
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ।
शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ।।
माझा मामेभाऊ व बालपणापासून सख्खा मित्र श्रीधर पालमकर याचा दिवाळीच्या शुभेच्छांचा फोन आला. औपचारिक संवाद झाल्यावर, “वामन राव, बरेच दिवस झाले आई कुठे फिरायला गेलेली नाहीये. गोकर्ण, मुर्डेश्वर, उडपी वगैरे फिरू म्हणतीये; प्लानिंग करा की." असं बोलणं झालं.
माझी आई व माझ्या मामी दोघीही ७५ वर्षांच्या पुढच्या आहेत पण पर्यटनाचा उत्साह अगदी पौगंडावस्थेतील तरुणींचा आहे. सुदैवाने प्रकृती चांगली आहे. त्या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांची सोय लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन सुरू झाले.
त्यातली बरीचशी ठिकाणी मी आधीच पाहिलेली होती. खरंतर मागच्याच वर्षी म्हणजे मे २०२५ ला मी, अहो व आमची दोन अपत्ये असे चौघे बेंगलोर, म्हैसूर, मेडिकरी (कुर्ग), मेंगलोर, उडुपी, मुर्डेश्वर, हम्पी असे आठ-दहा दिवस फिरलो होतो. पण यावेळी आई-मामींना घेऊन जायचे होते. मग त्यापूर्वीचे व तेव्हाचे अनुभव, मित्रमंडळींचा सल्ला, मायबोलीकरांचे मार्गदर्शन हे सर्व विचारात घेऊन दौरा आखला.
सुरुवातीला शुक्रवार, २४ ऑक्टोबर हा निघण्याचा दिवस ठरला होता मग सोमवार, २७ ऑक्टोबर ठरला शेवटी गुरुवार ३० ऑक्टोबरला प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला.
प्रवास प्रारंभ:
गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ सकाळी ६ वाजता
प्रवास मार्ग:
हैदराबाद - तुळजापूर - कोल्हापूर - गोवा - गोकर्ण - मुर्डेश्वर - उडुपी - शृंगेरी - हंपी - मंत्रालय - कुर्वापूर - हैदराबाद
पर्यटन ठिकाणे:
- श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर
- श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
- श्री ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर
- पन्हाळा किल्ला, कोल्हापूर
- कन्हेरी मठ, कोल्हापूर
- बागा बीच, गोवा
- श्री मंगेश मंदिर, मंगेश
- मिरामार बीच, पणजी
- दूधसागर, सनौली
- पलोळे बीच, गोवा
- श्री महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण
- शरावती नदी, होन्नावर
- श्री महागणपती मंदिर, इडागुंजी
- श्री शिवमंदिर, मुर्डेश्वर
- मुर्डेश्वर बीच समुद्रस्नान
- श्री कृष्ण मठ, उडुपी,
- सी वॉक, उडुपी
- माल्पे बीच, उडुपी
- श्री शारदा पीठ, शृंगेरी*
- श्री विरुपाक्ष मंदिर व इतर ठिकाणे, हंपी
- श्री राघवेंद्र स्वामी मठ, मंत्रालय
- श्री दत्तात्रय मंदिर, कुर्वापुर
मुक्काम ठिकाणे: १, २ - कोल्हापूर, ३ - गोवा, ४ - गोकर्ण, ५ - शृंगेरी, ६ - हंपी
*मूळ कार्यक्रमात शृंगेरी नव्हते ते प्रत्यक्ष प्रवासात ऐनवेळी सामील केले.
बुधवारी संध्याकाळी श्रीधर व मामी आले. आमच्या बॅगा भरून ठेवलेल्या होत्या. टाटा निक्सन गाडीत पेट्रोल, हवा, सर्विस सेंटरला जनरल चेक अप विजिट, वॉटर वॉशिंग सर्व झाले होते. सकाळी सहाला निघायचे ठरवले होते, त्यासाठी चारला उठायचे होते. जेवण करून रात्री नऊ वाजता झोपी गेलो.
कारसाठीचे व सुरक्षेचे साहित्य:
टीपा:
- प्रवासाचा तपशील, itinerary वगैरे या कर्नाटक तीर्थाटन २०२५ इथे लिहिले आहे.
- ही लिंक उघडण्यात अडचण येत असल्यास लिंक कॉपी करून ब्राउजर मध्ये पेस्ट करून उघडावी.
- त्यातील इंग्लिश मध्ये दिलेली itinerary ही ChatGPT च्या साह्याने आधी तयार केली होती पण नंतर त्यात बदल केले.
क्रमशः पुढे आईंचे तीर्थाटन - भाग २: जय भवानी
उत्तम सुरुवात.
उत्तम सुरुवात.
>>>>>>माझी आई व माझ्या मामी दोघीही ७५ वर्षांच्या पुढच्या आहेत पण पर्यटनाचा उत्साह अगदी पौगंडावस्थेतील तरुणींचा आहे. सुदैवाने प्रकृती चांगली आहे.
अरे वा!! टच वुड!!! असेच सदैव राहू देत.
छान सुरुवात. तुमच्या आई आणि
छान सुरुवात. तुमच्या आई आणि मामीचं कौतुक. त्यांना यात्रा घडवल्याबद्दल तुमचंही कौतुक.
लेखांची सुरुवात दणक्यात. एवढी
लेखांची सुरुवात दणक्यात. एवढी लांबची यात्रासहल आखून पार पाडल्याबद्दल कौतुक. नियोजनही चांगले केले आहे. डॉक्युमेंटरी पाहिले.
प्रवासाच्या नोंदी आणि नकाशे यांतून इतरांनाही स्फुर्ती मिळेल.
विडिओ शुटिंग असले तर यूट्यूबवर टाकता.
मस्तच…. हा भाग आमच्याही
मस्तच…. हा भाग आमच्याही लिस्टीत आहे पण अजुन मुहुर्त मिळत नाहीय.
त्यामुळे अगदी डिटेलवार, खायच्या बघायच्या जागांसकट दणदणीत वृत्तांत येऊ द्या. भरपुर भाग करा बिनदास्त.
प्रवासाच्या नोंदी आणि नकाशे
चांगले लिहिले आहे, लेख माला वाचेन.
छान सुरवात झालीय .पुढचे भाग
छान सुरवात झालीय .पुढचे भाग पटापट येऊ देत..तुमची लेखन शैली आवडते
वय वर्षे ७५+
वय वर्षे ७५+
ग्रेट
तुमची सविस्तर मांडणी करून लिहायची शैली पाहता बरेच ज्येष्ठांना फायदा होईल असे वाटते.
वाचतोय..
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
विडिओ शुटिंग असले तर यूट्यूबवर टाकता.
खायच्या बघायच्या जागांसकट दणदणीत वृत्तांत येऊ द्या.
>>> Yesss, that's the part of the plan.
हा भाग आमच्याही लिस्टीत आहे पण अजुन मुहुर्त मिळत नाहीय.
>>>
सैर कर दुनिया की गाफिल जिंदगानी फिर कहां,
जिंदगी गर कुछ रही तो नौजवानी फिर कहां.
मस्त, वाचायला आवडेल. यातील
मस्त, वाचायला आवडेल. यातील काही भाग आम्हीही केला आहे पण अजून बरीच ठिकाणं बाकी आहेतच. त्यामुळे वाचायला आवडेल आणि उपयोगी पण पडेल. छान लिहिता तुम्ही तपशीलवार.
छान सुरुवात आणि तयारी
छान सुरुवात आणि तयारी
पुढचे भाग सविस्तर येऊ देत
मस्त सुरवात
मस्त सुरवात
तुम्ही तपशीलवार लिहिणार हे माहीत आहेच
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
पुढील भाग आईंचे तीर्थाटन - भाग २: जय भवानी इथे लिहिला आहे.
वामन राव, धन्यवाद धागा
वामन राव, धन्यवाद धागा काढल्याबद्दल.
तुमच्या धाग्यावर इत्यंभूत माहिती मिळणार याची खात्री आहे.
वाचतोय ....
सैर कर दुनिया की गाफिल
सैर कर दुनिया की गाफिल जिंदगानी फिर कहां,
जिंदगी गर कुछ रही तो नौजवानी फिर कहां.>>>>>
बराबरे…