कटिंग स्लॅक

Submitted by सामो on 8 January, 2024 - 13:56

अनेक वर्षांपूर्वी माझं कोणाशीही पटत नसे. आख्ख्या जगाबरोबर माझे वैर होते. रीडींग बिटवीन द लाइन्स - मधे माझ्याइतके निष्णात अन्य कोणी नव्हते. रीडींग बिटवीन द लाइन्स - आपले विचार, आपले गुणावगुण आणि आपला त्या त्या क्षणीचा मूड अन्य व्यक्तीवरती आरोपित करणे. मी अमक्याला १०० वॅटेज स्मितहास्य दिले व तिने मला, ५० च वॅटेज स्मित परत केले म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे की तिला मी आवडत नाही. सासूबाईंनी गणपती घराच्या अमक्या कोपर्‍यात ठेवला कारण तो उजव्या सोंडेचा आहे. बरोबर मुद्दाम ठेवला त्यांनी. त्यांना काय पडलीये माझं भलं करण्याची चिंता. अमकीने माझ्याकडे रोखून पाहीलं कारण सरळ आहे मत्सरी आहे ती. हे आणि असेच मोनोलॉग माझे स्वतःशी होत.
पुढे मूडस संतुलित झाले, एक छानसा पॉझ जीवनात आला. मेंदूत नवीनच न्युरॉन्स कदाचित तयार झाले (?) कदाचित पुनर्जिवीत झाले. आय हॅव्ह नो आयडिया काय झाले पण औषधांमुळे, माझी वृत्ती १८० कोनातून फिरली.
आणि मला कळू लागले - अरे तिची टक लावून पहाण्याची पद्धत तशी असेल, तिचे चेहरा रिलॅक्स असलेला तसाच दिसत असेल. तुला त्रासलेला वाटतो पण तसे नसेलही. ती वेगळी- तो वेगळा-तू वेगळी. तुमचं नाक सेम टू सेम आहे का नाही तर मग तुमचे सर्व विचार, आचार कसे अनुकूलच असतील? प्रत्येक व्यक्ती खरे तर एक, विविध रसायनांनी बनलेले मिश्रण असते. वी आर नथिंग बट अ बन्च ऑफ केमिकल्स. हे सर्व स्वभाव, षडरिपु, आवडी-निवडी हे आपल्या हातात फार थोड्या प्रमाणात आहेत. लहानपणापासून आपले एके प्रोग्रॅमिंग झालेले आहे. आपल्या संप्रेरकांची मोगलाई आहे. टायरनी आहे हार्मोन्स्ची.
आपण १००% परिपूर्ण आहोत का नाही पण आपण अन्य व्यक्तीकडून मात्र परिपूर्णतेची अपेक्षा ठेवतो. आपण स्वतः इव्हॉल्व्ह होतोय असे आपण मानतो & वी कट अ स्लॅक टु अवरसेल्वज. परंतु जेव्हा समोरच्या व्यक्तीची वेळ येते तेव्हा आपण समजतो की ती व्यक्ती फिनिश्ड प्रॉडक्ट आहे आणि पुढे इव्हॉल्व्ह ती होतच नाहीये. ती त्या क्षणी एक संपूर्ण आणि परिपूर्ण व्यक्तीमत्व आहे मात्र आपल्याशी ती व्यक्ती मुद्दाम खुनशीपणे वागते आहे. मत्सरयुक्त वागते आहे वगैरे वगैरे. पण तसे नसते ना. प्रतिक्षण, ती व्यक्तीही प्रगल्भ होत असते, शिकत असते, उत्क्रांतीच्या फूटपट्टीवरती पुढे सरकत असते.
साधी सकाळची कॉफी उशीरा झाली, झोप निट लागली नाही, कोणीतरी आपल्याशी वाईट वागले तर आपला दिवस खराब जाऊ शकतो नव्हे जातोच. झोप निट लागली नाही की मी खूप खाते, खूप खर्चही होतो त्या दिवशी - हे माझे नीरीक्षण आहे. पुढे एका संशोधनात ही बाजू वाचलेलीही आहे. मग अन्य व्यक्तींचे ही तसेच नसेल का? नसेल आज त्यांचा मूड. तब्येत बरी नसेल, त्यांच्या डोक्यावर काळजीची तलवार असेल, व्हाय नॉट कट अ स्लॅक टु देम? आपण का नाही समजाउन घेउ शकत?
माफ करा, हे बालिश वाटले असेल. पण मला माझ्या स्वभावात पडलेला हा मोठा फरक याबद्दल लिहायचे होते. कटिंग स्लॅक ज्याला मराठीत काय म्हणु आपण - समोरच्या व्यक्तीला सांभाळून घेणे. अगदी आपण स्वतःला सांभाळतो तितके हे मला महत्वाचे वाटते. अर्थात त्याचा अर्थ माझे खटके उडत नाहीत असे नाही. पण खटके उडले की वाईट वाटते खरे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, लिहिलंय.माझं ऑबसेर्व्हशन अस आहे कि सांभाळून न घेणे, किंवा बळच स्वतःच्या डोक्यातले डायलॉग समोरच्याच्या तोंडी परस्पर लिहून टाकणे हे बायका जास्त करतात. त्यामानाने पुरुष मंडळी सगळं सहज, घेतात गोष्टीना. माझं चूक असेलही पण एक general ऑबसेर्व्हशन आहे माझं अस.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पुरुष बरेच अनएक्स्प्रेसिव्ह असतात पण गैरसमज करुन घेणे मला वाटते तितकेच असते. जितक्या स्त्रिया रीडींग बिटवीन द लाईन्स करता तितकेच.

खूप पटेल असं लिहिलंय.
कोणीही अतीविचारी माणसं(स्त्री किंवा पुरुष) मनात हे सेल्फ टॉक करतच असतात.

पुरूष दुसऱ्यांच्या विश्वात सहसा शिरतच नाहीत त्यामुळे त्रास होत नाही. बहीण, नणंद, सासू, जाऊ, आणि शेजारीणसुद्धा एकमेकींच्या व्यवहारांत उगाच ढवळाढवळ करतात याचे कारण लहानपणापासून मोठ्यांचे हेच पाहात आलेल्या असतात. जिथे असं नसतं तिथे हा प्रकार फारच कमी असतो. हे काही चरित्रे वाचून मत बनलं.
एखाद्या गोष्टीवर असहमती झाल्यावर ते वाढवत नेणे यानेही संबंध बिघडतात.

बालिश नाहिये छान आहे. पटणेबल आहे, लेबलं लावण्याची आपली जी वृत्ती आहे ती काही अंशी जरा वय वाढतं तशी कमी होऊ लागते सहसा असं ऑब्जर्वेशन आहे..
औषधं न घेता अशी नविन दृष्टी अनुभवायला मिळाली तर अजून बरं होइल असं वाटतं Happy

अनु, कुमार, देवकी, शरद, मंजूताई, समाधानी, आशू, चिमण व राधानिशा प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
>>>>एखाद्या गोष्टीवर असहमती झाल्यावर ते वाढवत नेणे यानेही संबंध बिघडतात.
होय असू शकते. अ‍ॅग्री टु डिसॅग्री म्हणुन मोकळे व्हावे कारण आपला मुद्दा दुसर्‍याच्या गळी उतरत नसतो तसेच समसमा आपल्या बाबतीतही होते.
>>>>>>'बेनेफिट ऑफ डाऊट'
होय हाच शब्द बरोब्बर!!

नेहमीप्रमाणे छान आणि प्रामाणिक लिहिले आहे सामो Happy

मलाही बरेच वर्षापूर्वी ही सवय लागली आहे की आपल्याला मिळालेल्या वाईटातल्या वाईट वागणूकीला सुद्धा समजून घ्या. समोरच्याच्या बाजूने विचार करा आणि तो शक्य तितका सकारात्मक करा.

चांगल्याशी चांगले वागा आणि वाईटाशी सुद्धा चांगलेच वागा. ते नाही जमले तर इग्नोर करा.

मुळात समोरच्यावर वाईट हा शिक्का आपणच मारला असतो. जो चुकीचा सुद्धा असू शकतो. पण एकदा का आपण समोरच्याशी वाईट वागलो की तो देखील वाईटाशी वाईट वागा म्हणत आपल्याशी वाईटच वागणार.
म्हणून वाईट अनुभव देणाऱ्याशी किमान एकदा तरी जरूर चांगले वागून बघावे. मग हवे तर इग्नोर करावे..

या वागण्याचा सर्वाधिक फायदा आपल्यालाच होतो. आपण आपल्या बाजूने तरी अजातशत्रू होतो. त्यामुळे जगातली सर्वात अमूल्य अशी मन:शांती मिळते Happy

दुर्दैवाने जवळच्या व्यक्तींना मात्र आपण बरेचदा गृहीत धरायची चूक करतो. त्यांना वेगळे निकष लावतो. त्यांच्याकडून जास्त अपेक्षा धरतो. या नादात ती सुद्धा माणसेच आहेत हे विसरून जातो. यावर माझेही अजून काम चालू आहे Happy

अजून एक म्हणजे आपण जेव्हा इतरांना समजून घ्यायला सुरुवात करतो तेव्हा नकळत आपल्या मनात सुद्धा एक अपेक्षा घर करते की जेव्हा आपण काही चूक करू तेव्हा इतरांनी सुद्धा आपल्याला समजून घ्यावे. पण तशी अपेक्षा न धरणे हे सुद्धा जमायला हवे.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सारे स्वभावाचा भाग असल्यासारखे सहज जमायला हवे... तसे ते नाही जमत.. पण प्रयत्न तरी त्याच आणि योग्य दिशेने हवा Happy

स्वाती आणि ऋन्मेष आभार.
>>>>>दुर्दैवाने जवळच्या व्यक्तींना मात्र आपण बरेचदा गृहीत धरायची चूक करतो. त्यांना वेगळे निकष लावतो. त्यांच्याकडून जास्त अपेक्षा धरतो. या नादात ती सुद्धा माणसेच आहेत हे विसरून जातो. यावर माझेही अजून काम चालू आहे Happy
अगदी खूप खरे आहे.
>>>>पण तशी अपेक्षा न धरणे हे सुद्धा जमायला हवे.
अगदी अगदी. आपल्या चूकीला क्षमा धरायचीच नाही.

छान लिहिलंय. अगदी रिलेट झालं. एखाद्याला अगदी नगण्य गोष्टीवरून जज करुन ग्रह करून घेण्याचा स्वभाव स्त्री - पुरुष दोघांतही आढळतो.

धन्यवाद अनघा.
>>>>ग्रह करून घेण्याचा
होय हाच शब्द.
पूर्वी मी सायलेन्ट ट्रीटमेन्टला भयंकर घाबरायचे कारण मला असे वाटे की आपण गरम वाफ भरलेल्या कुकरवर बसलोय आणि त्याचा केव्हाही स्फोट होउ शकतो. हे लहानपणीचे संस्कार म्हणा अनुभवजन्य ज्ञान होते.
त्यामुळे मी सायलेन्ट ट्रीटमेन्ट देणार्‍या व्यक्तीला, मनातल्या फार दूषणे देत असे. सेडीस्ट समजत असे. पण ती माझी कपोलकल्पित आणि आपण होउन एग्झॅजरेट केलेली भिती होती. हे पुढे पुढे लक्षात आले. की अरेच्च्या नवर्‍याला जरा एकटे त्याच्या विश्वात सोडले की थोड्या वेळात तो नॉर्मल होतो. हे कुकरवर बसणे वगैरे आपली नाहक अनाठायी भिती आहे. आपले प्रोजेक्शन आहे. त्यात त्याची चूक नाही.

छान लिहिले आहे. प्रतिसादही आवडले.
अनघा पुणे आणि ऋ यांचेही प्रतिसाद आवडले.

एकेकाळी सेल्फ एस्टीम इतका उच्च होता ( किंवा बावळटपणा) की समोरची व्यक्ती थेट अपमान करेपर्यंत 'बेनेफिट ऑफ डाऊट' देता यायचा. अजूनही सूक्ष्म पॉलिटिक्स समजत नाही. पिंडच नाही आणि वर्थही वाटत नाही. अदृष्य तणावाखाली रहाण्याऐवजी 'कन्फ्रंट' करून मोकळी होते. कुकरमध्ये बसतही नाही, बसवतही नाही.

>>>>>आणि वर्थही वाटत नाही.
धन्यवाद अस्मिता.
हे त्रिवार अगदी लक्षवार सत्य आहे. आपली उर्जा फालतू, फडतूस रीत्या अपव्यय करायची का विधायक रीत्या हे आपण आपलं ठरवायचं.

चांगला विषय.
ओव्हरथिंकिंग करणार्‍या माणसांचं अक्खं आयुष्य असंच जातं ....वेळीच स्वभावात फरक पडलाय हे चांगलंच आहे.
नाहीतर मेंदूचं भजं व्हायची वेळ येते.

छान आणि प्रामाणिक लिहिले आहे. हा स्वतःमधला बदल घडवून आणणे सोपे नाही. तुम्ही त्या बदलाची अनुभूती घेतली आणि १८० अंश फिरू शकलात ही खूप मोठी गोष्ट आहे.

(एक तांत्रिक कौतुक - आजकाल एबीपी, लोकसत्ता वगैरे ठिकाणी '३६० डिग्री फिरणे' हा वाक्प्रचार वापरतात आणि ते पाहून सवयीने लोकही तेच वापरायला लागले आहेत. ३६० डिग्री फिरणे म्हणजे पूर्ण गोल फिरून जिथे आहे तिथेच पुन्हा तोंड करणे ना! तुम्ही १८० वापरलेले बघून बरे वाटले.)

छान लिहिले आहे. काही वेळेस हा बेनिफिट ऑफ डाऊट स्वतःलाही देता यायला हवा. काही लोक स्वतः बद्दल खूप क्रिटिकल असतात. छोट्या चूकांसाठी स्वताः ला दूषणे देत असतात. तेसुद्धा टाळता यायला हवे.

माबो वाचक आणि चना आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
>>>>काही वेळेस हा बेनिफिट ऑफ डाऊट स्वतःलाही देता यायला हवा. काही लोक स्वतः बद्दल खूप क्रिटिकल असतात. छोट्या चूकांसाठी स्वताः ला दूषणे देत असतात. तेसुद्धा टाळता यायला हवे.
माबो वाचक खरच की. मस्त मुद्दा मांडलात.

सामो, मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाच्या मनात दुसऱ्या बद्दलची निगेटिव्ह साईडची इमेज असते तीच व्यक्त केली आहेत.
माझा असा अनुभव आहे की यात एक बायस प्रत्येक माणसा बरोबर असतो. समोरचा व्यक्ती आपल्याला आवडणारी आहे का न आवडणारी आहे याप्रमाणेच आपण त्याच्या सर्व कृतीकडे त्या चष्म्यातूनच बघत राहतो.
आणि अजून एक बायस असतो, तो म्हणजे जेव्हा आपण खूप घाबरलेलो असतो तेव्हा आपण आपल्याला हवा असलेला अर्थही बराच वेळा लावत असतो, मग कधी कधी आपल्या नावडत्या माणसाच्या वाईट कृतीचा सुद्धा आपल्या उपयोगाचा अर्थ आपण लावत असतो.

Pages