वास्तवावर विस्तव

Submitted by मिरिंडा on 25 October, 2025 - 05:59

आज वास्तव नको आहे
कारण ते भाजून काढते
भावनांच्या वासनांच्या
पोळ्या भाजणे सोपे जाते

या पोळ्या खाणाऱ्यांना
माज चढतो जातीधर्माचा
मग लहान बालकांनाही
हाती शस्त्र दिले जाते

जुमानणे मानवतेला
स्वप्नातही न दिसे त्यांना
खोटी स्वप्ने वीरगतीची
खोट्या खोट्या आहुतीची

वास्तवाची परवड फरफट
स्वार्थ साधी त्यांचा झटपट
तरीही उरतो स्लेष खऱ्याचा
अवास्तवाची होई चिकित्सा

अन्यायाचे पितळ उघडे
मुलामा सोन्याचा उतरे
आता फक्त वाट पाहाती
" संभवामि युगे युगेची "

अरुण कोर्डे
©®

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकच कविता पाच पाच वेळा पोस्ट करून आमच्या वाचण्यावर विस्तव फिरवा. नाहीतर एक काम करा आमच्यावरच विस्तव फिरवा. फटाके फोडले आता उरलेला विस्तव काय करायचा तर फिरवा मायबोलीकरांवर.

मोबाईल मधे काहीतरी प्रॉब्लेम झाल्याने पाठवली गेली की नाही हे कळलं नाही. त्याबद्दल क्षमस्व. आपला राग समजू शकतो. परंतू कवितेबद्दल आपण काहीच लिहीलं नाहीत.ते अवश्य लिहा. प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

आपला राग समजू शकतो. परंतू कवितेबद्दल आपण काहीच लिहीलं नाहीत.>>> @मिरींडा, एकदा हडळीवर कविता लिहून तर बघा.. Biggrin

फार्स विथ द डिफेन्स

" एकदा हडळीवर कविता लिहून तर बघा ".
आपल्या या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही. कृपया स्पष्ट करावा, ही विनंती.