सावली

Submitted by तुष्कीनागपुरी on 18 September, 2026 - 01:47

आयुष्याच्या रखरखत्या उन्हात
तू शीतल सावली झालीस आई !
आमची वाट उजळण्यासाठी मात्र
स्वतःच एक ज्योत झालीस.
.
अखंड तेवत राहिलीस
स्वतःला कणाकणाने जाळत...
आमच्यासाठी प्रकाश होताना;
स्वतःच्या जळण्याची तू
कधीच पर्वा केली नाहीस !
.
आज उजेडात उभं राहून मागे पाहताना,
काळजात सल दाटून येते
स्वतः जळून इतरांना सावली देणाऱ्या
ज्योतीच्या वाट्याला
स्वतःची सावली देखील कधी नसते !
.
तुष्की नागपुरी
पछमढ़ी, शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६, २२ः२०

Group content visibility: 
Use group defaults