नमस्कार मंडळी,
यंदाचा संकल्प धागा लिहिताना स्वतः मधले बरेच बदल जाणवत आहेत.
म्हणून पुन्हा धागा प्रपंच!
हाच तो आपला हक्काचा vision board आहे असे समजून संकल्प/योजना किंवा vision नक्की लिहा.
इथे अगदी फॅन्सी संकल्पच हवेत असं नाही. बारीकसारीक गोष्टीसुद्धा असू शकतात ज्या ह्या वर्षी करायच्याच आहेत. एक लक्षात आलंय की baby स्टेप्स लिहून त्या पूर्ण केल्या तरी चालू शकतं.
.
२०२५ चा धागा
https://www.maayboli.com/node/86136
.
जुनी list आणि त्याचे अपडेट्स / टिक्स :
१. मानसिक आरोग्य जपणे आणि stress management - शिकतेय, सुधारतेय, जमतंय
२.website सुरु केल्यात live तिकडे content टाकायचा आहे- काहीही लिहिलं नाही. लिखाण शून्य.Website बंद पडू दिल्या, सोडणार आता हे झाड. लोड नाही घेणार त्याचा
३..Health आणि व्यायाम : जैसे थे परिस्थिती, पण बारीक सारीक सुधारणा आहेत, लिहाव्यात इतकं काही नाही, पण हे नेहमीच सुरु राहणार, दरवर्षी असणार
४. नविन टेकनॉलॉजि शिकणे - on the job शिकतेय, advanced technology
ह्यावर्षी जॉब change केला, बेटर प्रोफाइल, more workload, मज्जा!
५. Documents ची कामं- झाली बाबा जुनी पेंडिंग कामं एकदाची.
आता नवनवीन येतात पण ठीक आहे ते चालत राहतं
६. ह्यावर्षी चा नविन संकल्प हा की अनावश्यक बडबड करणार नाही. उत्तम श्रोता व्हायचा प्रयत्न करेन रोजच्या आयुष्यात - पहिले काही महिने जड गेलं पण आता जमतंय
७.दुसरं कोणी चिडचिड करत असेल, negative mood मध्ये असेल तर आपणही ती energy absorb करून बसायचं नाही. फरक पडू न देणे साध्य करायचे आहे. अति sensitive nature काही कामाचे नाही- Same जमतंय बरं का मंडळी, कमल पत्र का काय त्याप्रमाणे राहणे (थोडक्यात बेशरम पणा)
८.Productivity वाढवणे, कामाच्या जागी आणि वैयक्तिक कामे करताना, जे काम करतोय त्या क्षणाशी प्रामाणिक राहायचे आहे.- शिकतेय, जमवेन हळूहळू
......
२०२६ साठी नवीन काय?
१. स्वतःच्या Finance कडे लक्ष देणार, हिशोब लिहिणार व्यवस्थित आणि planning करणार, गोल्स ठरवून
२. शॉपिंग वर बंधन घालणार- खासकरून ऑनलाईन केली जाणारी
३. स्वतः ला मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी ट्रेन करणार, स्ट्रेस न घेता निर्णय घेता यायला हवेत
..
तुमचं काय काय ठरलंय?
वजन कमी करायचे आहे.
वजन कमी करायचे आहे.
स्तोत्रे म्हणेन.
नवीन हेल्दी स्नॅक बनविणॅ
आजचे काम उद्या करण्याचा
आजचे काम उद्या करण्याचा संकल्प आहे.
माझे काही २०२६ चे संकल्प :
माझे काही २०२६ चे संकल्प :
१. रेग्युलर प्युबिक हेअर काढणे, विशेषत: पण तीन महिन्यांतून एकदाच . कारण केस काढल्यावर पुन्हा वाढताना एक फेज अशी येते की अक्षरश: बसवत नाही
२. भरपूर पाणी पिणे, दिवसाला कमीत कमी अडीच ते तीन लिटर्स
३. ७५ सूर्यमनस्कार घालणे
४. दक्षिण भारतात फिरायला जाणे
५. एकवेळच्या अन्नावर येणे (सध्या प्रचंड खात सुटलो आहे, वजन पूर्ण आटोक्यात आहे कारण आठवड्याला दोन दिवस तरी चोवीस चोवीस तासांचे उपवास होतात)
६. पैसे साठवणे
७. मिरजेजवळ एक शेतजमीन घेतली आहे त्यात जरा प्रोसेस बसवायची आहे. म्हणजे २०३० पर्यंत जमिनीचा कर्ब वाढेल किमान २.५ टक्क्यांच्या पुढे जाईल
८. उरलेले सगळे असेट्स लिक्विडेट करायचे आहेत (पुण्यातला एक फ्लॅट विकत जातोय का ते पाहणे, अजून दोन तीन जागा घेऊन ठेवल्या होत्या त्या पण विकत घालवून फक्त आता नवे शेत + सांगलीत एक दुकान गाळा एवढेच रियल इस्टेट करायचे आहे.)
९. २०३० (बरोबर ४० होतात) ला निवृत्त होण्याची तयारी करणे. सध्या जेवढे सेविंग्स झालेले आहेत ते योग्य वेळेस एखाद्या कमी रिस्की बाँड किंवा लाँग टर्म MF मधे गुंतवून टाकून ठेवायचे आहेत.
१०. होर्डिंग डिसॉर्डर होऊ नये यासाठी वस्तू फेकून देणे किंवा विकून टाकणे करत आहे. नवे काही खरेदी करायचे नाही असे ठरवले आहे.
संकल्प असं म्हणून काही करणार
संकल्प असं म्हणून काही करणार नाही.
संकल्प न करता सायकलिंग सुरू केलं. सध्या खांदा आणि हाताच्या दुखण्यामुळे थांबवावे लागले आहे. यासंदर्भातच..
व्हिटॅमिन इनटेक, फिजिओथेरपी यावर लक्ष द्यायचं आहे. आहार कोणत्याही स्पोर्टस न्युट्रिशनिस्ट कडून लिहून न घेता सरळ डॉक्टरांकडूनच घेणार.
हॉस्पिटलची फिजिओथेरपी स्वतः घरी ही कंटीन्यू करणार (हे जमत नाहीये सध्या)
मायबोलीवर सध्या चित्रपट या ग्रुपात आहे. तिथला वावर कमी करून वेळ वाचवणार. उरलेल्या कथा पूर्ण करणार.
पुढच्या वर्षात सिंहगडावर एकदा तरी सायकलने जाऊन यायचे आहे.
पानशेतच्या पुढे कँपिंग (बिबट्याच्या बातम्यांवर अवलंबून)
फोफसंडी गावी / जुन्नर परीसरात सायकलवरून किंवा कोकण ट्रीप सायकलवरून असे बेत आहेत.
एक कोयना ट्रीप ( बिबट्याचा वावर बघूनच)
चित्रकला शिकायची आहे.
छान केलं किल्ली धागा काढून.
छान केलं किल्ली धागा काढून.
माझे काही संकल्प इथे लिहितो आहे. पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करीन. इथे अपडेट देईन.
१. पोटाचा घेर कमी करणे.
२. चांगली बॉडी बनविणे (वामन्या, शक्य आहे का बे तुला? नुसतं धुरंधर शेनिमा बघून बॉडी बनते का?)
३. किमान पाच किमी सलग धावण्याची क्षमता गाठणे. (सध्या दोन किमी)
४. किमान १०० सूर्यनमस्कार सलग घालण्याची क्षमता गाठणे.
५. दीर्घवेळ शंख वाजवायला शिकणे.
६. २२५०४ विवेक एक्सप्रेसने पूर्ण प्रवास करणे.
मागच्या वर्षी जे ठरवलं होतं
मागच्या वर्षी जे ठरवलं होतं ते बऱ्यापैकी पूर्ण केलंय. डाएट फॉलो करण मला जमत नाही मग सोपा उपाय म्हणून साखर पूर्णपणे बंद केली आहे . वजन कमी झालंय .
दिवसातून किमान ३० मिनिटं चालण होईल ह्याची काळजी घेतीय .
ह्या वर्षीचा मुख्य संकल्प आहे ..
१)डोक्याला त्रास देणाऱ्या गोष्टी सोडून द्यायच्या, दुर्लक्ष करायचं.
आणि तसं वागायला सुरुवात पण केली आहे. ज्या WhatsApp ग्रुप मध्ये गॉसिपिंग शिवाय दुसर काहीही नसत अशा ग्रुप मधून बाहेर पडलीये...त्यात फॅमिली ग्रुप पण आला...☺️.
२)गिरनार ला परत जायची खूप इच्छा आहे..बघू कधी बोलावणं येतय .
३) एक सोलो ट्रिप करणार आहे.
१) ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत
१) ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत जगायचे आहे
२) पोट कमी करायचे आहे. (आयुष्यात कधी हे लिहायची वेळ माझ्यावर येईल असे वाटले नव्हते)
३) त्यानंतर लेकीसोबत डान्सरील बनवायच्या आहेत.
४) एखादी नवीन हेअर स्टाईल ट्राय करायची आहे.
५) मुलांचा गणिताचा अभ्यास घ्यायला पुन्हा सुरुवात करायची आहे.
६) विवाहबाह्य संबंधावर एक दीर्घकथा लिहायची आहे.
** क्रमांक दोन जर २०२६ मध्ये जमले तर एक छोट्यातील छोटी मॅरेथॉन धावायचा संकल्प २०२७ साठी ठेवला आहे.
6) अनुभवाने कथा जिवंत होते
6) अनुभवाने कथा जिवंत होते.
अश्विनी ९९९, माझे पण हे
अश्विनी ९९९, माझे पण हे तिन्ही पॉइण्ट आहेत.
दुसरा पॉईंट एकत्रच करू
मी गेल्या वर्षी केलेले संकल्प
मी गेल्या वर्षी केलेले संकल्प फार काही मनावर घेतले नाहीत. पण तरी यंदा करते आहे.
१ व्यायामात नियमितता आणणे
२ किमान १२ नवीन पुस्तके वाचणे
३ लिखाण नियमीत करणे
४ एका अभ्यासाचं भिजत पडलेलं घोंगडं नीट रांगेत आणणे
५ मनाच्या आणि शरीराच्या आरोग्याची काळजी घेणे
इतकं केलं तरी पुष्कळ होईल.
@ धनवन्ती..... दुसरा पॉईंट
@ धनवन्ती..... दुसरा पॉईंट एकत्रच करू .
नक्की करू.
माझा नवीन वर्षाचा काही संकल्प
माझा नवीन वर्षाचा काही संकल्प नाहीये..
मनात येईल तेव्हा त्या त्या गोष्टी करून टाकते...
तर ज्यांचे weight लॉस, फॅट
तर ज्यांचे weight लॉस, फॅट लॉस, maintan फिटनेस, muscle building, weight gain असे यावर्षीचे संकल्प आहेत..
पण जिम ला जायला वेळ नाही, जमत नाही, सातत्य टिकवता येत नाहीये.. घरात काय करावं समजत नाहीये.. त्यांच्यासाठी.......
माझ्या सोबत जॉईन करू शकता online फिटनेस home workout..
अधिक माहितीसाठी सम्पर्कातून mail किंवा विपु करू शकता...
यावर्षी माझ्यासाठी आणि
यावर्षी माझ्यासाठी आणि लेकासाठी vision board बनवायचा विचार आहे.
गेल्यावर्षी केलेले संकल्प अर्धवट पूर्ण करता आले.
नवीन वर्षात स्वतः गाडी
नवीन वर्षात स्वतः गाडी ड्राईव्ह करून शिर्डी ला जाऊन यायचे आहे.
किंवा मुंबई..
म्हणजे मला पुण्याबाहेर जाण्याचा कॉन्फिडन्स मिळवायचा आहे
डेफिनेटली बी एम आय कमी करणे
डेफिनेटली बी एम आय कमी करणे मनावर घेतलेले आहे. करणारच इथे आज ( ३१ डिसेंबर २०२५) नोंदवते आहे - ३२.४ (ओबीस)
वजन कमी करणे. गेल्या वर्षीचा
वजन कमी करणे. गेल्या वर्षीचा हा संकल्प असा नव्हे तरी तसे वाटले होते.
कार्ब्स सोडायला हवेत.
कार्ब्स सोडायला हवेत. प्रयत्न करणार आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
सुरूवात लवकर उठून झाली.
आत्तशीक ४ वाजलेत. झोप
आत्तशीक ४ वाजलेत. झोप
सुप्रभात
सुप्रभात
माझा सुद्धा चार वाजताचा अलार्म वाजला.
आता वाईफ सेव्हिंग स्किल शिकायला घेतो.
सुरुवात भांडी घासण्यापासून करतो.
पहाटेच्या कडाकाच्या थंडीत गरम पाण्याने भांडी घासायची मजाच वेगळी.
यावर्षी स्वतःची भांडी स्वतःच घासणार, स्वतःचे कपडे स्वतःच धुणार, स्वतःचा स्वयंपाक स्वतःच बनवणार, स्वतःची आंघोळ स्वतःच करणार हाच माझा संकल्प.
झोप
झोप

नवीन वर्षाची सुरूवातच हसण्याने झाली.
काल सिंहगडावरून आल्यानंतर तासभर झोप लागली होती.
ऋन्म्याच्या पोस्ट मधल्या
ऋन्म्याच्या पोस्ट मधल्या स्वतःच्या लिस्टीत नको ते वाचुन हसुन घेतलं, तुम्ही पण हसुन घ्या.

हॅप्पी न्यू यर!
स्वतःची आंघोळ स्वतःच करणार >
स्वतःची आंघोळ स्वतःच करणार >>> या आधी घरचे लोक वॉशिंग मशीन मधे घालत होते का काय?
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा !
>>>>पहाटेच्या कडाकाच्या थंडीत
>>>>पहाटेच्या कडाकाच्या थंडीत गरम पाण्याने भांडी घासायची मजाच वेगळी.

https://youtu.be/xg60Ep6Geu4
मस्त, नवीन वर्षाची सकाळ
मस्त, नवीन वर्षाची सकाळ हसण्याने झाली वरचे प्रतिसाद वाचून.
माझे बरेच संकल्प बाकी आहेय पूर्ण व्हायचे, मागच्या वर्षीच्या संकल्पाच्या धाग्यावरचे ,पण सुरुवात तर केली आहे. तेच यावर्षी पूर्ण व्हावेत.
रुन्मेष यांचा सहावा संकल्प वाचून मीही संकल्प ऍड केलाय यावर्षी एक तरी कथा लिहायची इच्छा आहे तीही सस्पेन्स थ्रिलर .बघू कसे जमते.
सर्वाना नववर्षाच्या शुभेच्छा . सर्वांचे संकल्प पूर्ण होवोत ही सदिच्छा.
अस्मिता >>> ऋन्मेष >>>>
अस्मिता >>>

ऋन्मेष >>>>
वॉशिंग मशीन >> .. काश ये
वॉशिंग मशीन >>
.. काश ये शक्य होता
गेला बाजार वरच्या शाहरुख सारखे तरी नशीब हवे होते 
मला रोज आंघोळ करणार असे म्हणायचे होते पण स्वावलंबनाच्या फ्लो मध्ये तसे लिहिले गेले.. बाकी आजही पाठीला साबण लाऊन चोळताना फिलिंग ठाकूर होतेच
>>>>शॉपिंग वर बंधन घालणार-
>>>>शॉपिंग वर बंधन घालणार- खासकरून ऑनलाईन केली जाणारी<<<<<
हे आणि हेच. मला खुपच व्यसन लागलय.
आणि हे,
>>>डोक्याला त्रास देणाऱ्या गोष्टी सोडून द्यायच्या, दुर्लक्ष करायचं.
आणि तसं वागायला सुरुवात पण केली आहे. ज्या WhatsApp ग्रुप मध्ये गॉसिपिंग शिवाय दुसर काहीही नसत अशा ग्रुप मधून बाहेर पडलीये...त्यात फॅमिली ग्रुप पण आला...☺️.<< +१
Pages