शशक ३- बिनलग्नाचा सैराट - अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 4 September, 2025 - 21:43

बिनलग्नाचा सैराट !

'अ'चे 'ति'वर खूप प्रेम. पण 'ति' म्हणाली, 'तू माझा राईट वन वाटत नाहीस'. मग 'अ' म्हणाला, 'राईट वन मिळेपर्यंत रॉंन्ग वन सोबत मजा करायला काय हरकत आहे'. तिलाही ते पटलेच अर्थात. एके दिवशी त्यांनी 'अति' करायचे ठरवले. कारण -हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अति करतात नाही! - असे वाक्य सगळेच वापरत असल्याने आपणही आपले "अति" करून बघू असं त्यांना वाटलं. पण 'अ' आणि 'ति' जेव्हा-जेव्हा 'जवळ' येऊ बघत वेमा सैराटमधल्या प्रिंससारखे मधेच बिब्बा घालायचे, अशाने नागनागिणीच्या जोडी-टाईप 'अ' आणि 'ति' हजारो वर्षे ब्रह्मचर्याच्या वणव्यात होरपळत आहेत. 'अति' करायचं असूनही होत नाहीये. वेमा वाटायचे प्रिंस चार्मिंग, निघाले सैराटचा प्रिंस. त्यांचं अ function at() { [native code] }ति होणार कधी !!!

- हर्पाने घातलेल्या कोड्यावरून सुचलेली कल्पना लगेच खरडली. Happy एररही त्यानेच दिला, यावेळी हवा होता.
वेमा Light 1 घ्या. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता..
Lol
भारी एकदम !
किती हुशार आहेस!!

अस्मिता मस्त.
वेमा वाटायचे प्रिंस चार्मिंग, निघाले सैराटचा प्रिंस हार्मिंग

function at() { [native code] }

यामुळे चार चांद लागले आहेत. हे काउंट मधे धरलेत का शब्द?

Lol Lol

सामो, हो Happy
मी स्वतःच जिथे तिथे अती करत असल्याने असावे कदाचित.. मला या अतीचा त्रास नाही. मी माझ्या अटीवर जगतो Wink

मस्तच !
अति तेथे माती म्हणून function at() { [native code] }इ हे असं उमटतं. माती आहे ती

Lol

अति
अती
अटी
आती क्या खंडाला

डकडक गो वर ह्यांचे live in चालते वाटतंय

Rofl

मला सुरवातीला metro in dino ची कथा वाटली Lol

Lol
इथे वेमांना दिवा नाही दिव्याच्या उलटं काही तरी द्यायची गरज आहे.
अजिबात हलके घेऊ नका. काही तरी करा!!!!! Lol

Lol मस्त जमलीये! मलाही फारएण्डसारखं आधी कळलं नव्हतं. नंतर मात्र भन्नाट आवडली.
मलाही ऋन्मेषसारखाच अतिचा प्रॉब्लेम नाही Wink

Happy मीही गुगल इंडिक वापरते म्हणून मलाही ही एरर येत नाही, मला हर्पाला मागावी लागली. कुणी आवर्जून एरर मागण्याची ही पहिलीच वेळ असेल.

वेमा, घ्या आता मनावर होऊ नका प्यार के दुष्मन! Wink

सगळेच प्रतिसाद मस्त, धन्यवाद सर्वांना. Happy

हायला मला वाटलं आता गेला का काय तो एरर. पण चांगला जित्ता आहे. "मुडदा बसविला तुजा" असे अनेक जणांनी अनेक वेळा म्हणूनही तो मरत नाही Sad

शशक मस्तच.

एकदा वेमांनी काढलेला आठवतं. काय अपग्रेड केलंलं तेच जाणोत. पण परत पहिले पाढे करावे वाटले म्हणजे इकडे आड तिकडे विहीर असणार. बरं त्यांची मोकळेपणे बोलून,'की बाबा नाही शक्य, प्रयत्न करतोय' इतकं ओपन कम्युनिकेशन ठेवायची रादर काही मोकळा संवाद ठेवायची पद्धतच नाही. तेव्हा जे आहे ते गोड मानून घ्यायचं हेच आपल्या नशिबात लिहिलेलं आहे. आता हे वाचून तरी काही लिहा.

मला हा एरर यायचा तेव्हाही काही फार त्रासदायक वाटले नव्हते. तेव्हा हे लिहिले सुद्धा होते. मी सवयीने झपझप एडिट करून टाकायचो.
पण हो, इतरांना होणारा त्रास आणि इरिटेशन जेन्यूइन असू शकते हे सुद्धा तेव्हा पटले होते.
आता तर बोलूनच टाईप करतो त्यामुळे आयुष्यातले प्रश्नच मिटले सारे Happy

अ नंतर ति जरा एक दोन पावले पुढे जाउन मागे आली की अति झाले तरी माती होत नाही. यावरून "ति" बद्दल एक व्हॉटसॅप फॉर्वर्ड होऊ शकतो. तमाल व्हॉटसॅप काकू व काका ग्रूप्स मधे लोकप्रिय होईल.

Pages