|
Iop123
| |
| Thursday, January 26, 2006 - 9:11 pm: |
| 
|
कोणी मला नान कटाईची रेसिपी सान्गेल का?
|
Manuswini
| |
| Friday, January 27, 2006 - 12:31 am: |
| 
|
मी ही माझी recipe देत आहे again fat free आहे, पण तुला हवे असेल तर तु मैदा घालुन कर. माझी आई मैदा आणि रवा समप्रमाणात घेवुन करायची त्याने ती छान खुस्खुशित आणि जराशी कुरकुरी चव येते आम्ही भट्टीत भाजुन आणायचो पण तु oven मधे करु शकते ही घे ४ वाट्या कणीक किंवा मैदा २ वाटी आणि २ वाटी रवा ( जर तु मैदा आणि रवा घेतलास तर रवा चांगला भीजत ठेवुन कुटावा लागतो थोडा ज्यास्त त्रास आहे मैदा मिश्रित रवा असेल तर ) जरास आंबट दही ४ टेबलस्पून, पिठीसाखर २१/२ वाट्या, देशी घी किंवा डालडा पावणे तीन वाटी, use same वाटी for measurement of all , बेकिन्ग सोडा १ टेबलस्पून आणि बेकिन्ग पॉवडर १ टेबलस्पून अस घे, जायफळ १/२ टीस्पून वेलची बदाम तुकडे वरती लावायला कृती तूप किंवा डालडा परातीत चांगला फेसुन घे हळु हळु साखर टाकत फेसत रहा मग जायफळ दही, वेलची टाक सगळ्यात शेवटी हळु हळु मैदा आणि रवा किंवा कणीक टाकुन mix कर. मैदा आणि रवा असेल तर खुप मळावे लागते अगदी हात दुखतात बदामाचे काप वर लाव छोत्या चपट्या गोळ्या बनवुन. ३५० डेग्री वर १५ १८ मीनिटे भाज किंचीत लाल्सर छटा आल्यावर मस्त खुस्खुशीत नान्कटई झाली तयार, कणीकेची पण तुला आवडेल जरूर कळव केल्यावर
|
Moodi
| |
| Thursday, August 10, 2006 - 9:33 pm: |
| 
|
मनुस्विनी या नानकटाईत बटर वापरले तर चालेल का गं? आणि रवा मैदा भिजवुन कुटण्याबद्दल म्हणतेस ना, ते मिक्सर / फूड प्रोसेसरमधुन २ दा फिरवायचे, चांगले मऊ होते. मी नानकटाई अजून केली नाही पण तुझी कृती फारच छान वाटतेय. मात्र बटरविषयी सांग गं मला.
|
Manuswini
| |
| Thursday, August 31, 2006 - 4:52 pm: |
| 
|
मूडी, butteR वापरलास तर चालेल गं पण वजन वाढेल दुसरे म्हणजे तु म्हणते ते बरोबर आहे मैदा नी रवा मळुन हात दुखतात त्या पेक्षा मिक्षिए मधे फिरव पण ते तूप पातळ होते ना हीच तर गोची आहे. मूडी कळव मला केल्यावर पण तु रवा का मैदा वापरणार आहेस?
|
Moodi
| |
| Thursday, August 31, 2006 - 5:21 pm: |
| 
|
मनु थॅंक्स गं. मी कणिक वापरुन बघायचा विचार करत होते पण मैदाच चांगला लागतो नानकटाई किंवा इतर बिस्कीटांमध्ये. पण मी प्रमाण निम्मे घेणार आहे. म्हणजे १ वाटी रवा अन १ वाटी मैदा असे. केली की जरुर सांगते गं.
|
Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 3:06 am: |
| 
|
माझी नानकटाई before baking and after baking त्या इतक्य फुलल्या की त्याचा shape गेला कामातून. बाराला करायला सुरवात केली नी रात्री एक वाजला शेवटी कांटळून दोनच tray मधून काढायचा प्रय्त्न केला नी shape गेला कामातून 
|
Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 3:08 am: |
| 
|
before baking
|
Vrushs
| |
| Saturday, February 10, 2007 - 1:13 am: |
| 
|
manuswini तुम्ही सांगितलेल्या नानकटाईत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही न वापरता फक्त बेकिंग सोडाच वापरला तर चालेल का? pls reply.
|
Manuswini
| |
| Saturday, February 10, 2007 - 1:43 am: |
| 
|
नुसता बेकिंग सोडा पण चालेल.
|
Vrushs
| |
| Sunday, February 11, 2007 - 1:00 am: |
| 
|
Thanks.आता मी करुन बघेल.
|
Adtvtk
| |
| Thursday, February 15, 2007 - 5:39 pm: |
| 
|
मनुस्वीनी छानच झाली नानकटाइ तुझ्या पद्धतीने. मी कणकेच्या केल्या. मला चव आवडली. आणि एकदम झट्पट. मला वाटते साखर कमी चालेल मी २ कप टाकली. आणखी कमी चालली असती असे वाटले.
|
Mvrushali
| |
| Saturday, March 31, 2007 - 6:20 am: |
| 
|
मस्त झाली आहे नान कटाई.मी देखील कणकेच्याच केल्या.खुसखुशीत झाल्या आहेत.धन्यवाद
|
Saj
| |
| Saturday, August 04, 2007 - 9:50 pm: |
| 
|
manu, ek shanka aahe. pavne tin vati tup/dalda ghatle tar fat free kase ga? baki mala aani mazya lekina nankatai far aavdate tymaule mi karnar aahe aata.
|
Manuswini
| |
| Monday, November 05, 2007 - 4:43 am: |
| 
|
साज, अग कळत कसे नाही ती typos आहे. मला Actually low fat म्हणायचे होते. तेव्हढेच मनाला हायसे. चला, दिवाळीची सुरवात नानकटाईने करायला सोपी नी खायला मस्त. चकलीची भाजणी नी करंजी सारण करून ठेवले. ह्यावेळेला मी 1:1:1 मैदा,रवा,कणीक घेतली. बराच वेळ होता म्हणून सगळे फोटो काढले. ह्यावेळेला काजु लावले.  
|
Saj
| |
| Tuesday, November 06, 2007 - 4:15 pm: |
| 
|
manu, ekdam chan,mi kal besan ladu kelet.ata shankarpali aani karanjya karen lek ghari yaychya aat.
|
Prr
| |
| Thursday, January 10, 2008 - 1:14 am: |
| 
|
@मनुस्वीनी ...(मैदा आणि रवा घेतलास तर रवा चांगला भीजत ठेवुन कुटावा लागतो थोडा ज्यास्त त्रास आहे)......म्हणजे नक्की काय करायचे? किती वेळ रवा भीजत ठेवायचा?
|
Prr
| |
| Tuesday, January 15, 2008 - 2:57 am: |
| 
|
Thanks मनुस्विनी !!... तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्या नानकटाई (फक्त मैदा वापरुन)...छान झाल्या. तुमच्या फुललेल्या नानकटाई बघुन मी पण अंतरावर ठेवल्या आणि माझ्यापण मस्त फुलल्या. दुसर्या दिवशी Chocolate नानकटाई केल्या.पहिल्याच प्रयत्नात एकदम successful!

|
Manuswini
| |
| Tuesday, January 15, 2008 - 6:36 pm: |
| 
|
prr, छान वाटले तु केल्यास पाहून. अग ही माझ्या आईची रेसिपी आहे कीती वर्षाची. मी जरा अतीच health Conscious अस्लयाने कणीकच वापरते. तूप असते म्हणा पण तेव्हढाच दीलासा काहीतरी कमी केल्याचा. BTW ते अहो जाहो नको ग. मी म्हातारी नाहीये.
|
Prr
| |
| Thursday, January 17, 2008 - 2:47 am: |
| 
|
हा हा हा ....नाही म्हणणार हं अहो जाहो ... मनुस्विनी! अग मी पण health Conscious आहे. पण सुरवातीला चुकायला नको म्हणुन मैदा वापरला. पण मला रवा वापरल्यास भीजवायचा व कुटायचा का? ते नाही कळले.
|
Manuruchi
| |
| Thursday, January 17, 2008 - 5:29 am: |
| 
|
prr, nankatai ekdam chhanach dist aahet, ata tumchya chocolat nankati chi recipi yeu dya .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|