Submitted by जावेद_खान on 30 October, 2025 - 10:31        
      
    
रोहित आर्या नावाच्या माणसाने मुंबईत 17 लहान मुलांना ओलीस ठेवले. सरकारकडे त्याचे काही पैसे बाकी होते म्हणून त्याने असं केल्याचं बोललं जातंय.
त्याने स्वतः एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलाय
https://www.indiatoday.in/india/video/any-wrong-move-and-chilling-video-...
स्वच्छता अभियानावर आधारित काही लघुपट आणि कुठलेसे कार्यक्रम त्याने केले होते. त्याने पंधरा वर्षाखालील जवळपास 17 मुलांना मुंबईत एका स्टुडिओमध्ये बोलावून डांबून ठेवले.
सध्याच्या घडीला पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्याचे कळते आहे.
स्वतःला सामान्य नागरिक म्हणवून घेणाऱ्या मनुष्याने असं टोकाचे पाऊल का उचललं असेल बरे?
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults
शेअर करा
 
 
बापरे !
बापरे !
त्याला मारलं असेल तर उत्तम.
त्याला मारलं असेल तर उत्तम.
त्याच्या वर काय अन्याय झाला वगैरे चर्चेत आता रस नाही. टू रॉंग डझंट मेक वन राईट! पि रि ए ड!
यामी गौतमीचा Thursday नावाचा
यामी गौतमीचा Thursday नावाचा पिक्चर होता सेम..
बातमी अजून वाचली नाही.. पण हेच डोक्यात आले पहिला.. त्याच्याशी काही लिंक असावी का
त्याला मारलं असेल तर उत्तम.
त्याला मारलं असेल तर उत्तम.
त्याच्या वर काय अन्याय झाला वगैरे चर्चेत आता रस नाही. टू रॉंग डझंट मेक वन राईट! पि रि ए ड!
>>>>>>>
मानसिक संतुलन गेले असेल.
थंड डोक्याने केलेला अपराध नसेल.
मुले सुखरूप आहेत हे उत्तम झाले म्हणूया. त्याला मारणे हा योग्य निर्णय होता म्हणूया. पण कोणाला मारला त्याची पार्श्वभूमी जाणून न घेता उत्तम झाले म्हणणे हार्श वाटले
तो म्हणाला मी आत्महत्या
तो म्हणाला मी आत्महत्या करण्याऐवजी, माझे सांगणे मांडण्याकरता, हा मार्ग निवडला. एवढे पाहीले @*%& जाहीरात लागली. मग पुढचे नाही पाहीले.
हो. नी जर्क असेल माझी
हो. नी जर्क असेल माझी प्रतिक्रिया. पण मायनर मुलांचे अपहरण याने सगळ्या सीमारेषा पुसल्या.
https://www.indiatoday.in
https://www.indiatoday.in/india/story/mumbai-powai-hostage-crisis-rohit-...
इथे बरीचशी कारणं दिली आहेत.
आत्तापर्यंत भारतात एखाद
आत्तापर्यंत भारतात एखाद मुलाला अपहृत करून खंडणी मागण्याच्या घटना घडल्या होत्या. पण मुलांच्या गटाला ओलीस ठेवण्याची घटना पहिलीच असावी. त्यामुळे याबाबतीत अजिबात दया माया न दाखवता शूट केले हे एका अर्थी उदाहरण सेट केल्यासारखे आहे. जी काही कारणं होती त्याच्याशी मुलांचा संबंध नव्हता.
लहान मुलांची सुरक्षा हा अतिशय व्हल्नरेबल पॉईंट आहे. रँडम समाजकंटकांनी मुलांना ओलीस धरण्याचे प्रकार वाढायला नको. पण सबसे तेज चॅनेल्स टीआरपीच्या नादात ही गोष्ट लक्षात घेतील का की प्रकरण अजून हाइप करतील हे माहीत नाही.
उदा. रेप पूर्वीही होत होते. पण निर्भया प्रकरणाचे डीटेल्स जाहीर झाल्यावर व्हिक्टीमला तशाच क्रूरपणे जखमी करण्याच्या घटना वाढल्या.
इरफान खानचा मदारी चित्रपट
इरफान खानचा मदारी चित्रपट आठवला....
रँडम समाजकंटकांनी मुलांना
रँडम समाजकंटकांनी मुलांना ओलीस धरण्याचे प्रकार वाढायला नको.>>> बरोबर....आणि असं ओलीस धरुनही शेवटी मारलेच जातो म्हणून आपण मरण्या आधी ओलीसांच्या मरणाची पुरेपुर तजवीज असे रॅंडम समाजकंटक करु लागतील ही देखील शक्यता नाकारता येत नाही.
माझेमन अगदी सहमत आहे. पायंडा
माझेमन अगदी सहमत आहे. पायंडा पडायला नको म्हणुनच एन्काऊंटर केलेले असणार.
वरची लिंक बघितल्यावर नक्की
वरची लिंक बघितल्यावर नक्की कोणाला दोष द्यावा हेच कळेना. सरकारी खाते कामे करुन घेते आणि सरळ लाथ मारते?? मंत्र्यांना दिलेला शब्द पाळता येत नसेल तर मंत्री बनले कशाला? फक्त भत्ते खायला???
>>>>>नक्की कोणाला दोष द्यावा
>>>>>नक्की कोणाला दोष द्यावा हेच कळेना.
तो मनुष्य दोषी आहेच आहे. मुलांना ओलिस/वेठीस धरुन मागणे मांडणे हा गुन्हा आहे.
मग मुलांऐवजी .... जाउद्या इथे
मग मुलांऐवजी .... जाउद्या इथे लिहित नाही.
मुलांऐवजी एकच मूल असते तर असे
मुलांऐवजी एकच मूल असते तर असे म्हणताय ना अमित? मुद्दा बरोबर आहे.
पण कोणी एका मुलाला ओलिस धरुन अश्या प्रकारच्या मागण्या केलेल्या का पूर्वी? - हे माहीत नाही. अश्या प्रकारच्या म्हणजे - लक्ष वेधून घेण्याकरता केलेल्या मागण्या.
अजिबात असं म्हणत नाही आहे.
अजिबात असं म्हणत नाही आहे. जाउद्या!
ओके.
ओके.
भयंकर अस्वस्थ वाटलं. लोक
भयंकर अस्वस्थ वाटलं. लोक प्रतिक्रिया देऊन नंतर कोडगे बनत जातात. त्यांची चूक नाही. एखादी गोष्ट वारंवार घडून न्याय मिळत नाही ही गोष्ट नॉर्मल होऊ लागली कि अशा घटनेबाबत कळकळ व्यक्त करणे हे वेगळ्या नंदनवनाचे लक्षण ठरत जाते. पत्रकार राहुल कुलकर्णी यांचा रिपोर्ट पाहिला. https://www.youtube.com/watch?v=HhlOK62J_sM
माणसं एव्हढं टोकाचं पाऊल का उचलतात ? एण्काउंटर दहशत बसवण्यासाठी असेल तर इतर अनेक गंभीर गुन्ह्यांचं काय ? कि ते अंगवळणी पडलेले असल्याने ते नॉर्मल आहेत ? बीडच्या प्रकरणात आरोपीला पोलीस सेल्युट काय ठोकतात , संरक्षण काय पुरवतात आणि फलटणच्या घटनेत आरोपी असलेली बडी धेंडं पैशाचा तगादा लावणार्यांवर सहा महीन्यात ३०० गुन्हे कय दाखल करतात, तेच पोलीस डॉक्टर महीलेला त्रास देत असल्याने तिला function at() { [native code] }महत्या काय करावी लागते . या सर्व घटना घडत असताना कोडगेपणाने गप्प बसावे लागते. मग अशा एखाद्या घटनेत ती वाफ निघते.
पण एण्काउंटर करताना आरोपीची पार्श्वभूमी पोलीस बघत नसतील ? त्यांच्या प्रशिक्षणाचा तो भाग नसेल ? नेमकी घटना काय घडली आणि कोणत्या परिस्थितीत गोळी झाडावी लागली हे कधीच समोर येणार नाही. पण याच आरोपीने शाळा सुधारण्यासाठी योजना अंमलात आणल्या, त्या कल्पनाही त्याच्या होत्या, मुलांच्या शाळा सुंदर बनवण्यासाठी अनेक शाळात त्याने स्वतःच्या पैशांनी ही योजना राबवली. २०१३ पासून तो शाळांमधे काम करतोय. एव्हढ्या दीर्घ काळात मुलांना त्याच्या पासून धोका असेल् का ? पंतप्रधानांनी कौतुक केले आणि त्याच्या धडपडीचे पैसे भलत्यालाच दिले गेले. मंत्र्यांच्या घराबाहेर उपोषण केले तेव्हांच एण्काउंटर करायला हवा होता. मंत्र्यांची सुरक्षितता धोक्यात आली होती.
यानिमित्ताने अनेक प्रश्न पडतात.
ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीला मित्र असावेत. झपाटलेले लोक एकलकोंडे होतात. यश मिळतं, कौतुक होतं तेव्हां ते त्यात वाहवत जातात. धोक्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांना मग धक्के सहन होत नाहीत. वैफल्यग्रस्त होत जातात. यश मिळत असताना खुशमस्करे आणि स्वार्थी लोक भोवती गोळा होतात. ते संकटात साथ सोडतात. कुणीही बाजू घ्यायला नसतं अशा एकटेपणात खरे मित्र दिशा साखवू शकतात. पण तेच नसल्याने मग त्यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. अर्थात त्याच्याकडे एअरगन होती. त्यातून नुकसान पोहोचवण्याचा इरादा होता असे दिसत नाही. वेगवेगळी मतं असतील. अपहरण किंवा ओलीस ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे.
पण हा एकच गंभीर गुन्हा नाही. यादी आजही लोक विसरलेले नाहीत. पण कोडगे बनल्याने जखमांवर खपल्या भरतात. काहीच होऊ शकत नाही ही जखम पुन्हा पुन्हा कुरतडून काढणे हे काम इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडीया करतो. त्यामूळं अशा चर्चा नको वाटतात. हा धंदा नको व्हायला. पण झाला आहे.
आपला फीड नियंत्रित करावा. जंगल, वाईल्ड लाईफ, अॅडव्हेंचर, टेक्नॉलॉजी , विनोद एव्हढाच ठेवावा आणि कोडगे बनून जावे हेच खरं.
याच आरोपीने शाळा
याच आरोपीने शाळा सुधारण्यासाठी योजना अंमलात आणल्या, त्या कल्पनाही त्याच्या होत्या, मुलांच्या शाळा सुंदर बनवण्यासाठी अनेक शाळात त्याने स्वतःच्या पैशांनी ही योजना राबवली. २०१३ पासून तो शाळांमधे काम करतोय
>>
याच बाबींमुळे मला रोहित बद्दल सहानुभूती वाटतेय. त्याच्या विडिओतील देहबोलीमुळे सुद्धा तो मुलांना काही ईजा पोहोचवेल असं वाटत नाहीये. कदाचित व्यवस्थेने एका सामान्य नागरिकाला गुन्हेगार बनण्यास प्रवृत्त केलं असच मला वाटतं.
काही दिवसांपूर्वी पश्चिम
काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात एका ठेकेदाराने आत्महत्या केली होती. कारण अनेक पाठपुरावे करूनही सरकारने त्याच्या थकीत बिलांची रक्कम अदा केली नव्हती.
त्यावेळी तो सरकारचा ठेकेदार नसून एक पोटठेकेदार आहे आणि त्याच्या थकीत बिलांचं सरकारशी काही देणंघेणं नाही असं बोलून सरकारने हात वर केले होते.
आणि आतासुद्धा रोहित आर्य हा मनोरुग्ण होता असं पसरवलं जातंय. मनोरुग्ण लोकांना सरकारी ठेके देण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासत नसतील काय? की उगाच कुणालाही सरकारी ठेके मिळतात?
डॉ, संपदा मुंडे काय, तो
डॉ, संपदा मुंडे काय, तो ठेकेदार पाटील असो किंवा रोहित आर्या - हे व्यवस्थेने केलेले खून आहेत. सराईत गुन्हेगार नसलेल्या व्यक्तीच्या छातीत गोळी घातली जाते ?? त्याला जायबंदी करता येत नाही का?