Submitted by अनन्त्_यात्री on 19 September, 2026 - 02:58
बोतल बोले तो बरबादी.....
...."नवरसे" घराण्यातले आम्ही नऊ बंधू पिऊन चारचाकी चालवताना एकसमयावच्छेदे खपलो.
यथावकाश चिकित्सक चार्वाकवाद्यांना चकवून चक्क भुतं झालो.
"भूतदयाभवन" या वडिलोपार्जित वाड्याला प्रवेशद्वारापासून पार परसबागेपावेतो पछाडलं.
काल मध्यरात्री टाईमपाससाठी "अर्थालंकार / शब्दालंकार" असा खेळ खेळत आम्ही तरंगत असताना वाड्याच्या दारावर थाप पडली.
मी भूतच ! न भिता दार उघडलं.
"तो" तडक आतच आला.
आम्ही भुकेनं भंजाळलो होतो.
मतकऱ्यांच्या "जेवणावळ" कथेतील ट्विस्ट आठवून आम्ही जिभल्या चाटू लागलो तोच "त्यानं" काहीतरी पुटपुटत भक्क उजेड केला. आम्ही भुतांनी दिपलेले डोळे मिटले.
डोळे उघडतो तो काय?
आम्ही एकसमयावच्छेदे त्याच्या हातातल्या बेढब, बळकट, बोरोसिलिकेट बाटलीत बूचबंद !
...... बोतल बहुतही बूरी बबुआ.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाटली काही पिच्छा सोडत नाही
बाटली काही पिच्छा सोडत नाही
मस्त!!!
मस्त!!!
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
आवडली शशक
आवडली शशक
मस्त!
मस्त!
बाटलीत बूचबंद धमाल आहेत भुतं
बाटलीत बूचबंद 😀
धमाल आहेत भुतं
हाहाहा अफाट!
हाहाहा अफाट!
(शाब्दिक नाही पण अर्थाचा आहेच की)
>>>>>बोतल बहुतही बुरी बबुआ
श्लेष
(No subject)
सुंदर!
सुंदर!
लोल.
लोल.
मस्त.
मस्त.
(No subject)