ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्रात 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे
१. मुंबई २. उरण-जेएनपीटी ३. तारापूर ४. पुणे ५. ठाणे ६. नाशिक ७. थळ-वायशेत ८. रोहा-धाटाव-नागोठाणे ९. मनमाड १०. सिन्नर ११. पिंपरी-चिंचवड १२. संभाजीनगर १३. भुसावळ १४. रायगड १५. रत्नागिरी १६. सिंंधुदुर्ग

जय हिन्द ! वन्दे मातरम..
हे घडणार अस वाटतच होत..ऑल पॉवर टू अवर फायटर्स ऑन द बॉर्डर

हो नाव अगदी चपखल आहे. बाकी स्ट्राइक्स बद्दल अजून फार माहिती मिळाली नाही. पण पाकने ऑलरेडी तक्रार केली आहे म्हणजे त्यांनी हे स्ट्राइक झाले हे मान्य केले आहे असे दिसते.

इतक्या लगेच केले याचे मला आश्चर्य वाटले. मला वाटले होते काही दिवस गाफील ठेवून त्या त्या ठिकाणी जे हवे आहेत ते अतिरेकी जमले की मग अचानक करतील.

बाकी आता राजकीय मुत्सद्देगिरी करून सगळा आंतरराष्ट्रीय सपोर्ट आपल्यालाच मिळेल व इव्हन पाकही उत्तर बित्तर द्यायच्या फंदात पडणार नाही अशी फिल्डिंग लावायला हवी.

हो सर्जिकल स्ट्राइक होईल असे वाटत होतेच. अजून डीटेल्स येतायत . किती लोक अ‍ॅक्चुअली मारले गेलेत ते समजलेले नाही. पहलगाम चे टेररिस्ट मारले गेले असावेत अशी इच्छा आहे!! तसे झाले असेल तर बेस्ट !
इन्टरनॅशनल मिडिया चे एकूण सूर वेगळेच आहेत , ते "दोन न्यूक्लियर आर्म्ड नेशन्स युद्धाच्या उअंबरठ्यावर" अशा अँगल ने रिपोर्ट करतायत.
पाक ने आपली ३ विमाने पाडल्याचे क्लेम केलेत. सीएनेन वर तर ५ पाडली म्हणत होते!! होपफुली ते खरे नसावे!

१० वाजता सेनेची प्रेस कॉन्फरेन्स आहे त्यात डिटेल्स मिळण्याची शक्यता आहे.

समाधान वाटते आहे. प्राथमिक अंदाजानुसार हजार टेररिस्ट आणी पाकी नागरिक मारले गेले असावेत. अर्थात पाक हे कधीच मान्य करणार नाही.
अशा हल्ल्यानंतर पाकिस्तान ईतका कमजोर होऊ दे की भारतावर काही ऊचापत करायच्या आधी अंतर्गत यादवी मुळेच तो देश जेरीस येऊ दे

विचारपूर्वक केलेलं असू दे आणि आपल्याला यापुढे आणखी हानी पोहोचू नये.
जय हिंद.

पाकिस्तानच्या स्टेटमेंटमध्ये भारतिय विमानांनी भारतिय हद्दीतून क्षेपणास्त्रांनी हल्ला केला असं म्हटलं आहे. मग विमानं पाडण्याची शक्यता कमी वाटते आहे.
मुरीदके व बहावलपूरवर हल्ला केलेला आहे कारण ही जैशची महत्वाची ठिकाणं आहेत.
नाव चपखल आहे.

"ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले."
+१०००००
कालच्या हल्ल्यानंतरचे काही फोटोज अत्ता पहाण्यात आले....

Rescuers search for victims in the debris of a damaged building in the Government Health and Educational complex after Indian missile strikes in Muridke, about 30km (18.6 miles) from Lahore, on May 7, 2025 [Murtaz Ali/AFP]


Destruction at the Bilal Mosque in Shawai, Muzaffarabad [Chudary Naseer/Anadolu]

'मशीदी आणि मदरशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करत असाल तर ती धार्मिक स्थळे देखिल उध्वस्त केली जातील' हा संदेश भारताने पाकिस्तानला दिल्याचे वर नमुन्यादाखल दिलेल्या फोटो मधुन दिसत आहे.
अर्थात एवढ्या प्राथमिक पातळीवरच्या कारवाईने माझे तरी समाधान झालेले नाही... "ये दिल मांगे मोअर"...

जय हिंद! जय हिंद की सेना!

भारतावर आजवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांतील मृतांना श्रद्धांजली!
आजवर व्यक्त केलेल्या कोरड्या शब्दांना काहीही अर्थ नव्हता..... जय हिंद!!

विचारपूर्वक केलेला स्ट्राईक आहे. ८० अतिरेकी मारले गेले असे वाचले.
पाकीस्तान कबूल करणार नाही, भारताची विमाने पाडली, बेस उडवला अशा बातम्या त्यांच्या लोकांसाठी पसरवेल.
पण खरंच काही असले मोठे दुस्साहस करेल असे वाटत तर नाही.

भारताच्या जवानांना आणि देशाच्या नेतृत्वाला यश मिळण्यासाठी शुभेच्छा. पहलगामला २६ निरपराधी नागरिकांची हत्या केलेल्या अतिरेकी आणि त्यांचे मास्टर माईंड यांना जबर शिक्षा मिळावी. आज नाही तर कधीतरी टारगेटेड सर्जरी व्हायला हवी.

युद्धाचा भडका उडणार नाही यासाठी योग्य काळजी घेतली गेली असेलच. आंतरराष्ट्रिय पातळी वर महत्वाचे सर्व देश ( रशिया, अमेरिका, चीन) गुंतलेले आहेत. इतर वेळी लागलीच दबाव येतो, या वेळी तसे घडणार नाही असे वाटते अपवाद बांग्लादेश. बांग्लादेशच्या कुणा नेत्याने ( महंमद यु नूस चे सल्लागार) खोडसाळ आणि संताप येण्यासारखे वक्तव्य केले होते.

"भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा."
स्वच्छतेच्या सवयी मुके प्राणीही अल्पावधीत आत्मसात करतात, पण काही मनुष्यप्राणी मात्र त्या कधीच आत्मसात करु शकत नसल्याने जिथे-तिथे घाण करुन ठेवतात. ह्या धाग्यावरचे दोन प्रतिसाद वाचुन ह्याचे प्रत्यंतर आले 😀

सेनेच्या प्रेस कॉन्फरन्सनुसार
१o० किमी आत पर्यंत अतिरेकींच्या तळांची नेमकी इमारत, इमारतींचा समुह टारगेट करून प्रिसाईज स्ट्राईक केला आहे.
अगदी नियोजनपूर्ण ऑपरेशन केलेय.

या करावाईचे सेना आणि मोदी सरकार दोन्हींना क्रेडिट द्यायला हवे.

मी रात्री शैलेश ला (नवरा ला) हेच बोलले आपण करू मॉक ड्रिल मोदी घेऊन टाकील pok.

रात्री अकरा बारा ला बोलणं झाला सकाळी न्यूज़ बघून काय भारी वाटला.

प्रसन्न जोशी यांची खालील पोस्ट आवडली

_____________________________________

हा 'नॅरेटिव्ह स्ट्राईक' थोर आहे!

पाकिस्तानी राजकारण्यांच्या, जनतेच्या मनात भारतीय संरक्षण दलांनी केलेला हा नॅरेटिव्ह स्ट्राईक फार फार महत्त्वाचा...हा फोटो विसरु नका!

सर्वप्रथम 'ऑपरेशन सिंदूर' राबवून २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिकांच्या हत्येची, भारतीयांच्या राष्ट्राभिमानाला, धार्मिक सौहार्दाला ठेच पोहण्यावण्याच्या वृत्तीची आणि काश्मिर पुन्हा अस्थिर करण्याच्या प्रयत्नांची किंमत पाकिस्तानला मोजायला लावल्याबद्दल सर्वसेनादलप्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, पंतप्रधान मोदी आणि भारतीय संरक्षण दलांचे आभार आणि अभिवादन.

मात्र, आपण याहून मोठा....फार मोठा नॅरेटिव्ह स्ट्राईक आज सकाळी भारतीय सीमेत राहून २५ कोटी पाकिस्तानी लोकांच्या (यात राजकारणी, सैनिक, जनता सारे आले) मनात केलाय. 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या एक हिंदू महिला, एक मुस्लिम महिला लष्करी अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन आपण एक भारत राष्ट्र म्हणून हा नॅरेटिव्ह स्ट्राईक केलाय. या निवडीसाठी भारतीय संरक्षण दले, संरक्षण मंत्रालय आणि सरकारचे अधिक अभिनंदन. पेहलगाम हल्ल्याआधी पाक लष्कर प्रमुख मुनीर यानं जाहीररित्या हिंदू-मुस्लिम द्विराष्ट्रवादाची केलेली भलामण असो की पहलगाममध्ये धर्म विचारुन (होय, धर्म विचारुन-पाहून मारण्यात आलं हे वास्तव आहे.) मारण्याचे दहशतवादी कृत्य असो, पाकिस्तान एक सायकोलॉजिकल वॉरफेअर खेळत होता. त्यांचं मैदान होतं आपल्या सर्व भारतीयांचं मन-मेंदू. यानंतर भारतातही मुस्लिमद्वेषाला हवा देण्याचे प्रयत्न झाले. त्या पार्श्वभूमीवर आजच्या या पत्रकार परिषदेत या दोन महिला अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देणं हे खालील तीन कारणांसाठी महत्त्वाचं-

१. पहलगाममध्ये महिलांना सोडून पुरुषांना मारण्याची पुरुषी वर्चस्ववादी वृत्ती. त्या रानटी मध्ययुगीन दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी लष्करालाही (आठवा बांग्लागदेश मुक्तीमधील बलात्कार) महिलांचा सन्मान कळणं शक्य नाही.

२. धर्म विचारुन मारण्याचे कृत्य- हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचे कारस्थान

३. पाक लष्करप्रमुख मुनीरनं सांगितलेला जिन्नावाला द्विराष्ट्रवाद- हिंदू-मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत.

या एकाच पत्रकार परिषदेतील आमच्या महिला अधिकारी सोफिया आणि व्योमिका या भारत कन्यांना पाहून पाकिस्तानची जनता काय विचार करेल? पाकिस्तान एक सेक्युलर देश असेल, असं जिन्ना म्हणाले होते. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. भारत हे स्वप्न नव्हे वास्तव जगतोय..काल-आज-दररोज!

हा नॅरेटिव्ह स्ट्राईक पाकिस्तान्यांना फार फार लागणार आहे....

जय हिंद, जय हिंद की सेना!

मॉक ड्रिल झाले काय?

ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या एक हिंदू महिला, एक मुस्लिम महिला लष्करी अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन आपण एक भारत राष्ट्र म्हणून हा नॅरेटिव्ह स्ट्राईक केलाय. या निवडीसाठी भारतीय संरक्षण दले, संरक्षण मंत्रालय आणि सरकारचे अधिक अभिनंदन. >>>>
पर्फेक्ट.

वेगवेगळे देश भारत आणि आतंकीस्तानला सबुरीने वागण्याचे सल्ले देत असतानाच्या पार्श्वभुमीवर इस्राएलच्या राजदुतांची 'X' वरील ही पोस्ट आवडली...

Pages