मायबोलीकर यूट्युबर्स - Swaroop Kulkarni Poetry (स्वरुप)

Submitted by स्वरुप on 4 April, 2024 - 09:59
स्वरचित कवितांचे वाचन

कविता मी तसा शाळा कॉलेजच्या दिवसांपासून लिहतोय. त्या त्या वेळी शाळा कॉलेजच्या नियतकालिकांतून वगैरे छापूनही आल्या पण त्यापलीकडे जाऊन त्याचे काही करावे किंवा कुठे सादर कराव्यात वगैरे फारसा अट्टहास नव्हता. कालांतराने मायबोलीवर आलो. गुलमोहरावर, झुळकेवर रमलो. इथे दर्जेदार लिहणाऱ्यांकडून त्या काळात दादही मिळत गेली आणि कविता लिहित राहिलो.
मध्ये बरीच वर्षे कामामुळे आणि इतर प्रायोरिटीजमुळे कवितालेखन खुप कमी झाले..... जवळजवळ नाहीच!!
चांगले चांगले वाचत होतो; youtube, podcasts वगैरेच्या माध्यमातून खुप चांगले ऐकत होतो.... पण बसून परत कविता लिहिणे वगैरे होत नव्हते.

तीन चार वर्षापूर्वी सहज म्हणून काही लिहले आणि फेसबुकवर पोस्ट केले...... काही चांगल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढला आणि मग सातत्याने लिहित राहिलो!!
काही दिवसांपुर्वी एका फॅमिली गेटटूगेदर मध्ये काहीजण म्हणाले की तू चांगले लिहतोस असे ऐकले; आम्ही काही फेसबुकवर नाही तर आमच्यासाठी काहीतरी ऐकव ना किंवा रेकॉर्ड करुन पाठव!!

आता आली का पंचाईत!! कारण लिहण्याचा कॉंफिडंस यायला लागलेला पण सादर करणे एक वेगळे स्कील आहे..... तेंव्हा काहीतरी बोलून वेळ मारुन नेली पण नंतर एका निवांत वीकांताला वाटले की करुन बघायला काय हरकत आहे!! जमले तर जमले Happy

सुरुवात छोट्या चारोळ्यांपासून केलीय आणि थोडीफार हिंदी शायरी ही आहे..... येत्या काही वीकेंडसना मोठ्या कवितांही वाचून बघायचा प्लॅन आहे
जसे रेकॉर्ड करेन; आणि चॅनेलवर अपलोड करेन तसेतसे इथे अपडेट देतच राहीन.

मायबोलीकर नेहमीप्रमाणे प्रेम देतीलच पण हक्काने सुधारणा सांगितल्यात तर अजुन आवडेल कारण सादरीकरणात अजुन तसा नवखा आहे. जुन्या जाणत्यांचे मार्गदर्शन आणि अभिप्राय मोलाचा असेल Happy

चॅनेलची लिंक देत आहे:
https://youtube.com/@SwaroopkulkarniPoetry?si=W-ttJIyj4v7FBSMn

Like, Comment, Share, Subscribe हा प्रेमळ आग्रह Happy

Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह छान आहे सादरीकरण..
सुधारणेला वाव तर नेहमी राहणार.. पण हे बिलकुल बोर वाटले नाही. एका पाठोपाठ एक सगळे ऐकले.

बाकी कविता शायरी पद्य साहित्याचे मूल्य मापन करायची मला अक्कल नाही .. त्यावर नो कॉमेंट्स.

नवीन कविता (म्हणजे लिहलीय खुप आधीच पण रेकॉर्ड कालच केलीय) अपलोड केली आहे.
आधुनिकीकरणाच्या झपाट्यात एखादे शहर आपली ओळख हळूहळू कशी हरवत जाते त्यावर आहे.

https://youtu.be/6Lpn10ydtsA?si=mDcDwKRY4OyPDhJm