
धर्मेंद्र गेले ही बातमी विश्वास बसण्यासारखी नव्हती.
कारण चारच दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या. निधनाच्या अफवेने आयुष्य वाढतं असं म्हणतात. या म्हणीचं प्रत्यंतर सुद्धा आलेलं आहे. पण दुर्दैवाने धर्मेंद्र यांना तेव्हढे आयुष्य लाभले नाही.
आजच्या इंटरनेटच्या पिढीला राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद माहिती नाहीत. पण धर्मेंद्र माहीत आहेत. काळ किंचितसा अलिकडचा असेल. चित्रपट क्षेत्रात मात्र ती एक पिढी असते. आमच्या चित्रपटवेड्या घरात मात्र या कलाकारांबद्दला एका पिढीकडून दुसर्या पिढीला या कलाकारांचे किस्से, चित्रपट याबद्दल सांगितलं जातं.
जेव्हां मनोरंजन म्हणून चित्रपटसृष्टीची भुरळ संपूर्ण देशाला पडलेली होती, त्या काळात दिलीपकुमार यांच्या स्टारडम मुळे प्रभावित होऊन पंजाबातल्या एका छोट्याशा गावातून एक तरूण मुंबईत आला. डोळ्यात असंख्य स्वप्नं, विलक्षण देखणेपण आणि कष्टाने पीळदार झालेलं शरीर याशिवाय त्याच्याकडे काहीही नव्हतं. ना ओळख, ना गॉडफादर ! पण पडेल ते काम करायची तयारी, मनमिळाऊ स्वभाव आणि मैत्रीपूर्ण व्यवहार यामुळे हा खेड्यातून आलेला पंजाबी युवक धर्मेंद्र या नावाने प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहीलं नाही.
धर्मेंद्रच्या आधी दारासिंग आणि प्रेमनाथ हेच पीळदार शरीरयष्टी असलेले अभिनेते चित्रपटसृष्टीत होते. पण धर्मेंद्र मधे विशेष काहीतरी होतं. चेहर्यावरचा गोडवा, मिस्कील स्वभाव आणि लोकांना पाहताक्षणीच आपलेपणा वाटावा असं व्यक्तीमत्व यामुळं त्यांना चांगले सिनेमे मिळत गेले. सुरूवात काही मनासारखी झाली नाही. पण हळूहळू अॅक्शनपटातून धर्मेंद्रचं स्थान बनत गेलं. आंखे हा त्यांच्या बाबतीतला मैलाचा दगड.
असे म्हणतात कि आंखेचे निर्माते राजकुमार यांच्याकडे हा रोल घेऊन गेले होते. राज कुमार यांनी बाहेर लॉन मधे टेबल लावून स्क्रीप्ट ऐकली. त्यांना काही कथा आवडली नाही. पण सरळ सांगतील तर ते राजकुमार कसले ? त्यांनी आपल्या कुत्र्याला विचारलं. "तू ये रोल करेगा ?"
मग रामानंद सागर यांच्याकडे वळून ते म्हणाले " देखो मेरा कुत्ता भी मना कर रहा है". हे ऐकल्यावर रामानंद सागर तडक उठले आणि त्या वेळी राजकुमार यांच्या मानाने स्टार व्हॅल्यू एस्टॅब्लिश न झालेल्या धर्मेंद्रकडे गेले. त्यांनी धर्मेंद्रवर डाव लावला आणि ती त्या काळची ब्लॉकबस्टर फिल्म ठरली.
त्यानंतर धर्मेंद्रला घेऊन असे जेम्स बॉण्ड टाईप अनेक चित्रपट आले. चरस, यकीन, समाधी इत्यादी हे सगळे चित्रपट सुपरहीट झाले. आजच्या पिढीला आवडणारे असेच हे सिनेमे आहेत. आजही टीव्हीवर, युट्यूबवर ते पहायला मिळतात. या सिनेमांनी धर्मेंद्रला ओळख मिळवून दिली. त्याचं स्टारडम त्यानंतर कुणीही हिरावून घेऊ शकलं नाही.
देव - राज - दिलीप या त्रिमूर्तीच्या काळातही धर्मेंद्रचा वेगळा चाहता वर्ग राहिला. नंतर राजेंद्रकुमार - राजकुमार युग अवतरलं. काही काळ गोविंदाप्रमाणे शम्मीकपूरचं युग आलं. पण या सर्वांचं युग संपवलं ते राजेश खन्नाच्या सुपरस्टारडम मुळे. न भूतो न भविष्यति अशी राजेश खन्नाची क्रेझ होती.
त्ञा काळात असा एक विनोद सांगितला जायचा .
ऋषी कपूर एका पत्रकाराला विचारतो कि. "कालपर्यंत माझ्या काकाच्या घरासमोर निर्माते रांग लावून उभे असायचे. आता ती रांग कुठे गेली कळत नाही."
तो पत्रकार त्याला सांगतो कि " ती रांग काकाच्या बंगल्यासमोर असते, फक्त तो सर्वांचाच काका आहे , तुझ्या एकट्याचा नाही"
हे अक्षरशः खरं होतं. शम्मी कपूरच्या करीयरला सावरायला सिप्पीजना अंदाज मधे राजेश खन्नाला एका गाण्यापुरते घ्यावे लागले होते.
आणि राजेश खन्नानंतर अमिताभ बच्चनचं युग सुरू झालं. वन मॅन इंडस्ट्री असं अमिताभचं वर्णन केलं जायचं. असं म्हणतात कि त्या काळात पहिले ते एक ते दहा या क्रमांकावर अमिताभ बच्चन आणि नंतर इतरांचा नंबर लागायचा.
या सर्वांना धर्मेंद्र पुरून उरला.
धर्मेंद्रचं स्टारडम कधीही या सुपरस्टार्सच्या काळातही झाकोळलं नाही. त्याचा फॅन बेस वेगळाच होता. अगदी राजेश खन्नाच्या जादूई काळातही धर्मेंद्रचे नऊ सिनेमे एका वर्षी रिलीज झाले होते आणि त्यातले सात सुपरहीट ते हीट होते आणि दोन अॅव्हरेज राहीले. यातल्या पाच सिनेमात चोराची भूमिका होती. जुगनू, लोफर हे सिनेमे तर आजही लोकांना माहीती आहेत.
आणि नंतर अमिताभच्या उभरत्या काळात आलेल्या धर्मेंद्र अमिताभच्या जोडीने शोलेमधून इतिहास घडवला. या एकाच सिनेमाने अनेकांना अजरामर केले. यातली जय वीरूची जोडी आजही प्रसिद्ध आहे. या जोडीला साईन करण्यासाठी अनेक निर्माते उत्सुक होते. पण अनेक प्रोफेशनल इगोज मुळे ते पुढे शक्य झालं नाही. पण दोघांची मैत्री कायम राहिली.

यातली अमिताभची अँग्री यंग मॅन ची इमेज आजही लोकांना आवडते. पण खास धर्मेंद्र स्टाईल "वीरू से टक्कर ?" हा डायलॉग ऐकताना हसून हसून पुरेवाट होते. महादेवाच्या मूर्तीच्या मागे लपून "कन्या, वो वीरू है ना उसे हमने तुम्हारे लिए वर चुन लिया है" हा सीन धर्मेंद्र सोडून अन्य कुणी करूच शकत नाही. धर्मेंद्रचं हेमा मालिनीसाठी पागल होणं हे प्रत्यक्षातही खरंच होतं. इतकं की जयचा रोल धर्मेंद्र साठी असताना, वीरू बरोबर हेमा मालिनी असणार याची कुणकुण लागल्यावर धर्मेंद्रने वीरूचा रोल मागितला होता. हेमाचा सहवास जास्त मिळावा म्हणून स्पॉटबॉइज ना धर्मेंद्र लाच द्यायचे. जेणे करून रीटेक होतील.
हाच स्वभाव पडद्यावरचे मिश्कील रोल साकारताना कामी आला. हृषि केश मुखर्जींनी चुपके चुपके मधून ही मॅनला फाटा देऊन धमाल विनोदी धर्मेंद्र पेश केला. मग असे रोल्स धर्मेंद्रच्या वात्याला येऊ लागले.
धर्मेंद्रचा एक भाऊ होता. काही सिनेमातून त्यालाही नायकाचे रोल्स मिळाले. दोघे दिसायला एव्हढे सारखे होते कि लोक म्हणायचे कि धर्मेंद्र दोन नावांनी का काम करतात ? पण नंतर त्याने अभिनय थांबवूना निर्माते व्हायचे ठरवले आणि पहिल्या सिनेमासाठी धर्मेंद्रला पसंती दिली. एक ट्रक चालक हातून घडलेल्या गुन्ह्यात शिक्षा होऊ नये म्हणून एका गावी लपायला जातो आणि तिथे डाकूंकडून संपूर्ण पोलीस दलाची हत्या होताना साक्षीदार बनतो. नंतर या डाकूंशी मुकाबला करताना गावातल्या लोकांना पोलीस बनवतो. नकली पोलीस स्टेशन बनवतो. हा सगळा धमाल प्लॉट आणि धर्मेंद्रचा विनोदी रोल ,त्यातले "मै जट यमला पगला दिवाना" हे गाणे आणि धर्मेंद्र हेमा मालिनी जोडी यामुळं प्रतिज्ञा आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाने अजितसिंग देओलला यशस्वी निर्माता बनवले. अजित सिंग देओल म्हणजे अभय देओलचे पिता.
धर्मेंद्र ने शेवटपर्यंत नाती सांभाळली. इतकेच नाही गावाकडून किंवा पंजाबातून आलेल्या सर्वांना आपल्या घरी मुक्काम करू दिला. अनेक पंजाबी अभिनेते सांगतात कि त्यांच्या स्ट्रगलच्या काळात धर्मेंद्रने त्यांना खाऊ , पिऊ घातले, रहायला जागा दिली. धर्मेंद्रने त्याचे एके काळचे स्टार दिलीपकुमार यांच्या सोबत शेवटपर्यंत नातं ठेवलं. त्यांच्या आजारपणाच्या काळात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी शेवटपर्यंत नियमित त्यांच्या घरी भेटी दिल्या. सायरा बानू यांना मदत केली. धर्मेंद्रच्या मदतीचे असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
धर्मेंद्र म्हटले कि धरम वीर मधला तो स्कर्ट सारखा रोमन योद्ध्याच्या पोशाखातला त्यांचा रोल आठवतो. आज अनेक नायक त्यांचे दगडी शरीर दाखवतात. त्या काळात धर्मेंद्रकडून निर्मात्यांना ही अपेक्षा असायची. पडद्यावर काटकुळा अमिताभ बच्चन जेव्हां दहा दहा गुंडांना लोळवायचा तेव्हां धरमजींचा एक ठोसा बसल्याने गुंड दहा बारा फूट कोलांट्या उड्या खात मागे धडपडायचा हे फक्त धरमजींचं दणकट शरीर बघून खरं वाटायचं.
गुलजारने मात्र चष्मा लावलेला धर्मेंद्र पेश केला, दिल्लगी मधून शबनम बॅग घेतलेला, खादीचे कपडे परिधान करणारा धर्मेंद्र लोकांनी स्विकारला. त्या आधी सत्यकाम मधूनही हा धर्मेंद्र भेटीला आलेला होताच. त्या वेळी हुकलेले फिल्म फेअर नंतर कधीच मिळाले नाही. लाईफ टाईम अचिवमेण्टच्या वेळी लहान मुलाप्रमाने धर्मेंद्रने केलेली धमाल प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
"कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाऊंगा" हे वाक्य धर्मेंद्रजींना चिकटलेलं होतं. अनेक स्टॅण्ड अप कॉमेडिअन्सना या वाक्यामुळे करीअर करता आलं.
धर्मेंद्र यशस्वी निर्माता सुद्धा होते. मुलाला लाँच करण्यासाठी त्यांनी बनवलेला बेताब बघताना अजिबात कंटाळा येत नाही. बेताब नंतर सनीने वाटेल ते सिनेमे स्विकारले. ते दणकून आपटले.
त्यामुळं धर्मेंद्र चिंतेत होते. त्या वेळी राजकुमार संतोषी घायल बनवत होते. धर्मेंद्रने हा सिनेमा मी प्रोड्युस करतो, फक्त तू सनीला मुख्य रोल मधे घे असे सांगितले होते. पण राजकुमार संतोषीने मिथुनला साईन केले होते. धर्मेंद्रने मिथुनला अडचण सांगितली. धर्मेंद्र यांचं गुडविल असल्याने मिथुनने त्यांच्यासाठी घायल सोडून दिला आणि पुढचा इतिहास तर आपल्याला माहीतच आहे. एकीकडे नायिकांसाठी पागल होणारा, दारूच्या आहारी गेलेला ही इमेज झालेली असली तरी कुटुंबाच्या बाबतीतया कर्तव्यात धर्मेंद्रने कुठलीही कसूर केली नाही हेच यातून दिसतं.
आयुष्याच्या शेवटी शेवटी मात्र गावाच्या आठवणीने ते भावूक होत असत. रिअॅलिटी शो मधे तर एकदा ते रडले होते. पहिल्या पत्नीला वेळ देउ न शकल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. तिचा मी गुन्हेगार आहे असे ते म्हणायचे. यामुळे शेवटचे दिवस त्यांनी प्रकाश कौर यांच्या सोबत आपल्या फार्म हाऊस वर घालवले. तिथे ते शेती करत. मातीत कामं करत. त्यामुळे गावातले दिवस पुन्हा जगता आले असे ते म्हणायचे. त्यांच्या या आठवणींमुळे मुलांनी "अपने" हा सिनेमा बनवला होता.
वरून दणकट असलं तरी एके काळी दारूच्या आहारी गेल्याने शरीर आतून पोखरलं गेलं होतं. डॉक्टरांनी दारू सोडायला सांगितली. नंतर मात्र तब्येत ढासळतच गेली. दोन तीन वेळा जिवावरच्या संकटातून बाहेरही पडले. पण अखेर हा प्रवास काल २४ नोव्हेंबर २०२५ रोजी कायमचा थांबला.
आता शोले मूळच्या शेवटासहीत पुन्हा रिलीज होणार आहे. यात कधीही न पाहिलेले डिलीटेड सीन्सही असणार आहेत अशा बातम्या आहेत. पण हे रिरीलीज बघायला धर्मेंद्र नसणार हे दुर्दैव !
चित्रपट सृष्टीचा हॅण्डसम हंक, ही मॅन, गरम धरम काल काळाच्या पडद्याआड गेला.
तीन पिढ्यांपासून सर्वांना आनंद देणारा हा अभिनेता आता पुढच्या प्रवासाला निघून गेला आहे यावर विश्वास बसत नाही. अगदी घरातलं कुणी तरी मोठं माणूस गेल असं वाटतंय.
धर्मेंद्र यांच्या बाबतीत कधी हा शब्द लिहीन असं वाटलं नव्हतं.
श्रद्धांजली !
किती होते, किती आले, किती
किती होते, किती आले, किती गेले पण धरम सारखे कुणीही नाही.
आज चुपके चुपके पाहिल्याशिवाय झोपणार नाही.
माझे वडील फॅन, मी फॅन आणि माझा मुलगा पण त्याचा फॅन.
सगळ्यांना आनंद देऊन गेला.
चॅट जी पी टी ने लिहिलेला लेख!
चॅट जी पी टी ने लिहिलेला लेख!
धर्मेंद्र चा अभिनय काही विशेष खास नव्हता
छल्ला जी,
छल्ला जी,
कुणी तरी धर्मेंद्र यांच्यावर धागा काढावा असं आवाहन केलं होतं. म्हणजे त्या धाग्यावर लिहीता आले असते.
पण तो न निघाल्याने चॅट जीपीटीची मदत घेऊन धागा काढला. तुम्हाला त्रास झाला असल्यास अॅडमिन यांना हा धागा उडवायला सांगेन. तुम्ही धागा काढत असाल तर तिकडे आठवणी लिहीता येतील. कुणीही काढला तरी चालेल.
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
क्रिकेटचा फार मोठा फॅन आहे. पण वीरू म्हटले की त्या नावाने ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवाग कधीच डोळ्यासमोर येत नाही, तर शोले मधील धर्मेंद्रच आठवतो. तोच वीरू या नावाने डोक्यात फिट्ट बसला आहे. किंबहुना त्यामुळेच सेहवागसारख्या धडाकेबाज खेळाडूला वीरू नाव जास्त सूट होते असे वाटते.
माझ्या आई काकी मामींच्या पिढीत चॉकलेट हिरो म्हणून देवानंद आणि हँडसम हिरो म्हणून धर्मेंद्र फेमस असल्याने, आजच्या भाषेत क्रश असल्याने त्याचे कैक चित्रपट बघून झाले आहेत, ज्यांची नावेही माहीत नव्हती की आता स्टोरीही आठवत नाही पण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात सुद्धा कमालीचा देखणा दिसणारा धर्मेंद्र आजही आठवतो.
राभू - धागा उडवायचा कशाला?
राभू - धागा उडवायचा कशाला? तुम्ही तुमच्या चार ओळी लिहील्यात तरी चालेल. किंवा लेखही.
एकेकाळचा प्रचंड आवडता हीरो. बच्चन खालोखाल धरमच. ७०ज मधे आधीच्या ज्या हीरोंनी अॅक्शन हीरोज म्हणून स्वतःची नवीन प्रतिमा उभी केली त्यात धरम हा सर्वात स्मूथली बदललेला वाटला. किंबहुना तो एकच असेल. आता पाहताना ७०ज मधला धर्मेंद्र हाच खरा धर्मेंद्र असून तो आधीचा अजून अॅक्शन युग यायचे असल्याने घुसमटलेला वाटतो
धर्मेंद्रची ही ट्रान्झिशन या गाण्यात अफलातून रीत्या आली आहे. यात सुरूवातीच्या संवादात आधीचा ६०ज मधला धर्मेंद्र आहे आणि पुढे गाण्यात नंतरचा
https://www.youtube.com/watch?v=RkIo-U_splo
ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात
ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात सुद्धा कमालीचा देखणा दिसणारा धर्मेंद्र आजही आठवतो. >> +१. त्या सिनेमांमधे भयंकर देखणा राजबिंडा दिसलाय धरमपाजी. राजेश खन्न, अमिताभच्या वादळांमधे सहज तरुन गेला !
हो ना, रानभुली
हो ना, रानभुली

धागा कशाला उडवायचा?
मी तसे काही म्हटले नव्हते!
धर्मेंद्र बद्दल तुम्हाला इतके प्रेम असेल, तर होऊ द्या की लोकांना इथे व्यक्त!
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/16mWhHsk2i/?mibextid=wwXIfr
श्रद्धांजली ! चुपके चुपके आणि
श्रद्धांजली ! चुपके चुपके आणि सत्यकाम कायम लक्षात राहतील...
धर्मेंद्र चा अभिनय काही विशेष
धर्मेंद्र चा अभिनय काही विशेष खास नव्हता
>> स्वानंदी -तुम्ही धरम जी चे 90 मधले चित्रपट पाहून म्हणत असाल तर बरोबर.. ते सगळे बिझिनेस चित्रपट..
खरा धर्मेंद्र म्हणजे सिक्सटीज आणि सेव्हन्टीज...
अनुपमा , मेरा गाव मेरा देश वगैरे...
ये मोह मोह्के धागे मेरे
ये मोह मोह्के धागे मेरे उंगलियोमे जा उलझे.
उडानेको कायकु?
राभू - धागा उडवायचा कशाला?
राभू - धागा उडवायचा कशाला? तुम्ही तुमच्या चार ओळी लिहील्यात तरी चालेल. किंवा लेखही. >> हो. काल ही बातमी समजली तेव्हां डोंगरात असल्याने रेंजही मिळत नव्हती. म्हणून कुणी तरी धागा काढा अशी विनंती केली होती. संध्या़काळी घरी पोहोचल्यावर प्रचंड झोप होती. पण कुणीच धागा न काढल्याने चॅट जीपीटीची मदत घेऊन धागा काढला. नंतर आठवणी लिहीता येतील हाच हेतू होता. कुणीही काढला असता तरी चाललं असतं. चॅट जीपीटी चा लेख आक्षेपार्ह असेल तर हा धागा असावा असा काही हट्ट नव्हता. फारसे कुणी प्रतिसाद दिलेले नसल्याने उडवणे शक्य झाले असते. आता फ्रेश मूड मधे पुन्हा लिहून काढले आहे. अजून आठवेल तसे अपडेट करीनच.
चांगला लेख. श्रद्धांजली.
चांगला लेख. श्रद्धांजली.
मला जुना धर्मेंद्र आवडतो. शोलेमधे त्याच्याकडे फार लक्ष गेलं नाही, शोले म्हणजे अमिताभ. अमिताभ नंतर गब्बरसिंग, हेमा, जया (माझ्यासाठी) त्यानंतर तो. चुपके चुपके मधे मात्र आवडला. सत्यकाममधे बेस्ट. हेमापेक्षा शर्मिलाबरोबर असलेले रोल जास्त लक्षात राहीलेत माझ्या (चुपके चुपके, सत्यकाम) . अनुपमामधे फार गोड दिसतो. अनपढमधेही होता ना, त्यात आवडलेला. फॅन वगैरे कधीच नव्हते मी. देखणा होता.
इतकं की जयचा रोल धर्मेंद्र साठी असताना, वीरू बरोबर हेमा मालिनी असणार याची कुणकुण लागल्यावर धर्मेंद्रने वीरूचा रोल मागितला होता. >>> असं असेल तर खरोखर धन्यवाद धर्मेंद्रला कारण अमिताभच्या जयने इतिहास घडवला, अजरामर केला तो रोल.
'कर चले हम विदा' हे गाणं तो गेल्यावर, जास्त आठवतंय. हा पिक्चर मी बघितला नाहीये पण छायागीत, चित्रहारमधे गाणं पंधरा ऑगस्टवेळी लागायचं ते बघितलं आहे.
प्रतिज्ञा टीव्ही वर पाहिलयाचे
प्रतिज्ञा टीव्ही वर पाहिल्याचे आठवते.धमाल आहे चित्रपट. धर्मेंद्रचा दमदार आवाज आणि बोलण्याची युनिक स्टाईल होती.आता केवळ मिमिक्री आर्टिस्ट च्या मिमिक्रीतूनच धर्मेंद्र यांचे अजरामर डायलॉगस ऐकू येतील.धर्मेंद्र हे हिंदीचित्रपट सृष्टीचा सर्वात हॅण्डसम हिरो म्हणून ओळखले जायचे .ब्लॅक अँड व्हाईट मधल्या फोटो मध्ये तर अतिशय सुंदर दिसतात.
श्रद्धांजली !
धर्मेंद्र यांना श्रद्धांजली.
धर्मेंद्र यांना श्रद्धांजली.
धर्मेंद्र - जितेंद्र - विनोद खन्ना तिघेही देखणे अभिनेते.
जितेंद्र मर्दानी पेक्षा चिकणा हिरो वाटायचा. विनोद खन्ना आणि धर्मेंद्र दोघेही तगडे हिरो होते. पण जितेंद्र आणि विनोद खन्ना हे वेगळ्या लोकातले वाटायचे. धर्मेंद्र आपल्या सारखाच गावातला रॉ हिरो वाटायचा.
चांगला लेख. श्रद्धांजली.
चांगला लेख. श्रद्धांजली.
धर्मेंद्र काही फार आवडीचा
धर्मेंद्र काही फार आवडीचा नव्हता पण शोलेत मजा आणलेली त्याने. (धर्मेंद्रचा अहो जाहो उल्लेख करणं झेपत नाही. यामागे अनादराची भावना नाही.)
मला आठवतंय लहान असताना (आणि सनी जाम हॅंडसम वाटत असताना) एकदा आई सहज म्हणालेली मुलगा काही बापासारखा देखणा नाही तेव्हा ते स्टेटमेंट फारच चुकीचे वाटलेले कारण तोपर्यंत ८०जमधला उतारवयाकडे झुकलेला धरमपाजी डोळ्यापुढे होता. नंतर कधीतरी त्याचे ब्लॅक ॲंड व्हाईट पिक्चर पाहिले आणि आईचे म्हणणे पटले.
श्रद्धांजली.
त्या निमित्ताने धर्मेंद्रवर चित्रीत केलेले माझ्या आवडीचे गाणे….….
गाण्यांबद्दल लिहायला आले होते
गाण्यांबद्दल लिहायला आले होते, धर्मेंद्रला गाणी फार छान लाभली. त्याच्यावर चित्रीत झालेली अनेक गाणी आवडीची आहेत. प्रामुख्याने आठवतात ती झिलमिल सितारो का आंगन होगा आणि हम बेवफा हरगिज न थे. शालीमारमध्ये आवडलेला तो.
धर्मेंद्र आई आणि मावशीचा क्रश
धर्मेंद्र आई आणि मावशीचा क्रश होता, तेव्हां “क्रश” म्हणत नसत तरी. B&W आणि सुरुवातीच्या काही मूवीज मधे दिसायचाही खूप हँडसम. “पाहताक्षणीच आपलेपणा वाटावा असं व्यक्तीमत्व” हे अगदी परफेक्ट म्हटले आहे @ रानभुली. सोबत थोडी मिष्किली, खोडकरपणा. शोलेच्या वीरूने “तुम्हारा नाम क्या है बसंती?” विचारून बहार आणली आहे. मारधाडवाले रोल तर आहेतच पण चुपके चुपके, सत्यकाम, दिल्लगीतला संस्कृत शिक्षक … रेंज भरपूर. सर्वत्र वावर Easy as breeze.
अपवाद dancing skills चा. पण धरमपाजी चे two left feet सुद्धा हमखास चेहरेपर मुस्कान ले आते.
Unassuming, friendly vibes.
व्यक्तिगत जीवनातही friendly आणि unassuming असावा. पुण्यात एका रेस्तरांमधे (बहुदा Gorden House) धरम पाजी + सन्नी बाजूच्या टेबलवर होते. सहज Hi केले तर हसून नीट बोलले. त्वाड्डा की हाल ? अस्खलित पंजाबी, मला पंजाबी समजले असावेत. मग हिन्दी. No airs. Not your average snooty celebrity, but a real, confident, down to earth man. A true star. ❤
जनरली श्रद्धांजलीपर लिहित नाही पण हा बिंधास्त माणूस आवडला आणि भेट लक्षात रहाण्यासारखी होती म्हणून.
धर्मेंद्र यांना श्रंध्दांजली
धर्मेंद्र यांना श्रंध्दांजली ! त्यांच्या एका चित्रपटाचा बहुतेक कोणीच उल्लेख केलेला नाही तो म्हणजे हेमामालिनी व निरुपा रॉय यांच्या बरोबर असलेला मां !
यात त्यांनी प्रांण्याबरोबर खरे स्टंट केलेले आहेत. यु ट्युब वर हा चित्रपट आहे. जरुर बघा.
माँ चित्रपट आवडीचा. लहानपणी
माँ चित्रपट आवडीचा. लहानपणी एकापेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. पण त्या वयात प्राण्यांबद्दल एक वेगळेच ममत्व आपल्याला असल्याने त्यात धर्मेंद्रऐवजी हत्तीणच खरी हीरोइन म्हणून तो बघितला जायचा.
पण छान आठवण काढलीत. मुलांना दाखवावा असा आहे
धर्मेंद्र यांना श्रद्धांजली.
लेख छान लिहिलाय (असे कसे म्हणू?). त्या काळात धर्मेद्र आवडते अभिनेते होते.
धर्मेंद्र यांना श्रद्धांजली. लता मंगेशकर यांच्या आवाजातले, धर्मेंद्र माला सिन्हा यांचे, माझे आवडते सुमधुर गाणे इथे देतो.
मिलती है ज़िन्दगी में मोहब्बत कभी कभी
एक सुंदर प्रसन्न पहाट. या
एक सुंदर प्रसन्न पहाट. या गाण्यासंबंधीत अनेकांच्या करीयरची सुद्धा! किती स्वच्छ निर्मळ आणि निरागस आहे हे. एखाद्या नंदीच्या उगमस्थाना इतकंच! या गाण्यात लतादिदी, हेमंतदा, शर्मिला टागोर या सर्वांचे योगदान तर आहेच आहे. परंतु यातील धर्मेंद्रचा वावर फार फार लोभस...
https://youtu.be/69dnqIFfrnE
धर्मेंद्रला श्रद्धांजली. _/\_
धर्मेंद्रला श्रद्धांजली. _/\_
मी चुपके चुपके आणि शोले सोडून कदाचित एकही चित्रपट बघितलेला नाही धर्मेंद्रचा असं आत्ता विचार केल्यावर लक्षात आलं. पण तरी तो अनोळखी न वाटता ओळखीचा वाटतो. चुपके चुपके प्रचंड आवडतो. शोलेही अर्थातच तितकाच आवडतो पण तो धर्मेंद्रचा आहे तितकाच इतरांचाही आहे.
लेख छान..!
लेख छान..!
धर्मेंद्रना भावपूर्ण श्रद्धांजली..!
लहानपणी त्यांचा ' अलीबाबा और 40 चोर 'पाहिलेला आठवतो. अलीबाबा म्हटलं की, धर्मेंद्रच समोर यायचे.
शोलेतला विरू तर अजरामर आहेच.
'पल पल दिलके पास तुम रहती हो' हे त्यांचं आणि राखीचं गाणं ऐकायला आणि पाहायला मला खूप आवडते.
आपली आवडती माणसे
आपली आवडती माणसे वृद्धापकाळामुळे अशी सोडुन जाताना पाहुन खुप वाईट वाटते आणि काळाच्या विक्राळ जबड्याची जाणिव होऊन जीव थरकापतोही. शशीबाबा, धर्मेन्द्र…..
नंतर लिहिते.
अतिशय आवडता अभिनेता..
अतिशय आवडता अभिनेता..
फार वाईट वाटल काल news ऐकल्यावर..
भावपूर्ण श्रद्धांजली.
मला धर्मेंद्र आणि तनुजाच " चाहे रहो दूर , चाहे रहो पास ' हे दो चोर मधलं गाणं अतिशय आवडत. Yellow शिफॉन साडीतली तनुजा आणि ब्लॅक सूट मधला धर्मेंद्र फार मस्त दिसतात.. गाण्याचा मूड खोडकर आहे..दोघांनीही तो मूड बरोबर पकडलाय ...
* तुम्हारा नाम क्या है बसंती?
* तुम्हारा नाम क्या है बसंती?”… हे चुकले. शोलेत हा डायलॉग धर्मेंद्रचा नाही.
दुरुस्तीची वेळ निघून गेली.
धर्मेन्द्र गेल्याची खोटी
धर्मेन्द्र गेल्याची खोटी बातमी गेल्या आठवड्यात आली तेव्हाच जो बसायचा तो धक्का बसुन गेला होता. काल अचानक त्याला अंब्युलंसमधुन अंत्यसंस्कारासाठी नेताहेत म्हणुन बातमी पाहिल्यावर वाईट वाटले. त्याच्या कुटुंबियांनी चांगला निर्णय घेतला.
मला अॅक्शनवाल्या धर्मेन्द्राबद्दल कधी ममत्व वाटले नाही, त्याच्या ट्रांझिशननंतरचे चित्रपट मी पाहिलेही नाहीत. पाहायचे नाही म्हणुन नाही तर माझी ती आवडच नाही. आझाद, बर्निंग ट्रेन वगैरे पाहिले होते.
कृष्णधवल आणि नंतर रंगीत अशा दोन्ही चित्रपटातला जुना धर्मेंद्र मात्र खुपच आवडता होता. जबरदस्त व्यक्तीमत्व, चांगला आवाज, विनोदी कामाचे उत्तम बेअरिंग, आणि आवश्यकतेएवढा अभिनय ही त्याची जमेची बाजु. अभिनयसम्राट म्हणुन त्याचे नाव कधी कोणी घेतले नाही. त्याचे असणेच काफी होते, अभिनय चेरी ऑन द केक. पण म्हणुन तो ठोकळा अजिबात नव्हता. बहुतेक करुन कौटुंबिक चित्रपट असायचे ज्यातल्या अभिनयाच्या मागण्या तो प्रामाणिकपणे पुर्ण करायचा. भावुक प्रसंगात मात्र गडी एकदम ढेपाळायचा. पडद्यावर तो डोळ्यात अश्रु भरुन संवाद म्हणतोय आणि आम्ही प्रेक्षक खदखदा हसत ते पाहतोय असे खुप वेळा झालेय
त्याचे खुप चित्रपट पाहिलेत आणि बहुतेक सगळे आवडलेत. अनुपमा, सत्यकाम हे तर जबरदस्त होते. त्याचे दिसणे व काम दोन्ही उत्तम झालेय या चित्रपटात. देवरमधला नंतर निगेटिव होणारा रोलही त्याने चांगला केलाय. आयी मिलनकी बेला हा अजुन एक चित्रपट ज्यात त्याने निगेटिव भुमिका केलीय. शर्मिला टागोर, मुमताज व आशा पारेखसोबत आलेले त्याचे कित्येक रंगीत चित्रपट मी पाहिलेत.
१९६५ -७० ह्या कालखंडात त्याने भरपुर हिट चित्रपट दिले. त्यातली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मेरा गाव मेरा देश मध्ये जय व विरु एकाच रोलमध्ये आहेत, डाकु जब्बर सिंग विनोद खन्ना. पुढे दोन वर्षांनी शोलेत जय व विरु वेगवेगळे झाले व गब्बर सिंग अवतरला. मेगामेदे मधली सगळीच गाणी उत्कृष्ट आहेत पण त्यातही कुछ केहता है ये सावन मधला धर्मेंद्र कसला जबरदस्त दिसतो. रफीचा आवाज त्याला इतका सुट व्हायचा की पडद्यावर धरमच गातोय असे वाटायचे. हल्लीच विविधभारतीवर एका कार्यक्रमात ऐकले की शक्य असते तर धर्मेंद्रने त्याची सगळी गाणी रफीकडुनच गाऊन घेतली असती.
विनोदी भुमिकाही त्याने तितक्याच समर्थपणे केल्यात.
मनोजकुमार व धर्मेंद्र समवयस्क, देखणे आणि सारखेच लोकप्रिय. पण राजेश खन्ना व अमिताभ या वावटळींसमोर मनोज कुमार कुठल्याकुठे उडुन गेला. होम प्रॉडक्शनच्या जीवावर कसाबसा तगला. पण धर्मेंद्र या वावटळीसमोरही उभा राहिला. त्याच्या चित्रपटांची एक वर्गवारी होती आणि त्याचा प्रेक्षकवर्गही बहुधा असावा. नाहीतर कसा काय टिकला असता??
तो अॅक्शन हिरो झाल्यावर त्याच्या मद्यपानाच्या भरपुर बातम्या यायच्या. पण माझ्या डोक्यात ती त्याची जुनीच इमेज आहे. बाग मे कली खिली मध्ये तनुजाला स्विमिंग पुलात पाहुन गर्र्कन तोंड व सायकल वळवणारा सभ्य धरम
ही मॅन, गरम धरम ह्या उपाध्या त्याच्या नावामागे लागलेल्या आणि त्याला शोभायच्याही. कुठेतरी वाचले होते की टी शर्ट-शॉर्ट्समध्येही देखणा दिसणारा एकटा धरमच होता.
असो. जुने चित्रपट सर्वत्र उपलब्ध आहेत हे नशिब. अभिनेते व अभिनेत्र्या देवाच्या घरी जरी जाऊन बसल्या तरी त्यांच्या चित्रपटामधुन त्यांना अमरत्व प्राप्त झालेय. तेच ते जुने चित्रपट परत परत पाहायचे.
काल संध्याकाळी विविधभारतीवर धर्मेंद्रची एक हल्लीचीच मुलाखत ऐकवत होते. जुन्या काळापासुन त्याच्या घरी सगळ्यांना मुक्त प्रवेश व दिवसभर लंगरसदृश्य जेवणाच्या सोयीचा उल्लेख झाला तेव्हा त्याने ‘माझ्या आईने मला असे करायला सांगितले आणि मी कायम ते पाळले‘ असे सांगितले. दिलिपकुमारचा शहीद पाहुन आपणही अॅक्टिंग करावी असे त्याला वाटले, फिल्म्फेअरच्या टॅलेंट सर्चमध्ये त्याने फोटो पाठवला आणि नर्गीस-सुनिल दत्तने त्याचा फोटो निवडला ही आठवणही त्याने सांगितली.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/sachin-pilgaonkar-shares-d...
Pages