Submitted by जीजी on 2 July, 2021 - 07:11
जीवनभर मी ज्यास शोधले
सरणावर ते स्वप्न भेटले
भिरभिरणारे फूलपाखरू
बघुनी मज गालात हासले
बोलायाचे ठरवले मनी
पण ओठावर शब्द थांबले
हसतमुखाने करुन अलविदा
दुनियेने मज दूर लोटले
पून्हा हिच ती चूक भोवली
आभासाने हृदय धडकले
जीवन मृत्यू , खेळ चालतो
या खेळावर विश्व चालले
जी जी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जीवनभर मी ज्यास शोधले
जीवनभर मी ज्यास शोधले
सरणावर ते स्वप्न भेटले>>> +१
छान ! आवडली.
धन्यवाद ! हाडळीचा आशिक खूप
धन्यवाद ! हाडळीचा आशिक खूप खूप आभार !
>>>>जीवनभर मी ज्यास शोधले
>>>>जीवनभर मी ज्यास शोधले
सरणावर ते स्वप्न भेटले
वाह!
धन्यवाद ! सामो खूप खूप आभार
धन्यवाद ! सामो खूप खूप आभार !