
सध्या देशात सगळ्यांत जास्त गमतीजमती कोण करत असेल तर आपला निवडणूक आयोग. याची सुरुवात तशी बरीच आधी झाली आहे. पण आता त्यांचा गंमतीजमती करण्याचा वेग भलताच वाढला आहे आणि गंमतीजमतींची पातळीही अस्मानाला पोचली आहे. त्या गंमतीजमतींचा आढावा इथे घेऊयात.
मायबोलीकरांना विनंती : नुसत्याच टिप्पण्ण्या कर ण्या ऐवजी आयोगाच्या जुन्या गंमतीजमती इथे लिहा.
तसंच अशा गमतीजमती ७० वर्षांपासून होत होत्या आणि या गमतीजमती नाहीतच मुळी अशा प्रतिसादांचीही प्रतीक्षा आहेच.
तर पहिल्या तीन - चार गमतीजमती मतदानाच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगबद्दल
१. पूर्वी निवडणुकीसंबंधीचा सगळा इले क्ट्रॉनिक रेकॉर्ड कुणालाही पाहायला मिळू शकत असे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या नियमात बदल करून उमेदवारांचे आणि मतदानाचे व्हिडियो रेकॉर्डिंग फक्त उमेदवारांनाच पाहता येईल. इतर कोणाला ते पाहायचे असेल तर न्यायालयाकडून तसा आदेश आणावा लागेल. हे फुटेज पाहिल्याने मतदान गुप्त राहणार नाही आणि ए आय चा वापर करून फेक नॅरेटिव्ह पसरवता येईल, असं कारण सांगितलं.
२ या जून महिन्यात आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकार्यांना मतदानाचं रेकॉर्डिंग ४५ दिवसांनी नष्ट करण्याचे आदेश दिले.
३. माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत - काय करणार तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघून ? आणि रोज ८ तास फुटेज पाहिलं तरी सगळं बघायला ३६०० वर्षे लागतील . कशाला बघायचंय ते? ज्याला ते बघायचंय, त्याला हा प्रश्न विचारूया - अशी विधाने केली होती.
४ आजच्या पत्रकार परिषदेत सध्याचे मुख्य आयुक्त ज्ञानेश / ग्यानेश गुप्ता यांनी " आपल्या आयाबहिणींलेकींसह कोणा मतदाराचं सीसीटीव्ही फुटेज आयोगाने लोकांना दाखवावं का? - असा काळजाला हात घालणारा प्रश्न विचारला.
फक्त महाराष्ट्र नाही तर
फक्त महाराष्ट्र नाही तर रायबरेली ,वायनाड, कनोज, मैनपुरी, कोलथूर, डायमंड हार्बर इथेही घोटाळा झाला आहे. गोली मरो फेम खासदार अनुराग ठाकूर ह्यांनीच आयोगावर आरोप केला आहे. त्यांना देखील आयोग शपथपत्र द्यायला लावणार होता, पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे ही म्हण राजीवकुमारना ऐनवेळी आठवली आणि त्यांनी आदेश मागे घेतला
पुण्यात आजारी असतानाही गिरीष
पुण्यात आजारी असतानाही गिरीष बापटाना कसबा पोटनिवडणूकीत व्हीलचेअरवर फिरवण्यात आले, त्यानंतर ते वारले. त्यांच्या टर्म ला एक वर्ष बाकी होते तरीही पुण्यात “भाजप” हरेल? ह्या भीतीने निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेतली नाही पण त्याचवेळी पंजाबात एक खासदार वारले होते त्यांच्या जागी पॉट निवडणूक घेण्यात आली.
हो. कसब्याबद्दल न्यायालयानेही
हो. कसब्याबद्दल न्यायालयानेही विचारणा केली होती ना?
---
आजकाल आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही. टीव्ही न्युज पाहत नाही, असं अभिमानाने सांगायची पद्धत आहे. त्यामुळे वरच्या फोटोतले गृहस्थ हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, असं काहींना वाटू शकेल. ते चंडिगड महानगरपालिकेत नॉमिनेटेड नगरसेवक आहेत. भाजपचे पदाधिकारीही आहेत. तिथल्या महापौर निवडणुकीसाठी ते निवडणूक अधिकारी होते. आपचे २० नगरसेवक होते, तर भाजपचे १६. या गृहस्थांनी मतमोजणी करताना अपच्या आठ मतपत्रिकांवर खुणा करून त्या बाद केल्या. हे करत असतानाच त्यांनी एकदा सीसीटीव्ही कॅमेर्याच्या दिशेने पाहिलं. त्याचाच हा फोटो.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. तिथे न्यायालयाने न्यायालयाने मतपत्रिका पाहिल्या , व्हिडियो रेकॉर्डिंग पाहिले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे अनिल मसीह यांच्या बचावार्थ आले होते. त्यांनी सांगितलं की व्हिडियो मध्ये प्रकरणाची एकच बाजू दिसते आहे.
मसीह यांनी सांगितलं होतं की आपचे दोन नगरसेवक मतपत्रिका घेऊन पळून गेले होते आणि त्यांनी त्या मतपत्रिकांवर खुणा केल्या. (खुणा केलेल्या मतपत्रिका बाद होतात.)
वर या प्रकरणामुळे मला मानसिक ताण आला आहे, वैद्यकीय मदत घ्यावी लागत आहे, असंही सांगितलं.
अर्थात न्यायालयाच्या हे पचनी पडलं नाही आणि त्यांनी मसीह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर मसीह यांनी माफीनामा देऊन सुटका करून घेतली.
इति सीसीटीव्ही फुटेज महत्त्व पुराणम् - किन्तु न संपूर्णम् |
बिचार्या ग्यानेश कुमारना किती मानसिक ताण येत असेल कल्पना करा. दुष्ट काँग्रेस आणि राहुल.
ही थोडी जुनी पण पूर्ण न
ही थोडी जुनी पण पूर्ण न झालेली गंमत.
एखाद्या पक्षात फूट पडली की त्याचं निवडणूक चिन्ह गोठवलं जातं. हात हे काँग्रेसचं तिसरं चिन्ह आहे. आधीची दोन - बैलांची जोडी आणि गायवासरू.
एका पत्रकाराच्या म्हणण्यानुसार फक्त समाजवादी पक्षाच्या फुटीचा अपवाद. तेव्हा मुलायमसिंगना मूळ पक्षाचं सायकल हे चिन्ह मिळालं.
महाराष्ट्रात गेल्या ३+ वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि निवडणूक आयोगाने फुटीर गटाला मान्यता देऊन पक्षाची मूळ चिन्हेही दिली. गंमत इथेच संपत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार - यांना तुतारी वाजवणारा इसम हे चिन्ह मिळालं. लोकसभा निवडणुकीत या चिन्हाशी मिळतंजुळतं तुतारी हे चिन्ह अपक्षांना देण्यात आलं. त्यामुळे काही जागांवर राकॉ- शपच्या हातून विजय निसटला.
विधानसभा निवडणुकांपूर्वी राकॉ शप ने तुतारी हे चिन्ह अपक्षांना देण्यावर तीव्र आक्षेप घेतला होता आणि राज्य निवडणूक आयोगाने तो मान्यही केला होता. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय फिरवला - असं राकॉ शपचं म्हणणं आहे.
काल मु नी आ यांची पत्रकार
काल मु नी आ यांची पत्रकार परिषद पाहिली.
यातून एक धडा शिकलो.
दर जानेवारी, एप्रिल ,जुलै, ऑक्टोबर या महिन्यात मोबाईलवर निवडणूक आयोगाचे ॲप उघडून मतदार यादीतआपले नाव आहे की नाही हे याची देही याची डोळा चेक करणे ही माझी जबाबदारी आहे कारण भारत माझा देश आहे.
https://x.com/ECISVEEP/status
https://x.com/ECISVEEP/status/1500118518200614914
कैमरे को ज़रिया बनाओ,
एक मत का महत्व बताओ...
आज ही भाग लीजिये 'राष्ट्रीय मतदाता जागरूकता प्रतियोगिता' की वीडियो मेकिंग श्रेणी में।
हाच निवडणूक आयोग आमच्या माताभगिनीकन्यांना तुमचा व्हिडियो बनवून पाठवा असं सांगत होता. ग्यानेश कुमार तेव्हाच्या निवड्णूक आयुक्तांना विकृत म्हणणार.
भारतातले लोक इतके मुर्दाड
भारतातले लोक इतके मुर्दाड झालेले आहेत, की कितीही प्रकारे यांना लूटलं तरी अक्कल येत नाही.
दरवडेखोर मनोवृत्तीचे लोक सामान्यांना लुटत ऐश करत आहेत.
अन सामान्य लोकांना थोड्या फुकट गोष्टी मिळून ते आपापसात भांडत बसले आहेत. मज्जाय.
सहज जाता जाता काही जुन्या
सहज जाता जाता काही जुन्या आठवणी.
चुक असेल तर दुरुस्त करा.
1) टंडन यांनी गांधी घराण्यावर पुस्तक लिहिलं आणि डायरेक्ट निवडणूक आयुक्त बनले
2)टी एन सेशन राजीव गांधीची आतंकवाद्याकडून हत्या झाल्यानंतर फक्त त्या एकाच लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करणे अपेक्षित असतानाही त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक रद्द केली. काँग्रेस पक्ष राजीव गांधीचा अस्ति कलश म्हणून संपूर्ण देशभर फिरले त्यांचं राजकीय भांडवल केलं नंतर वीस दिवसानी निवडणुकीची तारीख जाहीर केली .
तेच निवडणूक काँग्रेसचे तिकिटावर एलके आडवाणी यांच्या विरोधात निवडणूक लढले .
3) एम एस गिल यांनी बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक मध्ये दिलेल्या धार्मिक भाषणावर .
बारा वर्षानंतर निवडणूक लढविणार व मतदान करण्यावर बंदी घातली .
हेच एम एस गील काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे खासदार झाले व नंतर केंद्रीय मंत्री झाले.
आहे की नाही गंमत?
टी एन शेषन वर टीकात्मक
टी एन शेषन वर टीकात्मक लिहिणारा पहिला व्यक्ती
<< टी एन सेशन राजीव गांधीची
<< टी एन सेशन राजीव गांधीची आतंकवाद्याकडून हत्या झाल्यानंतर फक्त त्या एकाच लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करणे अपेक्षित असतानाही त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक रद्द केली. काँग्रेस पक्ष राजीव गांधीचा अस्ति कलश म्हणून संपूर्ण देशभर फिरले त्यांचं राजकीय भांडवल केलं नंतर वीस दिवसानी निवडणुकीची तारीख जाहीर केली .
तेच निवडणूक काँग्रेसचे तिकिटावर एलके आडवाणी यांच्या विरोधात निवडणूक लढले . >>
------ एखाद्या नेत्याची हत्या/ निधन याचे परिणाम नंतर होणार्या निवडणूक निकालांमधे दिसतांत. इंदिरा गांधी हत्या ऑक्टोबर १९८४ मधे झाल्यानंतर घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणूकांत काँग्रेस पक्षाला ४०४ जागा मिळाल्या होत्या तर भाजपाला केवळ दोन. दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत मोठा ( ४९ % , ७.७ %) फरक होता. या घवघवीत यशांत राजीव गांधी यांचे नेतृत्व गुण किंवा काँग्रेस पक्षाचे कर्तुत्व यापेक्षा भावूक जनतेची ( इंदिरा गांधी हत्येला मिळालेली ) सहानुभूतीची लाट जास्त होती. थोडेफार असेच चित्र ( पहिल्या टप्प्यापेक्षा नंतरच्या दोन टप्प्यात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या) राजीव गांधी हत्येनंतर दिसले.
१९९१ मधे राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर पुढच्या टप्प्यतल्या निवडणूका वेळेवर घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. राजीव गांधी हे केवळ एक खासदार नव्हते. प्रमुख विरोधी पक्ष नेत्याची , एका माजी पंतप्रधानाची आणि भविष्यात पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता असणार्या नेत्याची हत्या मोठी दुर्घटना होती.
मतदान करतांना लोकांनी भावनेच्या आहारी न जाता, कुठल्याही दडपणाला बळी न पडता मतदान करावे आणि निवडणूका निष्पक्ष ( Free and Fair ) वातावरणांत कशा पार पडतील हे बघणे निवडणूक आयोगाचे काम आहे.
शेषन यांनी काँग्रेस तिकीटावर १९९९ मधे लोकसभेची निवडणूक लढविण्यात गैर काहीच नव्हते. लोकसभेसाठी निवडणूक होती, मतदारांनी कौल दिला आणि त्यांना नाकारले. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्याच्या दुसर्याच महिन्यांत त्यांची राज्यसभेसाठी निवड झाली असती तर ते अयोग्य होते.
छबुराव ,स्वागत आहे.
छबुराव ,स्वागत आहे.
बाळ ठाकरे यांनी १९८७ च्या निवडणुकांत रमेश प्रभूंच्या प्रचारसभांत धर्माच्या आधारावर मते मागितली. हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होते निकालानंतर पराभूत उमेदवार काँग्रेसचे प्रभाकर कुंटे न्यायालयात गेले. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा आरोप मान्य केला.
या प्रकरणाचा निकाल डिसेंबर १९९५ मध्ये लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाला जाग आली आणि त्यांनी १९९९ मध्ये ठाकरे यांच्यावर सहा वर्षांसाठी मतदान आणि निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. म्हणजे आयोगाने या प्रकरणी कुचराई केली होती, ही यातली गंमत.
आपले लाडके पंतप्रधान आता सर्रास धर्माच्या नावावर मते मागतात. त्यामुळे ती गंमत आता पुरती फोफावली आहे, असं म्हणावं लागेल.
https://www.telegraphindia.com/india/bal-thackeray-stripped-of-voting-ri...
https://legaleagleweb.com/articalsdetail.aspx?newsid=18
आपले लाडके पंतप्रधान आता
आपले लाडके पंतप्रधान आता सर्रास धर्माच्या नावावर मते मागतात. >>> धर्माच्या नावावर काय घेऊन बसलायत, हे तर देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद सैनिकांच्या बलिदानाचे श्रेय लाटत, त्याचे राजकीय भांडवल करून त्याच्या नावाने देखील मतं मागतात....इतक्या नीच माणसाच्या/ पक्षाच्या समर्थकाने कुण्याही दुसऱ्या पक्षाने त्याच्या स्वतःच्या सर्वोच्च नेत्याच्या मरणाचे राजकीय भांडवल जरी केले असेल तरी त्याबद्दल नैतिकतेचे प्रश्न उपस्थित करून, त्याच नैतिकतेच्या खेटराने स्वतःचे तोंड फोडले जाईल इतपत आततायीपणा करू नये.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत कोणता
बेस्ट पतपेढी निवडणुकीत कोणता फॅक्टर असावा?
मला वाटते मतपत्रिकेवरची निवडणूक होती ईव्हीएम नव्हते.लोकांनी पण कोणत्याच पक्षाला निवडून दिले नाही,काम करणाऱ्याकडे बघून मते दिली वाटत.
लाडकी बहीणसारखं काही?
लाडकी बहीणसारखं काही?
असेल
असेल
(No subject)
ते मध्यरात्री पुन्हा मतमोजणी
ते मध्यरात्री पुन्हा मतमोजणी घेणे वगैरे पण झालं म्हणे. आणि ballet पेपर वर निवडणूक घेऊन भाजप जिंकत असेल तर महापालिका निवडणुका देखील तशाच घ्याव्यात
राहुलची ताजी पत्रकार परिषद -
राहुलची ताजी पत्रकार परिषद - मतदारांची नावं उडवण्याबाबत
https://x.com/i/broadcasts/1djGXWzoYMEKZ
राहुल गांधीच्या आरोपानंतर
राहुल गांधीच्या आरोपानंतर आयोगाचे प्रवक्ते देवाभाऊ ह्यांची प्रतिक्रिया आली की नाही?