पहिला भाग बघत जाईन.
शनिवार ठीक होता...
शनिवार ठीक होता...
तन्वी ला ओरडायचं नाटक केलं.. पण तसाच खेळ चालु ठेव असही सुचवलं...
दीपाली ला बोलले ते आवडलं.. शिरा करताना तिने उगीच राडा केला होता असं मला वाटलं.. दीपाली रितेश ला RD म्हणाली तेव्हा पण तिला झापलं.. बाहेर त्या दोघांची ओळख आहे की नाही माहिती नाही. पण समोरच्याची परवानगी न घेता त्याच्या नावाची तोड्फोड किंवा शॉर्ट्फॉर्म करणारे लोक मला अजिब्बत पटत नाही. राकेश बापट ला पण असंच RB म्हणतात.. अर्थात त्याला हरकत नसेल तर ठीके.. पण रितेश ला अजिबात आवडलेलं दिसलं नाही.
शुक्रे बाई थोड्याच दिवसात नावडती होणार असं दिसतंय..
रुचिता ची शिवानी सुर्वे होईल का ? तिला अजिबात राग अवरता येत नाही आणि याचा करण, सोनाली आणि सागर छान फायदा करुन घेणार असं दिसतंय..
राधा अगदीच अनफिट वाटते आहे मला एकुण.. ती गेली तरी चालेल पुढच्या आठवड्यात.
दीपाली अप्रत्यक्षरीत्या राधा च्या प्रोफेशन वर बोलली त्याबद्दल रितेश काहीच बोलला नाही..
रविवार बोअर होता.. करण आणि सागर चं स्किट आवडलं.. त्याने जरा मजा आली पण एकुण बोअर झालं..
काल कोणालाच काढलं नाही पण या आठवड्यातले सगळे जण पुढाच्या आठवड्यात नॉमिनेट आहेत..
चावी कोणी चोरली होती ते समजलं
चावी कोणी चोरली होती ते समजलं काय?
चावी अनुश्रीने चोरली.
चावी अनुश्रीने चोरली.
चावी अनुश्रीने चोरली. >> हे
चावी अनुश्रीने चोरली. >> हे कधी दाखवल ? काल दिसलं नाही
करण आणि सागरसाठी बघणार हा
करण आणि सागरसाठी बघणार हा सिझन.. प्राजक्ता मस्त गाते, करण सागर off tasc पण मस्त कंटेंट देतात, goody goody खरंतर bb ने निगेटिव्ह वोटिंग सुरू केलं पाहिजे. सर्वात आधी विशाल तन्वी जाईल. पण मग भांडभांड कंटेंट कोण देणार?? प्रभू चे reels पाहिले, याला रक्त देणाऱ्यांनी पाहिले तर ते देणार नाहीत (साधारण सभ्य असतील तर).
Pages