संस्मरणीय भटकंती - दक्षिण मुंबई (गेट वे - मरीन ड्राईव्ह) - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 6 September, 2025 - 01:00

गेल्यावर्षी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये, जवळजवळ दोन दशकांहून जास्त वर्षांनी, मी आणि माझ्या मैत्रिणींने दक्षिण मुंबईतील फोर्ट, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह भागाची मस्त सैर केली, आमच्या जुन्या आठवणी जागवण्याचा केलेला तो एक छोटा प्रयत्न होता.
भुरभुरत्या पावसातील दक्षिण मुंबईची ही काही क्षणचित्रे आणि आठवणी.

***

पूर्वी जायचो तसंच यावेळीही ट्रेननीच जायचं आम्ही आधीच ठरवलेलं. परंतु गर्दीच्या कारणास्तव जाताना फर्स्ट क्लासने जायचं ठरलं. मी बरेच वर्षांनी लोकल ट्रेनचा प्रवास करत होते. खरं तर ठाणा स्टेशनसुद्धा इतकं बदललंय की सुरुवातीला मला गांगरायलाच झालं. आजकाल म्हणे तिकीटं ऑनलाईन, ॲप्सवरून वगैरे बऱ्याच प्रकारांनी मिळतात त्यामुळे तिकीट काढायला काही रांगा नसतात पूर्वीसारख्या. मैत्रिणीने असंच ऑनलाईन एका ॲपवरून आमची तिकीट काढली आणि आम्ही निघालो.
एकंदर बेत, CSMT ला उतरणे, १३८ पकडून नरिमन पॉईंटला जाणे, जुना क्लास बघणे, तिथून मग मरीन ड्राइव्ह आणि उरलेला वेळ आवडेल तसा घालवणे. तसंही फोर्ट, नरिमन पॉईंट भागात गेल्यावर काय करायचं हा प्रश्न खचितच कोणाला पडेल.
अगदी पूर्वीसारख्चयाच पूर्ण रस्ताभर, जळजळ चाळीस-पंचेचाळीस मिनिटं, नॉनस्टॉप हास्य-गप्पा चालू होत्या.
सीएसटीला उतरल्यावर, खरं तर काही घाई नव्हती पण तरी, मुंबईच्या प्रवासाला तुम्ही एकदा लागलात की निवांतपणा काही रहातचं नाही. चालता चालताच सीएसटी स्थानकाचे जमतील तसे फोटो काढले.

१३८ पकडायल गेलो पण गेट वे च्या बसेस बघितल्यावर त्यातीलच एक पकडली. मैत्रिणीबरोबर फिरण्यातील एक मुख्य मुद्दा / फायदा - फार आखीव रेखीव प्लॅन प्रमाणेच जायला पाहिजे असं काही नसतं. मनात आलं तसू केलं. त्यामुळे आनंद द्विगुणीत होतो.
शेवटच्या स्टॉपवर उतरल्यावर बघतो तो ही गर्दी. गेटवे ऑफ ला कधीही गर्दी असणारच, पण तरी.. तसंच माझ्या आठवणी प्रमाणे पूर्वी कधी अशा पोलीसचौकी बसवून चेकिंग करताहेत वगैरे बघितलं नव्हतं पण आता ही मोठ्ठी लाईन होती पोस्ट चेकला.
छान मस्त पाऊस भुरभुरत होता, करडं आकाश, त्याचं छटटेतला अरबी समुद्र आणि त्या पार्श्वभूमी वरती बुलंद गेट वे ऑफ इंडिया. त्याच्याबरोब्बर समोर ताज हॉटेलची मोठी दिमाखदार बिल्डिंग.
खरं सांगायचं तर 26/11 नंतर मी पहिल्यांदाच ताज आणि गेटवेच्या भागात आले होते. इतक्या वर्षानंतरही, ताजची दिमाखदार बिल्डिंग बघताना 26/11 आणि मुंबई स्पिरिट परत एकदा आठवल्याशिवाय रहावलं नाही.
असो! तिथे आम्हाला दोन-तीन बेस्टच्याच बसेस दिसल्या. त्या AC डबलडेकर होत्या आणि त्यांना खूप मोठ्या खिडक्या होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्या बेस्टने सुरू केलेल्या पर्यटन बसेस होत्या. शंभर रुपये तिकीटात दीड एक तासात तुम्हाला तो पूर्ण भाग फिरवून आणतात. म्हणजे मस्त एसीमध्ये बसून बाहेरचा पाऊस, समुद्र, मुंबईची रहदारी, प्रेक्षणीय स्थळे बघायची आणि जमेल तसे फोटो घ्यायचे. कल्पना अतिशय उत्तम होती. डबलडेकर मध्ये वर बसून त्या मोठ्या काचेच्या स्वच्छ खिडकीतून खरच खूप छान दिसत होतं. फोटोही छान येत होते.

बसमध्ये आम्ही फक्त चारच प्रवासी होतो, त्यामुळे कंडक्टरही वर येऊन बसला आणि तो आम्हाला जाता जाता माहिती देत होता. कॉलेजचे दिवस आठवले, कंडक्टरचा एवढा विनयशील अनुभव मला वाटतं पहिल्यांदाच येत होता - इतका छान हसून वगैरे बोलत होता, बहुतेक एसी आणि रिकाम्या बसचा परिणाम असावा.
स्वच्छ गिरगाव चौपाटी बघून, "चौपाटी आणि इतकी स्वच्छ...," असे शेलके उद्गार काढतोय न काढतोय तोच मागून कंडक्टरभाऊ बोललेच, “ही गिरगाव चौपाटी आहे.. कधीही बघा, नेहमीच एकदम स्वच्छ असते.” इतके बाणेदार बोलणे, तेही मुंबईत? दचकायलाच झालं क्षणभर.

गेटवे ऑफ इंडिया हून निघुन राजाभाई टॉवर, जेजे स्कूल ऑफ आर्ट, हुतात्मा चौक, सीएसटी स्टेशन करत करत मरीन ड्राईव्ह नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी करून परत गेटवे ऑफ इंडियाला आलो.

गंमत वाटली ती ही की खरंतर यातील काही रस्त्यांवरुनं खूप वेळा गेलोय. पण प्रत्येक वेळेला कुठूनतरी कुठेतरी पोहोचायचं असायचं त्यामुळे कधीही आपल्या आजूबाजूला काय आहे याकडे लक्षच गेलं नाही. मग रस्त्यातील सौंदर्य टिपणं तर खूप दूरची गोष्ट झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला शेकडो वेळा - रात्री उशिरा ते सकाळी खूप लवकर- गेलोय पण त्यावेळी कधीही आजच्यासारखी फुरसत, कॅमेरा आणि दृष्टी नसावी.
मरीन ड्राईव्ह क्लासच्या अगदी जवळ असल्यामुळे मध्ये एखाद दोन-तास मिळाले तर अख्खा ग्रुप मिळून मरीन ड्राईव्हवर जात असू - सकाळी, दुपारी, अगदी रात्रीही. आता खूप बारकाईने सर्वकाही आठवत नसले तरी प्रामुख्याने आठवतंय ते म्हणजे, समोर दिसणारा अथांग समुद्र- स्क्रीनकडे बघून, वाचून वाचून थकलेल्या डोळ्यांना विश्रांती देणारा, ती पंचतारांकित क्षितिजरेखा, मैत्रिणींबरोबर केलेली धमाल, रात्रीच्या गारव्यात खाल्लेले चमचमीत मसालेदार चणे. मंतरलेले दिवस होते ते.
बसने जाताना ते सगळं आठवल्याशिवाय राहिलं नाही. तेव्हा कोणाकडे मोबाईल तर नव्हतेच पण कॅमेरेही नसत नेहेमी त्यामुळे त्या सगळ्या स्मृती फक्त डोक्यातच बंद आहेत.
गेटवे वरून परत आम्ही आमच्या जुन्या क्लासपाशी आलो.
त्या कोपऱ्यावरच्या टपरीवर एक एक कटिंग घ्यायचा, झालंच तर बाजूच्या सँडविचवाल्याकडे मस्त भरपूर मस्का (?) मारलेलं सँडविच खायचं. पण आमच्या त्या सगळ्या खुणा आता मिटल्या होत्या. पूर्वीचा रस्ताही आता मोठा झाला होता त्यात क्लासचे काही आवार गेल्यासारखे वाटले. पूर्वी भव्य वाटणारं प्रवेशद्वार आता काहीसं सामान्य/ खूजे भासले.
आपण काही शोधत यावं आणि कुठलीच खूण पटू नये असं काहीसं आमचंही थोडं झालं. पण तरी न हिरमुसता, "शास्त्र असतं ते" म्हणत सेल्फ्या काढल्या. मैत्रिणीचं तिकडेच काही काम होतं. त्यामुळे परतीच्या वाटेवर मी एकटीच होते.
यावेळी मात्र १३८ पकडली. CST ला उतरले. तिकिटाला छोटीशी रंग होती. फक्त १० रुपयांत परतीच तिकीट मिळालं तेव्हा खूप भारी वाटलं.. त्या भारतफेरीत तीच फक्त एक गोष्ट अधीसारखीच स्वस्त सापडली. पूर्वीसारखं मस्त दारात उभं राहून मुंबईची हवा खाल्ली, वारा प्यायला :).

काही वर्षांनी भारतात परत आलं की सगळंच बदललेल दिसतं- रस्ते, मेट्रो, गगनचुंबी इमारती, टोलेजंग दुकानं, हॉटेलं, मॉल्स, वाढलेली गर्दी, आकाशाला भिडणारी महागाई.
वाटलं, या सगळ्यात पूर्वी होती तशीच आहे ती म्हणजे ही मुंबईची जीवन वाहिनी - अहोरात्र चालणारी सेवा ( रात्रीचे ४ तास सोडून) तेही अत्यंत माफक दरात, प्रत्येक तीन ते चार मिनिटाला एक गाडी, सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर, नवी मुंबई ही तिची व्याप्तीही वाढत जाणारी. मुंबईची खरी ओळख आणि अभिमान!

विचारांच्या तंद्रीत कधी माझं स्टेशन कधी आलं कळलही नाही. खूप वर्षांनी मनासारखी भटकंती करायला मिळाली म्हणून मन पिसासारखं हलकं झालेलं. अलगद गर्दीत स्वतःला झोकून दिलं आणि त्या गर्दीबरोबर आपोआप स्टेशनवर उतरलेही.

---
हॉटेल ताज

PXL_20240810_071117675~2.jpg

---
गेट वे ऑफ इंडिया

PXL_20240810_071114003~3.jpg

----

PXL_20240810_071114003~4.jpg

---
PXL_20240810_065637101~2.jpg

----

IMG-20240810-WA0042~3.jpg

---

IMG-20240810-WA0039~2.jpg

----

image_0.jpg

---

PXL_20240810_062342755~2.jpg

---

IMG-20240810-WA0052~2.jpg

---
IMG-20240810-WA0037~2.jpg

---
मुन्नाभाई च शूटिंग बहुदा इकडे झालं, ही किंवा खालची बिल्डिंग .

IMG-20240810-WA0022~2.jpg
---

PXL_20240810_062332898~2.jpg

---

PXL_20240810_064016617~2.jpg

----

IMG-20240810-WA0018~2.jpg

---

PXL_20240810_052952013.jpg

---
CST स्टेशन - सुरेख कोरीव काम केलंय.
जाता जाता घेतलेला धावता फोटो.

PXL_20240810_053116079~2.jpg

---

PXL_20240810_065312182~3-min.jpg

---
बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC)

IMG-20240810-WA0013~3.jpg

---
CSMT ( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरून)

PXL_20240810_065132989~2.jpg

---
फ्लोरा फाऊंटन

PXL_20240810_065625911.MP~2_0.jpg

---
हुतात्मा चौक

image_1.jpg

---

राजाबाई टॉवर
गुगल केल्यावर ही माहिती मिळाली, रोचक वाटली म्हणून टाकत आहे.
प्रेमचंद रॉयचंद जैन ह्यांनी आपल्या आईचे नाव देण्याच्या अटीवर ह्या टॉवरच्या बांधकामासाठी मदत केली होती.
त्यांची आई आंधळी होती, आणि सूर्यास्तापूर्वीच जेवत असे. तिला ह्या टॉवर ची घंटा वाजली की कळत असे आणि दुसऱ्या कोणाला वेळ विचारावी लागत नसे.

IMG-20240810-WA0024~5_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद केशकुल.

मी फोटो अरेंजच करते अजून Lol

मोबाईल वरून करताना खूपच वेळ लागतोय.. टाकते नाव

मस्त फोटो.. सगळेच आयकॉनिक..

हा सारा परिसर घरचा वाटतो.. घरचे अंगण वाटते.
मुलांसोबत फिरताना फोटो काढता येत नाही मनासारखे हे नुकतेच लक्षात आल्यावर विचार चालू होता की पावसाळ्यात एकट्याने फिरावे इथे एखाद्या रविवारी खास फोटो टिपायला.. पुढच्या पावसाळ्यात नक्की करणार असे Happy

फारच सुन्दर फोटो आणि लेखन ही छान...
माझं नोकरीच अख्खं आयुष्य फोर्ट आणि WTC मध्ये गेलं. पण मुंबई आपलीच आहे ह्या विचाराने कधी फार फोटो काढणं झालं नाही मोबाईल आल्यावर ही ह्याची हे फोटो बघून रुखरुख वाटतेय. खूप छान फोटो काढले आहेत.

ऋन्मेऽऽष, मनीमोहोर तुमच्या प्रतिसादाशी खूप रिलेट झालं.

खरंय मुलांबरोबर किंवा सामान्यत: कोणी बरोबर असलं की फोटो काढण्यावर नाही म्हटलं तरी मर्यादा येतात. फक्त बरोबरची व्यक्तीही फोटो काढणारी असेल तर अपवाद!

पुढच्या पावसाळ्यात नक्की करणार >> नक्की करा. फोटो इकडे टाकालंच Happy

मुंबई आपलीच आहे ह्या विचाराने कधी फार फोटो काढणं झालं नाही >> Happy

लांब गेलो किंवा दुर्लभ झालं की महत्व ( गुण) जास्त चांगल्या रीतीने समजून येतात हे गेल्या काही वर्षात मला उमगलेल सत्य Happy

पुनः मुंबईला, पुण्याला नि नागपूरला पण जावेसे व फिरावेसे वाटते. >> Happy

मला लिहितानाही तसेच वाटत होते. Happy

धन्यवाद!

मस्त फोटो आणि वर्णन. रस्ते कसे सुस्नात आहेत!
हा परिसर नुसता बघायला एकदा जायला हवं असं हा लेख वाचताना झालं.

काही दुरुस्त्या / काळानुसार बदल
मुंबई महानगर पालिका (BMC) - बृहन्मुंबई महानगरपालिका BMC / ंMCGM अशी दोन्ही संक्षिप्त रूपे वापरात आहेत.
CST ( छत्रपती शिवाजी टर्मिनस बाहेरून) - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - CSMT
राजाभाई टॉवर - राजाबाई टॉवर

भरत, सामो आणि अस्मिता धन्यवाद!

भरत - बदल केले आहेत.

BMC पूर्वीची बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन

CST - पूर्वी CST म्हणायचो.. मला वाटतं नंतर CSMT झालं??

मस्त फोटो आणि लेखन.
का कुणास ठाउक पण मुंबईत वर्षानुवर्षे राहूनही मुंबईबद्दल ममत्व कधी वाटलंच नाही

मस्त वर्णन आणि फोटो!

मी पण २०२४ मधे साधारण याच भागात फिरलो होतो. काळा घोडा, म्युझियम, मलबार हिल, मरीन ड्राइव्ह ई.

फोटोही खूप आवडले. तो एक पावसाचा मागे मैदान असलेला फोटो तर थेट "रिमझिम गिरे सावन" ची आठवण करून देतो.

बरोबर पकडली आहे भटकंती.
आपलं काही नसलं तरी आपलंच वाटणे असं काही जागे बद्दल होतं. ( प्रत्येकाची जागा वेगळी).

सहीच, जायला हवं परत. अतिपूर्वी फिरलेले. फोटो सर्व सुरेख.

त्या एसी डबलडेकर बसेस सारख्या असतात का गेटवेहून.

का कुणास ठाउक पण मुंबईत वर्षानुवर्षे जन्मापासून राहूनही मुंबईबद्दल ममत्व कधी वाटलंच नाही. >> +१

झकास !

मुंबईतला सर्वात देखणा भाग. This part of Mumbai is ❤

या भागात दरवर्षी एकदा तरी मुद्दाम वेळ काढून फिरून येतो; रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी. To re-live the happy days and create fresh memories.

मग रेलिश, लिओपोल्ड, चेतना, मॉंडेगर, क्रिस्टल, गेलॉर्ड, सोम, के रुस्तम, मेरवान, सेंचुरी क्लब, कपूर्स, श्रीठाकोर पैकी एखाद्या जागी नॉस्टेलजिक खादाडी + ढीगभर फोटोज्

तुमच्या या लेखानी सर्व सुखद स्मृतींची उजळणी झाली.

मग रेलिश, लिओपोल्ड, चेतना, मॉंडेगर, क्रिस्टल, गेलॉर्ड, सोम, के रुस्तम, मेरवान, सेंचुरी क्लब, कपूर्स, श्रीठाकोर पैकी एखाद्या जागी नॉस्टेलजिक खादाडी + ढीगभर फोटोज्
>>>>>>>>>>

दक्षिण मुंबई खादाडीचा लेख लिहून धागा काढा कधी वेळ मिळाला तर.. तुम्हीच काढू शकता.

दक्षिण मुंबई खादाडीचा लेख लिहून धागा काढा कधी वेळ मिळाला तर >> +१ आवडेल वाचायला.
फक्त मेरवान ला गेलीय.

जाता जाता -
पूर्वी कॅनन पावभाजी साठी जीव टाकायची.. गेल्या(या )खेपेला एकंदर परिस्थिती बघून जाण्याची हिंमत नाही झाली. .

Srd, अंजू, उपाशी बोका, अनिंद्य धन्यवाद!

भरत , व्हिडिओ लिंकसाठी धन्यवाद!

अंजू, शुक्र/ शनिवारी सकाळी आम्ही गेलो होतो. काहीच माहिती काढली नव्हती . त्यामुळे जास्त काही सांगता येणार नाही. कदाचित बेस्ट च्या संकेत स्थळावर माहिती मिळेल.

आपलं काही नसलं तरी आपलंच वाटणे असं काही जागे बद्दल होतं. ( प्रत्येकाची जागा वेगळी). >>> आवडलं

मुंबईतला सर्वात देखणा भाग>>+१

का कुणास ठाउक पण मुंबईत वर्षानुवर्षे जन्मापासून राहूनही मुंबईबद्दल ममत्व कधी वाटलंच नाही.>>>> Lol
मुंबईत राहायला (राहणार्याने ) मुंबईचा अभिमान/ ममत्व वाटलच पाहिजे असा नियम / अशी अट नाही Happy

या भागात दरवर्षी एकदा तरी मुद्दाम वेळ काढून फिरून येतो; रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी. To re-live the happy days and create fresh memories>>> वाह! मस्त!

कुणीतरी म्हटले आहे ना. मुंबईला लांबी आहे , रुंदी आहे पण खोली नाही. त्यामुळे कधी आपली वाटली नाही.

Pages