मायबोली वर्षाविहार २०२५

Submitted by ववि_संयोजक on 15 June, 2025 - 11:04

मायबोली वर्षाविहार २०२५

लोकहो, मस्त पावसाळा सुरू झालेला आहे.
भिजलात की नाही पावसात?
काय म्हणता? नाही अजून.
बरं ठीक आहे, चिंब भिजायला आणि मस्त मजा करायला आपला लाडका ववि येतोय. तुम्ही ववि २०२५ ची दवंडी ऐकली ना?
मग आता आम्ही आलो आहोत त्याबद्दल आणखी सांगायला.
यंदा आपण ववि करणार आहोत नवीन रंगात नवीन ढंगात...

आहात ना तयार?

सगळ्यात आधी कॅलेंडरवर २० जुलै २०२५ चा रविवार हा "वविवार" म्हणून नोंदवून ठेवा बरं पटकन.

तारीख राखून ठेवलीत?OK

आता ठिकाण.
यंदा आपण ववि साठी भेटणार आहोत युकेज् रिसॉर्ट, खोपोली येथे.

हे आहे रिसॉर्ट चं मॅप लोकेशन -
https://maps.app.goo.gl/dekvFMqKvyuKcWvh9

आहे की नाही मस्त, आवडलं ना ठिकाण? आवडलंच असणार.
बरं आता तिथले काही फोटो बघा ...
Screenshot_20250615_192726_Gallery.jpg
.
Screenshot_20250615_192712_Gallery.jpg
.
Screenshot_20250615_192706_Gallery.jpg
.
Screenshot_20250615_203717_WhatsApp.jpg
.
Screenshot_20250615_203752_WhatsApp.jpg

आता तर नक्कीच आवडलं असणार.
विचार कसला करताय नाव नोंदणी करा लगेच.

नाव नोंदणी करण्यापूर्वी या खालील गोष्टी एकदा नीट वाचून घ्या:
- वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.
- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे रविवार, १३ जुलै २०२५.
- योग्य ते शुल्क bhagyadeshmukh@okhdfcbank (भाग्यश्री देशमुख) या upi वर भरावे व त्यानंतर सगळ्यात खाली दिलेला गुगल फॉर्म भरुन त्यात नोंदणीसाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी. तुमची वर्गणी आणि गुगल फॉर्म जमा झाल्यावर संयोजक तसे संपर्कातून किंवा ईमेलने पोचपावती देतील.

- काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा vavi2025@maayboli.com या पत्त्यावर ईमेल करा.

मायबोली वर्षाविहार २०२५ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे:
मुंबईसाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु. १२००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-, बस: रु. ६००/-)
पुण्यासाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु १२००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-, बस: रु. ६००/-)

मुले (वय ५ ते १० वर्षे) : रु. ८००/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. ६००/- आणि पुण्यासाठी रु. ६००/-

- ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- १० वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.

- रिसॉर्टच्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी २० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

ववि नोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/oPSbtSrSQq61yxsb8

शुल्क bhagyadeshmukh@okhdfcbank (भाग्यश्री देशमुख) या यूपीआय आयडी वर भरावे

मायबोली वर्षाविहार २०२५ संयोजन समिती:

मुंबई
मुग्धा साठे (मुग्धा)
भाग्यश्री देशमुख (चंपा)
विशाल शिंदे (ऋतुराज.)

पुणे
योगेश कुलकर्णी (योकु)
मल्लीनाथ करकंटी (MallinathK)
पल्लवी कुलकर्णी (किल्ली)
वामन देशमुख (वामन राव)

चला चला चला.
त्वरा करा.
आजच नोंदणी करा आणि माबो ववि २०२५ अनुभवायला तयार व्हा.

याबरोबरच सगळ्यांबरोबर हा धागा शेअर करायलाही विसरु नका.

आपल्या लाडक्या वविला यंदा नक्की यायचं हं.
Happy

ववि संयोजक टीम
#ववि२०२५-नवीनरंगातनवीनढंगात

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी माझ्याकडून एक चूक झाली होती. कृपया माफ करा.
काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा vavi2025@maayboli.com या पत्त्यावर ईमेल करा.
(चुकून संयोजकांना मी vavi2025@gmail.com असा पत्ता दिला होता तो वापरू नका)

युकेची जागा चांगली आहे, हायवेवर आहे, दोन्ही टीम्सना कन्व्हिनियंट आहे. आणि खरं तर जागा कुठचीही असो, रोलमध्ये घुसलात, की मजा येतेच.

युकेला काही मायबोलीकर पहिल्यांदाच भेटले होते, त्याची आठवण आली..

२० जुलै तारखेचा अंदाज खरा ठरला याचाच मला जास्त आनंद झाला Happy
आता यायला जमणार नाही याची खंत कमी राहील.
सर्व वविकरांना शुभेच्छा. लहान मुले नक्कीच मजा करतील इथे.

एक सजेशन -
जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम चालू होतील तेव्हा मुलांची सोय लावायला म्हणून त्यांना चित्रे काढा चित्रे रंगवा असे काम (जे ते असेही घरी करतात) देण्यापेक्षा जेवल्यावर पुन्हा त्यांना पाण्यात खेळायचे असेल तर जाऊ द्या.. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. पण मी फक्त विचार केला की मी लहान असतो तर मला काय करायला आवडले असते.

अरे वाह
Uncle kitchen आले परत
छान दिसतेय जागा

साजिर्‍याला मम. पूर्वीचं युकेज नाहीये हे. खूप मोठं आहे. भरपूर जागा आहे. स्लाईड्स वगैरे मोठी मोकळी जागा इ. आहे.
ऐन हायवे वर असल्यानी कुठे आत इ. नाही.
लहान मुलांना हे नक्की आवडेल असं आहे.

पावसाळा म्हणजेच भिजणं, धमाल, निसर्ग, गप्पा, आणि अर्थातच… ववि!
मी रिसॉर्टचे फोटो पाहिले, एकदम भारी वाटतंय! वविवार, दि, २० जुलै २०२५ च्या तयारीला लागतो.

पावसाशी सख्य नाही >> हे जाहीर लिहिणं म्हणजे भारी आहे. कारण अशी पद्धतच नाही. पाऊस एखाद्यासाठी टर्न-ऑफ करणारा असू शकतो, तेही असो, पण ओव्हररेटेड तरी असू शकतो, हेच सार्वजनिकरीत्या आपण स्वीकारत नाही.

हे कुमारांसाठी.

बाकी ववि टीम, बकअप!

@ साजिरा, मला बरेच लोक माहीत आहेत ज्यांना पाऊस आवडत नाही.
फक्त माझ्या डोक्यात जाणारे लोक म्हणजे (पेट पिव्ह) - पाऊस आवडत नाही कोणी बोलले की 'प्रीची आणि शेतकरी मोडमध्ये जाणारे "पाऊस कसा पडायला हवा. कसा वनस्पतिंकरता आवश्यक आहे वगैरे" प्रवचन देणारे.
अरे अमक्याला पाऊस आवडत नाही म्हणजे लगेच पाऊस थांबणारे का पडायचा? आणि वर तुम्ही कौतुक केल्याने रुसून बसलेला पाऊस परत पडू लागणार आहे का.

मला उन्ह आवडत नाही. इतके आवडत नाही की वेगळा लेख लिहू शकेल.. पाऊस यासाठी सर्वात जास्त आवडतो कारण तेव्हा उन्ह नसते.

मला ऊन आवडतं पण हिवाळ्यात. उन्हाळा आवडत नाही.
पाऊस आवडतो पण मुंबई कोकण वगैरे एवढा गंभीर पावसाळा नाही आवडत. क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे आवडतं.
किंवा थ्रील म्हणुन जरा वादळ आणि थोडासा पूर आवडतो एखाद्या दिवसा करता. एखाद्या रात्री भयंकर विजा, आणि प्रलय होतोय सारखा घाबरवणारा पाऊस सुद्धा आवडतो.

पण वविला येणे जमणार नाही, वविसाठी शुभेच्छा.

मला सगळेच आवडतात ऋतु उन्हाळ्यात आंबा मिळतो म्हणून, इतरही फळांची रेलचेल, पावसाळ्यात गरमागरम खाण्याची मजा अनुभवायला मिळते. चिंब पाऊस सुरु आहे कोसळणार्‍या धारांकडे पहात वाफाळलेल्या आलेयुक्त चहाचे घोट घेत खुर्चीत निवांत बसायचे. आहाहा सोबत कुरकुरीत कांदाभजी हवीत. मग विचारायलाच नको. हिवाळ्यात आधी दिवाळी येते मग त्या कुडकुडणार्‍या थंडीत बाजरीची भाकरी, लोणी सोबत वांग्याची भाजी, मिरचीचा ठेचा, वाफाळती डाळ तांदूळाची खिचडी वर मोठ्ठा चमचाभर लसूण तिखटाची कुडकी, सोबत ताज्या ताकाची कढी किंवा मठ्ठा. वाह मज्जाच!
एकंदरीत आमच्या भागात सगळे ऋतु कसे समतोल असतात. घाम काढणारा वा घश्याला कोरड पाडणारा उन्हाळा नसतो, घरात कुबटपणा आणणारा पाऊस नसतो की हाडे गोठविणारी थंडी नसते. सगळे कसे मस्त एकदम त्या ऋतुचा पुर्ण आस्वाद घेऊ देणारे. Happy

मी येणार बरं का वविला! बरीच वर्षे नाही जमले.

@ किल्ली @ संयोजक

नवीनरंगातनवीनढंगात म्हन्जे काय केलेय नविन नेम्के >>
ह्याला प्रतिसाद नाही म्हणजे तेच ते आहे ह्यावेळी पण?

आपले मायबोलीकर मित्र, मैत्रिणी कुटुंबीय यांच्याबरोबर एक सुंदर दिवस अनुभवण्याची संधी, मायबोली ववि २०२५ आठवड्याभरावर येऊन ठेपलाय!

आत्तापर्यंत अनेकांनी उत्साही प्रतिसाद दिला आहे, पण अजूनही काही जण “बघतो”, “पाहू काय होतं”, "नंतर सांगतो" या विचारात आहेत. मायबोलीकरांनो, असे क्षण वारंवार येत नाहीत. तुम्ही आलात तरच ववि खऱ्या अर्थाने “आपला” होईल.

ववि यशस्वी होण्यासाठी संयोजनाच्या दृष्टीने किमान ३५-४० जणांची नोंदणी निश्चित होणे आवश्यक आहे. नाहीतर इतक्या मेहनतीने नियोजन केलेला हा कार्यक्रम कदाचित रद्द करावा लागेल. म्हणूनच, जर तुम्हाला येण्याची इच्छा असेल, तर कृपया उशीर न करता लगेच नोंदणी करा, घरच्यांशी बोला, आणि येण्याची तयारी सुरू करा.

येत्या दोन दिवसात किमान आवश्यक सभासद नोंदणी झाली नाही तर ववि संयोजक पुढील निर्णय घेतील.

पावसाच्या सरी, मातीचा सुगंध आणि आपल्या मायबोलीतल्या गप्पा - ववि २०२५ तुम्हाला हाक देतोय! चला, आपण सगळे भेटूया – नव्या रंगात, नव्या ढंगात!

#ववि२०२५

चला, आपण सगळे भेटूया – नव्या रंगात, नव्या ढंगात!
>>>>>>

हे सस्पेन्स ठेवायला नको होते. किमान हिंट तरी द्यायला हवी होती.. ते पाहून नोंदणी झाली असती. की मी काही मिस केले?

मायबोली ववि २०२५ नावनोंदणी मुख्य धागा येऊन तीन आठवड्याहून अधिक दिवस झाले तरी अद्याप अत्यल्प नावनोंदणी झालेली आहे.
त्यामुळे रिसॉर्टला दिलेल्या कमीतकमी सभासद उपस्थितीची संख्या गाठणे आता अशक्य दिसत आहे. तसेच कमी सभासद असल्यास सध्याचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
यामुळे या वर्षीचा ववि रद्द करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

Pages

Back to top