Submitted by सुप्रिया जाधव. on 2 November, 2019 - 20:51
भेटलो ना फोनही केलास तू
रेंज नाही त्या तिथे गेलास तू
सजवते आयुष्य मी निर्जीव हे
प्राण तर देहातला नेलास तू
सांग ना भडका कसा विझवू मना ?
चांदणे म्हणतोस जर तेलास तू
सांब मिळतो का कुठे शोधूनही ?
वाहते आहे जरी बेलास तू
बाप करतो चौकशी आईकडे
करवदत म्हणतो जरी 'मेलास तू !'
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम गझल झाली
उत्तम गझल झाली
बाप करतो चौकशी आईकडे
बाप करतो चौकशी आईकडे
करवदत म्हणतो जरी 'मेलास तू !' मस्तच.
मस्त आहे गझल
मस्त आहे गझल
बाप करतो चौकशी आईकडे
बाप करतो चौकशी आईकडे
करवदत म्हणतो जरी 'मेलास तू !