nostalgia

गाणी आणि आठवणी

Submitted by अतुल. on 18 May, 2019 - 06:31

खूप लहानपणीची एक घटना आठवते. ती एक अतिशय उदासवाणी सकाळ होती. पावसाळा नव्हता. तरीही वातावरण कुंद. ढगाळलेले. जाग आली तीच बाहेर सुरु असलेल्या कसल्याश्या गोंधळ आणि गलक्यामुळेच. उठून पाहिले. घरातल्या व शेजारपाजारच्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यांवर धक्का बसल्याचे काळजीचे भाव होते. सगळेजण गंभीरपणे कसलीशी कुजबुज आणि चर्चा करत होते. त्याचवेळी रेडीओवर लता मंगेशकरांचे ते 'गाईड' मधले गाणे लागले होते "काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला, आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है". तसाच बाहेर आलो.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - nostalgia