Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2008

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » नवीन मायबोली » नवीन मायबोली: असे सुधारता येईल » Archive through April 04, 2008 « Previous Next »

Admin
Wednesday, April 02, 2008 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. नवीन प्रतिसाद ही वर असलेली link वापरली पाहिजे असे अजिबात नाही. सगळ्यात शेवटच्या प्रतिसादाला असलेली reply ही लिन्क वापरली तरी चालते. ती पानाच्या खालीच आहे. आणि खरं म्हणजे तुमचा प्रतिसाद हा सगळ्यात वर लिहिलेल्या मजकूराला सहसा नसतो. तो शेवटच्या किंवा त्या अगोदरच्या मजकुराला असतो. त्यामुळे त्यातल्या कूठल्याही संदेशाला reply म्हणून दिला तरी चालेल.

Admin
Wednesday, April 02, 2008 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२. दुसरी सुचना ही अमलात आणली आहे.

Arun
Wednesday, April 02, 2008 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा, असं आहे का ते ?????

थांबा हं वापरून बघतो ........ :-)


Tonaga
Wednesday, April 02, 2008 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर जुनी मायबोली नवी मायबोली असा काही फरकच जाणवत नाही...
मायबोली उघडली की सगळ्या लिंक्स पूर्वीप्रमाणेच दिसतात...


Dineshvs
Wednesday, April 02, 2008 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin ग्रुप्स ला काहितरी पर्यायी मराठी शब्द द्या ना. कट्टा वगैरे शोभेल, पण सर्वानुमते ठरवा.
तसेच My unread या शब्दाला पण पर्यायी शब्द घ्या. हे दोनच अमराठी शब्द आहे तिथे.
तसेच या फ़लकांवरील पोस्टस्ची लिंक मुख्य पानावर नसली तरी चालेल. इथली वाहतुक भरपुर असल्याने, तिथे गर्दी झालीय.


Kedarjoshi
Wednesday, April 02, 2008 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गृप्स ह्या नावाला पर्यायी काही तरी देता येईल काय? जसे समुह वा मिंत्रमंडळ ( समुह थोडे विचित्र वाटेल).

तसेच त्या गृप्स मध्ये सामील व्हा हे क्लीक केल्यावर परत एकदा तोच प्रश्न विचारला जातो, जर तो प्रश्न असेल तर ती सामील व्हा ज्या जागी हो आणि दुसरा पर्याय नाही असा करता येईल का?


Zakasrao
Thursday, April 03, 2008 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लास्ट डे सर्च मध्ये मागच्या चोवीस तासातील सगळ्या पोस्ट दिसत होत्या.
आधी सगळे बीबी माय सिटी मध्ये होते तेव्हा आरामात ते बीबी सापडत होते.
आता कसे शोधायचे???
त्यासाठी त्या ग्रुप ला सामील व्हाव लागेल का???


Ajjuka
Thursday, April 03, 2008 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकोबा, हो. सामील व्हावे लागेल. नुसते वाचायचे तर तिथे जाउन वाचता येईल.

या नवीन प्रकाराला अजून सरावले नसल्याने त्यावर फारसं मत व्यक्त करता येत नाहीये. पण काही सूचना आहेत.
१. लास्ट १ डे सर्च आहे त्याबरोबर पूर्वीसारखं ३ आणि ७ डे पण असावं. सोमवारी किंवा मोठ्या सुट्टीनंतर शोधायला बरं पडतं.

२. हितगुज वरून लास्ट डे वर आल्यावर उजव्या बाजूला ताज्या पोस्टसची जंत्री दिसते ती गुलमोहर, रंगिबेरंगी एवढीच मर्यादीत असावी. फारतर नंतर माझे अनुभव आणि V&C पण चालतील ते दोन्ही भाग नवीन ठिकाणी हलवलेत की. पण उठसूट सगळे ग्रुप्स नकोत.

३. वरची ग्रुपच्या ऐवजी मित्रमंडळ म्हणण्याची आयडियाची कल्पना एकदम आवडेश!


Gajanandesai
Thursday, April 03, 2008 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२. हितगुज वरून लास्ट डे वर आल्यावर उजव्या बाजूला ताज्या पोस्टसची जंत्री दिसते ती गुलमोहर, रंगिबेरंगी एवढीच मर्यादीत असावी. फारतर नंतर माझे अनुभव आणि V&C पण चालतील ते दोन्ही भाग नवीन ठिकाणी हलवलेत की. <<<<

माझे अनुमोदन! त्यात फक्त संकलित केले जाणारे विभाग असावेत ('समाज आणि संस्कृती', 'भाषा आणि वाङ्मय' वगैरे) असे वाटते.

नव्या स्मायल्या उगीच बावचळलेल्या वांदरांसारख्या दिसल्या. मग वाटले की त्या मायबोलीकरांकरता खास घडवून घेतल्या असतील.
या स्मायल्या बघायची सवय नाही त्यामुळे वेगळं वाटतंय, पण स्मायल्या चांगल्या आहेत.


Admin
Thursday, April 03, 2008 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक युक्ति सांगतो, पण त्या त्या गृपचे सभासद असणे आवश्यक आहे.

डाव्या बाजुच्या मेनुमधे खाली अजून वाचायचंय अस लिहिलंय ते पहा.

१. तुम्ही सभासद असलेल्या गृपमधले फक्त तुम्ही न वाचलेले संदेश
२. सगळ्य ग़ृपमधले नवीन संदेश (तुमच्या मायबोलीला दिलेल्या भेटीपासूनचे)
३. सगळ्या मायबोलीवरचं नवीन लिखाण
हे सगळं एका जागी दिसेल. तुम्ही दिलेल्या शेवटच्या भेटीपासून असल्यामुळे २४ तास झाले काय किंवा ७२ तास झाले काय सगळं दिसेल.

आणि पहिली पाटी जसे जसे तुम्ही वाचत जाल तशी कोरी होत जाईल.


Shyamli
Thursday, April 03, 2008 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

. हितगुज वरून लास्ट डे वर आल्यावर उजव्या बाजूला ताज्या पोस्टसची जंत्री दिसते ती गुलमोहर, रंगिबेरंगी एवढीच मर्यादीत असावी. फारतर नंतर माझे अनुभव आणि V&C पण चालतील ते दोन्ही भाग नवीन ठिकाणी हलवलेत की. पण उठसूट सगळे ग्रुप्स नकोत. >>>
हो हो अगदी काहितरीच वाटतय ते, इथे कुवेतमधे कोणी खी खी केलं तर गडावर काय आज्जि....ईत्यादी मधेच अंताक्षरीवरचा गाण्याचा शब्द. आणि हे सगळ एकत्र वाचल तर मज्जाच :D



Ladtushar
Thursday, April 03, 2008 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गृप्स ची कल्पना चांगली आहे... गृप्स ह्या नावाला पर्यायी
समूह हे नाव देखील चांगले आहे.

Maanus
Thursday, April 03, 2008 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

only for my information, why did we choose drupal groups instead of drupal forums?

http://drupal.org/forum

anyway if you want to add colors to the groups/drupal thing, you'll have to define stylesheet classes like
.red [ color: red; ]

and use these classes in span tag. right now one can use error, .content-title, comment classes.

Admin
Thursday, April 03, 2008 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The biggest issue with drupal forum (or almost any forum for that matter) does not give a group autonomy. They also do not allow additional features to manage themselves.

Forum would have been a very easy decision as it could have kept the look and feel of Hitguj. But that wouldn't solve some of the fundamental organization and scalability issues we are facing.

On the other hand we are seriously looking at making a forum available inside each group. I can't promise as there are some technical scalability issues that we are hoping to resolve. If that works it will be best of both worlds.

Maanus
Friday, April 04, 2008 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i tried some options with css and here is result to make new comments system more sleek.

text/html
b4_change.html (1.8 k)

text/html
after_change.html (1.9 k)


what i did is removed comment class from /sites/
www.maayboli.com/themes/Maayboli/style.css

and modified a bit in /sites/ www.maayboli.com/themes/Maayboli/base.css

modified classes are in attached html. You can try it once in some test area.


Limbutimbu
Friday, April 04, 2008 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन मायबोलीवर ग्रुप्स करता "सामिल व्हा" असा सन्देश हे!
तर या सन्देशा मागे "(बघता काय)" अस कन्सात किन्वा नुस्तच लिहिल तर????

विचारपुशीत, आलेली प्रत्येक पोस्ट एकेक करुन डिलीट मारावी लागेल, त्याकरता एकत्रित पोस्ट उडवायची काही सोय होवु शकेल काय?

नविन मायबोलीवर, लॉगिन केल्याशिवाय लिहिताच येत नाही, सबब ऑन लाईन असलेले मेम्बर्स किती व कोण कोण आहेत असे काही हिरव्या दिव्याने किन्वा तत्सम प्रकाराने दिसू शकेल काय? :-)

मतदान अर्थात तुमचे मत या सदरात काही भर पडणार हे का? जसे की सभासदाला एखादा पोल उघडता येणे इत्यादी!

एकन्दरीत नविन मायबोली झकास!


Limbutimbu
Friday, April 04, 2008 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> २. हितगुज वरून लास्ट डे वर आल्यावर उजव्या बाजूला ताज्या पोस्टसची जंत्री दिसते ती गुलमोहर, रंगिबेरंगी एवढीच मर्यादीत असावी. फारतर नंतर माझे अनुभव आणि V&C पण चालतील ते दोन्ही भाग नवीन ठिकाणी हलवलेत की. <<<<

याला माझे "कन्डिशनल अनुमोदन"
माझ्या मते एक, दोन वा काही तासान्चा सर्च जोवर उपलब्ध नाही तोवर ही ताज्या पोस्ट्स बघण्याची सुविधा उत्तम हे! :-) जर सर्च मधे १ दिवसा बरोबर मागणिबरहुकुम तास, दिवस या प्रमाणे पोस्ट्स्च्या सर्चची सुविधा उपलब्ध झाली तर आणि तरच उजवीकडील ताज्या पोस्ट्स्चा निर्देश ठराविक विषयान्पुरता मर्यादित ठेवावा, अन्यथा आत्ता चालू (बन्द केले की काय बहुतेक लग्गेच???? भारीच प्रॉम्प्ट बुवा! ) असल्याप्रमाणे येणारी प्रत्येक पोस्ट तिथे दिसुदे! आम्हाला "आवडत्या आयडीन्चे लिखाण" फॉलो करायला सोप्पे जाते!:-)


Maanus
Friday, April 04, 2008 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

do check this one

text/html
1607.html (41.4 k)


Ladtushar
Friday, April 04, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी संगेल का ? नविन मायबोली वरील एखादी स्वतः ची पोस्ट डिलीट कशी करायची ?

Amruta
Friday, April 04, 2008 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन मायबोलीवरचा माझा लॉगईन चा त्रास कधी संपणार आहे देव जाणे. परवा लॉगईन झाल आता मात्र अजिबात होत नाहिये.
मागे कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे Access Denied हा मेसेज वाचुन भयंकर अपमान झाल्यासारखा आता मलाहि वाटतो. :-(


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators