चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
पुन: एकदा केचिकान! काय, लक्षात आले ना की 'शीण' तोच, शहरे वेगळी वेगळी. छोट्या कॅमेरात काय सामावणार त्यांची भव्यता. बघताना मात्र दर वेळी काहीतरी नवीनच बघतो आहे असे वाटे. म्हणून एव्हढे फोटो. तुमच्या पैकी कुणि सौंदर्य दृष्टि असलेले, फोटोग्राफी जाणणारे तिथे गेले तर सगळ्या मायबोलीकरांना एक मेजवानीच मिळेल सौंदर्याची!
|
दिनेश, नलिनी, धन्यवाद. मला मुळात प्रश्न पडला होता की मी कोडॅक गॅलरीतून माझ्या पीसीत सेव्ह केलेले फोटो अपलोड केले ते दिसतील की नाही नीट मायबोलीवर. कारण सत्राशे साठ प्रकारच्या अडचणि येऊ शकतात. असो. आता ही लिंक द्यायची म्हणजे कशी? माझे काही स्वत:चे वेब पेज, होम पेज नाही. (करून त्यात लिहीणार काय? डोंबल? की माझी 'मते'!) तर कोडॅकची लिंक शेअर करायची तर कुणाकुणाचे इ-मेल आय डी लिहू? तुम्हाला कोडॅकची लिंक दिली तर तुम्हाला लॉग इन करावे लागते म्हणे! म्हणजे आहे फुकटच, पण आणखीन एक आय डी नि पासवर्ड लक्षात ठेवण्याची झंझट! शिवाय काही फोटो ५० के पेक्षा जास्त आहेत त्यांचे काय? एकंदरीत, दम धरा. या सगळ्यातून मी मार्ग काढीन. तुमची मदत अध्याहृत धरलीच आहे.
|
लहानपणापासून वृद्ध होईपर्यंतचे अहो बी, त्याचा नि अलास्काच्या फोटोंचा काय संबंध? का उगीच त्या हूडांना आमंत्रण देण्यासाठी लिहीले? एकतर हूडांना आमंत्रण लागत नाही. 'मुद्दाम घुसेंगे' म्हणून ते कुठेहि घुसतात. ('मुद्दाम घुसेंगे' हा शब्दप्रयोग मिल्या, मिलींद किंवा तत्सम प्रतिभावंताच्या लिखाणातून मी चोरला.) बरे, आले तर आले, काही फोटोंबद्दल बोलायचे तर उगाच काहीतरी नाटक सिनेमाबद्दल लिहीले. त्याचाहि इथे काही संबंध नाही. मला वाटते तुम्ही दोघेहि इथे असंबद्धता वापरून विनोद निर्माण करायचा प्रयत्न करताहात. करा करा, माझ्या पानाला बरेच लोक भेट देतात, त्यातल्या कुणी वाचला तो विनोद नि त्यांना आवडला तर तुमचे कल्याण होईल. लोपामुद्रा, अहो त्या Orkut वर म्हणे क्षणात मिठ्या मारतात नि क्षणात मिठी नदीत बुडवतात! मला हे असले झेपायचे नाही हो! मी मायबोलीवरच बरा! बाकी कुणितरी लिहा ना की लिंक कशी द्यावी, ५० K हून फोटो लहान कसा करावा, वगैरे. हा घ्या आणखी एक फोटो. गर्द झाडी पण मागे एकदम दगड नि स्नो यांचा डोंगर. एकूणच इथल्या बर्याच डोंगरांच्या कडा धारदार नि टोके अगदी नवीनच तासलेल्या पेन्सिली सारखी. त्यात जरासुद्धा गोलाई नाही! लगेच उजवीकडचा लहान डोंगर तुलनेसाठी बघा.
|
हे एक ग्लेशियर. अवाढव्य पसरलेले. अनेक फूट वर पासून नि अनेक फूट रुंद. ही एक प्रचंड मोठी गोठलेली नदी. त्यात दिसतात त्या लाटा. जश्याच्या तश्या गोठल्या. या गोठलेल्या नद्यांवरून तुम्ही खुशाल चालू शकता. फक्त जिथे पांढरा स्नो दिसेल तिथे पाय ठेवू नका, तिथे बर्फ झालेला नसतो. त्यामुळे तुम्ही एकदम त्या भुसभुशित स्नोच्या खड्ड्यात अनेक फूट खोल जाऊन पडाल. कारण दरवर्षी जवळपास शंभर फूट स्नो पडतो, नि तो कुणिच काढत नाहीत! या नद्या 'वहात वहात' पुढे सरकत असतात, अनेक वर्षांनी काही इंच! पण उन्हाळ्यात थोड्या वितळल्या की त्या मागे सरतात. त्या जिथे पाण्याला मिळतात ती त्यांची हद्द, पुढे किंवा मागे जाते. म्हणजे ग्लेशर्स हे नेहेमीच पुढे मागे होत असतात. पण गेल्या काही दशकात त्यांचा पुढे होण्याचा वेग, मागे सरण्याच्या वेगापेक्षा बराच कमी झाला आहे. Global warming ? अनेक वर्षे तिथे राहिलेल्या लोकांनी सांगीतले की ज्या रस्त्यांवरून आमची बस धावते तिथे अगदी २५ ते ३० वर्षांपूर्वी ग्लेशर होते, हळू हळू मागे हटले. (कोण खुणा करून ठेवत होते कोण जाणे. पण कदाचित् काहीतरी पद्धत असेलच हे मोजण्याची.
|
रॉबिनहूड, धन्यवाद. मी कार्निव्हल कंपनीच्या बोटिने गेले होतो. ती बहुधा स्वस्तातली स्वस्त असावी. इतर बोटी महाग असतात, नि प्रत्येकीत काही तरी उणे दुणे असतेच. आम्हाला तसे काही तक्रार करण्याजोगे आढळले नाही, फक्त पाण्याची बाटली ३.५० हे उगाचच मनात येते. वास्तवीक बाकी सगळे अन्न फुकट असताना पाण्याचेच का पैसे ते कळेना. पण बोलून चालून पैशाचा हिशोब हा प्रकार असल्या क्रुजवर ठेवूच नये त्यामुळे कुठलाहि त्रास होत नाही!
|
स्कॅगवेला आम्ही काही अंतर माथेरानला जाणार्या आगगाडी सारख्या आगगाडीतून गेलो, व पुढे बशीने. वाटेत अमेरिक कॅनडा सरहद्द ओलांडावी लागते. कॅनडाचे अधिकारी गाडीत चढून प्रत्येकाचा पासपोर्ट बघतात. पुढे बसमधून परत येताना अमेरिकन सरहद्दीवर मात्र आमच्या बस ड्रायव्हर फटाकडीने नुसतेच अमेरिकन अधिकार्याला खिडकीतून सांगीतले की ३३ अमेरिकन, २ ऑस्ट्रेलियन व एक न्यू झीलंड. तर त्याने आत येण्याचे कष्ट न घेता आम्हाला जाऊ दिले. आम्ही सुदैवी. कारण आमच्या नंतरच्या बसला एक खट अधिकारी भेटला. आमच्या बस ड्रायव्हर (तीच ती, फटाकडी) ने सांगीतले कि तो खट अधिकारी जरा विकृतच आहे. तो उगीचच बराच वेळ लावतो. मग परत बोटीवर पोचायला उशीर होऊ लागतो, लोक नर्व्हस. ड्रायव्हर, अधिकारी शांत. क्रूजवाल्यांना हे माहित असते. आठ ला निघायचे असले तरी ते सातलाच निघणार असे सांगतात. मग कसे बसे धावत पळत सगळे यात्री बोटीत घुसतात नि सगळा राग बोटीतल्या फुकट अन्नावर काढतात! चार चार स्वीट डिशेस,दोन दोन मेन कोर्सेस, चार प्रकारची शीत पेये इ. त्या सरहद्दीवरील एक चित्र.
|
बोटीवर दररोज संध्याकाळी खोली आवरून तिथे टॉवेलचे केलेले प्राणि ठेवतात. त्यातलाच हा एक हत्ती.
|
बोटीवर ही 'कला' शिकवण्याचा क्लास असतो. त्याला अनेक बायका जातात. म्हणजे एकंदरीत, 'आम्ही खूप काम करतो' म्हणणार्या बायकांना बराच रिकामटेकडा वेळ असतो तर! क्रूजवरून घरी गेल्यावर हेच उद्योग करणार का? तसेच 'पोट कसे कमी करावे' याचाहि एक ३५ डॉ. चा क्लास असतो. त्यात फुकट असलेल्या व्यायामशाळेत नेऊन फुकट असलेली यंत्रे वापरून एका दिवसात पोट चार इंचाने कमी करण्याचा प्रयत्न करतात! मग पुन: दोन वर्षे काही करायला नको! करू देत बापड्यांना. प्रामाणिकपणे विचारले तर मीहि इथे बसून मायबोलीवर लिहीण्यासाठी किंवा घरी, शाळेतल्या मुलांना त्यांच्याच पुस्तकातले बीजगणिता सारखे विषय शिकवून जे पैसे मिळवतो त्यात तरी काय मोठे प्रामाणिक आहे? आता फोटो देणे बंद करतो, नाहीतर Admin ओरडायचे 'कृपया भाराभर फोटो टाकू नयेत!' शिवाय आता ५० K पेक्षा कमी फोटो फार नाहीतच.
|
'देव' या विषयावर बराच वादविवाद चालू आहे, त्यानिमित्ताने माझी मते: अहं ब्रम्हाऽस्मि| कुठून तरी माझे कल्याण व्हावे, इथे या जगात, नि कदाचित् मेल्यावर काही असेल, स्वर्ग वगैरे (इतके लोक म्हणतात, कोण जाणे खरच असेलहि!) तर तिथेहि माझे कल्याण व्हावे अशी इच्छा. मग ते कसे होईल याचे मार्ग शोधणे. जगात दिसणार्या, किंवा माहिती असलेल्या सगळ्या गोष्टींहून काऽहीतरी भव्य, दिव्य असावे. की ज्याच्या हातात माझे भले करणे शक्य आहे. त्यासाठी 'देव', 'चैतन्य', 'परमात्मा', नावाचे काहीतरी समजा, नि मग काहीतरी करून त्याला 'प्रसन्न' करा. या सगळ्या कल्पना पूर्वी (हजारो वर्षांपूर्वी?) कुणाला तरी सुचल्या. नि त्यांनी बर्याच लोकांना त्या पटवल्या. त्यामुळे आपोआपच त्यात काही तथ्य असावे असे वाटते. त्यातले आपण काय मान्य करायचे नि काय नाही, हे परत आपल्यावर अवलंबून. ते लोक हुषार असल्याने त्यांनी असेहि सांगीतले की त्या 'देवाची' अनुभूति ज्याची त्यालाच कळते, नि त्या देवाला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमचा विश्वास असेल, तर त्या मार्गांचा अभ्यास करा, नसेल तर नका करू. त्यामुळे ते सिद्ध करण्याची जबाबदारी कुणावरच नाही. कुणि त्यांचे म्हणणे मान्य केले नाही, तरी त्यांना काही वाटणार नाही! म्हणून आपली (भारतातल्या हिंदूंची) वृत्ति अतिशय सहनशील. त्याचा गैरफायदा इतर लोक घेतात, नि तोहि 'धर्माच्या' नावावर, म्हणून आजकाल परत एकदा, इतकी हजार वर्षे जे खरे नि चांगले मानले त्याची परत एकदा खात्री करावी किंवा काहीतरी नवीन मार्ग शोधून काढावा, म्हणून सारे वादविवाद. जोपर्यंत स्वत: सुखी असावे असे वाटत रहाते, तोपर्यंत लोक निरनिराळ्या गोष्टी शोधत असतात. भारतातल्या अनेऽक लोकांना देव, वगैरे पटते. पण जगातले इतर अनेक लोक याला चक्क थोतांड म्हणतात! नि इतर धंदे करतात!
|
|
|
|