खुन झाला पोशिंद्याचा

Submitted by जगदिश ढोरे आसेगावकर on 23 November, 2023 - 08:05

ज्याचा गेलंसाली हिरवा मळा होता,
त्याचा आज फासावर लटकून गळा होता..

कोणी दिली त्याच्या खुनाची सुपारी,
हे निकामी सरकार का बिटातले व्यापारी..

कोरडं पडलं ओंदा तो करील तरी काय,
मागच्या साली रानात घुसत होते पाय.

ओलं कोरडं करीत गेले उपासी दोन साल,
गोंडस त्याच्या पोरीचे यंदा बसलेत गाल..

निघलं कधी चांगल पिक तर पडल्या कधी गारा,
कुणबी रं गड्या तो त्याला नाही कसला थारा..

एकदा काळे माई हिरवा शालु नेसावा,
तुच आता या जगाचा पोशिंदा पोसावा..

लेखक - जगदीश ढोरे पाटील
रा. आसेगाव मो. 9370346450

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाहक वास्तव....
शेताला शास्वत पाणी मिळाले आणि पीकाला हमीभाव मिळाला तरच परिस्थिती सुधारेल. शेतक-याला अनुदान, कर्जमाफी करण्यापेक्षा या दोन गोष्टी पुरवणं महत्वाचं आहे....