
५.विस हजाराचा कांदा!!
"Now we are descending down.."
ही उदघोषणा पायलट कडून ऑकलंड २५० किमी अंतरावर असताना झाली ३५००० फुट उंचीवर उडणारे विमान हळूहळू खाली येऊ लागले. ढगाची दाट थर असल्याने प्रत्यक्षात जमिनीचे दर्शन मात्र मात्र विमान ३००० फुटावर असल्यावर येते.
येथे तिसऱ्या वेळेस येत असलो तरी यावेळी खिडकी जवळ सीट असल्याने सुंदर देशाचे एरियल विहंगम दृश्य पाहण्यासाठी खिडकी उघडून ठेवली.दुपारी १.२० मी. अरायव्हल असले तरी सुमारे पंचवीस मिनिटे लवकर पोहचणार होतो.
शेवटच्या ढगाचा पडदा दूर होताच...
हिरव्या रंगाची
मुक्त उधळण..
त्यात असणाऱ्या
अगणित छटा..
छोट्या टेकड्यान्ची
सुंदर टोपोग्राफी..
जणू पाचूचेच
ते सुंदर बेट..
उतरण्यासाठी
खुणावत होते.
आपल्या धरेचे हे
विलक्षण सौंदर्य
पाहून डोळे
तृप्त झाले होते.
बाजूला निळाशार टासमान सी , या
ऑस्टलिया आणि न्युझिलन्ड मधील समुद्रास न्यूझीलंडमध्ये १६४२ मध्ये प्रथम पाय ठेवणाऱ्या डचं दर्यावर्दी अबेल टास्मान यांचे नाव दिले आहे.
प्रत्यक्षात येथील मुळ पॉलीनेशीअन रहिवासी माओरी हे न्यूझीलंड या देशाला "ओटेरिओ " म्हणजे मोठ्या पांढऱ्या ढगाचा देश म्हणून ओळखतात.
हळूहळू आखीव रेखीव एकमजली मागेपुढे प्रशस्त हिरवेगार अंगण आणि लाल हिरवी छत असलेली घरे आणि रस्ते नीट स्पष्ट दिसू लागली.. वरतूनच हा देश किती सुंदर आहे याची जाणीव होत होती.
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे कडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे
ही बालकवीची कविता आठवली तंतोतंत या देशासाठी लागू पडते यात फक्त्त एकच शब्द बदलावसा वाटतो.
"श्रावणमासी" च्या ऐवजी न्यूझीलंडसाठी "सदासर्वदा" हा शब्द योग्य वाटतो कारण बाराही महिने तशीच हिरवळ आणि निर्मळ आनंद असतो . वर्षभर फक्त्त १ से. ते २५ से. या प्लेझन्ट रेंज मध्ये तापमान असणाऱ्या ऑकलन्ड येथे बर्फ पडत नाही आणि हैप्पीनेस इंडेक्सच्या बाबतीत न्युझिलन्ड जगातील पहिल्या पाचातला देश आहे.
दिवसातून तिन्ही ऋतू येथे अनुभवले जातात. सकाळी ऊन तर कधी जोरदार पाऊसाची सर आणि संध्याकाळी थंडगार वारे.
आता बाजूची धावपट्टी दिसू लागली आणि हळुवार पणे अजस्त्र विमान या निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केलेल्या या देखण्या देशाच्या भूमीवर विसावले..
हिरवा रंग पाहता_
हरवलो हिरव्यात.
अंकुरले हिरवे मन_
फुटले कवितेचे पान_.
जमिन स्पर्श होता_
निर्धास्त झालो मी..
हवेत उडत होतांना
ओढ मनाला धरतीची .
आईची कूस काय?
दूर जाता ती कळे.
कुशीत तिच्या येताच
ब्रम्हानंदी टाळी वाजे..
"गगनी झेप घेण्याचे स्वप्न असावे पण जमिनीवर पाय असावेत.*"
जमिनीचे पाय सुटले तर अधांतरी जीवन असतें आणि ते नकोसेही वाटतें, दिशाहीन असतें..ते. जमिनीशी सर्वं जीवांची नाळ अगदी कायमस्वरूपी जुळली असते..म्हणून ओढही तेवढीच तीव्र असतें.
केबिन बॅग घेऊन विमानातून बाहेर जाण्यास निघालो, "Come back again.. Have nice day!" हे हवाई सुंदरीचे परत गोड शब्द ऐकून विस तासाच्या प्रवासानंतर शेवटी एकदाचा एअरपोर्टवर उतरलो.
या नंतर इंमिग्रेशन साठी निघालो.. तेथपर्यत जाण्याच्या भल्या मोठ्या पॅसेज मध्ये अनेक माहितीपुस्तकं, विविध शहरांची नकाशे, प्रेक्षणीय स्थलदर्शनाचे रंगीत सुंदर पुस्तकं विनामूल्य उपलब्ध होती.
सिंगापूरलाच फ्लाईट मध्ये न्यूझीलन्डचे अरायव्हल कार्ड दिले होते. ते वाचून तुम्हाला काळीजीपूर्वक लिहियाचे असतें, पण सर्वं खरेखरे हवे, काही खोटे लिहिल्यास मोठा दंड होऊ शकतो. एक प्रकारचे ते डेक्लेरेशन म्हणजे प्रतिज्ञापत्रच असतें ते. हल्ली ऑनलाईनवर तुम्ही ते आधीच अपलोड पण करू शकता. ते मी विमानातच लिहून पूर्ण केले होते.
ईमिंग्रेशन कॉउंटर जवळ येताच माओरी भाषेत *"किआ ओरा!!"* अर्थात वेलकम असे म्हणून स्वागत केले परेन्ट व्हिसा बघून पासपोर्ट स्टॅम्प केला.
"Welcome to NewZealand & Have a nice stay." असा शिष्टाचार गोऱ्या युवतीने दाखवला.मी हसून आभार मानून चेकिंन बॅग घेण्यास निघालो.
मागच्या एका प्रवासात एक बॅग तब्बल पाच दिवसांनी मिळाली होती. त्यामुळे यावेळी तो घोळ नको असे मनापासून वाटत असतानाच माझी बॅग पट्ट्यावर दिसली.. मी ती घेण्यास पुढे सरसावलो.
आजूबाजूला स्फ़ोटक व ड्रग्स शोधक दांडगे श्वानपथक घेऊन पोलीस फिरत होते
आता कस्टम क्लिअरन्स बाकी होते. न्यूझीलन्डचे बायो सिक्युरिटीचे नियम अंत्यत कडक आहे कोणतेही फळ अथवा बिया आणि आक्षेपार्ह औषधं आणि पदार्थ आणण्यास मनाई असल्याने तुम्ही चुकून आणले असतील तर त्यावर योग्य ठिकाणी येस म्हणून टिक करण अत्यंत गरजेचं असत..
सर्वं बॅगा उघडून तुमची तपासणी करतात.
माझ्या समोर एका पर्यटनासाठी आलेले एक जोडपे होते.. त्यांची तपासणी सुरु झाली आणि त्याच्याकडे फक्त्त एक कांदा आढळला मात्र फळ आणण्याबाबत विचारणेच्या ठिकाणी चुकून टिक, "नाही" वर झाली होती...आणि खोट्या डिक्लेरेशन बाबत त्यांना चक्क चारशे डॉलर्स चा फाईन भरावा लागला.
"फक्त्त तो एक मात्र उरलेला कांदा त्यांना विस हजाराचा पडला होता."
आपल्या देशाच्या बायोलोजीकल सिस्टीम मध्ये कोणतीही भेसळ होऊ नये या साठी हा देश खूप जागरूक आहे.
माझी वेळ आली तेव्हा दुसरा गोरा ऑफिसर आला होता त्या ऑफिसरने विशेष त्रास न देता मला ग्रीनलेन ने जाण्यास सांगितले गेले मी अर्धातासात सर्वं सोपस्कार करून बाहेर आलो.
चिरंजीव सौरभ व नातू चि.कियान घेण्यास आले होते, मला बघताच नातवाने माझेकडे झेप घेतली.. दोन चिमुकल्या हातांनी गळ्यास घट्ट मिठी मारली. आज त्याचा सर्वात तरुण मित्र चार महिन्यांनी परत त्याला भेटला होता.
हेमंत नाईक.
३०.०३.२४
छान लिहिताय. येऊदे अजून.
छान लिहिताय. येऊदे अजून. नातवाला भेटायचा आनंद काही औरच! प्रकाशचित्रे जास्त टाकलीत तर अजुन मजा येईल वाचायला.
सनविविंना,
सनविविंना,

स.नवि.वि,.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
आपली सुचना नक्की अमलात आणेल.
वीस हजाराचा कांदा … वाचतोय.
वीस हजाराचा कांदा 😂
वाचतोय.
>>>>>>>विस तासाच्या
>>>>>>>विस तासाच्या प्रवासानंतर शेवटी
बाप रे!! २० तास सलग?
कांदा फारच महाग पडला
>>>>>बायोलोजीकल सिस्टीम मध्ये
>>>>>बायोलोजीकल सिस्टीम मध्ये कोणतीही भेसळ होऊ नये या साठी हा देश खूप जागरूक आहे.
होय इन्व्हेसिव्ह स्पिशी येऊ देत नाहीत. आपल्याकडे असे काँग्रेस गवत होते जे की इतर सर्व रोपांना मारुन फोफावतच जायचे. पण ते गेले. आमच्या पिढीला, एका इन्व्हेसिव्ह स्पिशीज ना निसर्गाने काढून टाकण्याचे उदाहरण पहायला मिळाले. इतर जातीच्या रोपांनी लढा दिलेला.
मुंबई सिंगापूर पाच तास.. पुढे
मुंबई सिंगापूर पाच तास.. पुढे ऑकलंड दहा तास.. सिंगापूरचा ले ओव्हर असे एकूण विस तास!
ले ओव्हर असल्यामुळे सिंगापूर विमानतळावर आरामात फिरू शकलो.जागतिक प्रथम क्रमांकाचे चांगी एअरपोर्ट स्वतः च प्रेक्षणीय स्थळ आहे.
मस्त..
मस्त..
हा पहिलाच भाग वाचला
वीस हजाराचा कांदा काय आहे बघूया म्हणून
छान लिहिताय
बाकीचे वाचतो आता
धनश्री आपली पोस्ट आधी राजकीय
धनश्री आपली पोस्ट आधी राजकीय वाटली.. मग गूगल केले
हाहाहा ऋन्मेष त्या झुडपाला
हाहाहा ऋन्मेष त्या झुडपाला असे नाव का दिले माहीत नाही.
छान लिहिताय
छान लिहिताय
कवितेची आवड जाणवतेय
>>"फक्त्त तो एक मात्र उरलेला
>>"फक्त्त तो एक मात्र उरलेला कांदा त्यांना विस हजाराचा पडला होता."<<
चूकुन का होइना, परदेशात कांदे नेणार्यांचा शिवतीर्थावर जाहिर सत्कार झाला पाहिजे...