'मना'ची आनंदयात्रा/ भावजागर

Submitted by नीधप on 12 October, 2026 - 10:14

सध्याच्या अशांत वातावरणात जरा काही आनंदाचं सांगीन म्हणते.
१० ऑक्टोबर ह्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे निमित्त साधून एक कलाकार, शिल्पकार, नाटकवाला, नेपथ्यकार आणि कै. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर पंचवीसेक वर्षे जवळून काम केलेला आमचा मित्र सचिन गावकर ( Sachin Gaonkar ) मनाची आनंदयात्रा या सायकल सफरीवर निघाला आहे.
843434802_10163790320072151_418966121065549732_n.jpeg846449872_10163790302457151_6818553168033070555_n.jpg

१० तारखेला ठाण्याहून ही सफर सुरू झाली. आता येते चार साडेचार महिने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात फिरत फिरत विविध वयाच्या, व्यवसायाच्या लोकांना भेटत महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांचं मन समजून घ्यायचा प्रयत्न तो करणार आहे. महाराष्ट्राच्या माणसांचं माणूसपण शोधणार आहे.

याआधी २०१५मधे सचिनने अश्याच प्रकारची संपूर्ण भारताला प्रदक्षिणा घालणारी सायकल सफर पूर्ण केली होती. काल ११ ऑक्टोबर ला वसईत आमच्या बोलू आनंदे उपक्रमासाठी सचिनने आधीच्या सफरीचे अनुभव आणि आताच्या सफरीची माहिती दिली. भारतातली माणसं कशी कशी आहेत याच्या काही अस्वस्थ करणाऱ्या, तर काही गमतीशीर कहाण्या ऐकून फार छान वाटले.

आपल्या सफरीबद्दल सांगताना सचिन
846302122_10163790302907151_2762804449102620017_n.jpegसफरीच्या कहाण्या ऐकताना रंगून गेलेले श्रोते
845459224_10163790303052151_3630341326965996935_n.jpegसचिन, त्याची सायकल मना, वीणाताई आणि आमचे बोलू आनंदे उपक्रमाचे लोक
848044634_10163790302662151_6239257362064792684_n.jpeg

११ च्या रात्री आमच्या घरी मुक्काम करून आज भल्या सकाळी सचिन पालघरच्या दिशेने मार्गस्थ झाला. ७२ किलोमीटर पूर्ण करून तो आज दुपारी पालघर मुक्कामी पोचला आहे.

आज(१२ ऑक्टोबर) सकाळी वसईहून पालघरकडे मार्गस्थ होताना
847762399_10163790303337151_1129752922157990296_n.jpeg

कै. नाडकर्णी सरांचा आशीर्वाद आणि स्वतःची जिद्द इतक्याच पाठबळावर ही सफर तो करतो आहे. तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तो तुमच्या किंवा तुमच्या जवळपासच्या गावात येणार आहेच. तुमच्या गावात, शाळेत, संस्थेत, मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये येऊन गप्पागोष्टी करायला त्याला नक्की आवडेल.
सचिनच्या नजरेतून महाराष्ट्र समजून घेण्याचा हा सोहळा आता पुढचे चार साडेचार महिने चालत राहील.
या सफरीचे सगळे तपशील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मिळत राहतील. त्या इन्स्टा अकाउंटसच्या लिंक्स येथे देते आहे.
https://www.instagram.com/touringcyclogy
https://www.instagram.com/manacha_bhaavjaagar

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users