पाकिस्तान आणि पाणी पुरवठ्या बद्दल माहीत मिळू शकेल ?

Submitted by स्वरुपसुमित on 26 April, 2025 - 13:39

सगळ्यात मुख्य प्रश्न
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्या सोडून अजून तिथून होत नाही का ?
३) जर चीन ने त्यांच्या नंद्याचे पाणी भारताला बंद केले तर ? तसेच दोन्ही कडे जल फुगवटा निर्माण होण्याची शकयता ?
४) कोणी सरकारी आकडेवारी माहीत करू शकते कि पाणी करार ,सोडलेले पाणी व पाणी चालू बंद करायचे निर्णय शासन स्तरावर कोण करत ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विशेष काहीही अभ्यास केलेला नाही. पण चीनच्या हातात फक्त ब्रह्मपुत्रा नदी आहे. या गोष्टीला 'फक्त' म्हणणे खरे तर चुकीचे आहे कारण आपल्याकडे पूर आणणे किंवा पाणी न मिळू देणे हे त्यांच्या हाती आहे. भारत देश फक्त ब्रह्मपुत्रेवर विसंबून नाही हे सुदैव!

पाकिस्तानचे 'साधारणपणे' तसे नाही.

पाकिस्तानला तीन नद्या जातात. इकडे पाणी अडवले तर खायचीच भ्रांत असलेल्यांना पाण्यासाठीही संघर्ष करावा लागेल.

शेजारच्या घरात कोंबडी आलीच कशी यावरून सोळा मुडदे पाडले जात आहेत. तिथे आता पाणी प्रश्न येईल.

येथील अभ्यासू सदस्य योग्य ते सांगतील

मी दिलेला प्रतिसाद भावनिक वगैरे समजून सोडून द्यावात कृपया

कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?

>>>>

कोणीतरी लबाडीने नळ सोडतो बहुतेक दरवेळी

सिंधू पाणी वापर करार ऑफिशिअल लिंक
https://www.mea.gov.in/bilateral-documents.htm?dtl/6439/Indus

भारताच्या हिश्श्याचे पाणी वापरण्यासाठी केलेल्या सोयीसुविधा

वरील पॉडकास्ट जिओपॉलिटीक्स विषयाला वाहिलेल्या चॅनेलवर होते. चर्चा करणाऱ्यांची राजकिय मतेही यात आहेत.

अलीकडेच वाचले की ब्रह्मपुत्रेचा उगम तिबेटमधे असला तरी ७०% कॅचमेंट एरीआ भारतात आहे.

सिंधू जल वाटप करारानुसार ८०% पाणी पाकिस्तानला व २० % भारताला जाणे अपेक्षित आहे. हे ही अनफेअर आहे परंतु आपण तेवढेही पाणी साठवत/वापरत नव्हतो. फक्त आपल्या हिश्श्याचे सगळे पाणी वापरले तरी पाकिस्तानला पाण्याचा अभाव जाणवू शकतो.

भारतातील काश्मीर खोऱ्यात भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्या वाट्याचे पाणी साठवता येत नाही, पूर येऊन नुकसान होऊ नये म्हणून पाणी सोडून द्यावे लागते.

नवीन प्रतिसाद लिहा