अताशा जगणे होत नाही

Submitted by देवा on 31 May, 2025 - 13:00

अताशा जगणे होत नाही
जगाशी लढणे होत नाही

जगावर हसलो कैक वेळा
कुणावर रडणे होत नाही

नभावर दिसती लाख चिंता
कुशीवर वळणे होत नाही

असे पांघरण्या प्रेम माया
घडी विस्कटणे होत नाही

स्वतःशी रमणे ठीक आहे
तुलाही स्मरणे होत नाही?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

KDak