Submitted by अतुल. on 6 September, 2025 - 05:19
"गणपतीची आरास कशी केलीयेस यावर्षी?" तिने काहीतरी विचारायचे म्हणून विचारले.
तसे आता त्या दोघांच्यात काही राहिले नव्हतेच. पण बऱ्याच वर्षांनी अनायासे भेटले म्हणून ते कॉफी घेत बसले होते.
"नाही बसवत मी गणपती आता" तो निर्विकारपणे म्हणाला.
"का?"
"या उत्सवातून जे शिकायचंय ते शिकून झालंय माझं कधीच. मूर्तीची प्रतिष्ठापना, मनोभावे पूजाअर्चा. आणि अखेर तिचं विसर्जन. जसा जीव लावायचा तसंच सोडूनही द्यायचं. हीच शिकवण..."
"बरं मग?"
"नेहा" तो म्हणाला, "तू आयुष्यातून गेलीस तेंव्हाच या गोष्टी शिकलोय गं मी..."
ते ऐकले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले! तो शांतपणे उठला. निघून गेला.
कॉफीचा कप हातात धरून ती बराच वेळ तिथे एकटीच बसून राहिली.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
मलाही हे असे कोणाला तरी बोलायचे आहे.
आयुष्याने एकदा तरी ते बोलून असे शांतपणे उठून जायची संधी द्यावी एवढीच इच्छा.
वेगळं आहे शशक.
वेगळं आहे शशक.
असं सोप्पं का ? फाऊल धरतात मग.
छान
छान
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
छानच!
छानच!
व्वा ! आवडलीच.
व्वा ! आवडलीच.
@ऋन्मेऽऽष: स्क्रिप्ट तयार आहे
@ऋन्मेऽऽष: स्क्रिप्ट तयार आहे आता, होऊन जाऊ द्या
संत्री सोलायला लावणारं मलाच नको वाटतं आजकाल
@रानभुली
झकास, सामो, आबा, अस्मिता
थांकू थांकू
आवडली
आवडली
मला पण आवडली.
मला पण आवडली.
ओह! आवडली शशक!
ओह!
आवडली शशक!
खुप खोल अर्थ आहे खरे तर. बरच
खुप खोल अर्थ आहे खरे तर. बरच आहे उगाच संत्री सोलायचं काम नाही.
धन्यवाद छन्दिफन्दि, केशवकूल,
धन्यवाद छन्दिफन्दि, केशवकूल, कविता, झंपी
आवडली..
आवडली..
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.