फर्स्ट डे फर्स्ट शो मॉर्निंगलाच आज बघून आलो. थेटर फुल हाउसफुल. घरी आल्यावर बायकोने विचारले कसा होता? मी म्हणालो मस्त कडक होता. त्यावर ती म्हणाली, मी बघणार नाही तर तूच मला स्टोरी सांग.. मी विचारले दृश्यम-२ पाहिला आहेस का?.. ती नाही म्हणताच मी पाकिटातून पाचशे रुपये काढून तिच्या हातात ठेवले आणि म्हटले ताई माफ कर, हे घे पैसे आणि आधी ओटीटीवर दुसरा बघ, मग थिएटरला जाऊन तिसरा बघ..
यावर ती अवाक! इतरवेळी आपल्या उधळपट्टीला नावे ठेवणारा नवरा आज चक्क खिसा रिकामा करतोय.. पण तिला दृश्यम दोन आणि तीनची स्टोरी सांगण्यापेक्षा पैसे गेलेले परवडले. कुठून सुरू करावी आणि कुठली वळणे घेत सांगावी याचा विचार करूनच डोके भंजाळून गेले. ज्याला हे सारे सुचले, जसे त्याने ते लिहिले, ज्या प्रकारे ते दाखवले, म्हणजे कथा, पटकथा, स्टोरी टेलिंग वगैरे सगळंच भन्नाट. सांगणे सोपेही नाही आणि सांगण्यात मजाही नाही.
दुसरा भाग खरे तर मला इतका आवडला नव्हता. काहीतरी मिसिंग होते, विश्वासार्ह वाटत नव्हते, लूपहोल आहेत असे जाणवत होते. पण मी त्याची चिरफाड करत बसलो नाही. त्याने होत काही नाही, फक्त आपलीच चित्रपट बघायची मजा कमी होते. पण मूळात ती मजा तितकी दुसऱ्या भागात आलीच नव्हती. याला कारण कदाचित पहिल्या भागाने वाढलेल्या अपेक्षा सुद्धा असू शकतील.
यावेळी नेमका उलटा सीन होता. दुसऱ्या भागामुळे माझ्या अपेक्षा फार नव्हत्या. पण उत्सुकता होती. ओरिजनल मल्याळम चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये फर्स्ट हाफ संथ आणि खेचलेला आहे वगैरे वाचल्याचे आठवत होते. पण तरीही मला बघायचा होता आणि या दोन ऑक्टोबरचा निकाल दोन ऑक्टोबरलाच लावायचा होता.
प्रत्यक्षात मात्र मी ऐकलेल्या रिव्ह्यूप्रमाणे काहीच नव्हते. चित्रपट जराही संथ नव्हता. तब्बू आणि अजय देवगनच्या फॅमिलीची आजची परिस्थिती दाखवायला एक-एक सीन घेतला आणि तिथून जो चित्रपट सुटला त्यात क्षणभर विश्रांती घ्यायची एकही जागा नव्हती. एका सेकंदाचाही फाफटपसारा नव्हता.
यावेळी जयदीप अहलावत आणि वकील झालेले प्रकाशराज या दोन नवीन एन्ट्री होत्या. दोघे काय करू शकतात हे माहीत होतेच. पण अहलावत त्यात सुद्धा एक एक्स फॅक्टर घेऊन आला. इन्वेस्टीगेशन ऑफिसरचा टेरर दिसून आला म्हणून त्यानंतर अजय देवगन जे प्रत्युत्तर देतो त्यात मजा येत होती. थिएटरमध्ये पब्लिक टाळ्या वाजवत होती.
संवाद सुद्धा यावेळी एकेक मस्त आहेत. आणि त्यातले कित्येक नंतर त्यामागचा अर्थ उलगडत पुन्हा येतात तेव्हा जास्त मजा आली. गायतोंडे ह्युमर एक वेगळी कॅटेगरी तयार करायला हवी. यावेळी त्याने आणखी धमाल उडवली आहे.
मी ओरिजनल मल्याळम दृश्यम एकही भाग पाहिला नाही. पण त्याचा तिसरा भाग जमला नाही असे जे ऐकले होते ते खरे असेल तर हिंदी मध्ये गेम पलटला आहे एवढे नक्की.
बघून या लवकर.. पिक्चर सस्पेन्स असल्याने सर्वांनी बघितल्यानंतरच बोलण्यात मजा आहे. मग मी ती चर्चा माझ्या बायकोला वाचायला देतो, म्हणजे माझे पाचशे रुपये वाचतील 
कुठल्या थेटरला गेला होता?
कुठल्या थेटरला गेला होता?
कुठल्या थेटरला गेला होता?
डबल झाला.
"मी ओरिजनल तामिळ दृश्यम एकही
"मी ओरिजनल तामिळ दृश्यम एकही भाग पाहिला नाही" - कुणीच पाहिला नाहीये...... कारण ओरिजिनल सिनेमा मल्याळम भाषेत आहे
ही चूक एकाने फेसबुक वर सुद्धा
ही चूक एकाने फेसबुक वर सुद्धा काढली
पण पोस्टमध्ये एका जागी बरोबर लिहिले आहे एका जागी चुकवले. या दोघांमध्ये नेहमी हा घोळ होतो 
पण ठीक आहे, लिखाणातली प्रत्येक चूक किमान दोन प्रतिसाद वाढवतेच
ओरिजिनल मल्याळम पिक्चर तमिळ
ओरिजिनल मल्याळम पिक्चर तमिळ मधे काढला, हे चिटिंग नाही का?
ऋन्मेष, मुलांना बघण्यासारखा
ऋन्मेष, मुलांना बघण्यासारखा आहे का ? पहिले दोन त्यांनी बघितले आहेत, पण टीव्हीवर. परवा जायचा विचार आहे.
येस, मुलांना अगदीच
येस, मुलांना अगदीच बघण्यासारखा आहे.
हिंसाचार, शिवीगाळ, अश्लीलता काहीच नाही.
पहिले दोनमध्येही काही होते का तसे?
अच्छा पहिल्यात मूळ घटनेत काही असू शकेल.. पण यात तसेही काही उल्लेख नाही आता.
ओके
ओके
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=1Dr14qKrBKU&pp=ugUEEgJoaQ%3D%3D
यावेळचा दृश्यम एकदम फॅमिली
यावेळचा दृश्यम एकदम फॅमिली फ्रेंडली वरणभात आहे. लहान मुलांना घेऊन बघू शकता.
एका सीनमध्ये अजय देवगण च्या डोळ्यातल्या लाल शिरा एकदम क्लोजप घेऊन दाखवल्या आहेत.इथे तो 2 मोठ्या मुलींचा बाप आहे, ताणात आहे म्हणून हा क्लोजप आपण स्टोरीला उचित मानावा अशी अपेक्षा आहे.
एकंदर बघण्यासारखा आहे.जयदीप अहलावत चे केस बघून जेलसी वाटली
'मदिरा पीकर सो गये?'हे मिम्स बनण्यायोग्य आहे.
यावेळी औरा मोमेंट्स छान जमले
यावेळी औरा मोमेंट्स छान जमले आहेत. यामध्ये अजय देवगनचे कॅरेक्टर आधीच डेव्हलप झाले असल्याचा सुद्धा फायदा मिळाला असेल.
दुसरीकडे एका चर्चेवरून हाती
दुसरीकडे एका चर्चेवरून हाती लागलेली माहिती -
.
हा साउथ पिक्चरचा जसाच्या तसा रिमेक नाहीये.
त्या लोकांनी पसरट सिनेमा बनवला आणि चौथा भाग काढणार आहेत.
हिंदीवाल्यांनी कडक सिनेमा बनवला आणि हे पुढचा भाग काढणार नाहीत.
बॉलीवूड रॉक्स! मल्याळम शॉक्स!!
मी ओरिजनल तामिळ दृश्यम एकही
मी ओरिजनल तामिळ दृश्यम एकही भाग पाहिला नाही" - कुणीच पाहिला नाहीये......
>>
मी पाहिले दोन्ही पाहिले आहेत मल्याळम मधे
पहिल्याचा तमिळ (पापनसम - कमल हासन) अन् कन्नडा (दृश्या - रविचंद्रन) रीमेक पण पाहिलेत
मला मल्याळी भाग बोअर झाला
मला मल्याळी भाग बोअर झाला पहिला.त्यात शेवटी मारल्यावर कोणाच्याही चेहरा किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर दिसतील असे वळ दिसत नाहीत(काहीजण म्हणतील पोलीस वळ दिसू नये असेच मारतात) पण जर नंतरचा पब्लिक आउटरेज चा भाग खरा करायचा तर हिंदी व्हर्जन सारखे वळ जखमा दिसणं गरजेचं होतं असं वाटलं.
ऋन्मेष, दृष्यम ३ च्या तुझ्या
ऋन्मेष, दृष्यम ३ च्या तुझ्या रिव्ह्यूशी टोटल सहमत. अ तिशय वेगवान, खिळवून ठेवणारा सिनेमा आहे. पडद्यावर इंटरमिशन ची अक्षरं झळकली तेव्हा ‘इतक्या लवकर?‘ अशी प्रतिक्रिया होती थिएटर मधे. अहलावत, प्रकाश राज, कमलेश साळवी - सगळ्यांचीच कामं छान आहेत. ओव्हरऑल, एक छान जमून आलेला सिनेमा आहे.
मी ott वर आल्यावर बघेन,
चांगलं लिहिलंय.
मी ott वर आल्यावर बघेन, देवगणच्या बाजूने असेल तरच अर्थात.
पहिले दोन्ही आवडले, दुसऱ्यात कसा काय तो वाचणार असा जीव मुठीत धरून असताना, शेवटचा अर्धा तास मस्त वेगवान आहे.
मला मोहनलाल, अजय देवगण दोघेही आवडतात पण मी मल्याळम बघायचा नाही कुठलाही, हिंदीच बघायचं, ठरवलं आहे.
शनिवारी पाहिला
शनिवारी पाहिला
जयदीप अहलावत ने साकारलेला "राजीव सिंग तोमर" आणि प्रकाश राज ने साकारलेला "इंद्रजित शेट्टी" भारी जमला आहे.
सगळ्यात जास्त हशा गायतोंडे याने पिकवला आहे.
'मदिरा पीकर सो गये?' हा संवाद तर जबरी.
दृश्यम ३ मधे अर्जुनाच्या "गाण्डीव" धनुष्याला दिव्यास्त्र म्हटलं आहे
गायतोंडे ह्युमर एक वेगळी
गायतोंडे ह्युमर एक वेगळी कॅटेगरी तयार करायला हवी. यावेळी त्याने आणखी धमाल उडवली आहे.>>> ह्याला मोदक.
मी परवा पाहिला. पस्तावा झाला नाही पण अजून शेवटी १० मिन अॅडीशन असेल असे सारखे राहून राहून वाटते होते. तब्बू & अजय मधे. ज्यात तब्बू सांगते की ती किती सफर करतेय मुलाच्या आठवणींत आणि मग तो सांगेल की त्याचे तर आयुष्य उध्वस्त वगैरे झालेय. पल पल मर रहा हूं .. मग तिचं मन परीवर्तन होईल..
तो मुली च्या स्थळाचा प्रसंग बळेच आहे..
कारण तब्बू ला तिचा मुलगा ३रा भाग आला तरीही कुठेच चूक वाटत नाहीये.. त्याने त्या मुलीचा व्हिडीओ काढलेला असतो, तिला ब्लॅक मेल करत असतो, अजून म्हणजे परत तिला हॅरस करायला ही जातो आणि मग तिच्या आई वर ही हात टाकतो. ह्याचं तब्बू ला काहीच नाही वाटत.. (सध्याचे रेप्स, मुलं मानसिकता विक्टिम ब्लेमींग ह्यावर प्रकाश टाकायचा चांगला चांस सोडला)
जईदीप फार आवडतो, पण इथे छाप न सोडता नुसता धूर (सतत धुम्रपान, वाटत होतं त्याच्या सिगारेट वर पेला भर पाणी ओतावे) सोडतो.
२र्या भागात फॅमिली टोरचर प्रसंग पण बळेच होता, असं खरंच होत असेल का? इतक्या प्रमाणात..
ऑव्हरॉल, वेळ असेल तर जावा, नसेल तर वेळ काढून अगदी जायची गरज तशी नाही.
शेवटचा भाग असल्याबदद्ल, फारेंड ची पोस्ट हेमाशेपो नंतर.. लिहिणार नव्हतो पण
ह्याला अनुमोदन. माझा नवरा म्हणाला, हे कनच्लुजन अहे पुढे आखरी कनक्लुजन असे येईल 
Conclusion_final.pptx
Conclusion_final.pptx
बघितला काल. मस्त आहे. जयदीप
बघितला काल. मस्त आहे. जयदीप अहलावतसाठी तीन बदाम

प्रकाश राजचंही काम मस्त आहे. तबू मला पहिल्या भागात फारशी आवडली नव्हती. दुसऱ्या भागाचं लक्षात नाही, पण या तिसऱ्या भागात आवडली.
पण आता वाटतं, एवढं सगळं करण्यापेक्षा तेव्हाच तो चुकून झालेला खून रिपोर्ट केला असता तर? अर्थात आई आणि मुलगी panic मुळे मृतदेह पुरून टाकतात. ते अडचणीचं झालं असतं. पण तरीही, काय तो एकदाच उलगडा झाला असता
<<< पण आता वाटतं, एवढं सगळं
<<< पण आता वाटतं, एवढं सगळं करण्यापेक्षा तेव्हाच तो चुकून झालेला खून रिपोर्ट केला असता तर?
>>>>
हो ना, पण त्या बिचाऱ्याना तरी कुठे माहीत होते तेव्हा की हे लोकं सिक्वेल वर सिक्वेल काढत आपल्याला वर्षानुवर्षे अडकवून टाकतील..
(No subject)
मला दोन्ही भाग खुप आवडले होते
मला दोन्ही भाग खुप आवडले होते त्यामुळे तिसरा नक्कि बघणार ! ओटीटी वर यायची वाट बघेल..
आशु, तब्बुला माहीतच नाहीये ना
आशु, तब्बुला माहीतच नाहीये ना तिच्या मुलाने काय केलं आहे ते
.
कारण त्याने जे केलं आहे ते फक्त या च कुटुंबाला माहीत आहे. त्यांनी ते कबुल करणं म्हणजे स्वतः हुन खुनाचा आरोप मान्य करणं.
बहुतेक तिचा असा समज आहे की दोघांच्या संमतीने त्यांच्यात नको ते घडताना तिच्या आईने पाहिलं आणि म्हणुन हिच्या मुलाला मारुन टाकलं.
आधीचे दोन्ही भाग आवडले होते
आधीचे दोन्ही भाग आवडले होते त्यामुळे तिसरा बघणार !
ओटीटी वर यायची वाट पाहीन
+ १
तब्बुला माहीतच नाहीये ना
तब्बुला माहीतच नाहीये ना तिच्या मुलाने काय केलं आहे ते>>>> अर्रे हो. ते आलंच नाहिये एव्हिडन्स मधे पण.
२र्या भागात अ.दे. तब्बू च्या नवर्याला भेटून काहितरी सांगतो की करावे लागले तसे वगैरे..
आशु, तब्बुला माहीतच नाहीये ना
आशु, तब्बुला माहीतच नाहीये ना तिच्या मुलाने काय केलं आहे ते >> पहिल्या भागातच सॅमच्या मित्राने तब्बूला सांगितले असते.
पहिल्या भागात दाखवलं आहे
पहिल्या भागात दाखवलं आहे सॅमचा एक मित्र येऊन त्याच्या आईवडिलांना सांगतो त्याने काय केलं होतं ते. त्यामुळे त्यांना माहिती आहे. प्रत्यक्ष खून कसा झाला हे नसेल माहिती.
सॅमने ट्रिपमधे व्हिडीओ काढला
सॅमने ट्रिपमधे व्हिडीओ काढला हे सांगितलं होतं त्या मित्राने, पण प्रत्यक्ष घरी भेटल्यावर तो आधी मुलीशी आणि मग आईशीसुद्धा कसा वागला हे त्या कुटुंबालाच माहिती होतं ना पण?
म्हणजे सॅमने खरंच पुढे नक्की काय केलंय हे तब्बूला माहिती नाही असं मी समजते आहे.
तब्बूला माहीत असतात आपल्या
तब्बूला माहीत असतात आपल्या मुलाचे प्रताप. म्हणजे त्याने असा व्हिडिओ काढला हे पहिल्या भागातच आले आहे.
फक्त मृत्यू अपघाती होतो की देवगण आणि फॅमिली त्याच्या या दुष्कृत्याची त्याला शिक्षा द्यायला प्लान करून बोलावून मारतात याची खात्री नसते.
म्हणून पब्लिकला तब्बूची आताची स्थिती बघून सहानुभूती वाटली तरी अजय देवगण या केस मधून सुटावा असेच वाटते.
प्रत्यक्ष आयुष्याचा विचार करताही एखाद्या मुलीबाबत कुठलाही गैरप्रकार झाला किंवा कोणी करायचा प्रकार केला त्याला रोखायला त्या मुलीच्या बापाने घातला त्या मुलाच्या डोक्यात दांडका. ज्याने मेला तो मुलगा जागीच आणि नंतर समजले की तो कोणीतरी मोठ्या नेत्याचा किंवा पॉवरफुल माणसाचा मुलगा आहे ज्यामुळे न्याय मिळेलच याची खात्री नाही तर कोणीही तो गुन्हा लपवायचाच प्रयत्न करेल.
आणि तब्बूला जर एवढाच न्याय हवा असतो तर आपल्या मुलाने काय केले जे जगासमोर आणून खुनाचे मोटीव का नाही जगासमोर आणत..
Pages