पाकिस्तान आणि पाणी पुरवठ्या बद्दल माहीत मिळू शकेल ?

Submitted by स्वरुपसुमित on 26 April, 2025 - 13:39

सगळ्यात मुख्य प्रश्न
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्या सोडून अजून तिथून होत नाही का ?
३) जर चीन ने त्यांच्या नंद्याचे पाणी भारताला बंद केले तर ? तसेच दोन्ही कडे जल फुगवटा निर्माण होण्याची शकयता ?
४) कोणी सरकारी आकडेवारी माहीत करू शकते कि पाणी करार ,सोडलेले पाणी व पाणी चालू बंद करायचे निर्णय शासन स्तरावर कोण करत ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विशेष काहीही अभ्यास केलेला नाही. पण चीनच्या हातात फक्त ब्रह्मपुत्रा नदी आहे. या गोष्टीला 'फक्त' म्हणणे खरे तर चुकीचे आहे कारण आपल्याकडे पूर आणणे किंवा पाणी न मिळू देणे हे त्यांच्या हाती आहे. भारत देश फक्त ब्रह्मपुत्रेवर विसंबून नाही हे सुदैव!

पाकिस्तानचे 'साधारणपणे' तसे नाही.

पाकिस्तानला तीन नद्या जातात. इकडे पाणी अडवले तर खायचीच भ्रांत असलेल्यांना पाण्यासाठीही संघर्ष करावा लागेल.

शेजारच्या घरात कोंबडी आलीच कशी यावरून सोळा मुडदे पाडले जात आहेत. तिथे आता पाणी प्रश्न येईल.

येथील अभ्यासू सदस्य योग्य ते सांगतील

मी दिलेला प्रतिसाद भावनिक वगैरे समजून सोडून द्यावात कृपया

कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?

>>>>

कोणीतरी लबाडीने नळ सोडतो बहुतेक दरवेळी

सिंधू पाणी वापर करार ऑफिशिअल लिंक
https://www.mea.gov.in/bilateral-documents.htm?dtl/6439/Indus

भारताच्या हिश्श्याचे पाणी वापरण्यासाठी केलेल्या सोयीसुविधा

वरील पॉडकास्ट जिओपॉलिटीक्स विषयाला वाहिलेल्या चॅनेलवर होते. चर्चा करणाऱ्यांची राजकिय मतेही यात आहेत.

अलीकडेच वाचले की ब्रह्मपुत्रेचा उगम तिबेटमधे असला तरी ७०% कॅचमेंट एरीआ भारतात आहे.

सिंधू जल वाटप करारानुसार ८०% पाणी पाकिस्तानला व २० % भारताला जाणे अपेक्षित आहे. हे ही अनफेअर आहे परंतु आपण तेवढेही पाणी साठवत/वापरत नव्हतो. फक्त आपल्या हिश्श्याचे सगळे पाणी वापरले तरी पाकिस्तानला पाण्याचा अभाव जाणवू शकतो.

भारतातील काश्मीर खोऱ्यात भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्या वाट्याचे पाणी साठवता येत नाही, पूर येऊन नुकसान होऊ नये म्हणून पाणी सोडून द्यावे लागते.

भारतातील काश्मीर खोऱ्यात भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्या वाट्याचे पाणी साठवता येत नाही, पूर येऊन नुकसान होऊ नये म्हणून पाणी सोडून द्यावे लागते. >>>> Use it for more power generation. काश्मिरमध्ये लाईट जात असतात. श्रीनगरमध्ये पण जातात तर छोट्या गावांत काय अवस्था असेल. पहालगामला आत्ता १० दिवसांपूर्वीच बघितलं... सारखे लाईट जात.

त्यांचे power generation already जास्त त्यामुळे वीज स्वस्त मिळते त्यांना. पण म्हणे त्यांच्यासाठी पुरेशी वीज न राखता शेजारी राज्यांना दिली जाते.

मग आपल्या वाट्याच्या पाण्याचे जास्त power generation करा.

हायड्रॉलिक पॉवर प्लांट मध्ये पाणी खर्च होत नाही. पाण्याच्या दाबाने टर्बाइन फिरते आणि त्यातुन बाहेर येणारे पाणी साठवणे, सोडणे हे करावेच लागते.

वीज निर्मितसाठी जरूर वापरावे, पण परत पाणी कसे-कुठे साठवावे/पुढे कसे सोडावे हा मुद्दा सुरू असलेल्या चर्चेच्या संदर्भात तसाच रहातो.

वीज निर्मितसाठी जरूर वापरावे, पण परत पाणी कसे-कुठे साठवावे/पुढे कसे सोडावे हा मुद्दा सुरू असलेल्या चर्चेच्या संदर्भात तसाच रहातो. >>> hmm. खरे आहे...

India will ensure that “not a drop of water will go to Pakistan”, Water Resources Minister C.R. Patil said on Friday
कदाचित अगस्त्य ऋषींनी पुनर्जन्म घेतला असेल किंवा एखाद्या शाखेत असंख्य आरुणींचे सैन्य तयार झाले असेल.

मानव, आणखी एक लहानसा मुद्दा आहे.
Hydropower projects in the Himalaya face two real, ever-present, risks: the possibility of a devastating earthquake and ruinous floods caused by glacial lake overflows

उत्तराखंडमध्ये जमिनीच्या ज्या लहानसहान गंमतीजमती होत असतात, त्याचं कारण तिथले जलविद्युत प्रकल्प असं काही दीडशहाणे सांगतात.

अरे, हायड्रोइलेक्ट्रिकचे हायड्रॉलिक झालेय माझ्याकडुन वरती, कबबा!

हो भरत, त्याबद्दलही वाचलेय आणि वर रानभूली यांनी सुद्धा एक लिंक दिलीय.
हायड्रोइलेक्ट्रिक पॉवरप्लांट साठी सहसा धरण बांधतात आणि त्याचे पाणी मग हवे तसे, हवे तेवढे नियंत्रीतपणे पॉवर स्टेशनला सोडता येते आणि वर्षभर एका क्षमतेची विज निर्मिती करता येते.
तसे केल्यास हिमालयात वर म्हटल्याप्रमाणे समस्या असतील.

याला पर्याय म्हणजे पाणी न साठवता वाहत्या पाण्यात टर्बाइन्स चालवणे. याला Run of the river hydroelectric power plant म्हणतात. यात नदी पासुन पाण्याचा प्रवाह वळवून टर्बाईन्स मधुन नेऊन परत नदीत सोडतात.
(यात मग थोडेसेच एक दोन दिवसाचे पाठी साठवणे, धरणा ऐवजी तळे बांधणे, गुरुत्व धरण बांधणे असे उपप्रकार आहेत.)
पाणी अजिबात न साठवता अशा प्रोजेक्ट मध्ये ऋतू प्रमाणे नदीचे पाणी कमी जास्त होते तेव्हा वीजनिर्मिती पण कमी जास्त होते.

पाकिस्तानच्या वाट्याच्या तीन नद्यांवर वरच्या भागात धरणे नाहीत. त्या नद्यांपासून आपण जलविद्युत निर्माण करतो पण पाण्याचा त्याहुन जास्त वापर करत नाही. तो वापर करुन उन्हाळ्यात पाकिस्तानचे पाणी कमी होऊ शकते बाकी महिन्यात पाण्याच्या ओघाने ते शक्य ही नाही.
धरणे बांधणे कितपत शक्य आहे कल्पना नाही. बांधायचं ठरवलं तरी ते काही लगेच होणारं काम नाही.

हो ते मी ही वाचलं. पण मग सिंधू पाणी वाटप करार स्थगित म्हणजे नक्की काय करणार आहेत तेच आता मला समजेना झाले.

अनेक दावे प्रतिदावे वाचनात येतात. मला तरी हा निवडणुकीचा स्टंट वाटू लागल आहे.
वीस वर्षे धरण आणि कालवे ज्या जमिनीतून जाणार त्या जमिनीच्या कोर्टबाजीत जातील. मग पुढे कितीही रेकॉर्ड ब्रेक वेळेत बांधले तरीही पाच वर्षे.
पंचवीस वर्षे हा मुद्दा इतका हॉट राहील का ?
शिवाय त्या वेळी सत्ताधारी कोण असतील ?

पुलवामा हल्ल्यानंतर जलमंत्रालयाने दिलेलं स्टेटमेंट

भारताच्या वाट्याचं जे पाणी पाकिस्तानात जात होतं , ते थांबवण्यासाठी प्रकल्प राबवायला भारताने उरी दहशतवादी हल्ल्यानंतर सुरुवात केली. हे इंडस वॉटर्स ट्रीटीच्या चौकटीतच होतं.
आता ही ट्रीटीच स्थगित करू असं म्हटलं आहे.

भारताने नुसती धमकी दिली. तिकडे चीनने ब्रह्मपुत्रेचं पाणी अडवलं, शस्त्रास्त्रे दिली, विमान दिले, मिसाईल दिले काय काय लिहू आणि काय काय झाकू. इकडे इंस्टाग्राम फेसबुक खेळत बसा आणि लोकांना येडा बनवा.

Back to top