Submitted by Meghvalli on 4 September, 2025 - 11:08
मुक्त होतो नी मुक्तच राहिलो ।
मी कशातच कधी ना अडकुन राहिलो।।
जगाने रंग बदलले बरेच।
रंग माझा मी राखुन राहिलो।।
खोट्याचा मोह झाला कितीदा।
सत्याची कास मी पकडून राहिलो।।
मनाने जरी घेतल्या उंच भरार्या ।
मातीशी नातं मी जोडून राहिलो।।
सुख नी दुःख शरिर भोगतच होते।
मनाने मात्र मी स्थितप्रज्ञ राहिलो।।
तपाच्या तापाने घुसळुन मोक्ष आला।
तरी न बदलो फक्त साक्षी राहिलो।।
शेवट काय झाले, नकळले मला।
कळण्यास ते,'मी' न राहिलो।।
बुधवार, ३/९/२५ , ६:३४ PM
अजय सरदेसाई -मेघ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा