नाजूक अर्थव्यवस्थेमुळे सरकारने नुकतेच कडक निर्बंध लागू केलेले आहेत. नागरिकांना काटकसरीने रहावे लागणार आहे. उधळपट्टी आणि नासाडी यावर पूर्णपणे बंधनं आलेली आहेत.
डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईमुळे इंधनाचा वापर कमीत कमी करावा लागणार आहे. खालील नियम ठळक आहेत.
१. लग्नसमारंभ आणि अशा अन्य समारोहात जेवणात फक्त एकच जिन्नस थाळी ठेवायला परवानगी. पूर्वीप्रमाणे सतराशे साठ पदार्थांची रेलचैल चालणार नाही.
२. बाजारपेठा आता रात्री साडेनऊ वाजता बंद कराव्या लागतील.
३. भाजीमार्केटच्या वेळांवर बंधने
४. शॉपिंग मॉल्स रात्री नऊ वाजता बंद ठेवावे लागणार
५. लग्नाचे हॉल आणि अशी इतर ठिकाणे तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरण्टस रात्री दहा वाजता बंद करावी लागणार
६. पार्सल आणि घरपोच सेवांना यातून वगळले आहे.
७. सरकारी खर्चाला कात्री
८. इंधनात ५०% कपात. ही कपात तीन महीने जारी राहील. संकट टळल्यानंतर तीन महीन्यांनी मागे घेण्यात येईल किंवा पुढे चालू राहील.
९. परदेशदौर्यांवर बंदी, function at() { [native code] }यावश्यक सेवा वगळल्या आहेत.
१०. मेजवान्या, सेमिनॉर्स आणि अनावश्यक बैठका पुढील आदेशापर्यंत रद्द.
११. वीजेच्या वापरावर निर्बंध
१२. सोशल मीडीयाच्या वापरावर बंदी
होमुर्झच्या खाडीतल्या परिस्थितीमुळे ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे ही बंधने देशाला नाईला़जाने जारी करावी लागली आहेत.