भारत वास्तव्यातील वैद्यकीय विमा

Submitted by लवन्गीमिरची on 17 November, 2023 - 19:55

माझे आई वडील साधारण जानेवारी ते मे या कालावधीत भारतात (पुण्यात) जाणार आहेत. आम्हाला त्यांच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स घ्यायचा आहे. याबाबत अधिक माहिती हवी आहे. आई वडील दोघेही सत्तरीच्या पुढे आहेत. आरोग्याच्या सौम्य स्वरूपाच्या तक्रारी आहेत. (high blood pressure, Cholesterol etc)
त्या बाबतीत काही प्रश्न 
१. मेडिकल इन्शुरन्स अमेरिकेतून घेता येतो का?
२. Travel + Medical असा काही एकत्र पर्याय असू शकतो का? (कारण Travel Insurance पण घ्यायचा आहे)

विश्वासार्ह कंपनी, वैयक्तिक अनुभव असे कुणी सांगितले तर खूप मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरोगी व्यक्ती साठ+साठी - सतरा हजार रु एक वर्षाचा प्रिमिअम एक लाखासाठी. मोतीबिंदूचे साताठ हजार देतात. पाच लाखाचा मेडिकल काढल्यास पन्नास हजार देतात.(हे एक उदाहरण.)
६५प्लस,७० प्लसचा प्रिमिअम वाढवतात.
इतर रोगांवर capping असते . वाढीव विमा काढतील लोक पण capping कडे लक्ष ठेवा. युट्युबवर माहिती देणारे चांगले विडिओ आहेत. Pushkar raj Thakur एक उदाहरणार्थ.

Pushkar raj Thakur

लेखाचे उत्तर:
अमेरिकेतून पुण्यात => self insure

पैसे कमावण्याचे कोणतेही विडिओ - शेवटी आपले डोके चालवावे लागतेच. कुणीही रेडिमेड सल्ले देऊ शकत नसतोच.

हेल्थ इन्शुरन्सचे विडिओ आणि त्यातील माहिती पाहा. त्यात इन्शुरन्स निवडावा /प्लान कसा ती माहिती असते. ती त्या कंपनीच्या वेबसाइटवर चेक करता येतेच. Pushkar Raj thakur चे इतर विडिओ सोडा.

पॉलिसी बझार.कॉम वर माहिती
हीच कशी मिळवायची ते pushkar Raj thakur (किंवा इतर यूट्यूब विडिओंवर) सांगतात.
तुमची गरज आणि संभाव्य उपचार घेणे यावर ते शोधता येते. Visiting fee, room rent, वाढीव रक्कम,अम्बुलन्स चार्जेस,पूर्व आणि पश्चात घरी घेतलेली औषधे आणि तपासण्या कोणत्या किती रकमेच्या पॉलिसीत आहेत ते कळते. म्हणजे रोग इलाज करताना आपण भ्रमात राहात नाही. बिल मिळणार का नाही व किती ते.

मला वाटते तिकडूनच travel insurance (including medical emergencies) करून घ्यावे लागेल.
फक्त पाच सहा महिन्यासाठी इथे वेगळे मेडिकल इन्शुरन्स मेडिकल चेक अप न करता बहुतेक मिळणार नाही.

अमेरीकेतून ट्रॅवल + मेडीकल असा एकत्रीत इंश्युरन्स घेवून जावे. नर्ड वालेट वरील ट्रॅवल मेडीकल इंशुरन्स बाबतची माहिती

https://www.squaremouth.com/
https://www.insuremytrip.com/
https://www.travelguard.com/
वर दिलेल्या संस्थळांवर तुमच्या पालकांना योग्य असा प्लॅन शोधता येइल. तुमचा याबाबतचा जो काही अनुभव/निर्णय असेल तो प्लीज इथे सवड काढून नोंदवा. इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल.

मिळु शकतो. ज्या स्टेट मध्ये जाणार आहे त्यातिल प्रमुख ईस्पितळात in network आहे ते बघुन घेणे. माझ्या मते कमित कमी $१००,००० चे कव्हर पाहिजे. $५००,००० असल्यास उत्तम.
प्रिमियम वयानुसार ठरते. मागच्या वर्षी २५ वर्षाच्या निरोगी व्यक्ती साठी $५००,००० चा विमा काढ्ला होता १ महिन्यासाठी ... प्रिमियम $११०, Deductible $५०० (म्हणजे काही झाले तर पहिले $५०० आपण भरायचे मग विमा चालु होतो. ). Preset condition मध्ये जास्त कव्हर पाहिजे असल्यास प्रिमियम वाढु शकते. https://www.insubuy.com/visitors-insurance-quotes/ वर प्रिमियम चेक करु शकता. पण पुन्हा एकदा संगतोय, जिथे जाणार आहे त्याचा जवळपासच्या ईस्पितळात तुमचे ईन्सुरन्स in network आहे की नाही ते तपसुन घेणे नाहीतर तुमच्या ईन्सुरन्स ला फारसा अर्थ राहात नाही.

भारत वास्तव्यातील वैद्यकीय विमा : भारतात वयस्क लोकाचा विमा खुप महाग आहे. मागच्या वर्षी वडलाचा विमा बंद केला. ५ लाखाचा विमासाठी १ लाखाचे प्रिमियम होते. (वय ८१ ) त्यापेक्षा दरवर्षी काही पैसे बाजुला ठेवत आहे. अमेरिकेत भारतासाठी कोणी १ महिन्याचा विमा देत असल्यास बघणे.

अमेरिकेतूनच ट्रॅव्हल + मेडिकल इन्शुरन्स करावे.
हार्ट कंडिशन असेल तरी मिळेल, पण बहुतेक डॉक्टर कडुन fit for travel सर्टिफिकेशन लागेल.
साहिल शहा यांनी वर उत्तम माहिती दिली आहे.