धक्का !

Submitted by छन्दिफन्दि on 8 June, 2023 - 21:15

सकाळी बरोबर ११च्या ठोक्याला आम्ही दरवाज्यात पोहोचलो. ती आमची वाटच बघत होती. दार उघडून तिने आम्हाला आत घेतले. खूप मोठी खोली, खोली कसली मोठा हॉलच म्हणा ना आणि त्यात आम्ही तिघंच!

तिने अदबीने आम्हाला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले.

भरयला एक फॉर्म दिला.

आम्ही फॉर्म भरून दिला.

तिने आधीच सांगून ठेवलेली कागदपत्रे तिला दाखवली.

दोन मिनिटात तिने त्यांच्या कॉपीज केल्या. परत एक दोन सह्या करायला सांगितल्या.

गोड हसून म्हणाली, “ तुमचं काम झालं. एक दोन दिवसात घरी पत्र येईल. ”

आम्ही निघणार एवढ्यात तिने एक गुडी बॅग आमच्या हातात दिली. आता मात्र माझे डोळे डबडबायचे बाकी होते.

इतका वेळ मी कसंबस दाबून ठेवलेलं माझं हसू आणि आसू दोन्ही आता मात्र कंट्रोलच्या बाहेर गेलं

न राहवून मी बोललेच, “ ताई, आमचा विश्वासच बसत नाहीये . दहा मिनिटात आमचं काम झालं. पाच मिनिट पण थांबायला लागलं नाही . गर्दी नाही की रांगा नाहीत. तुम्ही इंडिया … ”

“मी ऐकलय, माझे बाबा पण बँकेतच होते. त्यांनी मला सांगितंलय तिकडच्या गर्दी आणि रांगांविषयी … “ हसून ती म्हणाली.

मनातल्या मनात मी रेटल “ आणि सौजन्य म्हणावं तर चिमटा काढला तरी विश्वासच बसत नाहीये की हे खर आहे. आम्ही SBI च्या एका शाखेत आहोत “

स्थळ: SBI, कॅलिफोर्निया ब्रँच

कोणत्याही विशिष्ट कर्मचारी वर्गावर टिपण्णी करण्यासाठी लिहिलेला नसून, लोकसंख्येच्या किंवा कामाच्या दबावाने किंवा त्याच्या अभावाने एकाच संस्थेत अगदी स्वप्नात आहोत असं वाटाव इतका वेगळा अनुभव यावा, म्हणून गमतीने लिहिलंय. वाचकांनीही त्याच खिलाडू वृत्तीने घेणे ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
खरंच धक्का बसला एकेक पायरीवर. Happy 'अदबीनं' पासूनच.. स्टेट बँकेच्या बाबतीत फार अनुभव नाहीये पण पोस्टातील कामाच्या वेळी असा सुखद धक्का अगदी म्हणजे अगदीच क्वचित बसलेला आहे. आणि अशा 'धक्कादायक' परिस्थितीत मग काही वेळा संभ्रम निर्माण होतो की या वाचलेल्या वेळाचं आता काय करायचं Wink

मला एसबी आय चा असा सुखद अनुभव एन आर आय शाखेत विले पार्ल्यात आला होता. अगदी फॉलो अप पासून चहा मागऊ का पर्यंत Happy आणि अजिबात गर्दी नव्हती.
पण लोकल बँकेत असे अनुभव येणे मुश्किल असावे..

उत्तम अनुभव. आपण दुर्व्यवहाराबद्दल टीका करतो त्यावेळी चांगल्या गोष्टींचे कौतुकही केले पाहिजे.

सरकारी बँकांसोबत गर्दी आणि सौजन्यपूर्ण व्यवहाराचा अभाव हा नेहमीचा अनुभव.
पण
बाबा गेल्यावर त्यांचे बँकेतील अकौंट्स, जॉईंट खाती, पेन्शन फॉर्मवर बँकेचे ऑथरायजेशन ही सर्व कामे एस बी आय मध्ये व्यवस्थित माहिती देऊन, कुठलीही कटकट न होता, वेगाने झाली.
बाबांनी व्यवहार व्यवस्थित नोट करून ठेवले हा फायदा होताच. तरीही बँकेतील कर्मचाऱ्यांची वागणूक सौजन्यपूर्ण होती हे जाणवत होते.
त्यावेळी त्यांची तारीफ करण्याच्या मनस्थितीत नव्हते. इथे हा अनुभव लिहावासा वाटला.

एस बी आय च्या ज्या पी बी बी शाखा असतात तिथे असाच छान अनुभव येतो. माझे हैद्राबादला जीपी ओ समोरच्या भ्रांच मध्ये अकाउंट आहे. थिते असाच इंडी अनुभव येतो. मला पण नवरा गेल्यावर तिथे दोन अकाउंट उघडली जिथे पी एफ जमा होत असे. एफ डी पण अर्ध्या तासात रिन्यु करुन देतात.

आता सर्व बँक शाखा डिजिटल होत आहेत. पण जुने कर्मचारी तेवढ्या वेगात काम करू शकत नाहीत. संगणक हा कितीही वेगवान असला तरीही इनपूटच्याच वेगाने जातो.
साधं रेल्वे रेझर्वेशनचे उदाहरण घ्या. नवीन तरुण बुकिंग कर्मचारी फॉर्मवर एक नजर आणि दुसरी संगणकावर ठेवून भराभर टाइपिंग करतात. पण हे कमी असले की जुन्या कर्माचाऱ्यास बसवतात तेव्हा तो एका बोटाने टाइपिंग करतो, फॉर्म आणि संगणक परत परत चष्म्यातून पाहतो. बराच वेळ लागतो.
तसेच अमेरिकेत जाणारे सुशिक्षित भारतीय कागदपत्रेही बरोबर भरून आणत असतील. तसं इथं नाही. अशिक्षित लोकही खातेदार खूप आहेत. केवळ बँक सुधारून चालत नाही.
आरडाओरड,वितंडवाद, रांगेत उभे असणाऱ्या बायकांची मुले विडिओ गेम्स फुल आवाजात खेळत असतात, काही जण फोनवर मोठ्यामोठ्याने बोलत असतात. बरं त्यांना बोलायचे नाही.

मला sbi आवडतेच. आमची फोर्ट पी बी बी पण छान होती आणि नौपाडा शाखा पण भारी आहे , एवढी गर्दी असते तरी ही.
आणि safety of your money च्या दृष्टीने तर एक नंबर ..sbi बुडली तर देश बुडेल Happy

सगळे प्रतिसाद छान!
Mazeman, अमा, शरद आणि मनीमोहोर तुमचे वेगळे अनुभव/ मते मांडल्याबद्दल धन्यवाद!

गतजन्मी पुण्याचा पार बांधलेल्या लोकांनाच SBI मध्ये सुखद अनुभव येतात असे ऐकून होतो, तुमच्या लेखामुळे तुमच्या विपुल पुण्यसंचयाची प्रचिती आली Happy

मी वूडलंड हिल्स मध्ये onsite आले होते तेव्हा ही ब्रंच बघून धक्का बसला.. मग तिथे जॉब करणारी मुलगी म्हणाली की तीही इथे onsite job म्हणून आली आहे ..सरकारी बँकेतून कॅलिफोर्निया अन् कमीत कमी काम असणार हे ऐकून पुन्हा धक्का बसला!

पुण्याचा पार = शनिपार

हा हा Happy

पुण्ण्य लिहावे काय ?

बँकेने गोल चिन्हात एक फट ठेवली आहे.
------
एक प्रश्न - या शाखेत फक्त डिजिटल अकाउंट उघडता येतात का? (पासबुक प्रिंटिंगवाले येतात/येऊ नये म्हणून?)

एक प्रश्न - या शाखेत फक्त डिजिटल अकाउंट उघडता येतात का? (पासबुक प्रिंटिंगवाले येतात/येऊ नये म्हणून?) >>>> नेहेमी सारखी अकाऊंट असतात. पण इकडे पासबुक नाही मिळत. तुम्हाला हवं असेल तर पोस्टाने बँक स्टेटमेंट महिन्याच्या महिन्याला मिळू शकते.

Digital accounts म्हणजे त् डिजिटल बँक अस सुचवायचं जा? कारण आता त्या इकडे बऱ्याच प्रचलित होतायत. ह्या बँकांना पारंपरिक पद्धतीची ऑफिस नसतात.

Do you have option to get e statement in online bank site? Our bank sends a combined e statement plus you can log in anytime and download statements in Excel or PDF. You can take a print of needed.

Yes