घे भरारी..

Submitted by मन्या ऽ on 12 May, 2020 - 16:32

घे भरारी..

स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु तुझिया मायेला विसरु नको

श्वासांत घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरी तु
असुदेत एक नजर भूवरी

नंदादीप तो जळत राहो
तुझ्या इच्छा-आकांक्षाचा
निसर्गाचे ते अनमोल देणे
तु परतवत रहा त्याला..

-Dipti Bhagat

(त.टी. : मला या कवितेसाठी योग्य शिर्षक सुचवण्यासाठी च्रप्स आणि अज्ञातवासी यांचे मनापासुन आभार! Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी भारी!
शीर्षक नाही सुचवत, प्रत्येक ओळीत शीर्षक आहे.

@च्रप्स, नावासाठी लाख लाख धन्यवाद! Happy

@अज्ञातवासी,
कविता ऐनवेळी सुचली. आणि तशीच काही छोटे बदल करुन इकडे पोस्ट केली. त्या नादात शिर्षक सुचल नाही.. असो, तुलाही थँक्स! Happy

आज मायबोली उघडली सकाळी सकाळी आणि पहिला धागा हा उघडला . एक कडक कॉफी मारून जितकी प्रसन्नता येणार नाही तितकी हि कविता वाचून फ्रेश झालो .
बाई दवे तुमच्या मनात काय शीर्षक होते ?

बोकलत ,कटप्पा, अजयदा खुप खुप धन्यवाद! Happy

@कटप्पा, फक्त कविता म्हणण्यापेक्षा एका छोटीसाठी मनापासून काही ओळी लिहील्या होत्या.. त्यामुळे मनात शीर्षक वैगेरे काही नव्हत.