लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ATM

हा धागा 'ललितलेखन' मधून 'राजकारण- भारतात' या ग्रुपमध्ये हलवला तर बरं होईल. म्हणजे तशी एक विनंती. म्हणजे यत्र तत्र सर्वत्र चालू असलेल्या राजकीय धुळवडी चा नॉशिया आलेल्यांना हे डोळ्यापुढे दिसत राहणार नाही.

https://www.facebook.com/share/v/wKAVHh9ibZD3q41u/?mibextid=qi2Omg
संकर्षणची मार्मीक कविता >>>> कवितेत सद्यस्थितीची नस छान पकडली आहे. पण,ज्याला मत दिलं तो मताधिक्याच्या अभावाने सत्तेपर्यंत पोहचू शकला नाही म्हणून माझं मत वाया गेलं, या संदर्भात ही भावना आणि समजच (हा आजचा समज नाही जुनाच आहे तसा ) मुळात चुकीचा आणि एकूणच लोकांच्या विचारांतील लोकशाही बद्दलचे अज्ञान, अप्रगल्भता दाखवतो ( जे या कवितेमध्ये मनसे आणि काँग्रेसबद्दल लागू होते). बाकी फोडा-फोडी, पक्ष बदल, निवडणूक पश्चात नवीन युतीची समीकरणे याबाबतीत मतदारांची तशी भावना झाली तर त्यात काही वावगे नाही.

या वेळी मी मत दिलं नाही.
राजकारणात सध्या प्रस्थापित असलेला एकही पक्ष मत देण्याच्या लायकीचा वाटत नाही. आहे त्यातच निवडून घ्यायचा म्हणून आजवर देत आलो.
पण या वेळी मात्र कटाक्षाने दूर राहिलो. अपक्ष उमेदवाराला मत दिले असते तर चालले असते.
लोकसभेला जास्तीत जास्त अपक्ष,छोटे पक्ष निवडून गेले तर प्रस्थापित पक्षांना इशारा मिळेल. पण हे इतके निगरगट्ट आहेत कि लोकांच्या नाराजीचा त्यांच्यावर फरक पडत नाही. ते लोकांचं मत बदलवण्याचा प्रयत्न करतात.

साधारण २००१ पासून सोशल मीडीयात आहे. सुरूवातीला तुरळक वावर होता तेव्हां स्टोरी बोर्ड असायचे. याहू , रेडीफ आणि अन्य बरेच होते. त्यावर जे मुद्दे मांडले जात तेच आजही मांडले जातात. त्यात कसलंही नावीन्य नाही. ऑर्कुट पासून सुसंघटित पद्धतीने टोळ्या वावरू लागल्या. सुरूवातीला भाजपच्या टोळ्या जास्त होत्या. त्याला उत्तर देणारे जे लोक होते ते कुठल्याही पक्षाशी संबंधित नसल्याचे दाखवत. पण हळू हळू ही मंडळी सुद्धा युवा शाखेचे पदाधिकारी असल्याचे समजले. अर्थात किमान हे लोक लॉजिकल होते.

पण पक्षाला वैचारिक बैठक प्राप्त करून देणारी ही मंडळी फक्त सोशल मीडीयात आहेत. प्रत्यक्ष पक्ष ज्यांच्या ताब्यात आहे त्यांचं या विचारधारेशी काही घेणं देणं आहे असे वाटत नाही. प्रचंड भ्रष्टाचार आहेच. पण स्वतः अनुभवलेली या लोकांची गावगुंडी ही जास्त त्रासदायक आहे. आपण मालक आहोत हा अविर्भाव ग्रामीण भागात असतो. आता हीच मंडळी सर्व पक्षात आहेत. त्यामुळे पक्ष बदलल्याने सत्ता बदलते हा भ्रम आहे.

कोणत्याही पक्षात फरक नसल्याने आमचा पक्ष वेगळा कसा हे दाखवण्यासाठी रंगांचे बुरखे पांघरले जातात आणि ते खरे असल्यासारखा विखारी प्रचार केला जातो. निवडणुका संपल्यावर एकत्र प्यायला बसतात. एकत्र जमिनीचे व्यवहार करतात. जर रिअल इस्टेट शी संबंधित असाल तर मोठमोठ्या प्रकल्पांमधे यांची भागीदारी कशी आहे हे समजून येईल.

लवासाच्या आसपास सुरेश कलमाडी,पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्या जमिनी आहेत. त्यामुळेच लवासाला विरोध झाला नाही. हा संपूर्ण प्रकल्पच कायद्याने घातलेला बेकायदेशीर दरोडा आहे. जंगल, डोंगर काहीही शिल्लक ठेवलेले नाही. त्यामुळे या पक्षाशी संबंधित बुद्धीमान लोक जेव्हां पर्यावरणावर गळे काढतात तेव्हां इरीटेशन लेव्हल पीकला असते. गळे काढण्यापेक्षा तुमच्या नेत्यांचे गळे धरा.

भाजपसहीत सहा ते सात पक्ष नामशेष झाल्याशिवाय आणि त्या जागी नवीन लोक आल्याशिवाय राजकारणाला अर्थ नाही.

गुप्त मतदान असल्याने कुठल्या पक्षाला मत दिले हे सांगू नये खरे तर. पण बराच काळ आमच्या कुटुंबाने, गावाने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा समाजवादी काँग्रेसला मत दिले. अपवाद फक्त जनता दलाचा. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या त्या वेळच्या प्रतिमेमुळे त्यांना मत दिले. हा अपवाद वगळता फारसा बदल झाला नाही. त्या वेळी गोडसे - गांधी, हिंदुत्व वि सेक्युलर असे काहीही नसायचे. पूर्वी तर सरकार म्हणजे काँग्रेस असा समज असायचा. इंदिरा गांधींना लोक सरकार म्हणायचे ते अनुभवलेले आहे.

गेल्या काही वर्षात सोशल मीडीयामुळे विरोधी बाजूचा प्रतिवाद करता करता काही मुद्दे विचाराधीन राहीले. वेगळा विचार करायला भाग पाडले. आपण मत देऊन सरकार बनवतो. त्याचा त्यांनी पोटापाण्याचा व्यवसाय बनवला आहे. रिअल इस्टेटमुळे खूप लवकर लक्षात येते हे सर्व. जिथे प्रोजेक्ट टाकायचा तिथे जमिनी घेण्याचा सपाटा लावला जातो. त्यासाठी धनिकांची लॉबी हाताशी धरली जाते. याला ना भाजप अपवाद आहे ना काँग्रेस. ईव्हीएम थिअरी जर खरी असेल तर मग भाजपने ओरडू नये म्हणून काँग्रेसने दहा वर्षे भाजपला दिली कि काय ही शंका मनात येते. दहा वर्षे घ्या आणि गप्प बसा असाच कारभार झालेला आहे.

त्यामुळे ज्या ज्या मुद्द्यांवर काँग्रेसने भाजपला घेरायला पाहीजे होते ते मुद्दे काँग्रेसने संधी मिळून देखील का सोडले हा प्रश्न आहे. मध्यप्रदेशात कमलनाथांना पावणे दोन वर्षे मिळाली. व्यापमची चौकशी का केली नाही ? भाजप बॅकफूट वर गेले असते.

महाराष्ट्रात जज्ज लोया कथित संशयास्पद मृत्यूची चौकशी का केली नाही ? भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी का स्थापन केली नाही ? उलट परमेश्वर सिंग यांना बढती देऊन मुंबईचे कमिशनर का बनवले असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आपण ज्या पक्षाला मतच दिले नाही त्याने अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर ती फसवणूक नाही म्हणता येणार. पण त्यांना सुद्धा देश आंदण दिलेला नाही. जाब विचारायलाच पाहिजे. लोकशाही आहे आणि लोकच जाब विचारणार.

पण सोशल मीडीयात विचारवंताचा आव आणणारे ट्रोल तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षाचे लेबल लावून बाद करायचा प्रयत्न करत असतात. या सर्व पक्षीय ट्रोल्सच्या कार्यशाळा घेतल्या जातात त्यात ट्रेनिंग दिलेले असते. त्यामुळे वर्षानुवर्षे चालणार्या वादाचा उबग येत चालला आहे.

कुठे तरी हे फ्रस्ट्रेशन काढायचे होते.या धाग्यावर तशीही चर्चा झालेली नाही. जर या पोस्टमुळे धागा भरकटला असेल तर पोस्टस उडवून लावल्या तरी हरकत नाही.

रघु, तुम्ही म्हणताय हे सारे खरे असले तरीही काँग्रेस व भाजप मध्ये काही फरक नाही, एकाला झाकून दुसर्‍याला काढावे आसे काही नाही. किंबहुना तुमचा प्रतिसाद वर वर वाचला तर तुम्ही मोदीभक्तच आहात, पण भक्तीला both siding चा तात्विक मुलामा देत अहात असा भास होतो.

राहूल गांधीही माणूस आहेत, ते मसिहा वगैरे नाहीत, ते जर पंप्र झाले तर तेही काही चुका करतील, कदाचित त्यांच्या भोवती सल्लागारांचे कोंडाळे होईल, आज भाजप मध्ये गेलेले बरेच जण मलईच्या आशेने परत काँग्रेस मध्ये येतील व पैसे खातील, हे सारे खरे असले तरीही निदान आज तरी कोंग्रेस व भाजप मध्ये काही मूलभूत फरक आहेत.

एक तर ED, CBI, NIA, NHRC, NWRC वगैरे स्वायत्त संस्थांना सरकार ने आपल्या दावणीला बांधले आहे जे कॉंग्रेस काळात नव्हते. अगदी सैन्य दलेही भाजपचीच प्रचार आघाडी असल्यागत कधी कधी वागतात. checks and balances चे ही बरेच वर्षे evolve झालेली सिस्टीम पोखरून जात आहेत.

कोंग्रेस व भाजपा दोघेही भ्रष्टाचार करतात, पण एकच पक्ष आपल्या भ्रष्टाचाराला उन्मादक राष्ट्रवाद व धार्मिकतेचे आवरण घालतो. सत्ताधारी पक्षावर टीका म्हणजे देशावर टीका हे त्रैराशिक २०१५ पूर्वी नव्हते. आजकाल 'पाकिस्तान चले जाव' हेच उत्तर मिळते.

भाजप ने सत्तेवर येण्यापूर्वी ज्या मुद्यावर रान उठवले होते ते (पेट्रोल, सिलेंडर व डॉलर) मुद्दे आजही आहेत, जास्तच दाहक, पण यावर विनोदी ट्वीट करायची हिंमत एकाही सेलेब्रिटी मध्ये नाही, कारण दुसर्‍या दिवशी ईडी दारात येइल याची खात्री.

मेडिया बद्दल तर बोलायलाच नको, मनमोहन सिंग यांच्या समोर त्यांना खडसावून जाब विचारणारे आज पी एम ओ मध्यल्या एका चपराशाच्या इशार्‍यावर भुंकतात.

ईडी ला हाताशी धरून केजरीवाल यांना खोट्या केस मध्ये निवडणूकीच्या तोंडावर आत टाकणे हे काय आहे ?

बलात्कारी लोकांची सुटका झाली व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोशात त्यांचे स्वागत केले असे उदाहरण देऊ शकाल ?

किंबहुना तुमचा प्रतिसाद वर वर वाचला तर तुम्ही मोदीभक्तच आहात, >>> तुमच्या पुढे नारळ उदबत्त्या लावून कोंबडं कापायचं का ? एक वेळ तुम्ही छुपे मोदीभक्त असाल, मी मोदीच काय राहुलचाही भक्त नाही. या दोघांकडूनही मला चाळीस पैसे किंवा अन्य कुठलाही लाभ मिळत नाही. लोकशाहीत कुणी कुणाचा भक्त नसतो. अर्थात तुमच्या सारख्यांना स्पष्टीकरण देणे हे ..... असो.

भाजप आणि काँग्रेस हे खूप वेगळे आहेत या उक्तीच्या भक्तांनाही डोके लावण्यात अर्थ नसतो. अंधभक्त आणि हे भक्त सारखेच. विजयजी तुमचा धंदा असेल हा, माझा नाही. या विषयावर मी प्रतिसाद देतो, पण प्रचाराला जुंपून घेतल्यासारखे नाही.

भाजपचे अंधभक्त " मग त्यांनी तसे केले तेव्हां ?"असे विचारत अंगावर धावून येतात त्याच पद्धतीचा तुमचा प्रतिसाद आहे काहीही फरक नाही.
दोन गुंड आहेत. एकाने खून केला आहे आणि एकाने दंगल घडवली आहे. मग खून केलेल्यानेच एकाचाच खून केला, त्यांच्यासारखे मास किलिंग केले का दाखवा बरे या छापाच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नसते. तुमच्याकडून या असल्या भोगळ प्रश्नांची अपेक्षा नव्हती. तुम्ही या पातळीवर उतरला आहात म्हणजे समजून घेतो.

रघु आचार्य यांच्या मताशी सहमत. बरेच लोक सगळ्याच राजकीय पक्षाला त्रासलेत. कदाचित ह्याच कारणामुळे आपल्या राज्यातील मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे. एव्हढी चर्चा होऊनही बारामतीत अवघे ४७% मतदान झालं. समर्थक मात्र आपलाच पक्ष कसा चागला आहे हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

लेसर एव्हील निवडायला लागतेच की खर. खून आणि मास किलिंग ह्या खरंच वेगवेगळ्या स्केल वरच्या गोष्टी आहेत. जर हे दोन पर्याय असले तर असलेल्या पर्यायांपैकी खून केलेला जिंकेल हे बघणे महत्वाचे वाटते.
एक कुठेतरी ऐकलेले असे आहे - की जर दोन concentration camp बांधणारा एक उमेदवार आहे आणि तीन concentration camp बांधणारा एक आहे, तरी दोन कॅम्प वाल्याला मत देणे हा कमीत कमी नुकसान करणारा पर्याय आहे.

मुद्देसूद चर्चा करणे अवघड झाले की शाळकरी पातळीवर चर्चा आणली की समोरचा माणूस वैतागून त्या पातळीवर न येता वैतागून गप्प बसतो. ह्यांना तेच हवे असते. ह्यांचे आदर्श असलेली व्यक्ती तरी दुसरे काय करते?
https://www.aksharnama.com/client/article_detail/7222

की जर दोन concentration camp बांधणारा एक उमेदवार आहे आणि तीन concentration camp बांधणारा एक आहे, तरी दोन कॅम्प वाल्याला मत देणे हा कमीत कमी नुकसान करणारा पर्याय आहे.
तीनवाला फक्त तरुण पुरुषांसाठी आणि दोनवाला बालके, स्त्रिया आणि व वृद्धांसाठी कॅम्प बांधत असेल तर कोणता पर्याय कमी नुकसान करणारा असेल?

हे आपापल्या पद्धतीने ठरवावे. पण काहीतरी ठरवावे हा मुद्दा आहे. तुमच्या मते कोण कमी नुकसान करणारा आहे त्याला मत द्या.

काही तरीच चर्चा. काही तरीच कम्पलशन्स. असो. तुमचे विचार तुमच्या जवळ.

राजकारणात अर्थकारण बघावे लागते. कोण खूनी आहे आणि कोण बलात्कारी हे बघावे लागणे हे आपण समाज म्हणून बाल्यावस्थेत असल्याचे लक्षण आहे. हा समाज सुधारण्याचे काम राजकीय पक्ष करू शकत नाहीत. त्यामुळे इथल्या वांझोट्या तात्विक चर्चांना शून्य अर्थ आहे. ही तत्वे सोयीनुसार बदलत असतात. त्याच्याशी सामान्य माणसाला काहीही घेणे देणे नाही.

पुण्यात काँग्रेसचा उमेदवार हा अफजलखानच्या कबरीच्या function at() { [native code] }इक्रमणाबद्दल काही वर्षांपूर्वी भिडे एकबोटें सोबत होता. २०१४ साली कारसेवकांच्या सन्मानार्थ समारंभ करत होता. आज हा उमेदवार सेक्युलॅरिझम वर बोलतोय. तर कालपर्यंत उच्चरवात सेक्युलॅरिझम सांगणारे अशोक चव्हाण आता भाजपात आहेत.

माफ करा, पण फालतूगिरी शिवाय दुसरा शब्द नाही. या चर्चांमधे आर्थिक चर्चा जाणिवपूर्वक दडपल्या जातात. लोक धार्मिक आणि भावनिक विषयांवर बोलत राहिले पाहीजेत एव्हढेच या सोशल मीडीयातल्या ट्रोल्सचे काम असते.

बघा ना अर्थकारण पण. त्यात पण लेसर इव्हील बघा. फक्त सामाजिक धार्मिक मुद्देच बघा असा कोणाचा आग्रह आहे ? निकष काय आहे हे आपले आपण ठरवावे. पण दोन्ही पक्ष चांगले नाहीत, एक खुनी आणि एक मास मर्डर करणारा आहे म्हणून मी मत देणार नाही हे व्यक्तिशः पटत नाही.

आणि, एक पक्ष जर धार्मिक भावनिक बाबींवरच निवडणूक लढवणार असेल, जर एका गटाचे otherization आम्ही करत राहू असे स्पष्ट संदेश देत असेल तर मग इथे दोष कोणाचा झाला ? हिंदू वि. मुस्लिम अश्या स्पष्ट battleline वर निवडणूक आखायला कोणता पक्ष जास्त उत्सुक आहे हे ?

त्यात पण लेसर इव्हील बघा >> तुम्हाला कुणी अडवलंय ? ज्याला ही फालतूगिरी नको त्याच्या मागे का लागताय ?

जबरदस्ती आणि मत मांडणे यात लांब फरक आहे. लेसर एव्हिल ही कल्पना कुणाच्या तरी फायद्याची आहे. ती मला नकोय तुम्ही माझ्यावर सक्ती करत आहात. ते ही चार पाच जण मिळून. हे नियमित टोळके बनवून एकट्याला खिंडीत गाठणे आहे. यामुळे सुद्धा असेल कुणीही मत मांडत नाही. मत मांडायचे तर टोळके आवश्यक आहे. इथली मतं प्रत्येकाला पटतच असतील असेही नाही.

अर्थकारणा मधे भाजप आणि काँग्रेस एकसमान आहेत.
दोन्ही पक्षातल्या धेंडांची शैक्षणिक संकुले आहेत. भरमसाठ फिया घेतल्या जातात. डोनेशन्स घेतली जातात आणि हे शिक्षणावर भाषणे ठोकतात.
खासगीकरणात या दोन्ही पक्षांचे आणि त्याच्याशी संबंधितांचे उखळ पांढरे झालेले आहे. पण दोन्हीही पक्ष शेतीमालावर निर्बंध घालतात. बाहेर भाव जास्त असतील तेव्हां देशात तुटवडा होऊ नये म्हणून शेतमाला निर्यातबंदी केली जाते. तसेच देशात जेव्हां शेतमालाचे भाव वाढतात तेव्हां बाहेरून स्वस्तातला शेतमाल आयात होतो. दोन्हीही पक्ष याला अपवाद नाहीत. हे शेतकर्‍याचे दुखणे आहे. त्यावर एकही पक्ष बोलत नाही.

प्रत्येक समाजघटकाचे असे प्रश्न आहेत त्यावर इथले ट्रोल्स आणि या पक्षांचे नरपुंगव नेते चकार अक्षर काढत नाहीत.
सेक्युलॅरिझम आणि हिंदुत्ववाद या विषयावर तात्विक चर्चा ही मुलभूत प्रश्नांपासून काढलेली पळवाट आहे.
याशिवाय धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवण्यात यातले कुणीही कमी नाही. लोकांना तेच तेच तेच ऐकून कंटाळा आलेला आहे. यांनी गुजरातचा विषय काढला कि ते दिल्ली दंगल, शीख हत्याकांड काढणार. पण दोषींना सजा कुणीही देत नाही.

का म्हणून यातले लेसर एव्हिल शोधायचे ? भंपकपणा आहे.
कम्युनिस्टांना सुद्धा हिंसेचे वावडे नाही. सर्वांचे हात रक्ताने लाल आहेत. त्यामुळे या विषयावर चर्चा नको.

लोकांना हे इश्यू नॉन इश्यू आहेत हे शिकवले तरच हे धंदे बंद होतील.

कालच एका रेडिओ वरील चर्चेत कुणी म्हणालं की अमेरिकन मतदाराने आता आर्थिक मुद्द्यांवर/ देशाच्या आणि स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर मतदान करणे बंद केले आहे.
ते चूक बरोबर असं काही नाही, एक निरीक्षण होतं. आणि ही चर्चा वाचली. लिंक सापडली तर देतो.

माननीय पंतप्रधान मागच्या पाच वर्षातल्या विकासावर, पुढच्या पाच वर्षाच्या नियोजनाबाबत काही बोलतच नाही. की काँग्रेस महोदयांना विकासावर बोलू देत नाहीये
https://www.loksatta.com/elections/narendra-modi-reply-to-mani-shankar-a...

>>बलात्कारी लोकांची सुटका झाली व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोशात त्यांचे स्वागत केले असे उदाहरण देऊ शकाल ?
https://www.hindustantimes.com/india-news/priyanka-chaturvedi-makes-her-...
थोर नेत्या प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसवासी असताना मथुरेत त्यांचा विनयभंग वगैरे प्रकार झाले. त्यावरून त्यांनी तक्रार केली. संबंधित लोकांना पक्षातून काढले पण लगेचच त्या कार्यकर्त्यांना रीतसर कॉग्रेसमधे दाखल केले गेले. असा ह्या विदुषीनेच आरोप केला होता.
नंतर थोर नेत्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत गेल्या. तिथेही काही सुरस आणि चमत्कारिक कथांना जन्म दिला. मग शिवसेनेने काँग्रेसशी घरोबा केला त्यामुळे आता थोर नेत्या प्रियांका चतुर्वेदी पुन्हा एकदा काँग्रेसशी खेळीमेळीचे संबंध ठेवून आहेत.

बलात्कारा ऐवजी मास किलिंग, मॉब लिंचिंग करणार्या काँग्रेसी लोकांना निवडणुकीची तिकिटे देणे वगैरे प्रकार काँग्रेसने केले आहेत. ह्यात १९४८ मधे गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात झालेल्या बामण विरोधी दंगली आणि १९८४ साली इंदिरा गांधी हत्येनंतर झालेल्या शीख विरोधी दंगली येतात.

बाकी राहुल गांधी सतत प्रचारसभेत ऐश्वर्या बच्चनला लक्ष्य करतात. ते का? आय मिन तिचा काय संबंध? कोणाच्या अध्यात ना मध्यात ती.
एका सभेत राहुल म्हणाले -and I quote - गरिबो के बारे मे मीडिया मे नहि दिखाना - मीडिया में कूछ दिखाना है तो ऐश्वर्या राय को.नाचते हुए दिखाना है.*
आता आजकाल ऐश्वर्याचा पोन्नियम सेल्वम हा एकच चित्रपट आलाय. कुठे दिसते राहुलना ती टिव्हीवर नाचताना?
ती राम मंदिर उद्घाटनाला उपस्थित नव्हती तरी ती तिथे होती असा दावा राहुल भाषणात करत होते. एकट्या राहु गांधींना ऐश्वर्याचे असे भास असे काय होतात? हे व्हिडिओ युट्यूबवर आहेत.

वास्तविक ऐश्र्वर्या राय बच्चनची आजेसासू तेजी ही इंदिरांची मैत्रीण. पडत्या काळातही तेजीने गांधी परिवाराची साथ सोडली नव्हती. १९७७ ची निवडणूक हरल्यानंतर दिल्लीत काही काळ गांधी परिवार तेजीच्या बंगल्यात रहातही होते. तिच्या नातसूनेबद्दल अशी भाषा वापरणे इंदिरांचा नातू नाही करू शकत,. मायनोपुत्र मात्र करतोय.

खुद्द सोनिया गांधी लग्नाकरता भारतात आल्या तेव्हा प्रत्यक्ष लग्नसमारंभ होईपर्यंत बच्चन कुटुंबात राहात होत्या.

रागाच्या मागच्या वर्षीच्या अमेरिकेतील मुलाखती चांगल्या होत्या. पण परवा एक आयआयटी व अमेरिकेतील एसएटी बद्दल क्लिप पाहिली. ती काही झेपली नाही. खरीच होती की एडिट केली होती माहीत नाही.

Pages