Submitted by Meghvalli on 5 September, 2025 - 03:51

मतला:
रुंदावल्या कक्षा, सोडल्या आशा, भुर्रकन उडून गेलो।
आकाशात चांदणी एक, तिचा चंद्र होऊन गेलो।
शेर २:
सुटल्या गाठी, तुटले पाश, मी प्रसन्न झालो।
आयुष्य झाले सुंदर, विमुक्त होऊन गेलो।।
शेर ३:
धुसर क्षितिजावर उमटले रंग, मी हरखून गेलो।
पहाटेच्या मंद वाऱ्याशी, गुज करून गेलो।
शेर ४:
निरभ्र नभातून ओघळले गीत, मी गाऊन गेलो।
त्या सुरांत पुन्हा, स्वतःला सापडून गेलो।।
शेर ५:
अश्रूंच्या सरींनी धुतले दु:ख, मन झाले निर्मळ।
अंतरीच्या वेदना विरल्या, पुन्हा मी फुलून गेलो।।
मकता:
'मेघ' नभात मनसोक्त विहरुन,मोहरुन गेलो।
पावसाच्या थेंबात स्वतःला, अखंड भेटून गेलो।।
शुक्रवार,५/९/२५, ११:४८ PM
अजय सरदेसाई -मेघ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
_/\_ धन्यवाद
_/\_ धन्यवाद
मायबोलीच्या मुख्य पेजवर
मायबोलीच्या मुख्य पेजवर मायबोली विशेष सदरात जेष्ठ गझलकार बेफिकिर यांची कार्यशाळा आहे. ती जरुर अभ्यासावी.
आपली रचना गझल प्रकारातील नाही.
छान आहे..!
छान आहे..!
छान आहे..!
छान आहे..!