Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 17, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » zakki » Feedback » Archive through March 17, 2006 « Previous Next »

Yog
Saturday, December 24, 2005 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! समर्थान्ची रचना, लींबूची श्रध्धा, आता ती चेतना उरली... ती कोणाची बरं
~d

Mpt
Sunday, December 25, 2005 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, समर्थान्च्या हिन्दीतील लिखानाबद्दल माहिति नव्हती. अधिक माहिति द्याल का दुसर्या एखाद्या BB वर?


Champak
Sunday, December 25, 2005 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दगड / दगुड महत्वाचा च आहे रे भो

Dineshvs
Sunday, December 25, 2005 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mpt धर्म हा काहि मजह्या अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे वेगळ्या बीबी वर काय लिहु ? तरिपण मला माहिती आहे ती ईथेच देतोय.

श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत मुसलमानी अष्टके आणि दासबोधाची मुखवस्त्रे, नावाची पुस्तिका आहे. १९८५ साली प्रसिद्ध झालेय हे पुस्तक. संपादन केलेय, डॉ. इंदु लिमये यानी.

समर्थानी उत्तर हिंदुस्थानात भरपुर प्रवास केला होता, तेंव्हा तेथील साधु, संत, फ़कीर, पीर, मौलवीना ते भेटले असणार. त्यांच्याशी चर्चा केल्या असणार. मग त्याना जाणवले असेल कि सर्व धर्माची एक मूलभुत धारणा आहे. आणि त्यानी लिहिले

बनन्मो कहे मै बडा हे बमन्ही
सबोंसे बडा मै मुसलमानसोहि
सबोंमे बडा ईन्नन्नसा कहे ना
कहे रामदासो ईनो कांस मज्यना

अर्थ ब्राम्हण म्हणतो मीच मोठा, मुसलमान म्हणतो मीच मोठा. पण तो परमेश्वर सर्वात मोठा, हे मात्र कोणी सांगत नाही. तर अश्या लोकाना मी काय सांगु ? समर्थ पुढे लिहितात.

ज्याहांन्नुध्धारा हे ईसेहि सरिछा
कहे मै उहि न हिरे परि छा
मुसल्मान न हिंदु सयध्बी हुवा है
कहे रामदासो सबेमो वो हि है

अर्थ या जगाचा उद्धारकरता तो असाच असतो. त्याला हिंदु वा मुसलमान म्हणणे म्हणजे त्याला न ओळखण्यासारखे आहे. रामदास म्हणतात तो सगळ्यांत आहे.

नहि वो मुसल्मान हिंदु कछुहि
सयथ्बी नहि क्या कहु मै ईसेहि
सबो ज्यातसे वोह हिसे नियारा
कहे रामदासो चला वेहि सारा

तो मुसलमान नाही कि हिंदु नाही, तसे त्याला कहिहि म्हणता येणार नाही. त सय्यदहि नाही. खरे म्हणजे जो जातीपाती पलिकडे, त्यापेक्षा वेगळा आहे, रामदास म्हणतात त्याला तु जाणुन घे, आणि त्याप्रमाणे वाग.

नक्की घ्यायचे म्हणुन या पुस्तकाचे नाव व हे ऊतारे लिहुन घेतले होते. बहुतेक कुठल्यातरी दिवाळी अंकात वाचले असणार मी.


Dineshvs
Sunday, December 25, 2005 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीसाहेब हे तुमच्या बीबीवर लिहिले म्हणुन हरकत नाही ना तुमची ?

Dineshvs
Sunday, January 08, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, अजिबात वाईट वाटुन घ्यायचे नाही. मी नेमके मुद्दे मांडलेत. तलवारी ऊपसल्याच तर त्या हवेत कश्याला फ़िरवायच्या. घडुदे चर्चा. अवश्य वाचा.
आपल्या दिक्षितांच्या माधुरीची पाठ ऊघडी केली म्हणुन कुणाला वाईट वाटले नव्हते हो.
पण याचे हात नको तिथेच जायला लागले, तर हातावर हात धरुन बसायचे का ?


Dineshvs
Monday, January 09, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्या प्रकारच्या वादात, मुद्दाम भावनेला अव्हान करुन, सनोरच्याला उत्तेजित करायची प्रथा जुनी आहे. पण असे डोके शांत ठेवुन, योग्य ते मुद्दे मांडले ना कि कुणीहि त्या मुद्द्याना धरुन बोलत नाही.
मी अजुन वाट बघतोय हो, मला ती चित्रे कुणीतरी समजुन द्यावीत म्हणुन.

अवयव सगळे नयनी जमले

अशी अवस्था आहे.


Moodi
Monday, January 09, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुमचे विचार पटतायत हो मनापासुन पण घरात जे संस्कार झालेत अन देवपुजा तर मला वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे लहानपणापासुनच करावी लागली,त्यामुळे कुणी हुसैन येऊन देवाची विटंबना करतोय अन त्याने आपले देव भ्रष्ट होतील असे कालत्रयी शक्य नाही हे मनापासुन पटतय. पण श्रद्धेमुळे अन त्या भावनेमुळे या लोकांचे कलेविषयीचे विचार पटत नाहीत. आपण जसा दुसर्‍या धर्माचा आदर करतो तसे यानी पण करावे असे वाटते पण तेच शक्य नाही.
वाद होत राहतीलच, त्याला अंत नाही.

तुम्ही मात्र संस्कृत शिकला आहात, मग थोडेसे त्यावर तुमच्या या जागेत का लिहीत नाही? मला शाळेत हिंदीच होते, तसे संस्कृत हिंदी ऐवजी घेऊन बोर्डाची परीक्षा द्यायला मुभा होती पण शिकवायला शाळेत त्यावेळी शिक्षकही नव्हते अन तो विषय पण शाळेत नव्हता, आता झालाय. पण तुम्ही जर त्यातले इथे काही लिहुन त्याचा अर्थ सांगीतलात तर बरे होईल. जमेल तेव्हा अन वेळ होईल तेव्हा एखादे सुभाषीत लिहा.


Moodi
Tuesday, January 10, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मी तुम्हाला काल थोडे तरी लिहीत जा असे म्हटले कारण श्री. द. मा. मिरासदार हे माझे आवडते लेखक, त्यांच्या पुस्तकांची पारायणे करण्यात जो आनंद अन विरंगुळा आहे, तो फक्त आपल्या लोकात मिसळण्यात अन संगीतात आहे. जे जगाचे कटु अन विक्षिप्त अनुभव विसरायला लावत.
अन मिरासदार तर प्रत्यक्ष तुम्हाला शिक्षक म्हणु शिकवायला होते असे तुम्ही म्हणालात ते वाचुन मी म्हणतेय की तुमच्या या हक्काच्या जागेवर कुणी उपहासात्मक अन न समजणारे लिहिण्यापेक्षा उलट तुम्ही काही जुने अनुभव लिहिलेत अन मधुन मधुन दिनेश यांनी दुर्मिळ शेर अथवा सुभाषिते लिहीली तर त्यात आम्हाला आंनद वाटेल. वादाकडे दुर्लक्ष करणे हा उपाय असला तरी काही वेळेस आपण उत्तर न दिले तर समोरचे चेकाळतात अशा वेळी तरी काय करणार?


Moodi
Tuesday, January 10, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मला त्यांचे अतिशय आवडलेले पुस्तक म्हणजे भोकरवाडी हाय अन हसवणूक. तशी बरेचसे वाचले मी, पण खूपच मजा आली या पुस्तकांमुळे. तुम्ही वाचली असतीलच. या पैकी एकातच व्यंकुची शिकवणी होती.

ग्रामिण भागतील भोळी पण गंमतशीर पात्र अन त्यांचा वेंधळे पणा हे त्यानी इतके हुबेहुब रंगवले की यावर मराठीत एक सिरीयल पण निघाली होती, भोकरवाडी हाय या नावानेच. तुमच्या कडे आहेत का ही पुस्तके नसल्यास मागवुन घ्या कुणी जात किंवा येत असेल तर. सर्व विवंचना विसरायला होत हे वाचल्यावर.
मी आता गेल्यावर परत घेणार आहे, मागे विसरले घ्यायची.


Dineshvs
Tuesday, January 10, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याहि आयुष्यातले राहुन गेलेले दोन विषय म्हणजे संस्कृत आणि रागदारी संगीत.
हे ज्याना येते, त्यांच्यांबद्दल मला प्रचंड आदर आणि असुयाहि वाटते.

झक्कि, आता वयाने तुम्हाला गाठणार आहे मी लवकरच. मग जोडीने अभ्यास करु या, परत.


Anilbhai
Tuesday, January 10, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशभावु.. क्यातरीच काय.. मला तो जोक आठवला.

संता : माझ तुझ्यावर प्रेम आहे. चल आपण लग्न करु.
मुलगी : पण मी तुझ्या पेक्शा एक वर्षानी मोठी आहे.
संता : काही हरकत नाही आपण पुढच्या वर्षी लग्न करु
:-) ~D

Dineshvs
Wednesday, January 11, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, आपले झक्कि काहि साठीच्या पुढे जात नाहीत, गेली अनेक वर्षे.
आता त्यांना हि सिद्धि प्राप्त झालेली आहे म्हणा.


Robeenhood
Wednesday, January 11, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते मानसशास्त्रात मेन्टल एज आणि क्राॅनाॅलाॅजिकल एज अशा दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत त्यामुळे उपरिनिदिष्ट व्यक्तिचा विचार साकल्याने ह्याच परिप्रेक्षात केला पाहिजे नाही का

Milindaa
Wednesday, January 11, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीनहूड, मला तुमचे विनोद बर्‍यापैकी आवडतात, मी तुम्ही झक्कींना मारत असलेले अप्रत्यक्ष टोले एंजॉय करतो पण म्हणून प्रत्येक वेळी तसेच बोलले पाहिजे का ?

Robeenhood
Tuesday, January 17, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मिलिन्दा
मी कशाला बाबा कोणाला अप्रत्यक्ष टोले देऊ? आणि परम आदरणीय झक्कीना ते तर केवळ अशक्य त्यांचेबद्दाल मला किनै फार्फार आदर आहे आनि तो मी किनई पुन्ह पुन्हा व्यक्त करीत असतो.. आता असते एखाद्याची आविष्करणाची पद्धती थोडी निराळी.....

प. आ झक्की कुठे मी कुठे? काय तरीच काय

कुठे ती शामभट्टाची तट्टाणी आणि कुठे हा इकडे


शा पुन्हा काही तरी गड बड झाली वाटते


Robeenhood
Wednesday, January 25, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे असे खुले आम मैदानात या ना.... असे नुसते चौकोन चौकोन पोस्ट करोन गार्बेज कशला टाकता?

काय म्हणायचे स्पष्ट देवनागरीत म्हणा असे चौकोन चौकोन पोस्ट करून नथीतून तीर कशाला मारता
हे म्हणजे थायलन्डच्या मानसाला विदर्भी बोलीत शिव्या देउन पळून गेल्यासारखे झाले...

भागुबाई कुठचे

मुद्दे सम्पले की माणूस अशा बालिश हरकती करतो

बालीश बहु गार्बेजात बडबडला......


Moodi
Wednesday, February 01, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की या खालील लिंकमध्ये बघा मी प्रवृत्तीनुसार रागांची माहिती दिलीय.

/hitguj/messages/34/60763.html?1138802523 .

अन या लिंकमध्ये पण बघा काही रागातील गाणी राग सरिता मध्ये.

http://www.aathavanitli-gani.com/ .

Robeenhood
Sunday, February 05, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ja@kI baÜvaa tumhI naa mhNajao AgadI caava+ maolao Aahat.......

Yog
Wednesday, February 22, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवसात काही झक्की स्पेशल नाही आले.. gtg मुळे सुस्तावले वाटत :-)

Moodi
Thursday, March 16, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की पुन्हा असे काही लिहीणार नाही म्हणुन तुम्ही जे गायब झालात ते अजुन उगवला नाहीत. कुठे गेलात? का रागवलात सगळ्यांवर? एवढे उदास होवुन नाही चालत हो.

Zakki
Friday, March 17, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगो मूडी, मी कधीतरी रागावतो का मायबोलीकरांवर? नि मी आणि उदास?! angry किंवा उदास चे चा emoticons नाही का टाकणार? उलट NJ च्या ए. वे. ए. ठि. .... ला असलेल्या लोकांना विचार. खरे तर त्यांना माझे वर्तन म्हणजे Irrational Exuberation च वाटले असेल. (प्रश्नः संदर्भासहित स्पष्टीकरण करा Irrational Exuberation .)
तर दोन गोष्टी एकदम वाचनात आल्या. १. कुणा झक्की सारखे नाव असणार्‍या माणसाला अतिरेकी म्हणून अटक झाली नि २. Patriot Act extend केला. आता wire tapping, इंटरनेट वर हेरगिरी असले धंदे करायला CIA ला परवानगी आहेच. त्यातून अमेरिकन म्हणजे कल्पना करता येणार नाही इतके मूर्ख पॅरॅनॉइड, नि bigot लोक. उगाच मलाहि उचलून कुठेतरी अंधारकोठडीत टाकतील, नि हाल हाल करतील. शिवाय तुम्हा सगळ्यांवर पण त्यांची वक्र दृष्टी वळेल!
म्हणून मी विचार करतो आहे. एकतर स्पर्धा ठेवावी, माझ्या साठी नविन आय डी. सुचवा, किंवा मीच नवीन आय. डी. घेऊन येतो, तुम्ही ओळखा! मी ऍड्मिन ना म्हंटले एक मायबोली कॉफी मग करा, टी शर्ट सारखा. मग मी तो मग विजेत्याला बक्षिस देईन. बघू काय होते. तोपर्यंत जरा खाली मुंडी घालून बसावे.
हुश्श्श. झाले समाधान?!



Admin
Friday, March 17, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्किंची भिती अनाठायी आहे असे मला वाटत होते. पण गेल्या २-३ दिवसात खालील संकेतस्थळावरून मायबोलीकडे अशी अचानक वहातूक internet traffic एकदम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पण ती फक्त झक्किंशी related आहे असे अजुनही मला वाटत नाही.

http://www.fsis.usda.gov/
http://www.ice.gov/graphics/index.htm
http://www.dhs.gov/dhspublic/



Moodi
Friday, March 17, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या!! झक्की अहो आता तुम्हीच जर आम्हाला असे म्हणाले की मला नवीन आय डी सुचवा तर कस करायच? आता काय होईल की जो कुणी नवीन आय डी येईल ना, त्याच्याकडेच सगळे मायबोलीकर हे झक्की तर नाही ना असा विचार करून संशयाने बघतील.

अहो एकदम नवा आय डी घेऊन, मजा करता करता सगळ्याना भॉक करायचे सोडुन दुसर्‍याच्या हातात कोलीत का देताय?


Champak
Friday, March 17, 2006 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ADMIN laa pan joke karata yeto?
:-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators