सरते वर्ष

Submitted by अनुजय on 31 December, 2023 - 10:08

सरते वर्ष

बघता बघता एक वर्ष सरल
हळूच तेवढं जगणं काढून घेतल ….

नियती मोठी असते चलाख
काढून घेते कित्येकांचा घास
मापा मधले कपात कधी आले
कुणालाच कधी ना कळलं….

कुणाचे मायबाप गेले
कुणाचे काका मामा संपले
भाव विश्र्वामधले ऋणानुबध
कळले नाही कसे पोकळ बनल.,..

समाज जीवनाचा तोच तरंग
जाती धर्माच्या भट्टीत नाही भंग
तू तू मी मी करत चिखल फेकीने
फेकुंनी कसे सर्वांना मामा बनवलं….

येईल नव्याने नव नाविन्याचा उल्हास
नसेल तेथे भासभान जीवनाचा आभास
तयारी करा होईल भले ,न विश्वासघात
नाहीतर म्हणाल, जगणे राहून गेलं…

प्रा.महेश बिऱ्हाडे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
जिंकणे हरणे गौण आहे. खेळणे महत्वाचे.