महाराष्ट्र, कर्नाटक: तीर्थाटन, पर्यटन - मदत हवी आहे

Submitted by वामन राव on 22 October, 2025 - 11:28

नमस्कार मायबोलीकरांनो ,

पुढच्या आठवड्यात खालीलप्रमाणे तीर्थटन, पर्यटन, देशाटन वगैरे करण्याचा माझा विचार सुरु आहे. आमचा चार जणांचा गट आहे. सर्वांच्या तब्येती चांगल्या आहेत व सर्वांना प्रवासाचा पूर्वीचा अनुभव आहे. सर्वजण शाकाहारी आहेत. प्रवास कारने करायचा आहे व शक्यतो दिवसा करावा असे नियोजन आहे.

प्रारंभ: हैदराबाद, सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५

प्रवासी: १ - पुरुष - ४७ वर्षे, २ - पुरुष - ४७ वर्षे, ३ - स्त्री - ७५ - वर्षे, ४ - स्त्री - ७० वर्षे

प्रवासाचा मार्ग: हैदराबाद - तुळजापूर - कोल्हापूर - गोवा - गोकर्ण - मुर्डेश्वर - उडुपी - होस्पेट - हंपी - मंत्रालय - कुर्वापूर - हैदराबाद

पर्यटनाची मुख्य ठिकाणे:

  1. श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर
  2. श्री अंबाबाई मंदिर कोल्हापूर
  3. गोवा समुद्रकिनारा
  4. श्री महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण
  5. श्री शिवमंदिर, मुर्डेश्वर
  6. श्री कृष्ण मठ, उडुपी
  7. विरुपाक्ष मंदिर व इतर ठिकाणे, हंपी
  8. श्री राघवेंद्र स्वामी मठ, मंत्रालय
  9. श्री दत्तात्रय मंदिर, कुर्वापुर

मुक्कामासाठी प्रस्तावित ठिकाणे: कोल्हापूर, गोवा, उडुपी, होस्पेट

या प्रवासासंबंधी विशेषतः खालील बाबतीत मार्गदर्शन, सल्ला, सूचना, माहिती हवी आहे.

  • ज्येष्ठ सदस्यांचा विचार करून हा मार्ग योग्य राहील का?
  • त्यासाठी काही विशेष तयारी किंवा खबरदारी घेण्याची गरज आहे का?
  • हा प्रवास साधारणपणे ५-६ दिवसांत पूर्ण करणे शक्य आहे का?
  • या मार्गावर माझ्या यादीत नसलेली, पाहण्यासारखी इतर महत्त्वाची ठिकाणे कोणती आहेत?
  • यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या भागात फिरलेल्या सभासदांचे अनुभव आणि सल्ला.
  • वरील मुक्कामाच्या ठिकाणी चांगली, स्वच्छ, विशेषतः ज्येष्ठांसाठी सोयीस्कर अशी हॉटेल्स कोणती आहेत?
  • प्रवास, हवामान, जेवणाची सोय, इतर कोणतीही उपयुक्त माहिती?
  • उपयुक्त / संबंधित धाग्यांच्या लिंका?

ही व इतर माहिती या गूगल डॉक्स मध्ये लिहीत आहे.

मार्गदर्शनासाठी मायबोलीकरांचे आगाऊ धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवासाला शुभेच्छा.
यादीतील क्रमांक ८ आणि ९ सोडून बाकीची ठिकाणे ही रेल्वे आणि स्थानिक बसने केली आहेत.
पण कारचा अनुभव नाही. शहरांत देवळे अगदी आतमध्ये मध्यवस्तीत असतात आणि पार्किंगचा प्रश्न येऊ शकतो. पार्किंग असणारी हॉटेल्स शहराबाहेर असतात.
एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला कार उपयोगी वाटली तरी एक चांगला नकाशा घेऊन आराखडा अगोदरच ठरवणे उत्तम.

तुम्ही खूप जास्त ठिकाणे आणि अंतर कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहात. जर स्वतः प्रवास करणार असाल तर ड्रायविंग खूप होईल.
हैद्राबाद - तुळजापूर - कोल्हापूर प्रवासच (अक्चुअल ड्रायविंग) १२ तासाचा होईल.
मृडेश्वर - हंपी ८-१० तासाचा प्रवास आहे.
हंपी - हैद्राबाद पुन्हा ८-१० तास.

दिवस १ हैद्राबाद - तुळजापूर दर्शन - कोल्हापूर मुक्काम
दिवस २ - कोल्ह्पापूर दर्शन - दुपारी गोव्याला प्रस्थान
दिवस ३ / ४ - गोवा दर्शन (मंगेशी वगैरे पहिला दिवस, दुसर्‍या दिवशी पणजी व आसपास)
दिवस ५ - गोकर्ण दर्शन व मुक्काम मृडेश्वर
दिवस ६- मृडेश्वर दर्शन, मृडेश्वर आसपास भटकंती, रात्री उडुपी
दिवस ७ - उडुपी ते हंपी प्रवास
दिवस ८-९ हंपी भटकंती
दिवस १० - हंपी ते हैद्राबाद प्रवास

या ऐवजी

पर्याय १ हैद्राबाद - तुळजापूर - कोल्हापूर - गोवा असा प्रवास करू शकता.
किंवा पर्याय २ हैद्राबाद - मृडेश्वर - उडुपी - हंपी असा एक प्रवास करू शकता.
हे पर्यात ६-७ दिवसाच्या ट्रिपमध्ये होवू शकतील. आणि या ठिकाणी तुम्ही योग्य तो वेळ देऊ शकाल.

माझे मतः
मृडेश्वर - उडुपी पेक्षा हैद्राबाद - हंपी - होस्पेट - बदामी असा प्रवास करा असे सुचवेन. यात देव दर्शन कमी पण पर्यटन अधिक होईल.
देवदर्शन हा मुख्य उद्देश असेल तर हैद्राबाद-कोल्हापूर (१) - गोवा - मंगेशी (२,३)- तुळजापूर (४) - हैद्राबाद (५) असा प्रवास करा असे सुचवेन.

सांगलीहून जाणार आहात, पाच मिनिटे भेटून घेऊ.
पणजी मधला फक्त एखादा बीच पाहून मुक्कामासाठी मडगावच्या पुढे पलोलम बीच हा अतिशय सुंदर आणि सेफ आहे. होम स्टे सुद्धा आहेत. तिथून कारवार फक्त २० मिनिटे आहे.

गोकर्ण साठी पांढरी लुंगी किंवा धोतर असू दे. शर्ट बनियन न घालता लुंगी लावूनच जावे लागते. मुर्डेश्रर मध्ये सुद्धा राज्याच्या सोयी आहेत. गोवा ते इथे पर्यंत रस्ता अगदी मख्खन आहे. आजिबात कंटाळा येणार नाही.
कोल्हापूर ते गोवा शक्यतो राधानगरी मार्गे जा.

तुमच्या ठिकाणांच्या यादीतून १.श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर हे सोडून
हा घ्या मार्ग
हैदराबाद_ मेहबूबनगर -रायचूर -
( ९श्री दत्तात्रय मंदिर,कुरवपूरसाठी)-
मंत्रालयम (८.श्री राघवेंद्र स्वामी मठ)_अडोनी_ अलुरू _ बेल्लारी_
हंपी( ७.विरुपाक्ष मंदिर व इतर ठिकाणे,)_
होस्पेटे_ चित्रदुर्गा मार्गे_ शिवमोगा ( शिमोगा)_ कोप्पा मार्गे-
श्रृंगेरी ( शंकराचार्य मठ)-
-उडुपी( ६.श्री कृष्ण मठ, उडुपी.कृष्ण मट मंदिर)-
-मुर्डेश्वर(५.श्री शिवमंदिर, मुर्डेश्वर) -
गोकर्ण ( ४.श्री महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण महाबलेश्वरा) -कारवार-
गोवा पालोळे किनारा (३.गोवा समुद्रकिनारा)-मडगाव _लोंढा _खानापूर_ बेळ्ळगावी ( बेळगाव)_ कागल -
कोल्हापूर( २.श्री अंबाबाई मंदिर)_ सांगली(खिद्रापूर मंदिर, आणि नरसोबाची वाडी )-
विजयपुरा ( विजापूर. गोलगुंबजसाठी) _
गाणगापुरा ( गाणगापूर)_ कलबुरगी ( गुलबर्गा)-
_ हुमणाबाद ( माणिक प्रभू संगिताचे गुरू) _झहिराबाद _हैदराबाद.

किंवा उलट जा.

झकास म्हणतोय तसं मंदिरात लागणारा वेळ लक्षात घ्या. गोकर्णला दुपारी मंदिर बंद असतं तर उडपीला सकाळी व दुपारी असं दोनदा गेलो दोन्ही वेळेला तेवढीच गर्दी. शेवटी मनाविरूध्द दोनशे रुपयाचं तिकीट काढून गेलो तरी नीट दर्शन झालंच नाही….

उडपीच्या कृष्ण मंदिराच्या आवारातच राहण्याची व्यवस्था आहे. वेगवेगळे मठ आहेत. मंदिर दोनवेळा पाहिले पण ते नऊ झरोख्यांतून ( एकफुटxएकफुट खिडकीत नऊ बारकी भोके आहेत.) आतला अंधारातला कृष्ण पाहणे एक खटाटोप आहे.

श्रींगेरी( श्रृंगेरी) मात्र भाविक नसलेल्या व्यक्तीलाही आनंद देणारी रम्य जागा आहे. नदीकाठी ( तुंगा) आहे, झुलता पूल आहे. बिनखांबांचे गीता भवन आहे.देवळांत दोन हत्ती आहेत. प्रसादाचे जेवण म्हणजे पातळ भात, ताक भात. काही जण नवस फेडणारे ताटात जेवत नाहीत. फरशीवरच वाढलेले अन्न खातात.

कारवार ते उडुपी ते मंगळुरू कुठेही शाकाहारी जेवण फारच यथातथा असते. लाल रंगाचे तिखट रसम, भात, बीट कांद्याची कोशिंबीर, ताक. क्वचित कोबीची भाजी. फार अपेक्षा ठेवू नका. इडली वडे डोसेही फार चांगले नसतात.

तुमचे इनपुट प्रॉम्प्ट म्हणून परप्लेक्सिटी ला दिल्यानंतर आलेले उत्तर (अर्थात ह्यातनं काही व्यवस्थित वाटले तरच घ्या... अन्यथा SKIP करा ):
तुमच्या नियोजित यात्रा मार्गासाठी आणि टीमच्या वयोमानानुसार मार्गदर्शनः
१. ज्येष्ठ सदस्यांसाठी मार्ग योग्य आहे का?
तुळजापूर, कोल्हापूर, गोवा, गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, होस्पेट, हंपी, मंत्रालय, कुर्वापूर – हे सर्व ठिकाणे आणि रस्ते कारने साधारणपणे आरामदायक आहेत व वयोवृद्धांसाठी प्रचलित ठिकाणे आहेत.
प्रत्येक दिवस जास्त तणावयुक्त ठेवू नका. मोठे प्रवासाचे टप्पे (६-८ तास) शक्य असल्यास टाळा; शक्य तितका मुक्काम वाढवा आणि प्रत्येक ठिकाणी आरामदायक वेळ द्या.​
२. विशेष तयारी व खबरदारी
हॉटेल निवडताना लिफ्ट, रॅम्प, मेडिकल/इमर्जन्सी सुविधा, ग्राऊंड फ्लोअर रूम्स यांचा विचार करा.
गाडीत पाण्याच्या बाटल्या, नेहमीच्या औषधांचा साठा, स्नॅक्स, छत्र्या, हॅट्स/टोपी, सॅनिटायझर्स, मास्क ठेवा.
दिवसा प्रवास करा; रात्री प्रवास टाळा.
हवामान बदलानुसार हलके ऊनी/लोकर कपडे बाळगा.
३. ५-६ दिवसांचे नियोजन शक्य आहे का?
तुमच्या मार्गावर असलेल्या पर्यटनस्थळे आणि आरामदायक मुक्कामासह ६ दिवस पुरेसे वाटतात.
जर तुम्हाला प्रत्येक स्थळावर आरामात फिरायचे असेल, तर ७-८ दिवस उत्तम राहील.
पुढचा अंदाज:
१ दिवस: हैदराबाद–तुळजापूर–कोल्हापूर
१ दिवस: कोल्हापूर–गोवा
१ दिवस: गोवा–गोकर्ण–मुर्डेश्वर
१ दिवस: मुर्डेश्वर–उडुपी
१ दिवस: उडुपी–होस्पेट–हंपी
१ दिवस: हंपी–मंत्रालय–कुर्वापूर–हैदराबाद
४. इतर महत्त्वाची स्थळे
बिदर किल्ला, बीजापूर गोल गुंबज, योगीमठ (चितळ), जोग फॉल्स (उडुपीच्या मार्गावर), बनवासी, पणजिममधील चर्चेस, गोकर्ण ओम बीच वगैरे यांचीही भेट देता येईल.​
५. ऑक्टोबर-नोव्हेंबर मधील अनुभव व सल्ला
हवामान नोव्हेंबरमध्ये छान ठंडगार, ऊन सहनशील असेल.
या काळात गर्दी तुलनेने कमी आहे.
मंदिर-सोहळे, उत्सव, किनाऱ्यांवर पर्यटनासाठी उत्तम काळ.
काही ठिकाणी फुलपाखरे, पक्षी निरीक्षण उत्तम.
६. ज्येष्ठांसाठी सोयीस्कर, स्वच्छ हॉटेल्स
कोल्हापूर: Sayaji Kolhapur (wheelchair accessible), Ramee Panchshil, Hotel Ayodhya.​
गोवा: Viavnta, Ginger, Old Goa Residency (सिनिअर फ्रेंडली).
उडुपी: Paradise Lagoon, Samanvay Boutique Hotel, White Lotus.
होस्पेट/हंपी: Clark’s Inn, Krishna Palace, Priyadarshini Pride (ground floor रूम्स मागा – लिफ्ट/रॅम्प बघा).​
७. प्रवास, हवामान, जेवणाची सोय, इतर टिप्स
प्रवास केल्यावर दिवसा/संध्याकाळी थोडं विश्रांती घ्या.
रस्त्यांवर प्रामुख्याने ४-लेन हायवे आहे, पण काही ठिकाणी वळणदार रस्ते/गावंदारे असतात.
हर ठिकाणी (कोल्हापूर, गोवा, उडुपी, हंपी) उत्तम शाकाहारी जेवण उपलब्ध आहे.
आवश्यकता भासल्यास स्थानिक टॅक्सी/ऑटो उपलब्ध आहेत.
काही मंदिरांत वरिष्ठ वयोगटासाठी विशेष प्रवेश आहे – ते जरूर वापरा.
८. उपयोगी लिंक/संदर्भ
मायबोली भटकंती फोरम: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनुभव, सदस्यांचे सल्ले​
TripAdvisor आणि Agoda वर सीनियर फ्रेंडली हॉटेल्स​
Road Trip ब्लॉग्स: Revv, Treebo, TravelTriangle, Wanderlog​
Hampi Senior Citizen Tour Information​
सूत्रसंग्रहः
धागे, ब्लॉग, ट्रॅव्हल गाइड/फोरमवरील अद्ययावत माहिती व सदस्यांचे अनुभव व सल्ले वाचा.​
****
हंपी येथे ज्येष्ठांसाठी आरामदायक प्रवास मार्गदर्शक:

१. प्रवासाचे नियोजन
हंपीमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, विरुपाक्ष, विजया विठ्ठल, कमलापूर आणि पुरातत्व क्षेत्र spread आहे. बरीच ठिकाणे walking distance वर आहेत, पण काही ठिकाणी वाहन किंवा ऑटो मिळू शकतात.​
ज्येष्ठांसाठी सायंकाळच्या किंवा सकाळच्या गाईडेड टूरचे प्लॅनिंग करा - या वेळी उन्हाचा जोर कमी असतो, उर्जा बचत होते.
दिवसा जास्त चालणे टाळा; मुख्य ठिकाणे किंवा मंदिरांजवळ ऑटो/कॅब करा.
वेळ ठरवून ब्रेक घ्या, विश्रांतीसाठी shaded spots किंवा बागांचा वापर करा.
२. निवासाची सोय
Heritage Resort, Hyatt Place, Royal Orchid Central, KSTDC Mayura Bhuvaneshwari, Hotel Malligi, Priyadarshini Pride, Varsha Hotel (Hospet/Hampi) हे सीनियर फ्रेंडली व स्वच्छ निवास पर्याय आहेत; येथे ground floor रूम्स, राम्प, लिफ्ट, आणि मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत.​
बुकिंग करताना accessible amenities, restaurant मध्ये शाकाहारी जेवण, आणि रूम सर्व्हिस याची खात्री करा.
३. गाईडेड टूर व सुविधा
ज्येष्ठांसाठी आरामदायक गाईडेड टूर उपलब्ध असतात ज्यात सुरक्षेची खबरदारी, तणाव कमी असलेली साईटसीइंग, व वेळेचे योग्य नियोजन असते.​
प्रमाणित गाईड मुख्य स्थळांच्या गेटजवळ hire करता येतात. रु. 200-300 दराने गाईड मिळतात.​
काही मंदिर/स्थळांमध्ये senior citizen discount किंवा fast track प्रवेश मिळतो.
४. आरोग्य व सुरक्षा
हंपीमध्ये हॉस्पेट येथे हॉस्पिटल व मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत; आपत्कालीन नंबर्स जवळ ठेवा.
हलका, breathable कपडे घालावेत; टोपी, सनग्लासेस, छत्री वापरावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
५. हवामान व उपयुक्त सूचना
ऑक्टोबर-मार्च कालावधी सर्वोत्तम; या वेळी हवामान २०-३०°C च्या दरम्यान असते, ऊन सहनशील असते.
काही ठिकाणी रस्त्यावर uneven डोंगर किंवा दगड असू शकतात—चांगल्या grip असलेली चप्पल/शूज वापरावेत.
जेवणासाठी शाकाहारी, सुपाच्य, आणि घरगुती पदार्थ निवडावेत; हॉटेल्स/रेस्टॉरंट्समध्ये विशेष सीनियर ओळख/सवलत मिळू शकते.
६. उपयुक्त टिप्स
वाहन/ऑटो बुक करून मुख्य स्थळे जवळजवळ भेट द्या; फार चालणे टाळा.
दिवसाच्या मध्यभागी विश्रांती घ्या (सिएस्टा).
शांत व रम्य स्थळांचा अनुभव घ्या—फोटो, ध्यान, मंदिर दर्शन, स्थानिक कथाकथन.
हंपीच्या ज्येष्ठ प्रवाशांसाठी काही मुख्य ठिकाणे:
विरुपाक्ष मंदिर
विठ्ठल मंदिर आणि स्टोन चारियट
कमलापूर संग्रहालय
लोटस महल, हंपी बाजार, हजारा राम मंदिर, पुष्करणी, अष्टांग योग सेंटर वगैरे.​
संपूर्ण प्रवासासाठी
आराम, आरोग्य, आणि ऐतिहासिक अनुभव अशा संयोजनाचे नियोजन करा; शाकाहारी जेवण, आरामदायक निवास, आणि सुरक्षित प्रवासाचा विचार लक्षात ठेवा.

परप्लेक्सिटी एवढं चांगलं उत्तर देत असेल तर वावा. त्यांच्या comet browser ची वाट पाहतो आहे. ॲप अगोदरच घेतले आहे.

मित्रहो, आताच आदरणीय वामन राव आणि मी भेटलो. अगदी फक्त पंधरा मिनिटे. त्यांना अजून 40 किमी कोल्हापूरला जायचे होते.
दोन फोटो आहेत पण मला येत नाही म्हणून कदाचित ते दाखवतील.

मी त्यांना काही सांगलीची खासियत भेट दिली आणि त्यांनीही खास हैदराबादी भेट मला दिली. खूप बरे वाटले. आशा आहे त्यांनाही आनंद वाटला असेल.
शरद गायकवाड सांगली

वाह, मस्तच.
@वामन राव.
तुमचे तीर्थाटन, पर्यटन झाले की एक लहानसा वृत्तांत लिहून ठेवा इथे. अगदीच नाही जमलं तर तुमचा प्रवास क्रम, थांबे, हॉटेल्स....