आज, २५ जून २०२५. भारताच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
२५ जून १९७५ रोजी, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात "आणीबाणी" जाहीर केली. त्यापुढील दोनेक वर्षांच्या कालखंडात भारताच्या लोकशाही संस्थांना, व्यक्तिस्वातंत्र्याला आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याला मोठा हादरा बसला. अनेक विरोधी नेते तुरुंगात डांबले गेले, वृत्तपत्रांवर निर्बंध आले, आणि सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रशासनाचे कठोर नियंत्रण आले.
आणीबाणीचा काळ हा काळे पर्व होता की अनुशासन पर्व यावर मतभेद आहेत.
या धाग्यावर या विषयावर विविध पैलूंनी चर्चा व्हावी, अनुभव, माहिती, संदर्भ आणि विचार मांडले जावेत यासाठी हा धागा काढत आहे.
आपल्याकडे त्या काळातील आठवणी असतील, कुटुंबीयांनी सांगितलेल्या गोष्टी, वाचलेले संदर्भ, किंवा आजच्या राजकीय घडामोडींशी संबंधित वाटणारे विचार असतील तर कृपया येथे शेअर करा. मायबोलीवर आधी मांडलेल्या / वाचलेल्या धाग्याच्या लिंकाही द्या.
माझेही मत मी प्रतिसादांतून मांडीन.
- वामन राव
माझा आवडीचा, जिव्हाळ्याचा,
माझा आवडीचा, जिव्हाळ्याचा, औत्सुक्याचा विषय आहे. आणिबाणी जाहीर झाली, तेव्हा अगदी लहान म्हणजे पाच वर्षांची होते. तेव्हाचं वातावरण आठवतं. १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी सगळं ढवळून निघालं होतं. कल्याणच्या शंकरराव चौकात झालेली डॉ.सुब्रमण्यम स्वामींची सभा, कल्याण पूर्वेला (कोळसेवाडीत) झालेली माननीय मृणाल गोरेंची सभा आठवते. निवडणूक निकाल येऊ लागल्यावर झालेला जल्लोष, रामभाऊ म्हाळगींची प्रचंड विजय मिरवणूक लक्षात आहे.
'चंद्रभागेला आला लोंढा, पाणी लागलं वडाला, इंदू म्हणते यशवंताला पा.शी. माझा बुडाला किंवा वा रे इंदिरा तेरा खेल, सस्ता बेवडा महंगा तेल, हरीभाऊ गोखले कडी लावून झोपले' ह्या घोषणा लोकप्रिय होत्या.
सध्या माझा रूमाल. बाकी उद्या लिहीते.
. आणीबाणी म्हणजे काय ते कळत
. आणीबाणी म्हणजे काय ते कळत नव्हतं. पण गोरेगाव हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला असल्याने आणि त्यात गोरेगाव पूर्वेत संघाचे प्राबल्य असल्याने काही ना काही कानावर पडे. मृणालताई, बाबुराव सामंत, कमल ताई देसाई ह्यांची धरपकड झाल्याचे कानावर येई. माझी एक मावशी कमलताई सोबत असे, ती देखिल मोर्चामधे वगैरे सामील होई. शाळेतील एक मित्राचे वडील समाजवादी होते, थोड्या काळासाठी त्यांनाही अटक झाली होती.
आता तेव्हाच्या आणीबाणी बाबत वाचतो, आणि सभोवताली पाहतो तेव्हा फरक कुठेच आढळत नाही . इंदिराजींनी तकलादू का असेना काहीतरी कारण दिले होते. सध्याच्या सत्ताधारी दुक्कलीला ते देखील सांगण्याची हिंमत करता येत नाही. तेव्हा सारखे विरोधी पक्ष आणि तसे नेते आता नाहीत हे या देशाचे दुर्दैव!
बाकी, आणिबाणीबद्धल - त्यावेळी
बाकी, आणिबाणीबद्धल - त्यावेळी माझा जन्म झाला नव्हता, पण मोठ्यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी आहेत. compile करून लिहायच्या आहेत.
१९७५ साली इंदिरा गांधींनी
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. लोकशाही असलेल्या देशासाठी हा निश्चितच दुःखद प्रसंग होता. लोकाना आंदोलने वगैरे करता येत नव्हते, झोपडपट्टी हटवणे नी नसबंदीची चुकीची अंमलबजावणी हे दोन मुद्दे पुढे रेटले जातात. पण ह्या आणीबाणीला एक चांगली बाजूही आहे. आजही बर्याच सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत, लाचलुचपत खात्याने सरकारी अधिकारी पकडला तरी “निर्दोष” सुटेपर्यंत त्याचा पगार चालू राहतो, बऱ्याच वर्षांनी काम न करता पगार घेऊन तो परत त्याच नोकरीला चिकटतो. श्रीमंत माणसाने कार चालवून लोक मारले तरी त्या श्रीमंता साठी अख्खी सरकारी यंत्रणा कामाला
लागते, उशिरा ब्लड सँपल घेतले जातात नी ते बदललेही जातात. मुंबई पुण्यासारखे शहर पहिल्या पावसातच तुंबतात, कारण नाले /गटार सफाईत भ्रष्टाचार झालेला असतो. कुठेतरी वाचल की मुंबई फक्त आणीबाणी काळात तुंबली नव्हती, कारण नालेसफाई व्यवस्थित झाली होती.
तसेच एकाचा अनुभव वाचला
“आणिबाणीपूर्वी एका ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या सरकारकडून फार अपेक्षा नव्हत्या. रेशनला रांगा लावूनही कधी रॉकेल मिळायचे नाही तर कधी साखर संपून जायची. रेशनचा काळा बाजार जोरात चालू असे. एसटी आगारातून खेड्यापाड्यात जाणाऱ्या गाड्या कधीही वेळेवर सुटत नसायच्या आणि बऱ्याचश्या फेऱ्या रद्द व्हायच्या. संपूर्ण आगारातून कायम गर्दी असायची. रात्रीच्या मुक्कामी गाडीलाही गर्दी असायची आणि बऱ्याचदा काहीतरी सटर-फटर कारणाने तीही रद्द झाली की एस्टी आगारातच रात्री मुक्काम करावा लागत असे. तेव्हा रिक्षासारखी खाजगी वाहने तुरळक असायची आणि ती भरायलाही तास तास थांबायला लागायचे. संध्याकाळी तर खेड्यापाड्यात रिक्षा जात नसत. आणीबाणीत रेशन वेळेवर मिळायचे, रॉकेल संपले किंवा साखर संपली असे कधी होत नसे . कोणी तक्रार करेल म्हणून रेशन दुकानदार शिधापत्रिका व्यवस्थित भरत असे. एसटी आगारातून वेळच्या वेळी गाड्या सुटत, गाड्या रद्द होणे बंद झाले त्यामुळे गाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी झाली. रात्रीच्या शेवटच्या गाडीला फारच कमी प्रवासी असतं. जि. प. च्या कार्यालयात कधी कर्मचारी वेळेवर येत. साहेबपासून शिपयापर्यंत सगळे कार्यालयीन वेळेत जागेवर सापडायचे त्यामुळे कामेही झटपट होत असत. शाळेत जाताना किंवा येताना एसटी वेळेवर मिळत असल्याने वेळेची बचत होत होती.”
मी अनेक वयस्क लोकांशी बोललो, ते सर्वसामान्य होते, आणीबाणीत सामान्य माणसाला काहीही त्रास नव्हता असेच त्यांच्या बोलण्यातून दिसले. सरकार “सरकार” म्हणून काम करत होते, सरकारी अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक होता, सरकारी नोकर वेळेवर कामावर दाखल होत, रेल्वे वेळेवर धावत होत्या, रस्त्यावर गाडे लाऊन जागा अडवल्या जात नव्हत्या, रात्री फिरायला बंदी होती त्यामुळे गुन्हे कमी झाले होते.
वरील सर्व जर खरं असेल तर आणीबाणी हा भारतासाठीचा सुवर्णकाळ मानावा का?? सर्वसामान्य माणसास हवेच काय असते आणखी?
ता.क- विनोबा भावे ह्यानी आणीबाणीस “अनुशासन पर्व” असे संबोधले होते.
वरील सर्व जर खरं असेल तर
वरील सर्व जर खरं असेल तर आणीबाणी हा भारतासाठीचा सुवर्णकाळ मानावा का?? सर्वसामान्य माणसास हवेच काय असते आणखी? >>> आणीबाणी केवळ २१ महिने होती म्हणून. अधिक काळ चालली असती तर त्यातही भ्रष्टाचाराच्या वाटा शोधल्या गेल्या असत्या.
आणीबाणीच्या काळात दूरदर्शनवर 'अनुशासन पर्व तुझे आज जाहले, क्रांतीतून शांतीकडे राष्ट्र चालले' हे आणीबाणीची स्तुती करणारं समुहगान लागत असे.
इंदिरा गांधी इतक्या निलाजर्
इंदिरा गांधी इतक्या निलाजर्या होत्या की त्यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना आणीबाणीबद्दल मुलाखती दिल्या
https://www.youtube.com/watch?v=dk22Mh3_p8E
ही मुलाखत १९७८ म्हणजे आणिबाणीपश्चात निवडणुकांत पराभव झाल्यानंतरची
https://www.youtube.com/watch?v=q8aETK5pQR4&t=289s
या मुलाखतींत आलेली अनेक वाक्ये सध्याही ऐकू येतात.
गेल्या रविवारच्या
गेल्या रविवारच्या लोकसत्तेत्त आलेले दोन लेख
आणीबाणी आणि विनोबा
नाही तरी गोष्टी बोलू नको - प्रदीप कोकरे
काय गंम्मत आहे बघा. मोदिंच्या
काय गंम्मत आहे बघा, मोदिंच्या कारकिर्दिला अघोषीत आणिबाणी म्हणणारे इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीचे गुण गात आहेत. काय तर म्हणे अनुशासन पर्व. घंटा!
मूळात आणिबाणी कोणत्या परिस्थितीत लादली गेली होती - अलाहाबाद कोर्टाचा निर्णय, जयप्रकाश नारायण आणि इतर प्रभृतींनी सुरु केलेलं आंदोलन "अराजकता" या गोंडस नांवाखाली चिरडण्या करताच होतं हे शेंबड्या पोरालाहि कळायला हवं. पण वैचारीक वेठबिगारांना कोण सांगत बसणार? चालुद्या...
आता भारतातल्या आंदोलनांच्या
आता भारतातल्या आंदोलनांच्या मागे जॉर्ज सोरोस, यु एस एड असतात, तसं तेव्हाच्या नवनिर्माण इ. आंदोलनांमागे कोणी होतं का?
इतर देशांतील राजवटी / सरकारं उलथून टाकायचा अमेरिकेचा जुना छंद आता इराण प्रकरणी अगदी उघड दिसला.
कुमी कपूर यांचे इमर्जन्सी हे
कुमी कपूर यांचे इमर्जन्सी हे आणीबाणीवरचे पुस्तक वाचनीय आहे. प्युअर रिपोर्टाज प्रकारात मोडणारे आहे.
https://en.wikipedia.org/wiki/The_Emergency:_A_Personal_History
आणीबाणीत ज्यांनी अत्याचार केले, बेकायदेशीर कृत्ये केली किंवा कायद्याला धाब्यावर बसवले त्यातल्या कोणाचेही काहिही वाकडे झालेले नाही. केस इन पॉइंट नवीन चावला. आणीबाणीच्या काळात नवीन चावला दिल्लीचे डिफॅक्टो गवर्नर होते. संजय गांधीचे निकटवर्तीय होते. पुढे जनता पार्टी पडल्यावर इंदिरा गांधींनी त्यांना पुन्हा मोक्याची पदे दिली. नवीन चावलांना निवृत्त होण्याचा काहीच दिवस आधी २००५ मध्ये इलेक्शन कमिशनवर नियुक्त केले गेले. पुढे ते राष्ट्रीय निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झाले. त्यांनी केलेली कृत्ये पाहता खरे तर त्यांना नोकरीतून बडतर्फच करायला पाहिजे होते. असा माणूस निवडणुक आयोगाचा अध्यक्ष झाला.
हमाम में सब नंगे है!
अनुशासन पर्व वाईट होते हा
अनुशासन पर्व वाईट होते हा काही अपप्रवृत्तींद्वारे चालवला गेलेला प्रचार आहे, ज्या काळात रेल्वे, बस वेळेवर धावत होत्या, नालेसफाई होऊन शहरे तुंबत नव्हती, सरकारी अधिकारी जागेवर सापडत होते नी कामे पटपट होत होती, भ्रष्टाचार नव्हता. असा काळ अत्याचाराचा काळ कसा असू शकतो?? असा काळ भारतात पुढील १००० वर्षेही येईल की नाही सांगता येत नाही.
अबा >>>> सहमत.
अबा >>>> सहमत.
आपले दिवंगत पंतप्रधान मनमोहन
आपले दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आणिबाणीच वर्णन लोकशाही वरचा काळा डाग असं केलं आहे तर राहुल गांधी यांनीही आणिबाणी चुकीचीच होती म्हटलेलं आहे.
एकावेळेस नेते चूक मान्य करतील पण समर्थक हे समर्थकच राहतील.
आणीबाणीच्या निमित्ताने आता
आणीबाणीच्या निमित्ताने आता धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे घटने मध्ये समाविष्ट केलेले शब्द वगळण्याची संधी संघी आणि भाजपा शोधत आहेत
कितीतरी लाख लोक बिनचौकशी
कितीतरी लाख लोक बिनचौकशी तुरुंगात डांबले गेले. कोर्ट नाही, खटला नाही, निकाल नाही, आरोपही नाही.
ह्यातले अनेक घरातील कमावते लोक होते. त्यांची बायकापोरे, म्हातारे आईवडिल साठवलेले पैसे, किडुक मिडुक विकून खर्च भागवत होते.
कैदेतले लोक कधी सुटणार, त्यांचे पुढे काय होणार, नोकर्या धंदे पुन्हा सुरळित होतील की नाही अशा शेकडो चिंतेच्या तणावात कित्येक महिने घालवले.
आणि ह्याबद्दलच्या बातम्याही बाहेर येत नव्हत्या. सगळी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके काय छापत आहेत याकडे सरकारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होती. आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तो स्तंभ कोरा ठेवण्याचा सक्त हुकूम होता आणि सगळे निमूटपणे पाळत होते.
काही भूमिगत कार्यकर्ते सायक्लोस्टाईल करून पत्रके वाटत असत. अनेकदा तेही पकडले जात. मग मारहाण वगैरेही होत असे.
पण तरी खरोखर अनुशासन पर्व म्हणजे भारताचा सुवर्णकाळ होता. गाड्या वेळेवर होत्या. सरकारी अधिकारी कामे करत होते.
लोकशाही वगैरे फडतूस गोष्टीची गाडी रुळावरून घसरून गेली तर काय झाले गाड्या वेळेवर धावणे आणि सरकार दरबारी चटकन कामे होणे कधीही महत्त्वाचे.
काय ते दिवस महाराजा! आजच्या फासिस्ट हिटलरी अघोषित आणीबाणी घोषित करणार्या लोकांना त्या मर्दानी इंदिराबाईने आपल्या पोलादी धोरणाने आणलेली आणीबाणीच्या केसाचीही सर येणार नाही.
शेंडे भाऊ, आता ही विनाचौकशी
शेंडे भाऊ, आता ही विनाचौकशी कित्येकांना तुरुंगात डांबले जाते, काहींच्या बातम्या येतही नाहीत, स्वतः सरकार रोखे घोटाळे करते, विरोधी पक्ष फोडते, ईडी, निवडणूक आयोग, काहीवेळा न्यायव्यवस्था ह्यांना बटीक बनवले गेले आहे, सरकारी अधिकारी खाजगी उद्योगांना अनुकूल असे सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय राबवतात, फिरायला जाणाऱ्या नागरिकांची हत्या केलेलं दहशतवादी कुठून आले ह्याचा पत्ता लागत नाही, ते सध्या कुठे आहेत हे कोणी सांगत नाही, सर्वोच्च नेता पत्रकारांना घाबरतो आणि हे आणीबाणी पर्व नाही?
सर्वसामान्य जनतेला आणीबाणीत
सर्वसामान्य जनतेला आणीबाणीत काही अपवाद वगळता सत्ता उलटवण्याइतपत त्रास झाला नव्हता. परंतु आणीबाणीला विरोध करण्यात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, त्यांना मोठ्या बुद्धिवादी साहित्यिकांनी साथ दिल्याने जनतेला आणीबाणी ही अत्याचारक असल्याचा साक्षात्कार झाला. इंदिरा गांधींना खलनायक बनविण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले. बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी इंदिराजींची साथ सोडली. दोन वर्षात सर्वसामान्य जनतेला आणीबाणी बरी ( प्रत्यक्षात त्यांना तिचा वाईट अनुभव आलाच नव्हता), पण जनता पक्षाचे अराजक नकोसे झाले होते. १९८० ला परत इंदिरा गांधीना निवडून दिले. अजूनही इंदिरा गांधींना आणीबाणीबद्दल दोष देणाऱ्यांना , जनतेने इंदिरा गांधींवर विश्वास दाखवून विषय संपवला होता. इंदिरा गांधीं अमेरिकेला भीक घालत नसल्याने त्यांचा जागतिक राजकारणात दरारा होता. सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे असा एकही जागतिक दर्जाचा नेता नसल्याने न्यूनगंडातून इंदिरा गांधीना कमी लेखण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. इंदिरा गांधींनी एक घाव दोन तुकडे करून पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा केला. ११ वर्ष झाली, ह्यांना भारतीयांचा स्विस बँकेतला काळा पैसा आणि बँकांना बुडवून परदेशात गेलेले उद्योगपती अद्याप भारतात आणता आले नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीत जे जे काही केले त्याची हुबेहूब नक्कल सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी करून दाखवावी. खरंच जनता तुम्हाला दुवाच देतील. पण नक्कल करायला अक्कल लागते, ती कुठून आणणार?
>>
>>
आता ही विनाचौकशी कित्येकांना तुरुंगात डांबले जाते, काहींच्या बातम्या येतही नाहीत, स्वतः सरकार रोखे घोटाळे करते, विरोधी पक्ष फोडते, ईडी, निवडणूक आयोग, काहीवेळा न्यायव्यवस्था ह्यांना बटीक बनवले गेले आहे, सरकारी अधिकारी खाजगी उद्योगांना अनुकूल असे सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय राबवतात, फिरायला जाणाऱ्या नागरिकांची हत्या केलेलं दहशतवादी कुठून आले ह्याचा पत्ता लागत नाही, ते सध्या कुठे आहेत हे कोणी सांगत नाही, सर्वोच्च नेता पत्रकारांना घाबरतो आणि हे आणीबाणी पर्व नाही?
<<
आज कदाचित काही लोकांना तुरुंगात डांबत असतील. जसे डाव्यांचा लाडका उमर खलिद ज्याच्यावर दंगल घडवल्याचा आरोप आहे. परंतु ही संख्या लाखात नाही.
आज कितीतरी माध्यमे, विचारवंत, लेखक, कलाकार उठता बसता मोदी आणि शाहला शिव्या घालतात. कार्टून बनवतात. ए आय वापरून अनेक कलाकृती बनवतात ज्यात मोदी शाह ची टिंगल, अपमान केला जातो. कुणालाही तुरूंगात टाकले जात नाही.
राजदीप सरदेसाई, आशतोष, अरफा शेरवानी, ध्रुव राठी, कुणाल कामरा वगैरे कितीतरी ह्या दुक्कलीला आणि भाजपला शिव्या घालणे हेच उपजीविकेचे साधन बनवत आहेत. कुणी तुरुंगात घातले नाही. इंदिरेच्या आणीबाणीत ह्यातले कुठलेही विचार बाहेर आले नसते आणि हे लोक आत गेले असते.
मोदी शाह अनेक बाबतीत कमी पडले म्हणून त्यांची आणीबाणी हा हास्यास्पद आणि बिनडोक युक्ती वाद आहे.
अतिरेकी हल्ला २६/११ ला झाला होता. त्यातले मरायच्या तयारीने आलेले अतिरेकी मारले गेले. पण पाकमधले कर्ते करविते सुखाने नांदत होते. काही कारवाई झाली नाही. एखाद दोन कडक निषेध झाले असतील कदाचित.
अनेक काँग्रेसी नेत्यांनी आपल्या पक्षाने आणीबाणी लादली ह्यासाठी माफी मागितली आहे. मनमोहन सिंग, राहुल गांधी असे काही. पण इंदिराबाईंचे खुशमस्करे मात्र त्या पर्वाला चांगलेच मानतात. चहापेक्षा किटली गरम ह्याचे उदाहरण असावे.
इथेही खुशमस्करे ह्या पर्वाची
इथेही खुशमस्करे ह्या पर्वाची वकीली करतातच की..
शेंडे भाऊ, आता ही विनाचौकशी
शेंडे भाऊ, आता ही विनाचौकशी कित्येकांना तुरुंगात डांबले जाते, काहींच्या बातम्या येतही नाहीत, स्वतः सरकार रोखे घोटाळे करते, विरोधी पक्ष फोडते, ईडी, निवडणूक आयोग, काहीवेळा न्यायव्यवस्था ह्यांना बटीक बनवले गेले आहे, सरकारी अधिकारी खाजगी उद्योगांना अनुकूल असे सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय राबवतात, फिरायला जाणाऱ्या नागरिकांची हत्या केलेलं दहशतवादी कुठून आले ह्याचा पत्ता लागत नाही, ते सध्या कुठे आहेत हे कोणी सांगत नाही, सर्वोच्च नेता पत्रकारांना घाबरतो आणि हे आणीबाणी पर्व नाही?
बरोबर, आजही संजय राऊत, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया एस इमोठे नेटव तुरुंगात घातले होते, शिवसेनेच्या अनेक नेत्याना शिंदेसेनेत जाई पर्यंत इडी ने सळो की पळो करून सोडले होते, उदा. रवींद्र वायकर,
बर एवढं सगळं इंदिरा गांधीणीही केले म्हणावे तर सामान्य माणसाला न भूतो न भविष्यती असे सरकारही दिले, रेल्वे गाड्या वेळेवर ते अनेक…. वर उल्लेख केला आहे. आज ह्यातले काय मिळतेय?
अनुशासन पर्वाला आणीबाणी म्हटले म्हणून ती अत्याचारी होते का? गांधी हत्येलाही अनेक खोळसाड लोक गांधीवध म्हणतात म्हणून तो अतिरेकी हल्ला ही हत्या नव्हती असे होते का?
आणीबाणीबद्दल मनात भीतीच होती,
आणीबाणीबद्दल मनात भीतीच होती, मी खूप लहान होते, फार आठवत नाही पण आमच्या शाळेतल्या एकीच्या बाबांना आर एस एस चे म्हणून अटक केलेली, तेव्हा माझ्या बाबांनाही नेतील का भीती वाटायची मला, बाबा आर एस एस चे होते पण रोज शाखेत जाणारे नव्हते कारण बाबांना वेळ नव्हता, सकाळी डोंबिवलीहून लोकल ट्रेन पकडून कुर्ल्यात कामावर जायचं असायचं. गुरुपौर्णिमा आणि रक्षाबंधन असे कार्यक्रम असायचे तेव्हा जायचे.
मी पाच सहा वर्षाची असेन तेव्हा, मला भीती मात्र वाटायची. अनयाने लिहिलं तसं १९७७ ला रामभाऊ म्हाळगी निवडून आले तो आमच्यासाठी आनंदाचा दिवस होता. सगळा एरिया खुश होता.
आमच्या मतदारसंघाने एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, नंतर राम कापसे यांच्यासारखी लोकं निवडून दिली, ज्यांच्याबद्दल अजूनही मनात आदर आहे.
rss च्या लोकाना अटक वगैरे
rss च्या लोकाना अटक वगैरे झाली तर तो अत्याचार असतो, पण शिवसेना, काँग्रेस, आप अश्या पक्षातील लोकाना इडी वगैरे द्वारे त्रास दिला गेला तर तो अत्याचार नसतो. आरएसएस चे लोक काही विशिष्ट असतात का? अनुशासन पर्वाला बदनाम करणारे हेच लोक आहेत.
ह्यांच्याच सरसंघचालकांनी
ह्यांच्याच सरसंघचालकांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता म्हणे, आणि ' माझी सुटका केली तर आमचे सगळे स्वयंसेवक राष्ट्र उभारणीच्या ह्या महत्कार्यात सहभागी होतील वगैरे' असे इंदिरा गांधींना पत्र देखील लिहिले होते
चर्चा प्रस्ताव हा १९७५-२०२५
चर्चा प्रस्ताव हा १९७५-२०२५ आणीबाणीची पन्नाशी आहे.
चर्चेच्या अनुषंगाने वर्तमानातील संदर्भ आले तर काही हरकत नाही पण ही चर्चा "आताचं असं चालतं मग तेंव्हाचं तसं का नाही चालत?" किंवा "तेंव्हाचं ते चाललं मग आताचं हे का नाही चालत?" अशा वळणावर जाऊ नये असे मला वाटते.
या निमित्ताने मायबोली दिवाळी
या निमित्ताने मायबोली दिवाळी अंकातल्या एका लेखाची लिंक देतेय.
https://vishesh.maayboli.com/diwali-2014/1523#google_vignette
यांच्यासारख्या कित्येक जणांनी त्यावेळी विरोध केला होता आणि सध्याच्या परिस्थितीलाही विरोध करत आहेत. आत्ता विरोध केला म्हणजे त्याकाळचे समर्थन आणि त्यावेळी विरोध केला म्हणजे आत्ताचे समर्थन असं नाहीये बर्याच जणांबाबत.
या निमित्ताने मायबोली दिवाळी
डबल पोस्ट
२०१४ च्या हितगुज मायबोली
२०१४ च्या हितगुज मायबोली दिवाळी अंकात ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते अण्णा खंदारे यांनी आणीबाणीच्या काळातल्या आठवणी लिहिल्या होत्या.
तो हा लेख
https://vishesh.maayboli.com/diwali-2014/1523
आणीबाणीत अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या हे नाकारण्यात अर्थ नाही.
हा लेख वाचताना किंवा आणीबाणी काळातल्या इतर घडामोडींबद्दल वाचताना आजही तेच चित्र दिसत असेल, तर ते चित्र जे रंगवत आहेत, त्यांनीच आणीबाणीच्या आठवणी जागत्या ठेवणे यातला विरोधाभास नोंदवणे भाग आहे.
अमरेंद्र बाहुबली तुम्ही
अमरेंद्र बाहुबली तुम्ही माझ्या पोस्टवर लिहिलं असेल आणि प्रश्न विचारले असतील तर त्यावेळी मला काय वाटलं आणि माझ्या मनातली त्यावेळची खळबळ एवढंच लिहिलं आहे मी आणीबाणी विषयी. मी अति लहान होते त्यामुळे ते पर्सनल लेव्हलवर आहे.
आणि सामान्य जनतेच्या
आणि सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रशासनाचे कठोर नियंत्रण आले.
कुठल्या प्रकारचे नियंत्रण? तेव्हाही मी सामान्य नागरिक होतो ,आताही सामान्य नागरिक आहे, त्यामुळे जाणून घ्यायचे आहे.
अंजू, तुम्हाला नाही, पण जनरली
अंजू, तुम्हाला नाही, पण जनरली संघाच्या लोकांवर अत्याचार झाले म्हणून गळे काढले जातात, पण दोन चार संघी आत गेले म्हणजे जनतेवर अत्याचार झाला असे होत नाही, तसेही संघाचा सामान्य नागरिकाना उपयोग तेव्हाही नव्हता नी आताही नाही, संघ तेव्हा जनसंघीसाठी सतरंज्या उचलायचा, मध्ये भाजपसाठी आणी आता भाजपमध्ये आलेल्या कॉंग्रेसींसाठी!
संघ देशसेवेच्या नावावर पिढ्यानपिढ्या सतरंज्या उचललायला लावतो, काहींची तर चौथी पाचवी पिढी सतरंज्या उचलत आहे, सतरंज्या उचलून कोणती देशसेवा होते ते संघीच जाणोत पण असे संघी अनुशासनपर्वात जेलात गेले असतील तर त्यामुळे देशाचे किंवा सामान्य नागरिकांचे काहीही नुकसान झाले नाही, आणी अशा जेलात गेलेल्या संघींबद्दल त्यांनी सध्याचे आणलेले सरकार पाहिले तर आजिबात अगदी खोटी सहानुभूतीही नाहि. त्यामुळे अनुशासन पर्व हा देशासाठी सुवर्णकाळ होता असे मला वाटते.
Pages