"एकादशी दुप्पट खाशी " - उपवासाची चंपाकली
मायबोलीवर पाककृती स्पर्धेची घोषणा झाली आणि त्यात भाग घेण्यासाठी डोक्यात विचारचक्र सुरु झाले. सर्वात आधी विचार आला की माझ्या मावशीला विचारावे. माझी मावशी अत्यंत प्रयोगशील त्यामुळे दिलेले जिन्नस वापरून ती नक्कीच नवीन काहीतरी पदार्थ सुचवेल ह्याची खात्री होती. पण पुन्हा मनात स्वतःचं असं स्वतंत्र विचारचक्र सुरु झालं.
मध्यंतरी फेसबुकवरच्या एका ग्रुपमध्ये मैत्रिणीच्या आईने चंपाकलीचे फोटो टाकले होते. तेव्हापासूनच ती पाककृती करून पाहायची इच्छा होती. पण मुहूर्त काही लागला नाही. जेव्हा ह्या स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा राजगिऱ्याचं पीठ वापरून चंपाकलीचा प्रयोग करता येईल का असं वाटलं. पण घरातील गणपती आणि अशीच एक अडचण असल्याने शेवटी कालचा मुहूर्त लागला.
राजगिऱ्याच्या पिठाला थोडा चिकटपणा असतो हे मला माहित होते. पण त्याची पातळ पोळी लाटून, त्याला काप देऊन चंपाकलीसाठी गुंडाळणे ह्यासाठी अजून चिकटपणा हवा असे वाटून त्यात शिजलेला बटाटा घालायचे ठरवले. आणि सांगू काय हा प्रयोग यशस्वी झाला.
तर आता सविस्तर साहित्य आणि कृती देते.
साहित्य:
१. उकडलेला बटाटा - १
२. राजगिरा पीठ - त्या उकडलेल्या बटाट्यामध्ये मावेल एवढे (मला अंदाजे ३/४ वाटी लागले)
३. साखर - १/२ वाटी
४. तेल
कृती:
१. उकडलेला बटाटा बारीक कुस्करून घेतला.
२. त्यात राजगिऱ्याचे पीठ मिसळून चांगले मळून घेतले. (ह्यात पाणी अजिबात घातले नाही.)
३. मळलेला गोळा साधारण तासभर झाकून ठेवला.
४. चंपाकलीसाठी पुऱ्या लाटायला सुरु करायच्या आधी एका पसरट भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून पाक करायला ठेवला. साधारण १ तारी पाक तयार ठेवला.
५. साधारण जरा मोठ्या सुपारीएवढा गोळा घेतला आणि त्याची शक्य तेवढी पातळ पुरी लाटली. पुरी लाटताना राजगिऱ्याच्या पीठ लावावं लागलं.
६. त्या पुरीला समांतर असे काप दिले. पुरीच्या कडेपासून साधारण १/२ - १ सेंटिमीटर अंतर ठेवून मध्ये हे काप दिले.(ह्या वेळीचा फोटो काढायचा विसरले.)
७. मैद्याच्या चंपाकलीसाठी जशी ही पुरी गुंडाळतो तशी गुंडाळी केली.
८. छान तापलेल्या तेलात मंद आचेवर खरपूस तळून घेतली.
९. तळलेली चंपाकली तेल निथळायला बाजूला ठेवली आणि नंतर पाकात १/२ मिनिट बुडवून ताटलीत काढली.
अश्या रीतीने एकादशी दुप्पट खाशी साठीची चंपाकली तयार आहे.
टीप:
ह्या साहित्यामध्ये साधारण १२ चंपाकली चे पीसेस झाले.
एवढं सगळं उत्साहाने केल्यावर आला महत्वाचा भाग. घरच्यांनी चव पाहून पावती देणे. नवऱ्याला जेवताना वाढल्यावर त्याने मुकाट्याने खाल्ली. मग मी आवर्जून विचारल्यावर मला म्हणे फारंच छान झाली आहे. विकतचा खाद्यपदार्थ आहे असे खाताना वाटून मी काहीच बोललो नाही. (आमच्याकडे एखादा पदार्थ बाहेरच्यासारखा होणे म्हणजे अत्युच्च दर्जाची पावती मानली जाते. कारण नवऱ्याच्या लहानपणी सासूबाईंनी कौतुकाने शेव करून त्यांच्या मुलाला खायला घातली तर म्हणे स्वस्तिकसारखी झाली नाही! :D)
तर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चव कशी होती? तर चव आणि कुरकुरीतपणा साधारण जिलेबीसारखा होता.
तर ६४ कलांची देवता असलेल्या गणपतीने पाककलेत एक नवीन प्रयोग करून सिद्धीला नेण्याची बुद्धी दिल्याबद्दल आणि मायबोलीने हा प्रयोग सर्वांसमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे अनेकानेक आभार!
मस्त दिसतेय चंपाकली.
मस्त दिसतेय चंपाकली.
मस्त.चिरोट्याची कझिन दिसतेय
मस्त.चिरोट्याची कझिन दिसतेय ही चंपाकली.
अरे वा! सुरेख दिसते आहे. मी
अरे वा! सुरेख दिसते आहे. मी मैद्याची करतो दिवाळीत. पण असा काही प्रयोग करायचे लक्षात आले नाही.
सुरेख दिसतेय चंपाकली
सुरेख दिसतेय चंपाकली
धन्यवाद मंडळी! तुमच्या
धन्यवाद मंडळी! तुमच्या प्रतिक्रयांनी हुरूप वाढला.
चिरोट्याची कझिन दिसतेय ही
चिरोट्याची कझिन दिसतेय ही चंपाकली.
Submitted by mi_anu on 19 September, 2018 - 11:08 >> अगदी अगदी!
सुंदर दिसतेय.
सुंदर दिसतेय.
छान दिसतेय चंपाकली !!!
छान दिसतेय चंपाकली !!! उपवासाचा आणि माझा ३६ चा आकडा आहे, पण जर असे काही खायला मिळणार असेल तर ६३ चा आकडा ठेवायला लागेल
मस्त पाककृती . छानच दिसतेय
मस्त पाककृती . छानच दिसतेय
मस्तच जमलीय.
मस्तच जमलीय.
धन्यवाद, सोनू. गोल्डफिश,
धन्यवाद, सोनू. गोल्डफिश, अश्विनी११ आणि मनीमोहर!
मस्त!!
मस्त!!
चिरोट्याची कझिन दिसतेय ही चंपाकली.>>+१
मस्तच दिसते आहे चंपाकली.
मस्तच दिसते आहे चंपाकली.
व्वा! भारी दिसतेय चंपाकली.
व्वा! भारी दिसतेय चंपाकली.
अरे ही पाहिलीच नव्हती! मस्त
अरे ही पाहिलीच नव्हती! मस्त कल्पना!!
सुंदर
सुंदर
चिरोट्याची कझिन दिसतेय ही
चिरोट्याची कझिन दिसतेय ही चंपाकली.>>+१
मस्तच दिसतेय.. नावपन आवडल मला..
मस्तच !
मस्तच !
व्वा! भारी दिसतेय चंपाकली. >>
व्वा! भारी दिसतेय चंपाकली. >>> + 9999
वा ...सुरेख .. मी मैद्याची
वा ...सुरेख .. मी मैद्याची चंपाकली try करणार होते ..आता उपवासाची करणार आहे ...मस्त च ..
भारी आहे चंपाकली
भारी आहे चंपाकली
धन्यवाद मंडळी! असाच लोभ असू
धन्यवाद मंडळी! असाच लोभ असू दे.
(No subject)