Submitted by चैतन्य दीक्षित on 6 May, 2019 - 11:07
देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता ।
चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी
दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।।
हासता यावे मला पाहून इतरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।
कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।
~ चैतन्य दीक्षित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान भावना आहेत !
छान भावना आहेत !
आवडली रचना
आवडली रचना
धन्यवाद आसा, हर्पेन
धन्यवाद आसा, हर्पेन
आवडली
आवडली
ह्रदयंगम प्रार्थना.
ह्रदयंगम प्रार्थना.
____/\____
अमित, शशांकजी, धन्यवाद
अमित, शशांकजी, धन्यवाद
Surekh lihilay
Surekh lihilay
अप्रतिम
अप्रतिम
आरसा बघतो तसे येऊ दे जग पाहता >>आवडलेली काव्यपंक्ती.
पु.ले.शु!
किल्ली, मन्या, धन्यवाद
किल्ली, मन्या, धन्यवाद
कोण मी? हा प्रश्न राहो सारखा
कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।>>>> क्या ब्बात!
मस्तच चैतन्य!
छान आहे रचना!
छान आहे रचना!
खरच उत्कट आणि शांतीप्रदायक
खरच उत्कट आणि शांतीप्रदायक प्रार्थना.
छान आहेत मनाचे श्लोक
छान आहेत मनाचे श्लोक