मराठी शब्दकोडे

Submitted by माबो वाचक on 23 March, 2024 - 00:15

नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app

हे दैनिक शब्दकोडे असून रोज एक कोडे असेल व सर्वांना ते समान असेल. सर्व शब्द हे तीन अक्षरी आहेत. शब्दाचे ठिकाण हे तीन प्रकारे निवडता येते. १) पहिल्या रांगेतील डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाउन ला टिचकी मारू. २) चौकोनात टिचकी मारून ३) संकेतावर टिचकी मारून शब्दाचे ठिकाण निवडल्यानंतर पहिल्या रांगेतील टेक्स्ट-बॉक्स मध्ये शब्द भरायचा व एंटर बटन दाबायचे. मग त्या शब्दाची फोड होऊन अक्षरे योग्य त्या चौकोनात दिसू लागतील.
कोडे भरून झाल्यावर तपासण्यासाठी "तपासणी" या बटनावर टिचकी मारावी. बरोबर चौकोन हिरव्या रंगात तर चुकीचे चौकोन लाल रंगात दाखविले जातील. चुकीचे शब्द पुन्हा भरता येतील.तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. Happy
शब्द खोडण्यासाठी शब्द निवडून खोडरबराच्या बटनावर टिचकी मारावी.लाऊड-स्पीकर च्या बटनावर टिचकी मारल्यावर दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. नंतर ती आपल्याला इच्छित ठिकाणी पेस्ट करता येईल.
अक्षरांऐवजी पूर्ण शब्द वापरण्या मागचे कारण असे की १) संगणकावर मराठी अक्षरांऐवजी पूर्ण शब्द लिहिणे सोपे आहे, विशेषतः ट्रान्सलिटरेशन पद्धत वापरत असाल तर २) इंग्रजी मध्ये जसे प्रत्येक अक्षर टंकल्यानंतर पुढच्या चौकोनात उडी मारली जाते तसे मराठी मध्ये करता येत नाही, कारण अक्षर लिहून संपले आहे कि नाही हे ओळखता येत नाही. 

कोडे सोडविल्यानंतर दवंडी इथे द्या व आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

✅✅✅⚫✅✅✅
⚪⚫✅❌✅⚫✅
⚪✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅❌⚫✅✅✅
❌⚫⚪⚫❌⚫❌
❌⚫⚪⚫❌⚫❌

✅✅✅⚫✅❌❌
✅⚫⚫⚫✅⚫⚫
✅✅✅⚫✅❌⚫
⚫✅⚫⚫⚫❌⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅

छान आहे, आवडले. मी सोडवून पाहिले. मला ही कोडी सोडवायची सवय नाही, तरी बऱ्यापैकी आले. ३ शब्द जमले नाहीत.

त्या कोड्यात ३ उभे जिथे संपते आणि ९ उभे सुरू होते, ती दोन अक्षरे शेजारी आल्यामुळे त्यांचा मिळून एक आडवा शब्द व्हायला हवा होता.

धन्यवाद हरचंदजी, हरकत नसल्यास दवंडी इथे द्या असे सुचवितो. Happy
त्या कोड्यात ३ उभे जिथे संपते आणि ९ उभे सुरू होते, ती दोन अक्षरे शेजारी आल्यामुळे त्यांचा मिळून एक आडवा शब्द व्हायला हवा होता. >>>> खरे आहे. तीन उभा मधील शेवटचे अक्षर आणि ९ उभे चे पहिले अक्षर हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या जागी असलेला शब्द संचयामध्ये नसणार. म्हणून तसे झाले आहे.

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫⚫⚫⚪⚫⚫
✅✅✅⚫⚪⚪⚫
⚫✅⚫⚫⚫⚪⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚪⚫✅⚫✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅

हा दवंडी प्रकार कसा आहे माहीत नव्हता. पण इकडे तिकडे टिचक्या मारल्यावर सापडला. मला आधी वाटलं ते volume किंवा music साठी बटण असावं.

<<तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे.>> हे विशेष आवडलं.

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
❌⚫✅⚫✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅

"कावळ्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली एक प्रकारच्या पक्ष्यातील मादी" हा शब्द आला नाही मला.

कोकीळा असावा.
तोच शब्द पण हिंदीमधे आहे.. कोयल

मला पण ते कोकीळ चे चुकून कोकील केले काय असे वाटले.
कोयल तर विदर्भातही म्हणत नाहीत मराठीत. Wink

आजचं कोडं अजिबात आवडलं नाही. ७, ९, १०, ११, १२, १३ उभे शब्द - यांच्यासाठी इकडून तिकडून कुठलाच शब्द जुळवण्याची गरज पडत नाही. ते स्वतंत्र आहेत. तरीही शेजारी असणारी अक्षरं आडवे अर्थपूर्ण शब्द बनवत नाहीत. हे एखाद्या ठिकाणी ठीक आहे, परवाच्या कोड्यात होतं तसं, पण इथे जवळपास निम्म्याच्या वर कोडं ह्या समस्येत अडकलं आहे. शब्दकोडं म्हणून घालण्याऐवजी स्वतंत्र एका शब्दात उत्तरं द्या अशा अर्थाचा खेळ खेळता आला असता. शब्दकोड्यात शब्दांच्या एक्मेकांना छेदून जाणार्‍या रांगा आणि त्यावरून मिळत जाणारे पुढच्या उत्तराचे सुगावे अपेक्षित आहेत.

(क्षमस्व. जे हे कोडं तयार करत आहेत, त्यांच्या कष्टाविषयी आदर आहे. ते स्वयंप्रेरणेने हे करत आहेत, त्यामुळे त्यांना नाउमेद करायचे नाही. कृपया वाईट वाटून घेऊ नका.)

@ हरचंद जी, प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
खरे आहे. आजच्या कोड्यामध्ये आडवे शब्द खूपच कमी आहेत. मर्यादित शब्दसाठ्यामुळे क्वचित प्रसंगी असे होते. हे कोडे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय programmatically तयार होते. त्याच्या लॉजिक मध्ये काही सुधारणा करता येते का ते पाहतो.
मलापण दोन शब्द आले नाहीत. Sad
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
⚪✅❌⚫✅✅✅
⚪⚫❌⚫✅⚫✅
⚪⚫❌⚫✅⚫✅

अच्छा. धन्यवाद. अल्गोरिदममध्ये काही नियम घालावे लागतील, उदा. दोन अक्षरे शेजारी येत असल्यास त्यांचा अर्थपूर्ण शब्द झालाच पाहिजे, अन्यथा कोड्यातले शब्द बदलावेत.

उदा. दोन अक्षरे शेजारी येत असल्यास त्यांचा अर्थपूर्ण शब्द झालाच पाहिजे, अन्यथा कोड्यातले शब्द बदलावेत. >>>>
@हरचंद जी, तो शब्द अर्थपूर्ण आहे कि नाही हे कसे ओळखायचे? Happy
@ अनिरुद्ध व मानव, प्रतिसादाबद्दल आभार.
आजचे कोडे सोपे आहे. तरीहि मला एक शब्द आला नाही.
७ उभा - "एक आदरसूचक पदवी"
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅⚪⚫⚫✅✅✅
⚫⚪⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅⚫✅⚫✅⚫✅

विसर्ग कसा टाकायचा? मी विसर्ग असलेला शब्द तिथे लिहिला, तर 'आमच्या इथे फक्त देवनागरी अक्षरे आणि मात्रे स्वीकारले जातील' असा संदेश येत आहे. (मात्राचं अनेकवचन 'मात्रा' असंच होतं ना? मात्रे नको आहे)

तो शब्द अर्थपूर्ण आहे कि नाही हे कसे ओळखायचे? >> हो, तो प्रश्नच आहे. तुम्ही त्याला आख्खा शब्दकोश फीड केला असेल तर 'अर्थपूर्ण' ऐवजी 'त्याला ज्ञात असलेला शब्द' असा बदल करता येईल.

"हरचंद जी" >> मला नुसतं हर्पा/हपा/हरचंद म्हटलेलं चालेल. Happy

तुम्ही कदाचित किबोर्डवरील कोलन(:) वापरले असेल. देवनागरी मध्ये विसर्गासाठी वेगळे युनिकोड आहे.
https://www.compart.com/en/unicode/U+0903
मात्राचं अनेकवचन 'मात्रा' असंच होतं ना? मात्रे नको आहे >> पुढच्या वेळेस सुधारणा करेन.
माझ्याकडे पूर्ण शब्दकोश नाही. काही हजार शब्द आहेत. त्यामुळे शब्द अर्थपूर्ण आहे कि नाही हे ओळखता येत नाही. शब्दखेळ च्या वेळी पण तीच समस्या होती.

अच्छा. धन्यवाद.
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅❌⚫⚫✅✅✅
⚫❌⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅⚫✅⚫✅⚫✅

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅⚫⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅⚫✅⚫✅⚫✅

@हपा, मलाही तो शब्द आला नाही काल. तो शब्द "चौधरी" असा आहे.
@अ'निरु'द्ध, फारच छान, अतिउत्तम. सर्व शब्द सापडले आपल्याला. Happy
आजचे कोडे छान आहे. एकही जास्तीचा काळा चौकोन नाही व उभे आडवे भरपूर शब्द आहेत.
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫❌⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅

कालच्या कोड्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता, तो इथे देत आहे.
@ अ'निरु'द्ध, मलासुद्धा सात उभा बराच वेळ येत नव्हता, पण नंतर सुचला. Happy
Screenshot 2024-03-28 104236 - Marathi Crossword.png

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅⚪✅⚫✅✅✅
⚫⚪⚫⚫⚫❌⚫
✅⚪⚪⚫✅✅✅
✅⚫⚪⚫✅⚫⚫
✅⚫⚪⚫✅✅✅

आज दोन शब्द आहे नाहीत. Sad
७. कोणत्याही प्रकारचे संकट येण्याची शक्यता ज्यात नाही असा
११. एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य; जेथे काही व्यवस्थित किंवा योग्य बसेल असे सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫❌⚫⚫⚫✅⚫
✅❌⚪⚫✅✅✅
✅⚫⚪⚫✅⚫⚫
✅⚫⚪⚫✅✅✅

पारस असा कुठला देश आहे? पर्शिया किंवा प्रशिया म्हणायचे ना त्याला पूर्वी?

@हपा, हो मलाही ते माहित नाही. पर्शिया म्हणजे आताच इराण आणि प्रशिया म्हणजे आताचा जर्मनी, माझ्या माहितीप्रमाणे.
बाकी छान सोडवले आहे, आणि तुम्हीही त्याच दोन शब्दांवर अडलेले दिसताय. बघूया कोणाला सापडतायेत का.

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅❌✅⚫✅✅✅
⚫❌⚫⚫⚫✅⚫
✅❌❌⚫✅✅✅
✅⚫❌⚫✅⚫⚫
✅⚫❌⚫✅✅✅

जेवतो आणि उरलेले सोडवायचा प्रयत्न करतो.

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫⚫
✅✅⚫⚫✅✅⚫
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅❌❌⚫✅⚫✅
एक शब्द आला नाही. - १५. एखाद्या गोष्टीत यश न मिळण्याची अवस्था किंवा भाव

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫⚫
✅⚪⚫⚫✅✅⚫
⚫⚪⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅⚪⚪⚫✅⚫✅

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫⚫
✅✅⚫⚫✅✅⚫
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅⚫✅

Pages