मन किती वेडं असतं

Submitted by ashvini.gharpure on 12 October, 2026 - 01:19

मन किती वेडं असतं,
जे त्याला हवं तेच ते स्वप्नांत बघत असतं

फक्त स्वप्नातच नव्हे तर प्रत्यक्षातही तेच व्हावं,
अशी आस लावून बसतं

मनात वियोगाचं दुःख असताना,
चेहऱ्यावर खळखळत हसू घेऊन फिरतं

प्रत्येक क्षणाला ते नवीन उभारी धरतं,
आणि प्रत्येक दिवशी तेवढंच उन्मळूनही पडतं

मनाला विचारांचे हजारो पंख असतात,
तेच रोज नवी उभारी धरतात

हे मन खरंच किती वेडं असतं,
सारखं सारखं तीच आस लावून बसतं

कधी तरी त्याची ही आस पुर्ततेस जाईल,
आणि या मनावरची दुःखाची छटा थोडी पुसटशी होईल

मनाचे हेच विविध रंग, आयुष्याला जिद्दीचा मार्ग दाखवतात,
ह्याच मनास जगण्याची ओढ लावणारी
नवनवीन स्वप्ने दिसतात

------ निहा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults