मातृदिन : माझ्या आईच्या पध्दतीचा आंब्याचा शिरा

Submitted by दीपांजली on 10 May, 2010 - 02:58
shira

आंब्याचा शिरा:

लागणारा वेळ:
अर्धा तास

साहित्यः
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी सजुक तूप
१ वाटी साखर
२ वाटी हापुस अंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅन मधला)
दीड वाटी गरम दूध
काजु, भिजवलेले साल काढलेले बदामाचे काप, बेदाणे. (प्रमाण आवडी प्रमाणे)
सजावटः
ड्राय फ्रुट्स थोडे मिक्स करायला आणि थोडे सजावटीसाठी ठेवावे.
आंब्याचा सिझन असेल तर आंब्याच्या फोडी.

क्रमवार पाककृती:

१.अर्धी वाटी तूपावर रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
त्यात दीड वाटी गरम दूध घालून रवा छान फुलवून घ्यायचा.
२. फुललेल्या रव्यामधे एक वाटी साखर मिक्स करून रवा नीट हलवून घ्या.
३. साखर मिक्स झाल्यावर हापुस आम्ब्याचा आमरस घाला आणि मग उरलेलं तूप त्यात घालून रवा, आमरस सगळं नीट मिक्स करायचं, गॅस बारीक करून झाकण ठेवायचं.
४. दोन तीन मिनिटांनी वाफ आली कि त्यात काजु, बदाम तुकडे आणि बेदाणे घालून मिक्स करा.
शिरा तयार.
सर्व्ह करताना:
सजावट करताना छान अकाराच्या साच्यातून तूप लावून मुदी कराव्यात आणि फोटोत दाखवल्या सारख्या किंवा आवडी प्रमाणे काजु-बदाम-बेदाण्यांचं डिझाइन बनवून सजावट करावी.

वाढणी/प्रमाण:
खाणार्‍यावर अवलंबून
अधिक टिप्सः
* आंब्याच्या शिर्‍यामधे स्वाद फक्त हापुस आंब्याचाच ठेवावा.
वेलदोडा, केशर अशा गोष्टी अजिबात घालु नये.
* यु.एस मधल्या स्टोअर्स मधे मिळणारा केसर मँगो पल्प अजिबात वापरु नये, त्या पेक्षा रत्नागिरी हापुस, देसाईंचा पल्प मिळतो तो वापरावा.
* कॅलरी कॉन्शस लोकांने पोरशन कंट्रोल करावा पण कमी तूपात अजिबात करु नये, गचगचीत शिरा होईल !
माहितीचा स्त्रोतः
आई :)

हा आईने बनवलेल्या शिर्‍याचा फोटो :
shira2.jpg

Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):

आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स बी,
पूर्वी आईकडे कोयरीच्या आकाराची मूद होती, ते फार छान दिसायच् !

फोटो अगदी मस्त आलाय.. आंबा किंवा कुठलंही फळ घालून शिरा करायचा असेल तर अगदी भारी पेशन्स ठेवून मंद गॅसवर रवा भाजावा लागतो. हात दुखून येतात अगदी Sad पण क्या करें, सब्र का फल मीठा होता है Proud

डिजे, वर साहित्यात 'एक वाटी जाड रवा' असं लिही.. 'एक जाड वाटी रवा' असं झालंय. Wink

मस्त!

हीच ती फेमस रेसिपी! कधीही कोणत्याही पार्टीत सगळ्यांना आवडतेच कायम. गंमत म्हणजे इतक्या वेळा आईच्या हातचा हादडून कित्येक वर्षे मी कधी केली नव्हती ही रेसिपी. नंतर करावासा वाटला तेव्हा सुरुवातीला मुळीच जमला नव्हता.
शिरा करताना तूप अन साखर चमच्याच्या हिशोबाने न घालता वाटीने (!) घालायचे असते हे कळले तेव्हापासून मस्त जमायला लागला मला हा शिरा! Happy

डीजे ! जलन बर का...! Lol चल, माझा मस्त जमला होता बारा गटग ला.
**तू पण तूप साखर सढळ हाताने घालून बघ, जमेल तुला सुद्धा Proud

डीजे मस्त कृती. मांडणीही एकदम मस्त.
मैत्रेयीने बारा गटगला केल्यावर लगेच तिच्याकडून ही कृती घेतली. ह्या पद्धतीने आतापर्यंत ७-८ वेळा तरी शिरा केलाय. जबरदस्त हा एकच शब्द आहे या शिर्‍याच्या चवीसाठी. खूपच सही लागतो. दर वेळी एकदम हिट होतो. मी माझ्या घरी, मैत्रीणींना आणि जमेल तेवढ्या सगळ्यांना ही कृती सांगीतली आहे (मैत्रेयीच्या नावासकट). Happy

अहा!!!

माझा मस्त जमला होता बारा गटग ला. >>>> हो हो.. I agree. लोकांचा **** पणा विसरायला लावणारी चव होती त्य शिर्‍याची... Proud

>> मैत्रेयीने बारा गटगला केल्यावर लगेच तिच्याकडून ही कृती घेतली.
कधी? कुठे??
मला नाही मिळाला तो?! निषेध!!

रेसिपी मस्त. Happy

झक्कींच्या घरी जे गटग झाले होते मागच्या उन्हाळ्यात तेव्हा केला होता मैत्रेयीने हा शिरा. स्वाती तू बहुदा भारतात गेली होतीस तेव्हा.

मला नाही मिळाला तो?! निषेध!! >>> सगळा पग्यानेच लाटला. म्हणून तर आजकाल **ला अनुमोदनं देत असतो Wink

smiley-rolleyes008.gif

अनुमोदन जाउ दे, स्टार स्टार स्टार वापरण्या इतका सौम्य पणा मात्र अगदीच हवा गेल्या सारखा झालाय .. शो .ना !!
मै उगीच गांधीगिरी करून मायबोली सौम्य करते Biggrin

सही रेस्पी आहे शिर्‍याची. एक टीन आंबरस दिसला. त्या पल्पाचा करून बघते.

स्वाती हेव्याने हिरवी की **यांच्या बडबडीने ** झाल्यामुळे? Proud

Pages