आयुष्याची सहल

Submitted by शाबुत on 6 February, 2013 - 05:28

सहल

उपभोग...
आणि फक्त उपभोग
भेटलं नाही तर
ओरबडुन घेण्याची वुत्ती वाढतेय
आपल्याला कोण विचारणार?
अशीच समाजाची धारणा झाली
कारण
माणसं आता सहलीला
आल्यासारखं आयुष्य जगतायत
माणसाचा जन्म आता उत्सव झाला
मोठा वाढदिवस
मोठं लग्न
शेवटी मोठं मरण.

या मोठापणासाठीच
जो-तो झुरतोय-झगळतोय
हे मोठेपण म्हणजे नक्की काय?
मोठा आवाज
मोठा डोलारा
मागे मोठी गर्दी...
सगळीकडे मोठा झगमटात
क्षणभंगुर...... असला तरी
शेवटी...
मोठ्यात-मोठ्या आकडा
हा खर्चाचा आकडाच ठरवतोय
माणसाचा मोठेपणा
यात
मनाच्या मोठेपणाचा लवलेशही नाही

सगळीकडे कुजक्या
मनाचांच दुर्गध दरवळतोय....
इथेच माणुसकीचा श्वास गुदमतोय
.... माणसं सहलीला आल्यासारखी जगताहेत.

..................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users