|
Neelu_n
| |
| Monday, December 19, 2005 - 4:17 pm: |
|
|
चॉकलेट बिस्किट्स साहित्य: मारी बिस्किट्स १०, कोको पावडर ४ टे.स्पू., लोणी २००ग्रॅम्स पिठी साखर २००ग्रॅम्स कृती: कोको पावडर, लोणी, आणि पिठिसाखर एकत्र करुन चांगले फेटुन घ्यावे. मारी बिस्किट्स या मिश्रणामध्ये व्यवस्थीत बुडवून एका पसरट डीशमध्ये मांडुन घ्यावीत. नंतर उरलेले कोकोचे मिश्रण त्या सगळ्या बिस्किटांवर पुर्ण पसरुन घ्यावे. (बिस्किट्स पुर्ण झाकली गेली पाहीजेत) ही डीश मग फ्रीझर मधे ठेवुन ४ ते ५ तास सेट करावे. नंतर डीश बाहेर काढून धारदार सुरीने त्याचे चौकोनी तुकडे करावे. झाली कुरकुरीत बिस्किट्स चॉकलेट तयार. वरील प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलल्यास चालेल. म्हणजे कोकोचे प्रमाण कमी जास्त करावे किंवा यात आवडत असल्यास थोडी कॉफी टाकली तर चॉकलेट सोबत कॉफीचा स्वाद लागेल. अगदी लहान मुलांसाठी कोको पावडरचे प्रमाण कमी करुन त्याएवजी होर्लिक्स, बोर्निव्हटा इ. घातले तर जे मुले दुधात घालुन प्यायला टाळाटाळ करतात ते ह्याद्वारे खाल्ले जाते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|