|
Prr
| |
| Friday, January 18, 2008 - 3:56 pm: |
| 
|
मनुस्विनी ... आईची रेसिपी म्हणजे छानच. करताना चुकायला होतच नाही. अग Manuruchi रेसिपी कसली ....कुठेतरी वाचलेले Chocolate नानकटाई - 2 cups maida + 2 tsp cocoa powder मनात आले chocolate नानकटाई करुन बघुया. माझ्याकडे cocoa powder नव्हती. म्हणुन मी chocolateच किसुन टाकले. बाकी मनुस्विनीची रेसिपीच. खर तर मला मध्ये मध्ये chocolateचे कण दिसायला हवे होते. पण chocolate सुरवातीलाच टाकल्याने ते विरघळले. पण चव मस्त लागतेय. Next time पीठ मळुन झाल्यावर chocolate mix करणार आहे.
|
Chioo
| |
| Monday, January 21, 2008 - 11:32 am: |
| 
|
मी काल नानकटाई केली. पण माझं काहितरी चुकलं. थोडी कडवट लागते आहे आणि तूपाचा खूप वास राहतो तोंडात. मी इथे मिळते ते देशी घी घेतले होते. बेसनच्या लाडवाला तेच वापरते आणि त्याला काही problem येत नाही. मी तूप पातळ करून घेतले आणि मग बाकी सगळं सांगितल्याप्रमाणे. शेवटी प्रमाणातली सगळी कणीक मिसळली तरी तूप खूप सुटत होतं आणि गोळे बनत नव्हते म्हणून आणखी अर्धी वाटी कणीक घातली. मी सगळं निम्म्या प्रमाणात केलं होतं. माझं कुठे काय चुकलं?
|
Manuruchi
| |
| Monday, January 21, 2008 - 12:10 pm: |
| 
|
mi manuswinine dilyapramane recipe keli pan maazi nankatai khuskhushit na hota kadak zali maza kaya chukle asel
|
Manuruchi
| |
| Monday, January 21, 2008 - 12:12 pm: |
| 
|
koni tup/ Dalda vitalavun nankatai keli aahet ka, aslyas krupya sanga .
|
Prr
| |
| Monday, January 21, 2008 - 2:14 pm: |
| 
|
Chioo,Manuruchi मनुस्विनीने दिलेली recipe इतकी अचुक आहे की चुकायला होत नाही. मी नानकटाई केली तेव्हा काय काय केले हे मी तुम्हांला सांगते. मी मैदा वापरुन नानकटाई केली. साखर थोडी कमीच(१ ३/४ वाटी-आवडीनुसार) घेतली. मी पण तूप वितळवुन घेतले. मग थंड झाल्यावर साखर टाकली. खुप वेळ फेसावे लागते(साखर पुर्णपणे विरघळेपर्यन्त). दही, बेकिन्ग सोडा प्रमाणापेक्क्षा कमी घेउ नये. मी बेकिन्ग सोडा वापरला(बेकिन्ग पावडर नव्हती). शेवटी मैदा. हया सर्व गोष्टि एकामागोमाग एक mix कराव्यात(पहिला पदार्थ mix होईपर्यंत दुसरा टाकु नये). मी 20 minutes बेक केले. Dont forget to preheat oven for 350 degree Farenhit. Chioo गोळा करताना खुप चिरा पडतात पण ह्ळुवारपणे चिरा पडु न देता गोल आकार दयावा. Manuruchi कदाचित तुप कमी पडले असावे किंवा तापमान जास्त झाले असेल ..... नाहीतर कडक होत नाही. 15 min नंतर oven मध्ये बघावे किंचीत लालसर छटा येत आहे का.
|
Chioo
| |
| Monday, January 21, 2008 - 3:56 pm: |
| 
|
धन्यवाद prr . अग, नुसत्या चिरा पडत नव्हत्या तर भांड्यातच आजुबाजुने तूप येत होते. आणि तरी एक करून ठेवली तर त्यातून तुपाचा ओघळ निघाला. मी दही, baking powder ( baking सोडा इथे मिळत नाही) सांगितल्याप्रमाणेच टाकली होती. आता एक अगदी basic प्रश्न. एक कप म्हणजे किती 'ml' , या कृतीप्रमाणे? मी १०० ml चा एक कप घेतला होता. त्यामुळे दही- baking powder चे प्रमाण चुकले का?
|
Prr
| |
| Monday, January 21, 2008 - 5:27 pm: |
| 
|
अग खर तर मी तुप थोडे कमीच वापरले होते. आणि मैदा mix करताना थोडा थोडा टाकत होते म्हणजे पीठ खुपच सैल / घट्ट होणार नाही. तु जमल्यास फोटो काढत जा म्हणजे तो बघुन पण कळु शकते की पीठ कसे केले आहेस. आमचे before Bakingचे फोटो बघ ... तुझे तसे पीठ झाले होते का?
|
Prr
| |
| Monday, January 21, 2008 - 5:34 pm: |
| 
|
हे ml/gm वगैरेने confusion होते मला. मी वाटीचे प्रमाण घेतलेले. १ वाटी मैदा + दही १ टेबलस्पून + बेकिन्ग सोडा १/४ टेबलस्पून जर प्रमाणापेक्शा जास्त कणीक add केलीस तर साखर पण जास्त टाकावी लागेल. मी नेहमी तुपाचे प्रमाण कमीच ठेवते कारण कमी पडले तर शेवटी add करता येते.
|
Manuswini
| |
| Monday, January 21, 2008 - 6:28 pm: |
| 
|
ह्म्म.. बर्याच पोस्ट झाल्या की इथे, मला ml/gm/ltr वगैरे कधीच कळत नाही का मी काहीही बनवताना हे प्रमाण वापरले नाही. बहुतेक वेळा अंदाजानेच घेते नी होते बरोबर. मोठेपणा नाही सांगत पण होते खरे. चिऊ, तु वरील प्रमाण घेतलेस तर का चुकल्या माहीत नाही. तूप आधी फेसून घे भरपूर. साखर सुद्धा वितळवायची तूपात फेसून. (चित्र बघ वरती मी टाकलेले) मग हळु हळु दही, पिठे टाक. मी एका ताटातच घेते सगळे नी फेसत टाकत जाते.
|
Prr
| |
| Tuesday, January 22, 2008 - 3:33 pm: |
| 
|
हा हा हा ...मनुस्विनी! कसे ग अचुक ओळखलेस. माझ्याकडे मोजमापाची साधने नाहित ग. मग अंदाज घ्यावा लागतो. माझी नुकतीच सुरवात आहे पण मला असे वाटते की... जर पदार्थ करताना एखादी गोष्ट का वापरतोय हे जर समजुन घेतले तर मग आपणच प्रमाण ठरवु शकतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|